Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘श्री-जान्हवी’ची केस अखेर समुपदेशकाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'होणार सून मी या घरची' या लोकप्रिय मालिकेतील श्री आणि जान्हवी घटस्फोटाचा निर्णय रद्द करून एकत्र आले असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात फॅमिली कोर्टात दाखल करण्यात आलेल्या त्यांच्या घटस्फोटाच्या केसची सुनावणी सुरू झाली आहे. फॅमिली कोर्टातील न्यायाधीशांनी त्यांची केस समुपदेशकांकडे पाठविली आहे. फॅमिली कोर्टात शुक्रवारी त्यांच्या घटस्फोट अर्जाची सुनावणी झाली.

प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरने आपली पत्नी तेजश्री प्रधान-केतकर हिच्यापासून घटस्फोट मिळावा म्हणून पुण्यातील फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला आहे. शशांकने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला त्या वेळी होणार सून मी या घरची या लोकप्रिय मालिकेमध्येही श्री आणि जान्हवी यांच्या आयुष्यात घटस्फोट होणार असल्याचे कथानक दाखविण्यात येत होते. शशांक आणि तेजश्री यांचा विवाह आठ फेब्रुवारी २०१४ रोजी पुण्यात झाला. या अर्जावर शुक्रवारी कोर्टात सुनावणी झाली. फॅमिली कोर्टात घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर पती- पत्नीमध्ये समेट घडावा तसेच त्यांच्यातील वादाचे निराकारण व्हावे म्हणून केस समुपदेशकांकडे पाठविण्याची तरतूद आहे. त्यानुसार फॅमिली कोर्टातील न्यायाधीशांनी शशांक आणि तेजश्री यांच्या केसमध्ये समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती केली आहे. त्यांची केस संबंधित समुपदेशकाकडे वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या केसची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्याची हर्षिता प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या राज्याच्या परीक्षेत (एमएच-सीईटी) पुण्याची हर्षिता शेट्टी २०० पैकी १९९ गुण मिळवून प्रथम आली. तिला बारावीलाही ९६.७ टक्के मार्क मिळाले आहेत.

हर्षिता पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजची विद्यार्थिनी आहे. बारावीला ती कॉलेजमध्ये दुसरी आली. तिला 'एमएच-सीईटी'मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये प्रत्येकी ५० पैकी ५० मार्क मिळाले, तर बायोलॉजीमध्ये १०० पैकी ९९ मार्क मिळाले आहेत. तिने 'जेईई-मेन'ही दिली होती. तिला त्या परीक्षेमध्येही १६० मार्क मिळाले आहेत. मात्र, मेडिकल प्रवेश हेच तिचे ध्येय असल्याने तिने 'जेईई-अॅडव्हान्स्ड' दिली नव्हती. आता पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजात प्रवेश घेण्याच इच्छा असल्याचे हर्षिताने 'मटा'ला सांगितले.

'मी अकरावी आणि बारावी अशी दोन्ही वर्षे सीईटीचा कसून अभ्यास केला. रोज तीन ते चार तास मी अभ्यास करीत होते. कॉलेजातील; तसेच देवधर क्लासेसमधील शिक्षकांचे मला मार्गदर्शन लाभले. बोर्डाच्या परीक्षेसाठी मी अखेरच्या दोन महिन्यांत अभ्यास केला,' असे हर्षिताने नमूद केले. हर्षिताचे वडील हरीश शेट्टी हॉटेल व्यावसायिक असून, आई वारिजा शेट्टी गृहिणी आहेत. तिच्या भावाने यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. हर्षिताचे शालेय शिक्षण बिबवेवाडी येथील विद्यानिकेतन शाळेत झाले. तिला दहावीला ९६.७३ टक्के मार्क मिळाले होते.

प्रवेशप्रक्रिया जूनच्या शेवटी

मेडिकलची प्रवेशप्रक्रिया जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय अर्थात 'डीएमईआर'ने जाहीर केले आहे. संचालनालयाने 'सीईटी'चा निकाल शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार, २२.०२ टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. निगेटिव्ह मार्किंग रद्द केल्याचा फायदा यंदाच्या निकालात दिसून आला आहे. यंदा या परीक्षेला एकूण १ लाख ८९ हजार ५० विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये ८४ हजार ९२९ मुलगे, तर १ लाख ४ हजार १२१ मुली होत्या.

उपस्थित जागा लक्षात घेता मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदा निगेटिव्ह मार्किंग नव्हते, तसेच अकरावीच्या अभ्यासक्रमाचाही प्रश्न नव्हता. यंदाची परीक्षा फक्त बारावीच्या अभ्यासक्रमावरच असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाल्याचे दिसून आले आहे.

- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेला ‘लोकपाल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी 'लोकपाल आपल्या दारी' ही संकल्पना राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर तक्रार निवारण करण्यावर भर देण्यात येत आहे. विद्युत लोकपाल (मुंबई) आर. डी. संखे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता नीळकंठ वाडेकर आदी या वेळी उपस्थित होते. कामगारांचा दर्जा, काम पार पाडण्याची पद्धत, कामातील त्रुटी आदी प्रकारच्या तक्रारी ग्राहकांकडून नोंदवल्या जातात. ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत आहे. त्यात सर्वप्रथम तक्रार निवारण कक्षाकडे (आयजीआरसी) तक्रार नोंदवावी लागते. दोन महिन्यांत या तक्रारीची दखल घेतली न गेल्यास ग्राहक निवारण मंचाकडे (सीजीआरएफ) तक्रार नोंदवू शकतो. मंचाच्या निर्णयाने ग्राहकाचे समाधान न झाल्यास ग्राहकाला निर्णय दिल्यापासून ६० दिवसांत विद्युत लोकपालकडे लेखी तक्रार देता येते. विद्युत लोकपालकडे पोस्ट, ई-मेलद्वारेही तक्रार नोंदवता येते. त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.

वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी विद्युत लोकपालची स्थापना करण्यात आली. वीज बिलावरच तक्रार निवारण कक्ष व मंच याविषयीची माहिती देण्यात आलेली असते. मात्र, ग्राहकांना त्याविषयी फारशी माहिती नसल्याने जिल्हास्तरावर जागृती करण्यात येत आहे. शक्यतो, जिल्हा पातळीवरच ग्राहकांच्या तक्रारी शक्य तितक्या जलद पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, असे संखे यांनी सांगितले.

हायकोर्टात दाद

ग्राहकाच्या तक्रारीबाबत विद्युत लोकपालने दिलेला निर्णय अंतिम आहे. हा निर्णय मान्य नसल्यास ग्राहक उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो. विद्युत लोकपालने दिलेल्या आदेशाची पूर्तता न झाल्यास ग्राहक पुन्हा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे तक्रार नोंदवू शकतो.



राज्यात दोन विद्युत लोकपाल

सध्या राज्यात दोन विद्युत लोकपाल कार्यरत आहेत. त्यात मुंबई विद्युत लोकपालच्या कार्यकक्षेत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित जिल्ह्यांचे काम नागपूर विद्युत लोकपालच्या कार्यकक्षेत येते. अधिक माहितीसाठी संपर्क : http://www.mercindia.org.in/

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात ‘मॅगी’विक्रीला बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मॅगीच्या नमुन्यांमध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात शिसे आढळल्याने, राज्यात मॅगीच्या विक्रीला बंदी घालण्याचे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी पुण्यात दिले. मॅगीची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर शनिवारपासून कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

देशभरात विविध ठिकाणी 'मॅगी'च्या नमुन्यांमध्ये मोनोसोडियम ग्लुटोमेट आणि तसेच शिसाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे केरळ, दिल्लीच्या सरकारने त्यावर बंदी घातली आहे. बिहारच्या कोर्टानेदेखील त्या बाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात मॅगीच्या नमुन्यांच्या झालेल्या तपासणीनंतर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एफडीएचे सहाय्यक आयुक्त शशिकांत केकरे उपस्थित होते.

पुण्यातून मॅगीचे सहा नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी तीन नमुन्यांमध्ये शिसाचे प्रमाण ठरवून दिलेल्या प्रमाणमापेक्षा अधिक असल्याचे तपासणीतून उघड झाले. मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण २.५ पीपीएमपेक्षा अधिक झाल्यास, ते मानवी आरोग्याला अपायकारक ठरू शकते. मात्र, पुण्यातून गोळा केलेल्या मॅगीच्या सहा नमुन्यांपैकी तीन नमुन्यांमध्ये शिसाचे हे प्रमाण अनुक्रमे २.५५ पीपीएम, २.५९ पीपीएम आणि ४.६६ पीपीएम असे आढळून आले. उर्वरीत तीन सॅम्पलमध्ये ते २.२४ पीपीएम, १.७२ पीपीएम आणि १.६२ पीपीएम इतके दिसले. सहा नमुन्यांपैकी तीन नमुने गोव्यातून, तर तीन उत्तराखंड येथून उत्पादित झाले होते. उत्तराखंडचे दोन आणि गोव्यातील एका नमुन्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त शिसे आढळून आल्याचे बापट यांनी सांगितले.

लेबलवरही खोटी माहिती

मॅगीच्या या तपासणीमधून मॅगीच्या लेबलवर दिलेली माहितीही खोटी असल्याचे आढळून आल्याचे बापट यांनी या वेळी सांगितले. एकीकडे मॅगीच्या लेबलवर मोनोसोडिअम ग्लुटोमेट नाही असे नमूद केले असताना, प्रत्यक्षात हे रसायनही मॅगीमध्ये आढळून आल्याचे बापट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉमर्सला मार्कशिट सायन्सची

$
0
0

योगेश बोराटे, पुणे

शाळा-कॉलेजच्या अखत्यारीतील निकालांचा प्रशासनातर्फे कसा 'निकाल' लावण्यात येतो, याचा प्रयत्न पुण्यातील एका शाळेत नुकताच आला. बिबवेवाडीतील मिकीज ज्युनिअर कॉलेजने अकरावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठीच्या मार्कशिटवर खाडाखोड करून मार्कशिट लिहून दिल्याचा प्रकार उघड झाला. कॉलेजमधील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या कारभाराविरोधात आवाज उठवित कॉलेजवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या कॉलेजमध्ये या पूर्वी अकरावी आणि बारावी सायन्सचे वर्ग चालविले जात होते. गेल्या वर्षीपासून त्या जोडीने कॉलेजमध्ये अकरावी कॉमर्सचे वर्ग चालविण्यासाठीची मान्यता मिळाली. त्यानुसार कॉलेजमध्ये गेल्या वर्षीपासून अकरावी कॉमर्सचे वर्ग सुरू झाले. या वर्गांसाठी अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. मात्र, प्रवेशानंतरच्या पातळीवर कॉलेजमध्ये कॉमर्सच्या योग्य त्या शैक्षणिक सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी केला.

