Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘गव्हर्नन्स’च्या पारंपरिक कल्पना कालबाह्य

$
0
0
‘सरकार आणि समाज यांच्यात परस्परांबद्दल गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे गव्हर्नन्सच्या पारंपरिक कल्पना नामशेष होत आहेत. यातूनच, आधुनिक भारतासाठी आवश्यक अशी नवी व्यवस्था निर्माण होईल’, असा आशावाद दिल्लीच्या ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’चे अध्यक्ष डॉ. प्रताप भानू मेहता यांनी सोमवारी व्यक्त केला.

शुभची आठवण येईलच

$
0
0
उत्साही, चुणचुणीत आणि गुणी शुभ कॉलनीतील सर्वांचाच लाडका होता. रविवारी रात्री गणपतीची आरती केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटणाऱ्या शुभचा त्यानंतरच काही वेळाने दुर्देवी अंत व्हावा, याचा डीआरडीओच्या रामनगर कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना चांगलाच धक्का बसला. सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या रावल कुटुंबीयांबाबत ही घटना घडल्याने रामनगर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

तीन साक्षीदारांची सरतपासणी

$
0
0
‘स्वारगेट बसस्थानकातून एसटी बस पळवून ती बेदरकारपणे चालवत निघालेल्या एसटीचालकाची एसटी एका अडथळ्याला अडकल्यामुळे बसमध्ये चढून हँडबेक्र ओढून बस थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा बसचालकाने छातीवर लाथ मारून ढकलून दिले,’ अशी साक्ष पीएमपीएमएलमधील एका प्रशिक्षकाने कोर्टात दिली.

पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांसह प्रबोधनही

$
0
0
वृत्रासुराच्या वधासारख्या पौराणिक देखाव्यापासून हिरकणीने कडा उतरण्यारख्या ऐतिहासिक देखाव्यांची रेलचेल शिवाजीनगर परिसरात पाहावयास मिळते आहे. ‘पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा,’ यासारखे प्रबोधनात्मक देखावेही साकारून मंडळांनी उत्सवाचा समाजप्रबोधनाचा हेतूही जपला आहे.

‘बाप्पा मोरया’च्या गजरात टाळले नदीचे प्रदूषण

$
0
0
गणेशोत्सवादरम्यान होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेने या वर्षीही कंबर कसली आहे. स्वयंसेवी संस्थांना मदतीला घेऊन ‘स्वच्छ’चे कार्यकर्ते सध्या शहराच्या विविध घाटांवर निर्माल्य गोळा करून नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यास हातभार लावत आहेत. गौरी विसर्जनादिवशी या कार्यकर्त्यांनी २५ टनांहून अधिक निर्माल्य आणि कात्रज व विठ्ठल मंदिर भागातून साडेतीन हजार गणेशमूर्ती गोळा केल्या.

पोलिसांच्या सहकार्यासाठी शंभर कार्यकर्ते

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीत संगमघाट, बंडगार्डन घाटासह बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्त ठेवण्यासाठी विविध मंडळांचे शंभर कार्यकर्ते आता पोलिसांना सहकार्य करणार आहेत.

पाण्याचे व्यवस्थापन ते स्त्री-भ्रूणहत्या

$
0
0
गंगावतरण, पाणी टंचाईत जाणवणाऱ्या दुष्काळाच्या झळा दूर करण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन, त्याचे नियोजन, वाढत्या स्त्री-भ्रूणहत्य आदींवर प्रकाश टाकणारे देखावे विविध गणेश मंडळांनी साकारले आहेत.

सोनसाखळी मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना

$
0
0
मोटारसायकलवरील दोन इसमांनी गळ्यातील सोनसाखळी हिसकावून ९७ हजारांचा ऐवज चोरल्याच्या दोन घटना रविवारी घडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (२३ सप्टेंबर) निगडीतील यमुनानगर येथील स्वप्नशिल्प सासायटी येथून सुमन शंकर खळदकर या पायी जात होत्या.

