Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हडपसरमध्येही बॉम्बची अफवा

$
0
0
हडपसर येथे बेवारस बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने घबराट पसरली. पोलिसांच्या बॉम्बशोध पथकाने बॅगची तपासणी केल्यावर ती केवळ अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. सोलापूर रस्त्यावरील राज्य परिवहन महामंडळाच्या थांब्यावर बेवारस बॅग पडली होती.

अंध मुलींचेही ढोल ताशा पथक

$
0
0
अंधत्वामुळे भलेही जग दिसत नसेल, मात्र जागृत संवेदना आणि जिद्दीने आम्ही त्यावर मात करू शकतो याचा दाखला कोथरूड येथील अंध शाळेच्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी दिला. एका ठेक्यात अन तालात ढोल-ताशा-झांज वादन करून या विद्यार्थिनींनी कसबा गणेशाच्या चरणी आपली सेवा रुजू केली.

‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू

$
0
0
‘स्वाइन फ्लू’ची लागण झालेल्या नामदेव महादेव खरात (वय ५३, रा. पिंपळेगाव, खरातवाडी, जि. अहमदनगर) यांचा शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पूना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. शहरात अठरा जणांना नव्याने स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यातील एक जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत.

दादा, भाईंमुळे ‘RPI’मध्ये फूट?

$
0
0
‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे (आरपीआय) वेगवेगळे गट एकत्र येऊन ''भाईचारा'' होण्यास सुरूवात झाली असतानाच, ''दादा'' आणि ''भाई'' यांच्यामुळे पुन्हा ‘आरपीआय’मध्ये अंतर्गत फूट पडली असल्याचे, वृत्त आहे.

सोलर एलईडी गणेशातून सामाजिक ऐक्याचे दर्शन

$
0
0
गणेशोत्सवाला सामाजिक ऐक्याची आणि पारंपरिक ऊर्जा वापराची जोड मिळते, तेव्हा एका आगळ्या उत्सवाचे दर्शन घडते. जनवाडी-गोखलेनगर येथील आयुबखान पठाण यांनी साकारलेल्या ‘सोलर एलईडी लायटिंग इकोफ्रंडली फोर इन वन गणेश’ त्याचेच प्रत्यंतर देतो.

मध्य पुण्यात प्रबोधनपर देखाव्यांची रेलचेल

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांनी उभारलेले पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक देखाव्यांना यंदाही गणेशभक्तांची पसंती मिळू लागली आहे. गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ आणि घोरपडे पेठेतील देखावे पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करू लागले आहेत. काही मंडळांनी महागाई, भ्रष्टाचार आणि दहशतवाद या विषयांना हात घालून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.

ऐतिहासिक आणि सामाजिक देखाव्यांवर भर

$
0
0
ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक देखा‍व्यांवर भर देत खडकीतील गणेशोत्सव मंडळांनी यंदाही वेगळेपणाची परंपरा राखली आहे. विविध विषयांवरील हे देखावे पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.

काळेवाडी परिसरात जिवंत देखावे

$
0
0
पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक या विषयांवर देखावे सादर करीत काळेवाडी, रहाटणी, थेरगाव परिसरातील मंडळांनी यंदाही परंपरा कायम राखली आहे. काळेवाडी, रहाटणी, पिंपळेसौदागर भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हलत्या देखाव्यांची परंपरा यंदाही कायम राखली असून काळेवाडीतील आदर्श मंडळाने आठ मूर्तींच्या सहाय्याने ‘जागरण गोंधळ’ देखावा केला आहे.

मार्चपर्यंतच्या कोट्याचा संभ्रम दूर व्हावा

$
0
0
यंदाच्या वर्षात मार्चपर्यंत तीन सिलिंडर सवलतीत देण्यात येतील, असे जाहीर झाले आहे. मग ज्यांनी आत्तापर्यंत तीनपेक्षा कमी सिलिंडर वापरले आहेत, त्यांच्याबाबत काय निर्णय घेणार, असा प्रश्न उपस्थित झाल्याचे ‘ऑल इंडिया एलपीजी डिस्टिब्युटर्स असोसिएशन फेडरेशन’चे अध्यक्ष प्रताप दोशी यांनी सांगितले.

ढोल-लेझीमच्या निनादात विसर्जन

$
0
0
मावळात ‘मावळी’ ढोल- लेझीमच्या निनादात आणि महिलांच्या पारंपारिक खेळांच्या तालावर पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचे, ‘गणपती बाप्पा मोरय्या, पुढच्या वर्षी लवकर या,! या जय घोषात भक्तीमय वातावरणात उत्साहात विसर्जन करण्यात आले. मावळात ग्रामिण भागात ‘ एक गाव एक गणपती ’ संकल्पनेला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दुरावलेली ऐक्याची भावना रुजण्याला सुरुवात झाली आहे.