'आम्हाला कॉलेजमध्ये आयकार्ड मिळाले नाही. आमचे शिक्षक सातत्याने बदलत गेले. हिंदी, मराठीचे शिक्षक उपलब्ध नसल्याने आमचे वर्गच झाले नाहीत. या विषयांची परीक्षाही झाली नाही. हिंदी, मराठी आणि आयटी या विषयांची परीक्षाच न झाल्याने, मार्कशीटमध्ये त्या विषयांच्या कॉलममध्ये डॅश मारले आहेत. मार्कशीट घेऊन इतर कॉलेजमध्ये विचारणा केली; तर असे मार्कशीट चालणारच नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले,' असे या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी 'मटा'ला सांगितले. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळाल्यानंतर प्रवेश समितीला लिहून दिलेल्या फीपेक्षाही जास्त फी या कॉलेजने उकळल्याची तक्रारही या विद्यार्थ्यांनी केली. या प्रकाराविषयी विचारले असता, विद्यार्थी नापास झाल्याने, त्यांची टक्केवारी कमी आल्यानेच ते असे आरोप करत असल्याचे मिकीज ज्युनिअर कॉलेजचे संस्थाचालक अशोक चावर पाटील यांनी सांगितले.

अकरावीच्या प्रवेशावर पुन्हा प्रश्नचिन्ह

शहरातीलच नव्हे, तर राज्य आणि राज्याबाहेरील विद्यार्थीही अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या कॉलेजांवर डोळे झाकून विश्वास ठेवून, तेथे प्रवेश घेतात. मात्र, प्रवेशानंतर शिक्षकांची अनुपलब्धता, शैक्षणिक सोयी-सुविधांचा अभाव अशा बाबी समोर येत असतील, तर त्याची जबाबदारी अकरावी केंद्रीय प्रवेश समिती घेणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अकरावीची केंद्रीय प्रवेश समिती कोणतीही छाननी न करता, कॉलेजांनी नाचवलेल्या कागदी घोड्यांकडे बघूनच त्यांना प्रवेश देत असल्याचेही आता उघड झाले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि कॉलेजचा निकालही चांगला लागावा म्हणूनच कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारी फी भरण्याचीही विद्यार्थ्यांची तयारी नाही. म्हणूनच हा सगळा प्रकार विद्यार्थी आणि पालक तक्रारींच्या माध्यमातून पुढे करत आहे.

- अशोक चावर पाटील, संस्थाचालक, मिकीज ज्युनिअर कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदमानातच ‘विश्व’ संमेलनाचा घाट?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

विश्व मराठी साहित्य संमेलनाची पताका फडकत ठेवण्यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळ निकराचे प्रयत्न करीत आहे. सरकारी निधीअभावी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे संमेलन होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने साहित्य महामंडळाने शिवसंघ प्रतिष्ठान या संस्थेला अंदमान येथे संमेलन घेण्याबाबत विचारणा केली आहे. विशेष म्हणजे अंदमान हे भारतामध्येच असल्याने या संमेलनाचा आता विश्व संमेलन म्हणून संबोधले जाणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

साहित्य महामंडळाने घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे चौथे विश्व संमेलन होणार असल्याची घोषणा केली होती. त्यातील घुमानचे संमेलन पार पडले. मात्र, निधीअभावी विश्व संमेलनाचे घोंगडे भिजत पडले आहे. आयोजकांनी सरकारी अनुदान मिळाल्याशिवाय संमेलन घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने जोहान्सबर्गचे संमेलनही अडचणीत आले. आता तर ते होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. परिणामी, साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यात आल्यानंतर एकतरी विश्व संमेलन घ्यावे, असा पदाधिकाऱ्यांचा अट्टाहास आहे. त्यासाठीच त्यांनी अंदमान येथे कार्यरत असलेल्या शिवसंघ प्रतिष्ठान या संस्थेला अंदमान येथे विश्व संमेलन घेण्याविषयी महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी विचारणा केली आहे. यापूर्वी या संस्थेने स्वतःहून संमेलन घेण्याची दोन वेळा तयारी दर्शवली होती.

विश्व संमेलन घेण्याविषयी महामंडळाने स्वतःहून विचारणा केली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष नीलेश गायकवाड यांनी दिली. 'अंदमान येथे संमेलन घेण्याबाबत तयारी असल्याने निमंत्रण महामंडळाला दिले होते. मात्र, महामंडळाने जोहान्सबर्गची निवड केली. त्यानंतर संमेलनाचे काहीच घडले नाही. त्यामुळे साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी स्वतःहून २५ मे रोजी भेट घेऊन संमेलन घेण्याविषयी विचारणा केली. संमेलन घेण्यासाठी प्रतिष्ठान तयार असल्याचे पत्र महामंडळाला देण्यात आले आहे,' असे त्यांनी सांगितले.

