Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘खडकवासला’तील पाणी दूषित

$
0
0

सुजित तांबडे, पुणे

पुणे शहर आणि आसपासच्या परिसराची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणातील पाणी दूषित (क्षारयुक्त) होऊ लागले असल्याचा धक्कादायक निष्कर्ष सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च सेंटरने (सीडब्ल्यूपीआरएस) काढला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेली बांधकामे आणि वाढलेली लोकवस्ती यामुळे पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण वाढले असून, आगामी काळात धरणक्षेत्रातील बांधकामे न थांबल्यास संपूर्ण धरणाचा पाणीसाठा दू्षित होण्याचा धोका असल्याचे 'सीडब्ल्यूपीआरएस'ने सूचित केले आहे.

खडकवासला धरणातील पाण्याविषयी 'सीडब्ल्यूपीआरएस'ने अभ्यास केला आहे. धरणाच्या काठापासून ते मध्यवर्ती भागातील सहा ठिकाणचे पाण्याचे आणि जैविक नमुने घेऊन त्यावर 'सीडब्ल्यूपीआरएस'च्या संशोधकांनी संशोधन केले आहे. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या आहेत. ते निष्कर्ष 'सीडब्ल्यूपीआरएस'च्या वार्षिक अहवालात मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये धरणाच्या काठावरील पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त झाले असल्याचे आढळून आल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.

या धरणातील पाण्यामध्ये क्षार वाढण्याची कारणेही 'सीडब्ल्यूपीआरएस'कडून सांगण्यात आली आहेत. प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रात होणारी बांधकामे आणि वाढती लोकवस्ती यामुळे हे पाणी दूषित होऊ लागले आहे.

बांधकामांसाठी वापरण्यात येणारे सिमेंट हे नाले आणि जमिनीत झिरपून धरणामध्ये येत असल्याने धरणाच्या कडेला असलेल्या पाण्यावर त्याचा परिणाम झाला आहे. आगामी काळात पाणलोट क्षेत्रात बांधकामांवर नियंत्रण आणले गेले नाही; तर संपूर्ण धरणातील पाण्याला क्षारयुक्त होण्याचा धोका असल्याचे 'सीडब्ल्यूपीआरएस'च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले.

पुणे शहर आणि आसपासच्या परिसराला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच, जिल्ह्यातील शेतीलादेखील या धरणातून पाणी पुरविले जाते. या धरणाची लांबी एक हजार ५३९ मीटर आणि उंची ३२.९० मीटर आहे. धरणातील पाणीसाठ्याची क्षमता ८६ दशलक्ष घनमीटर असून, पाणीसाठयाचे क्षेत्रफळ १४.९० वर्ग किलोमीटर आहे. या धरणातून मुठा उजवा कालवा आणि मुठा डावा कालवा यांना पाणीपुरवठा केला जातो. उजवा मुठा कालव्यातून पुणे जिल्ह्याच्या परिसराला; तर डावा मुठा कालव्यातून पुणे शहराला पाणीपुरवठा होतो.

कांबळे खुनाच्या घटनेत आरोपी आणि साक्षीदार एकाच ठिकाणचे असल्याने या परिसरात तणावाचे वातावरण आहे. दत्तवाडी पोलिसांनी कांबळे विरोधी गटातील दोघांना ताब्यात घेतले आहे. कांबळे गटातील भालशंकर यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमसीए’ होतेय ‘लॉग-ऑफ’?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'बीसीए' अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षाचा निकाल केवळ ३७ टक्के लागला आहे. कमी निकाल आणि बीसीए, एमसीए अभ्यासक्रम सायन्स विद्याशाखेत स्थलांतरित करण्याबाबत 'यूजीसी'ने दिलेले निर्देश यामुळे यंदा 'एमसीए'च्या (कॉमर्स) प्रवेशांबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सुमारे ५० कॉलेजांत कॉमर्स विद्याशाखेंतर्गत 'बीसीए' अभ्यासक्रम राबविला जातो. या अभ्यासक्रमाचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. त्यामध्ये अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षाच्या सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल साडेतीन हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे 'एमसीए'च्या जागा भरायच्या कशा, असा प्रश्न संस्थांपुढे निर्माण झाला आहे.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे एका विशिष्ट विषयातच नापास झाले आहेत. अखेरचे वर्ष असल्याने एका विषयात नापास असले, तरी यंदा ते पुढील संधींपासून मुकणार आहेत. काही कॉलेजांमध्ये तर 'नापास'चा शिक्का बसल्यामुळे 'कॅम्पस प्लेसमेंट' झालेल्या विद्यार्थ्यांची 'प्लेसमेंट'ही गेली आहे.

