Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मागण्यांसाठी शेतकरी संघटनेची दिंडी

$
0
0
उसाचा मागील दोन वर्षांचा हिशेब पूर्ण झाल्याशिवाय साखर कारखान्यांला गाळप परवाने देऊ नयेत, उसासह विविध शेतमालावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठवावी, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान जिल्हावार पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १५ ऑक्टोबर रोजी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

KEMमध्ये यकृत प्रत्यारोपण केंद्र

$
0
0
शतकोत्तर महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केईएम हॉस्पिटलचे होणा-या विस्तारीकरणात पुण्यातील पहिले यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याबरोबरच विविध प्रकारच्या पेशंटसाठी अतिदक्षता विभाग (आयसीयू) देखील सुरू करण्यात येणार आहेत.

परंपरा जतनाचा ऋषिपंचमीदिनी संदेश

$
0
0
‘भारतीय संस्कृती आणि परंपरेचे महत्त्व तरुणांना समजाविण्याची व त्यासाठी त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमांतील सहभाग वाढविण्याची गरज आहे,’ असे मत मान्यवरांनी गुरुवारी व्यक्त केले. याच व्यासपीठावर ऋषितुल्य व्यक्तिमत्वांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला.

वॉल पेटिंग्जमधून वंचितांना न विसरण्याचा संदेश

$
0
0
गणरायाचा उत्सव साजरा करताना वंचितांना विसरू नका, असा संदेश शुक्रवार पेठेतील बाल शिवाजी मंडळाने वॉल पेंटिंग्जच्या माध्यमातून दिला आहे. तब्बल ४५ फूट बाय १२ फूटांच्या वॉलवर फुटपाथवरील जगणे मंडळाने साकारले आहे.

‘श्री संग्रह’

$
0
0
फ्लॅटच्या दरवाज्यामधून आत पाऊल टाकले, की लक्ष वेधून घेणारा परशुधारी गणपती… कुठे पाकिस्तानमधून आणलेली हिरव्या रंगाची झलक लाभलेली गणेशाची प्रतिकृती… कुठे उजव्या आणि डाव्या सोंडेची दोन मस्तके एकत्र असलेल्या जेमिनी गणेशाची मूर्ती... अष्टविनायकाच्या प्रतिकृती कोरलेले भले मोठे लाकडी वॉलपीस कुठे, तर अगदी नाजूक पेटीमध्ये ठेवलेला तितकाच नाजूक प्रवाळ गणेश कुठे !

राज्यात धर्मप्रसारासाठी चर्च उभारणार

$
0
0
‘मेथोडिस्ट मराठी चर्चच्या माध्यमातून ख्रिस्त धर्माच्या प्रसारासाठी पुण्यामध्ये चालणारे उपक्रम स्तुत्यच आहेत. अशाच पद्धतीने इतर ठिकाणीही धर्मप्रसाराचे कार्य व्हावे, या साठी राज्यामध्ये आठ नव्या मेथोडिस्ट चर्चची स्थापना करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत,’ अशी माहिती ‘बॉम्बे रिजनल कॉन्फरन्स’चे (बीआरसी) बिशप डॉ. प्रदीप सॅम्युअल यांनी शनिवारी दिली.

श्रमिक भवनासमोरील दरोड्याची उकल

$
0
0
डोळ्यांत मिरची पूड टाकून भरदिवसा २६ लाख रुपये लुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने पाचजणांना अटक केली आहे. तर अद्याप दोनजण फरार आहेत. आरोपींकडून २२ लाख ९५ हजार रुपये आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेजवळ असलेल्या श्रमिक भवन येथे हा प्रकार घडला होता.

होर्डिंगप्रकरणी प्रशासन नमले?

$
0
0
‘होर्डिंग धोरणास सरकारची मान्यता मिळण्यापूर्वीच सध्याच्या होर्डिंगचालकांना मुदतवाढ दिल्यास महापालिकेचे मोठे नुकसान होईल,’ अशी भीती व्यक्त करणा-या प्रशासनाने आता स्वतःच या होर्डिंगचे पैसे भरून घेण्याचा वादग्रस्त प्रस्ताव ठेवला आहे. खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे खुद्द प्रशासनानेच म्हटले आहे.