विश्व संमेलन चार वर्षांत नाही

अमेरिकेतील सॅन होजे येथे २००९मध्ये पहिले विश्व संमेलन झाले होते. त्यानंतर २०१०मध्ये दुबई आणि २०११मध्ये सिंगापूर येथे विश्व संमेलन झाले. २०१२मध्ये कॅनडातील टोरंटो येथील संमेलन आयोजक व महामंडळातील वादामुळे रद्द करावे लागले. त्यानंतर गेल्या चार वर्षांत विश्व संमेलन होऊ शकलेले नाही.

ज्याचा खर्च त्याने करावा!

महामंडळाने चाळीस जणांच्या प्रवास व निवास व्यवस्थेविषयी विचारणा केली होती. त्याला स्पष्ट नकार देण्यात आला आहे. 'संमेलनाला येणाऱ्या प्रत्येकाने प्रवास व निवास व्यवस्था स्वतःच करण्याची अट आम्ही घातली आहे. संमेलनासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था व भोजन व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने केली जाईल. अंदमान व महाराष्ट्रात सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने संमेलन आयोजित करण्यासाठी प्रतिष्ठान उत्सुक आहे. त्यामुळे संमेलनासाठी सरकारी अनुदान, देणगी, प्रायोजकांची गरज नाही,' असे नीलेश गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचा निकाल ८ जूनला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल येत्या ८ जून रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

ऑनलाइन निकाल येथे उपलब्ध होणार

दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याची गंभीर दखल घेऊन, शनिवारी दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्याचं बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसारच, येत्या ८ जूनला दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होईल, अशी घोषणा बोर्डानं केली आहे.

मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी बसले होते. त्याच्या करिअरची दिशा परवाच्या निकालातून ठरणार आहे. यंदाच्या बारावीच्या निकालाची विक्रमी टक्केवारी पाहता, दहावीचा निकालही नवा विक्रम रचतो का, याबद्दल उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भारती विद्यापीठ पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी १२ लाख ३४ हजार १७० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी ९७ लाख ३२ हजार ६६८ रुपये किमतीचा माल कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना अमित राजेंद्र म्हेत्रे हा शेखर मुरलीधर सातव याच्या मदतीने मोटारीतून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. 'एफडीए'च्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मदतीने म्हेत्रे यांच्याकडून एक लाख ५३ हजार १७० रुपयांचा विमल पानमसाला, वी-१ तंबाखू आणि आरएमडी गुटखा जप्त केला. म्हेत्रे याने पौड येथून हा माल खरेदी केल्याची माहिती तपासात मिळविली. त्यानुसार पौड येथील महेंद्र भरत उबाळे यांच्या मालकीच्या शिवकृपा जनरल स्टोअर्स या दुकानाच्या गोदामावर धाड टाकली. तेथून १० लखा ८१ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.

हा कारवाई 'एफडीए'चे सहआयुक्त श. रा. केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त दिलीप संगत व शिवकुमार कोडगिरे, अन्न सुरक्षा अधिकारी विजय उनवणे, अस्मिता टोणपे, योगेश ढाणे, सचिन आढाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेखर शिंदे, संजय चव्हाण यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नापासां’ना पुन्हा अपॉइंटमेंटची सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चारचाकी वाहन चालविण्याच्या लायसन्सच्या टेस्टमध्ये नापास झालेल्यांची सुटीच्या दिवशी पुन्हा टेस्ट घ्यावी, या तत्कालिन परिवहन आयुक्तांच्या आदेशाला पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने हरताळ फासला आहे. माजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी नापास झालेल्यांची टेस्ट सुटीच्या दिवशी घ्यावी, असा आदेश सर्व आरटीओ कार्यालयांना दिला होता. मात्र, अद्याप नापासांना पुन्हा अपॉइंटमेंट घ्यावी लागत आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग अॅण्ड ट्रेनिंग रिसर्च (आयडीटीआर) येथे अत्याधुनिक ट्रॅकवर शिकाऊ वाहन चालकांची टेस्ट घ्यायला सुरुवात केल्यापासून त्यामध्ये नापास होणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांपेंक्षा अधिक झाले आहे. येथे टेस्टसाठी सहा-सहा महिन्यांचे वेटिंग असताना, नापास झालेल्यांना पुन्हा अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती. तोपर्यंत त्यांचे लर्निंग लायसन्सची वैधता संपते. त्यामुळे नागरिकांना पुन्हा लर्निंग लायसन्स काढावे लागत आहे. अपॉइंटमेंटच्या या एका प्रकारामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर नापासांना पुन्हा अपॉइंटमेंट घेण्याचे बंधन नसावे, अशी मागणी केली जात होती. त्याला तत्कालिन परिवहन आयुक्त झगडे यांनी हिरवा कंदील दाखविला. नापासांची सुटीच्या दिवशी टेस्ट घेण्याचा आदेश काढला. मात्र, त्यानंतर लगेचच झगडे यांची बदली झाली. परिणामी, पुणे आरटीओ कार्यालयाकडून त्यांनी काढलेल्या आदेशाचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे.