'बीसीएच्या अखेरच्या वर्षाचे अनेक विद्यार्थी एका ठरावीक विषयात नापास झालेले असल्याने एकूण निकालावर परिणाम होऊन तो ३७ टक्केच लागला आहे. याचा 'एमसीए'च्या प्रवेशांवर नक्कीच परिणाम होणार आहे. असे का झाले, याची माहिती घेतली जाईल. नापास झालेले किती विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतात आणि त्यानंतर निकालात काही सुधारणा होते का, हेही पाहावे लागेल,' असे विद्यापीठाच्या कॉमर्स विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधाकर जाधवर यांनी सांगितले.

'नापास विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच जास्त आहे. एखाद्या शाखेबाबत असे झाल्यास त्याचा आढावा घेतला जातो. त्यानुसार याबाबतही आढावा घेतला जाईल. गरज पडल्यास या संदर्भात येत्या अॅकॅडेमिक कौन्सिलमध्येही चर्चा होईल,' अशी माहिती बीसीए अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी दिली.

'बीसीए' सायन्समध्ये?

देशभरातील अभ्यासक्रमांच्या नावांमध्ये एकवाक्यता असावी, या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मध्यंतरी काही बदल सुचवले आहेत. त्यामध्ये 'बीसीए'चा पदवी अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सायन्स विद्याशाखेंतर्गत राबवावा, अशी सूचना करण्यात आली आहे. असे झाले, तर सध्या ज्या कॉमर्स कॉलेजांत बीसीए अभ्यासक्रम राबविला जातो, तेथील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे एमसीए (कॉमर्स) या अभ्यासक्रमाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. येत्या नऊ जूनला विद्यापीठाच्या अॅकॅडेमिक कौन्सिलच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादातून मित्राचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बिअर प्यायल्यानंतर मित्राला घरी सोडण्याच्या वादातून दोघांनी दोघा मित्रांनी वाहनचालक मित्राचा डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाबाबत तपास करताना त्याच्याच मित्रांनी खून केल्याचे तपासात उघड झाले. गुरुवारी (४ मे) दोघांना अटक करण्यात आली. महेश दिलीप कदम (वय ३०, रा. आहेरवाडी, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुहास आगतराव गायकवाड (वय २६), किरण एकनाथ साळुंखे (वय २७, दोघेही रा. जाधववाडी, चिखली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी महेशचा भाऊ बापू दिलीप कदम याने फिर्याद दिली आहे.वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी (२ मे) पहाटे साडेतीनच्या सुमारास मोशीतील बारणे पेट्रोल पंपाजवळ महेशचा मृतदेह आढळून आला होता. एखाद्या अवजड वाहनाने उडवल्याने महेशचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज बांधून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा अधिक तपास करताना महेश त्याचा मित्र सुहास व किरणसोबत घराबाहेर गेल्याची माहिती पोलिसांना समजली. तिघेही वाहनचालक म्हणून काम करतात. त्यामुळे दोघांकडे दोन दिवस चौकशी केल्यार बिअर प्यायल्यानंतर महेशला घरी सोडण्यावरून वाद झाला होता. तेव्हा महेश यानेसिमेंट ब्लॉक मारण्याचा प्रयत्न केल्याने तोच ब्लॉक त्याच्या डोक्यात मारून खून केल्याची कबूली दोघांनी पोलिसांकडे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत बसपास योजनेला कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