पिस्तुले बाळगल्याबद्दल सराईत गुन्हेगार अटकेत

$
0
0
कुख्यात गुंड शरद मोहोळच्या टोळीतील सराईत गुन्हेगाराला दोन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अर्जुन उर्फ अण्णा शिवाजी साबळे (वय २७, रा. बहुळ, साबळेवाडी, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. साबळे लोहगाव-वाघोली रोडवर आकाश ढाब्यासमोर पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती गुंडगिरीविरोधी पथकाच्या उत्तर विभागाचे पोलिस कर्मचारी कृष्णा बढे यांना मिळाली होती.

वीकएंडचा उत्साह, आकर्षक देखावे अन् तुडुंब गर्दी

$
0
0
गौरीपूजन झाल्याने गृहिणींना मिळालेली उसंत, शनिवारचा वीकएंड आणि पावसाने घेतलेली विश्रांती असा तिहेरी योग जुळून आल्याने गणेशोत्सवाच्या पहिल्या शनिवारी शहरातील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेले. सुटीमुळे शहर आणि उपनगरांसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधील भक्तांनीही आवर्जून हजेरी लावली.

विसर्जनासाठी पार्किंग व्यवस्था

$
0
0
गणपती विसर्जनादरम्यान घाटावर होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यात येते. विसर्जन घाटावर ‘श्रीं’ची मूर्ती वाहनातून उतरुन घेतल्यानंतर वाहने तात्काळ हलवावीत, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

वनखात्याची जमीन लाटणा-या बिल्डरला अटक

$
0
0
वानवडी येथील वनखात्याच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध वानवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या गुन्ह्यात महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांचा समावेश असल्याचा तपासात निष्पन्न झाले आहे.

विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन उपचारसेवा

$
0
0
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी वाहतूक पोलिसांसह स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मिरवणुकीदरम्यान शहरातील अकरा ठिकाणी अॅम्ब्युलन्सच्या सेवा देण्यात येणार असून त्यात डॉक्टरांचे प्रत्येकी एक पथक तैनात राहणार आहे.

शिवतारे यांच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी ‘सासवड बंद’

$
0
0
गुंजवणी -वीर धरणाचे पुरंदरच्या वाट्याचे पाणी मिळावे यासाठी गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करणारे आमदार विजय शिवतारे यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण तालुक्यात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

येत्या सोमवारपासून शनिवारवाडा महोत्सव

$
0
0
माननीयांच्या आग्रहामुळे होऊ घातलेल्या नऊ ठिकाणच्या महोत्सवांचा बेत रद्द करून महापालिकेच्या वतीने एकाच ठिकाणी आयोजिण्यात आलेला शनिवारवाडा महोत्सव येत्या सोमवारी सुरू होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यंदा टेंडर काढून कार्यक्रम निश्चित करण्यात आले असून, वीस लाखांची तरतूद असतानाही केवळ नऊ लाखांत हा महोत्सव होणार असल्याचे सांगण्यात आले.

क्रीडा संस्कृती रुजण्यासाठी 'कॉर्पोरेट्स'ने पुढे यावे

$
0
0
‘आपल्याकडे गुणवान खेळाडूंची कमतरता नाही; पण पैशामुळे अनेक गोष्टी अडतात. अनेकदा प्रकाशझोतातील खेळाडूंना कॉर्पोरेट क्षेत्राकडून मदत मिळते. मात्र, ख-या अर्थाने लहान वयातच गुणवत्ता हेरून, अशा उदयोन्मुख खेळाडूंना मदतीचा हात दिला पाहिजे,’ असे मत भारताचा ऑलिंपिकपदक विजेता नेमबाज गगन नारंग याने व्यक्त केले.

यंदा फक्त अनंत चतुर्दशीला मुठा नदीत पाणी सोडणार

$
0
0
पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणांत पुरेसा पाणीसाठा झाला नसल्याने यंदा फक्त अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जाणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागासाठी कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे.

मॅटवरील कुस्तीला प्रोत्साहन मिळावे

$
0
0
‘एकीकडे आखाडे भरवली जातात. मात्र, दुसरीकडे मॅटवरील कुस्तीला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. यापुढील काळात मॅटवरच्या कुस्तीला प्रोत्साहन मिळायला हवे,’ अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

बॅग पळविणा-या चोरट्यास अटक

$
0
0
शिवाजीनगर एसटी स्थानकात बसमध्ये बसलेल्या एका महिलेची २१ तोळे सोने असलेली बॅग लंपास करणा-या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

घरे फोडणारे चोरटे अटकेत

$
0
0
कर्वेनगर आणि वारजे परिसरात घरफोड्या करणा-या चोरट्यांना पकडण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात असून, त्यांनी दहा घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images