नापास झालेल्या शिकाऊ चालकांची टेस्ट आठ दिवसांमध्ये घेण्यात यावी, असा नियम आहे. परिवहन आयुक्तांनी सुटीच्या दिवशी टेस्ट घेण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे पालन करावे, अशी विनंती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केली आहे.

- राजू घाटोळे, अध्यक्ष, राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टामुळे फायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील घराघरांपर्यंत पोहोचणाऱ्या 'पोस्ट' खात्यावर टाकलेला विश्वास महापालिकेसाठी फायदेशीर ठरल्याचे चित्र मिळकतकरांच्या बिल वाटपातून स्पष्ट झाले आहे. यंदा मिळकतकराची बिले पोस्टाच्या माध्यमातून पाठविल्याने पालिकेच्या खर्चात १६ लाख रुपयांची बचत झाली आहे, तर बिले माघारी येण्याचे प्रमाणही नगण्य आहे.

शहरातील सुमारे आठ लाख मिळकतींपर्यंत बिले वेळेत पोहोचविण्याचे आव्हान पालिकेसमोर होते. गेल्या काही वर्षांत ही बिले नागरिकांना वेळेत मिळत नसल्याची तक्रार केली जात होती. गेल्यावर्षी तर साडेसात लाख मिळकतींपैकी एक लाखांहून अधिक बिलांचे वाटपच झाले नव्हते. त्याचा परिणाम पालिकेच्या उत्पन्नावरही झाला. यंदा बचत गटांच्या माध्यमातून ही बिले वाटपासाठी येणारा खर्च वाढल्याने पालिकेने पर्याय म्हणून पोस्ट खात्याकडे विचारणा केली. पालिकेच्या आवाहनाला पोस्ट खात्याने सकारात्मक प्रतिसाद दिला; तसेच दोन रुपये ९० पैसे अशा माफक दरांत बिले पोहोचविण्याचे मान्य केले. पालिकेने मार्चअखेरीस सर्व बिले पोस्टाकडे सुपूर्त केल्याने नागरिकांना वेळेत बिले पोहोचू शकली. बिले वेळेत मिळाल्याने नागरिकांनी मे अखेरपर्यंत ५ ते १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी कर भरणाही वेळेत केला. परिणामी, पालिकेला आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतच तब्बल ५२० कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळू शकले. पोस्टाच्या माध्यमातून आठ लाख बिलांच्या वितरणासाठी पालिकेचा २४ लाख रुपये खर्च करावा लागला. पोस्टाच्याऐवजी बचत गटांचा पर्याय पालिकेने स्वीकारला असता, तर त्यासाठी पालिकेला ४० लाख रुपये मोजावे लागले असते. त्यामुळे, पोस्टाच्या माध्यमातून बिले पाठविल्याने पालिकेचा दुहेरी फायदा झाला.

पालिकेला फायदा

मिळकतींचा पत्ता सापडला नाही म्हणून पालिकेकडे परत येणाऱ्या बिलांची संख्या सुमारे एक ते दीड लाखांच्या दरम्यान होती. एकूण मिळकतींपैकी जेमतेम ८० टक्के बिलांचे वाटपच पूर्ण व्हायचे. पोस्टामुळे यंदा पालिकेची बिले बहुतांश नागरिकांच्या मिळकतींपर्यंत पोहोचू शकली, अशी माहिती कर आकारणी व करसंकलन प्रमुख सुहास मापारी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या विमुक्तांच्या वसाहतीसाठी निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नागरी वनीकरण कार्यक्रमाच्या ठिकाणी शनिवारी निदर्शने केली. जावडेकर यांना या वेळी काळे झेंडे दाखविण्यात आले. भटक्या विमुक्तांच्या वसाहतीसाठी जागा देण्याच्या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी जावडेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन जावडेकर यांनी दिल्याचे संघटनेच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

माने यांच्यासह शारदा खोमणे, कलावती भाटी, सुमन गायकवाड, सुनंदा मानवी, राधा चव्हाण आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. वारजे माळवाडी येथील सर्व्हे ३५-२ व ३६-२ ही भटक्या विमुक्तांच्या आदर्श वसाहतीसाठी राखीव ठेवण्यात आलेली जागा वनीकरणासाठी न वापरता भटक्या विमुक्तांच्या घरांसाठीच वापरली जावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

$
0
0

पुणे : पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण त्याचा खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या ताडीवाला रोड भीमसेना युवक संघ येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

महेश बुधराम वर्मा (२१, रा. भीमसेना युवक संघ) याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आंड्या उर्फ प्रदीप सुविचंद घोडके (२१, रा. ताडीवाला रोड) याला अटक केली आहे, सौरभ धनगर, नितीन म्हस्के, सचिन घोडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध सुशिल सुर्यवंशी (१९ रा. आकुर्डी) याने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचा मित्र महेश वर्मा याच्यावर आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडण्याच्या कारणावरून तलवारीने वार केले.