खासगी मान्यताप्राप्त शाळांतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या मोफत बसपास योजनेत बदल करून, या शाळांतील विद्यार्थ्यांकडून २५ टक्के रक्कम वसूल करण्याची शिफारस पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड हद्दीतील महापालिकेसह सर्व प्राथमिक, माध्यमिक तसेच शासनमान्य खासगी शाळांमधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 'पीएमपी'तर्फे मोफत बसपास देण्यात येतो. ही योजना पालिका २००९-१० शैक्षणिक वर्षापासून राबवित आहे. विद्यार्थ्यांना जरी मोफत बसपास असला, तरी त्याचा सर्व खर्च महापालिकेमार्फत 'पीएमपी'ला दिला जातो. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याची गेल्या शैक्षणिक वर्षातील हजेरी ७५ टक्के आवश्यक असल्याची अट आहे. विद्यार्थ्यांचे प्रवासी अंतर हे त्याचे घर ते शाळा दोन किलोमीटरपेक्षा अधिक असणे बंधनकारक आहे. मोफत सायकल प्रदान केलेल्या विद्यार्थ्याला योजनेचा लाभ मिळत नाही. २०१४-१५ शैक्षणिक वर्षात योजनेचा लाभ २० हजार ९३३ विद्यार्थ्यांनी घेतला. त्यासाठी महापालिकेने ८ कोटी ६० लाख ५० हजार रुपये 'पीएमपी'ला दिले आहेत.

पुणे महापालिकेतर्फेही विद्यार्थी मोफत बसपास योजना राबविली आहे. तथापि, त्यांनी ही योजना बंद करून त्याऐवजी सुधारित बसपास योजना लागू केली आहे. त्यानुसार महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत बसपास, तर खासगी शाळांतील विद्यार्थ्यांकडून बसपासची २५ टक्के रक्कम घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेच्या या निर्णयाचे अनुकरण करून पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही सुधारित योजना लागू करण्याचे ठरविले आहे. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांकडून २५ टक्के रक्कम वसूल केल्यास महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार नाही. तसेच खासगी पासधारक विद्यार्थ्यांची निश्चित संख्या उपलब्ध होईल. दुबार किंवा बोगस पास प्रकार भविष्यात उद्भवणार नाही, अशी कारणे स्थायी समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहेत. सुधारित बसपास योजनेच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल.

सुधारित बसपास धोरण

सुधारित बसपास योजनेनुसार खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना महापालिका कोषागारात २५ टक्के रक्कम भरावी लागेल.

पैसे भरल्याची पावती आणि अर्ज पीएमपी व्यवस्थापनाकडे सादर करावा लागेल.

त्यानंतरच पास उपलब्ध केला जाईल.

ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर महापालिका बसपासची ७५ टक्के रक्कम 'पीएमपी'ला अदा करेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-पिंपरीसाठी धरण बांधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी पिंपरी

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने वाढत असून, या दोन्ही शहरांमधील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या शहरांसाठी 'पीएमआरडीए'ने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर स्वत:चे धरण बांधावे, अशी सूचना शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. शुक्रवारी (५ जून) शिवसेना शिष्टमंडळाने पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, पिंपरी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांची भेट घेतली.

शिष्टमंडळात डॉ. गोऱ्हे यांच्यासह शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख डॉ.अमोल कोल्हे, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण, पिंपरी शहरप्रमुख राहुल कलाटे, पुणे शहरसंघटक श्याम देशपांडे आदींचा समावेश होता. 'पीएमआरडीए'च्या माध्यमातून पुणे शहराचा कायापालट होणार आहे. शहराच्या सर्व भागांचा विकास करणे आता शक्य होणार आहे. पुण्याचे अनेक प्रश्न, प्रस्ताव, योजना राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. भविष्यात 'पीएमआरडीए'ने एखादा मोठा विकास प्रकल्प हाती घेतल्यास त्यामागे पाठबळ देण्यात येईल. रिंगरोड, मोनोरेल, मेट्रो यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्याचे काम पीएमआरडीएला करावे लागेल.