रंगमंचावरच हॅपी बर्थडे....

$
0
0
हास्यांच्या कारंज्यात नाट्यप्रयोग संपला...लाईटस् ऑफ झाले....पडदाही पडला...आणि काही क्षणात पुन्हा बॅकस्टेजला लाईटस् ऑन होऊन हॅपी बर्थ डे टू यू चे सूर उमटले...या अनोख्या सरप्राईज गिफ्टने ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर भारावून गेल्या.

शंकर-पार्वती विवाह ते चिल्लर पार्टी

$
0
0
होतकरू रंगकर्मींच्या सहकार्याने शंकर-पार्वती विवाहासारख्या पौराणिक विषयापासून ते स्त्री-भ्रूणहत्या, चिल्लर पार्टी, कारगिल युद्धासारख्या विषयांवरील जिवंत देखावे यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरत असून, नागरिकांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लाऊडस्पीकरची मर्यादा १२ पर्यंत वाढल्यानंतर येत्या आठवडाभरात या देखाव्यांच्या घोष उत्सवात अधिकच भरून राहील.

शिवतारे यांचे उपोषण मागे

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर आमदार विजय शिवतारे यांनी सुरू केलेले उपोषण रविवारी मागे घेतले. गुंजवणी-वीर धरणांचे पाणी पुरंदरवासीयांना मिळावे, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते.

घरपोच सिलिंडर बंद करणार?

$
0
0
सवलतीच्या दरानंतर दिला जाणारा सातवा सिलिंडर नक्की कोणत्या दराने ग्राहकांना द्यायचा याबाबतच्या कोणत्याही स्पष्ट सूचना या महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारने न दिल्यास येत्या एक ऑक्टोबरपासून सिलिंडरची घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) बंद करण्याचा इशारा सिलिंडर वितरकांच्या संघटनेने दिला आहे.

पाच वर्षीय मुलाचा खून

$
0
0
सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच पुण्यातील पाषाण परिसरात ह्दय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गणपती बघण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन एका पाच वर्षीय मुलाचा त्याच्याच शेजारच्या तरुणांनी गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

पुण्यात इमारत कोसळून सहा ठार

$
0
0
पुण्यातील तळजाई पठाराजवळच्या सहकार नगर येथे बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळून सहा लोक ठार झाले. आणखी दहा ते बारा लोक ढिगा-याखाली अडकल्याची भीती असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

...आणि दहा जीव वाचले

$
0
0
‘दुर्घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा ढिगाऱ्याखालून लहान मुलींचे आवाज ऐकू येत होते. काही वेळाने तेथे पोहोचलेल्या बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ते आवाज ऐकले नव्हते. त्याठिकाणी ढिगारा हटविण्यास पोक्लेन सुरू होणार, तेवढ्यात मी त्या सर्वांना तेथे मशिन लावू नका, असे सांगितले. त्यामुळे सगळे बाजूला झाले....आणि काही काळाने त्याच ठिकाणी अडकलेल्यांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले...’

केवळ दैव बलवत्तर म्हणून

$
0
0
तळजाई पठारावरील दुर्घटनाग्रस्त इमारतीत पंधरा दिवसांपूर्वीच राहण्यासाठी आलेल्या नागेश कांबळे यांच्या कुटुंबावर मंगळवारी मोठे संकट कोसळले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन मुलींच्या सुटकेसाठी माता-पित्याचा आक्रोश अनेकांच्या काळजाला भेदून गेला. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या तिघी ढिगाऱ्याखालून सुखरूप निघाल्या.

विसर्जनादरम्यान धरणात बुडालेल्या युवकाला वाचविले

$
0
0
गणेश विसर्जनासाठी तो धरणाच्या खोल पाण्यात उतरला, मात्र धाप लागल्याने तो तरुण बुडू लागला. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. दोघा तरुणांनी त्याचे प्राण वाचविले. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता खानापूर येथे ही घटना घडली.

निधी नसल्याने कामे करता येत नाहीत

$
0
0
नागरीकरण वाढले, लोकांच्या अडचणीही दिसू लागल्या. त्याची सोडवणूक तर करावीच लागणार आहे. परंतु, निधीची चणचण भासत असल्याने कामे मार्गी लावणे शक्यत नाही. निधीचे कारण लोकांना सांगून भागत नाहीत. अडचणी तर सोडवाव्याच लागणार आहेत. आता निधी द्या मग बघा काय होईल...ही व्यथा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची!
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images