बनावट कागदपत्रे; दोघांना अटक

पुणेः बँकेचे बनावट स्टेटमेंट तयार करून ते कर्जप्रकरणासाठी दाखल करणाऱ्या दोघांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. ललित दिलीप बावीस्कर (२५, नेताजीनगर, सांगवी) आणि दीपक रामकृष्ण वाणी (३०, रा. पाचोरा जि. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अशोक कृष्णाजी वाळके (५९, रा. बालेवाडी) यांनी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

टँकरमधून रसायनाची गळती

लोणावळा : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा एक्झिटजवळ एका रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरमधून रसायन लिक्विडची गळती सुरू झाली मात्र प्रसंगावधान राखत चालकाने टँकर सर्व्हिस लेनमध्ये बाजूला घेतल्यामुळे एक्स्प्रेस वे वरील मोठी वाहतूक कोंडी टळली. घटनेची माहिती कळताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक एम. टी.चाळके यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खबरदारी म्हणून अग्निशामन दलाला पाचारण केले.

ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक

पुणेः ऑनलाइन बँकिंगद्वारे एका व्यक्तीची फसवणूक करून त्याच्या खात्यातून ८३ हजार रुपये काढून घेण्यात आले आहे. याप्रकरणी सतिश मित्तल (वय ५२, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २९ मे रोजी ही घटना घडली. फिर्यादी यांचे अकाउंट ब्लॉक होणार असल्याचे सांगून ८३ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली.

कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे : भरधाव वेगाने जात असलेल्या कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आकाश गंगा सोसायटी पिंपळे निलख येथे ही घटना घडली. या घटनेत छाया किशोर धुताडमल (४० रा. पिंपळे निलख) या माहिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी सचिन विनायक कदम (२८ रा. गणेशनगर, पिंपळे निलख) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध मुकेश धुताडमलयाने फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचा निकाल सोमवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल येत्या सोमवारी (८ जून ) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. तर, १५ जून रोजी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत प्रत्यक्ष मार्कलिस्ट मिळू शकणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी शनिवारी ही घोषणा केली. बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी मोठी उत्सुकता होती. व्हॉट्सअपसह सर्व सोशल मीडिया साइट्सवर याबाबत वेगवेगळे मेसेज फिरत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, बोर्डातर्फे आता निकालाची अधिकृत तारीख जाहीर झाल्याने हा संभ्रम दूर झाला आहे.

विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in, www.maharashtraeducation.com, www.hscresult.mkcl.org, www.rediff.com/exams व ww.knowyourresult.com/MAHSSC या वेबसाइट्सवर सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून निकाल उपलब्ध होईल, असे बोर्डातर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपले विषयनिहाय गुण या वेबसाइटवर पाहता येतील व त्याचे प्रिंट आउटही घेता येतील; तर www.mahresult.nic.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहितीही उपलब्ध होईल, असे मंडळाने स्पष्ट केले. त्याचबरोबर बीएसएनएलसह अन्य काही मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्याकडून एसएमएसद्वारेही निकाल जाणून घेता येणार आहे.

मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी बसले होते. मंडळातर्फे निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. विद्यार्थी छापील गुणपत्रिका मिळाल्यानंतर गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळा व विभागीय मंडळांकडे सादर करू शकतात. त्यासाठी १५ जूनपासून २५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. गुणपडताळणीच्या अर्जासोबत विद्यार्थ्यांना मूळ छापील गुणपत्रिकेची (मार्कलिस्ट) फोटोकॉपी जोडावी लागणार आहे. यासाठी ऑनलाइन गुणपत्रिका ग्राह्य धरली जाणार नाही.

विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळण्याची संधीही बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आठ जून ते २९ जून या काळात योग्य ते शुल्क भरून आपले अर्ज संबंधित मंडळांकडे सादर करता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडिटकार्डची माहिती घेऊन फसविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

आयसीआयसीआय बँकेच्या व्हेरिफिकेशन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचा फोन करून एटीएम कार्डची माहिती घेऊन त्याद्वारे ८३ हजार रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे.

सतीश जयनारायण मित्तल (वय ५२, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी धारक उर्फ दीपककुमार शर्मा (पूर्ण नाव पत्ता समजू शकले नाही) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्तल यांना २९ मे रोजी त्यांच्या मोबाइलवरून दुपारी एक वाजता शर्मा याने मित्तल यांना फोन केला. तुमचे अकाउंट ब्लॉक होणार असल्याचे त्याने सांगितले. तसेच, त्यांच्या एटीएम कार्डची संपूर्ण माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ८३ हजार रुपये परस्पर ऑनलाइन काढले. मित्तल यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंद्रायणी’साठी नोटिसा़

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोणावळ्यातील उगमापासून ते पंढरपूरच्या प्रवासापर्यंत प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या इंद्रायणीला मोकळा श्वास घेता यावा, यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायाधिकरणाने लोणावळा नगरपालिका, आळंदी नगरपालिका, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यासह शासकीय यंत्रणांना नोटीस पाठवून बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

इंद्रायणी नदीचा उगम मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात होतो. मात्र, सुरुवातीपासून पुढे पंढरपूरपर्यंत नदीला प्रदूषणाच्या अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. एकीकडे धार्मिक महत्त्व असलेल्या नदीची पूजा होत असताना दुसऱ्या बाजूला तिली प्रदूषणाच्या विळख्यात अडकविणाऱ्या प्रशासन आणि औद्योगिक कारखान्यांना जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने पर्यावरणप्रेमी संदीप कायस्थ यांनी न्यायाधिकरणाकडे तक्रार केली आहे. अॅड. असीम सरोदे हे याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडणार आहेत. इंद्रायणी नदीच्या प्रवाहात चिखली, तळवडे, मोशी, चऱ्होली या भागात सांडपाणी, औद्योगिक कंपन्यांचे दूषित पाणी सोडले जाते आहे. पुढे आळंदीमध्ये दाखल झाल्यावर नदीपात्रालगतच कचरा डेपो असल्याने नदीत सर्रास कचरा फेकला जातो. एवढे गैरप्रकार घडत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अद्याप कोणावरही ठोस कारवाई केलेली नाही.