कारवाई टाळण्यासाठीची घाई नडली

$
0
0
‘इमारतीचा स्लॅब उभारल्यानंतर तेथील सिमेंट वाळण्यासाठीही पुरेसा अवधी न देता (क्युरेटिंग) त्यावर घाईने पुढील बांधकाम केल्यामुळे तळजाई पठारावरील इमारत कोसळून दुर्घटना घडली असावी,’ असा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

माननीयांचे ‘अभय’ निष्पापांच्या जिवावर

$
0
0
बेकायदा बांधकामांच्या उभारणीपासून त्यावरील कारवाई टाळण्यासाठी आजी-माजी माननीयांकडून पुणे महापालिका प्रशासनावर टाकण्यात येणारा दबाव किती जीवघेणा ठरू शकतो, याचा प्रत्यय तळजाईच्या दुर्घटनेमधून आला आहे. आणखी किती तळजाई दुर्घटना होईपर्यंत पालिका प्रशासन या दबावापुढे हतबल होत राहणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट

$
0
0
‘तळजाई पठार परिसरात इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे शहर आणि आसपासच्या परिसरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र पुन्हा समोर आले आले आहे. महापालिकेच्या वतीने अशा २३०० बेकायदा बांधकामांवर नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या आणि साडेआठशे बांधकामांवर पूर्ण किंवा अंशतः पाडापाडीची कारवाई करण्यात आली होती,’ अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

२७ लाखांची लूटप्रकरणी दोघांना कोठडी

$
0
0
श्रमिक भवन येथे डोळ्यात मिरचीची पूड टाकून २७ लाख रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी फरारी असलेल्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. के. यावलकर यांनी हा आदेश दिला.

उदंड जाहली अनधिकृत बांधकामे

$
0
0
पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण मिळकतींच्या जवळपास निम्म्या मिळकती अनधिकृत असून, तुलनेत कारवाई मात्र संथ गतीने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. उदासिन लोकप्रतिनिधी आणि उणे प्रशासन यामुळे येथील प्रश्न अधिक जटील होऊ लागले आहेत.

‘नांदे, सावंत यांना नोटीस दिली होती’

$
0
0
‘तळजाई पठार येथे बेकायदा बांधलेल्या इमारतीचे बांधकाम थांबवून ते काढण्याबाबतची नोटीस एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक संजय नांदे आणि लहू सावंत यांना देण्यात आली होती,’ अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता विवेक खरवडकर यांनी दिली.

शनिवारवाडा महोत्सव रद्द

$
0
0
तळजाई पठार येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे पुणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणारा ''शनिवारवाडा सांस्कृतिक महोत्सव'' रद्द करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी राखून ठेवलेल्या रकमेपैकी काही रक्कम मृतांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याची माहिती महापौर वैशाली बनकर यांनी सोमवारी दिली.

कोळसा खाणींचे परवाने रद्द करा

$
0
0
सरकारने कोळसा खाणीचे वाटप खासगी कंपन्यांना खैरात दिल्यासारखे केले आहे. हाच एका अर्थाने मोठा घोटाळा आहे. देशाचे नुकसान टाळायचे असेल तर १५७ खासगी कंपन्यांचे परवाने सरकारने रद्द करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर येथील खासदार खासदार हसंराज अहिर यांनी केली. अहिर यांनी एक लाख ८५ लाख हजार कोटींचा कोळसा खाण घोटाळा उघडकीस आणल्याने देशात चांगलीच खळबळ माजली.

पुणे दुर्घटनेतील बळींची संख्या ११

$
0
0
तळजाई पठार येथील चार मजली बेकायदा इमारत कोसळून सोमवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ११ वर गेली आहे. मृतांमध्ये दीड वर्षाचा मुलगा, एक महिलेचा समावेश आहे. इमारतीच्या ढिगा-याखालून अकरा जणांना बाहेर काढण्यात यश आले असून आणखी १० ते १२ जणांचा शोध सुरू आहे.

...आणि शिजला अपहरणाचा कट

$
0
0
‘हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या परमिंदरने काही दिवसांपूर्वी भजी खाताना त्या कागदावर अपहरणाची एक बातमी वाचली. आपणही एखाद्या मुलाचे अपहरण करावे आणि पैसे कमवावेत, असे त्याने त्यावरून ठरवले आणि त्यातून बळी गेला तो लहानग्या शुभचा…

लगेचच दिली गुन्ह्याची कबुली

$
0
0
पाषाण भागातील शुभच्या अपहरणाबाबत परमिंदर स्वर्ण सिंग याच्याकडे संशयाचा काटा वळला आणि पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने लगेचच गुन्ह्याची कबुली दिली.

बाइकच्या पैशांसाठी चिमुकल्याची हत्या

$
0
0
बाइकसाठी पैसे हवेत म्हणून, एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी १९ वर्षीय मुलाने आपल्याच परिसरात राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खून केल्याची घटना रविवारी रात्री पुण्यातील पाषाण भागात घडली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images