बाजू मांडण्याचे आदेश

औद्योगिक कारखान्यांना दर काही वर्षांनी नोटीस देण्यात येत असल्या तरी कारवाई झालेली नाही. नगरपालिकेनेही याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे, असे विविध मुद्दे आणि छायाचित्रांचे पुरावे याचिकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, न्यायाधिकरणाने या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक नगरपालिका आणि शासकीय कार्यालयांना बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोंढे खूनप्रकरणी दोघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुख्यात गुंड अप्पा उर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे याच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. बी. म्हालटकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. याप्रकरणी विष्णू यशवंत जाधव (वय ३७, रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता. हवेली जि. पुणे) आणि नागेश लक्ष्मण झाडकर (२७, रा. पांढरस्थळ, उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी संतोष भीमराव शिंदे (३४, रा. शिंदणे, ता. हवेली), नीलेश खंडू सोलवनकर (३०, रा. पांढरस्थळ, दत्तवाडी, ता. हवेली), राजेंद्र विजय गायकवाड ( २४ रा, शिंदवणे), अनिल सुनील महाडिक (२०, रा. उरुळीकांचन आणि नितीन महादेव मोगल (२७, रा. ऊरळी कांचन) या पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांना १२ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपींचे साथीदार गोरख बबन कानकाटे (रा. कोरेगाव इनामदार वस्ती, हवेली), अण्णा उर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद उर्फ बापू काळुराम कांचन, सोमनाथ काळुराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड ,प्रवीण मारुती कुंजीर, विकास प्रभाकर यादव (सर्व रा. उरुळी कांचन, हवेली) या फरार सात आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. वैभव प्रकाश उर्फ आप्पा लोंढे (२२, रा. उरुळी कांचन, शिंदवणे) यांनी लोणीकाळभोर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

अप्पा लोंढे हा २८ मे रोजी पहाटे व्यायाम करण्यासाठी घराबाहेर बाहेर पडला. त्या वेळी त्यांच्यावर आरोपींनी गोळीबार व धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केला होता. या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील राजेंद्र सूर्यवंशी यांनी कोर्टाने केला. बचाव पक्षाचे वकील बी. ए. अलूर यांनी पोलिस कोठडीला विरोध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘छपाई न झाल्यानेच सायन्सची मार्कशिट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मिकीज ज्युनिअर कॉलेजमध्ये सायन्सच्या मार्कशिटवर खाडाखोड करून कॉमर्सचे मार्कशिट विद्यार्थ्यांना देण्याची बाब चुकीची असली, तरी संबंधित विद्यार्थी अनियमिततेमुळे नापास झाल्याचे कॉलेजने शनिवारी स्पष्ट केले. कॉमर्सचे वर्ग नियमितपणे घेतल्याचेही कॉलेजने म्हटले आहे. कॉमर्सची मार्कशिट वेळेत छापून न आल्याने, सायन्सच्या मार्कशिटवर कॉमर्सचे विषय लिहून विद्यार्थ्यांना मार्कशिट दिल्याचेही कॉलेजने स्पष्ट केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, 'कॉमर्सच्या एकूण ३० विद्यार्थ्यांपैकी आयटी विषय घेतलेले २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मराठी व हिंदी घेतलेले चार विद्यार्थी होते. मराठी व हिंदी हे विषय कॉलेजमध्ये शिकविले जात नाहीत, हे संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशावेळीच सांगण्यात आले होते. हे विषय बाहेर क्लास लावून शिकू, असे सांगून संबंधित विद्यार्थ्यांनी कॉलेजला प्रवेश घेतला होता. या विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्येही अत्यल्प गुण मिळाले. मात्र, त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटरसिटी एक्स्प्रेस अचानक रद्द

$
0
0

पुणे : मुंबई विभागातील इलेक्ट्रिक मेगा ब्लॉकमुळे पुण्याहून मुंबईला जाणारी इंटरसिटी एक्स्प्रेस शनिवारी सायंकाळी अचानक रद्द झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, रविवारी पहाटे साडेपाच वाजता मुंबईहून निघणारी इंटरसिटी गाडीही रद्द करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. मेगा ब्लॉकमुळे पुण्याहून सायंकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी निघणारी इंटरसिटी रद्द करण्याच्या सुचना मुंबई कार्यालयातून पुणे कार्यालयास देण्यात आल्या. त्या वेळी इंटरसिटीने मुंबईला जाण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. मात्र, गाडी रद्द केल्याची घोषणा होताच स्थानकावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्या वेळी एकातासाच्या अंतराने असलेल्या इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये बहुतांश प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे ती गाडी फुल्ल झाल्याने अनेक प्रवाशांना गैरसोयीला सामोरे लावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी करणे अवघड आहे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आर्थिक मदत करू; मात्र कर्जमाफी अवघड आहे. मागील सरकारने केलेल्या साडे तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीचे ३६ हजार कोटी रुपये व्याजाचे ओझे निभावताना आमची कसरत होते आहे,' असे सांगून राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस नकार दर्शविला.

वेगवेगळ्या नैसर्गिक संकाटत सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी सातत्याने होत असताना राज्य सरकारने याबद्दल काहीच भूमिका जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांच्या मदतसाठी आतापर्यंत सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. प्रत्यक्षात तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. या धर्तीवर मुनगंटीवार यांनी कर्जमाफी शक्य नसल्याचे संकेत शनिवारी पत्रकारांशी बोलाताना दिले.

वन विभागातर्फे वारजे टेकडीवर राबविण्यात येत असलेल्या नागरी वन उद्यानाच्या उद‍्घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'मागील सरकारने पहिली चार वर्षे आश्वासने देऊन २००९मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्या वेळी माफ केलेले साडे तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आणि ३६ हजार कोटी रुपयांच्या व्याजाचा बोजा आमच्यावर आला आहे, ते निभावताना कसरत होते आहे. शेतकरी विकासाचा कणा आहेत, त्यांच्या समस्या सोडविण्याठीच शाश्वत शेती आणि जलयुक्त शिवार योजनांवर आम्ही भर देत आहोत,' असे मुनगंटीवर यांनी स्पष्ट केले. मान्सूनच्या धर्तीवर राज्य सरकारने बियाणे, खते आणि पेरणीसाठी केलेल्या नियोजनाची माहिती त्यांनी दिली.

'महाराष्ट्रामध्ये वनस्पती वैविध्य विपूल असून यात अनेक दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींचाही समावेश आहे. त्यामुळे बेंगळुरूच्या धर्तीवर चंद्रपूर येथे वन विभागातर्फे 'बोटॅनिकल गार्डन' साकारण्यात येणार आहे. हे उद्यान १० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात विस्तारलेले असेल,' असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुण्यामध्ये वनक्षेत्राचे प्रमाण चांगले असून या टेकड्यांना अतिक्रमणाचा धोका आहे. त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी परिणामकारक पावले उचलण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मी वनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांचे नियोजन सुरू असून महापालिकेने यात सहकार्याची तयारी दर्शविली असून लवकरच या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.

- सुधीर मुनगंटीवार, राज्याचे वित्त व नियोजन मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जॅकवेल’ची उर्वरित कामे केव्हा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नदीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मुंढवा जॅकवेल प्रकल्पाअंतर्गत रेल्वे रुळांखालून पाइपलाइन टाकण्याचे सर्वांत अवघड काम पालिकेने पूर्ण केले आहे. तरीही, अखेरच्या दोन किमीच्या पाइपलाइनचा विषय हायकोर्टासमोर असल्याने त्याबाबत शेतकऱ्यांना बेबी कॅनॉलच्या माध्यमातून प्रक्रिया केलेले पाणी मिळण्यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पाटबंधारे विभाग आणि महापालिकेत झालेल्या करारानुसार शेतीसाठी साडेसहा टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे पालिकेने मान्य केले होते. मुंढवा येथे जॅकवेल उभारून साडेसहा टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करून ते पाइपलाइनच्या माध्यमातून बेबी कॅनॉलमध्ये सोडण्याचे नियोजन केले गेले होते. ही पाइपलाइन रेल्वे रुळांखालून पुढे नेण्याचे खडतर आव्हान पालिकेसमोर होते. त्यासाठी, रेल्वे खात्याची परवानगी मिळण्यासही विलंब गेला; तसेच त्यानंतर हे काम पूर्ण होण्यासही वेळ लागला. तब्बल सहा महिन्यांनंतर हे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे, मुंढवा ते साडेसतरानळी दरम्यानचा सर्वांत कठीण टप्पा पालिकेने पूर्ण केला आहे.

सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये अत्यल्प साठा आहे. त्यातच, शेतीसाठी एक टीएमसी पाणी या प्रकल्पातून देण्याचे नियोजन यापूर्वी केले होते. मात्र, या कामामध्ये अखेरच्या टप्प्यातील पाइपलाइनचे काम बाकी असताना, स्थानिक शेतकऱ्याने कोर्टात धाव घेतली. जिल्हा कोर्टाचा निकाल पालिकेच्या बाजूने लागल्यानंतर आता संबंधित शेतकऱ्याने हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे, हायकोर्टाच्या निकालावर प्रकल्पाचे पुढची गती अवलंबून आहे.

शहराच्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असून, कोर्टकचेरीमध्ये तो अडकून पडल्यास त्याचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, येत्या आठवड्यात हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीच्यावेळी पालिकेतर्फे वरिष्ठ वकील नेमण्यात येणार आहेत. तसेच, राज्याचे अॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनीच पालिकेची बाजू मांडावी, असा आग्रह धरण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images