पुणे - पिंपरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पिण्याच्या पाण्याची समस्या येऊ शकते. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर स्वत:च्या मालकीचे धरण बांधावे, अशी सूचना करण्यात आली. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियम वेगवेगळे असतात. यासाठी सर्व स्थानिक संस्थांना एकत्र आणण्याचे काम 'पीएमआरडीए'ला करावे लागेल. त्यामुळे 'पीएमआरडीए'ला अधिकाधिक अधिकार असावेत, त्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, त्यात नागरी सहभाग असावा,' अशी अपेक्षाही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. शिष्टमंडळाने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी दिल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

शिवसेना शिष्टमंडळाने केलेल्या सूचना

'पीएमआरडीए'मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांकरीता उच्च क्षमतेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारावेत.

नदी प्रदूषण रोखण्याकामी उपाययोजना आखाव्यात.

जलवाहतुकीचाही अभ्यास व्हावा.

सुनियोजित विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञ संस्थेची नेमणूक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या बैठकीत सर्वमान्य तोडगा नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दुरावलेल्या काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांमध्ये एकजूट घडवून आणण्यासाठी मुंबईत शुक्रवारी (पाच जून) आयोजित बैठकीत सर्वमान्य तोडगा निघू शकला नाही. काही अटींवरच भाऊसाहेब भोईर आणि विनोद नढे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा पर्याय समोर आला असून, आता पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

शहर काँग्रेसमधील गटबाजी मुंबई दरबारी पोचली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सुमारे तासभर बैठक झाली. प्रभारी शहराध्यक्ष सचिन साठे, समन्वयक रमेश बागवे, नगरसेवक भोईर, नढे, कैलास कदम, सद्गुरू कदम, विमल काळे, शकुंतला बनसोडे, आरती चोंधे, राहुल भोसले, गणेश लोंढे उपस्थित होते.

भोईर आणि नढे यांच्यावरील निलंबन मागे घ्यावयाचे झाल्यास विरोधी पक्षनेतेपदाचा नढे यांनी राजीनामा द्यावा आणि स्थायी समितीतील विमल काळे किंवा जालिंदर शिंदे यांच्यापैकी एकाचा राजीनामा घ्यावा, अशा अटी मांडण्यात आल्या. त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे तूर्तास मनोमिलनाचे प्रयत्न असफल झाले. बैठकीतील पर्यायांवर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपखेलसाठी होणार तरंगता पूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बोपखेलच्या नागरिकांसाठी बोपखेल ते खडकी असा तात्पुरत्या स्वरूपात तरंगता पूल उभारण्याचे काम 'सीएमई'च्या वतीने शुक्रवारी सकाळी सुरू करण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांसाठी बोपखेलच्या नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न तात्पुरता सुटणार आहे.

'सीएमई'च्या आवारातून जाणारा रस्ता 'सीएमई'ने सामान्य नागरिकांसाठी बंद केल्यामुळे सीएमई आणि ग्रामस्थांमधील वादाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पुणेभेटीला आले असता, महापालिकेचे नगरसेवक आणि बोपखेल भेट घेतली होती. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करू देण्याचे आश्वासन लष्कराने दिले होते. त्याप्रमाणे पाहणी करून बोपखेल ते खडकी या पर्यायी रस्त्याचे काम शुक्रवारी सकाळी लष्कराने मुळा नदीवर सुरू केले. युद्धजन्य परिस्थितीमध्ये लष्कराकडून तयार करण्यात येत असलेल्या पुलाप्रमाणेच हा पूल असणार आहे. बोपखेलकरांसाठी पर्यायी रस्ता खुला होईपर्यंत पर्याय म्हणून हा पूल उभारण्यात येत आहे. बोपखेल स्मशानभूमीजवळून मुळा नदीच्या पात्रातून हा पूल तयार करण्यात येत आहे. पुलाच्या दुसऱ्या टोकाला चारशे मीटरचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता खडकी बाजाराच्या मागील बाजूला असलेल्या ५१२ वर्कशॉपच्या मागील बाजूस जोडण्यात येणार आहे. आज (शनिवार, ८ जून) जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये या प्रश्नाबाबत पुन्हा बैठक होणार आहे. सोमवारी (८ जून) संरक्षणमंत्री पर्रीकर एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात येणार आहे. त्या वेळी त्यांना या तात्पुरत्या पुलाच्या कामाचा आढावा देण्यात येणार आहे.

पुलावर बहिष्कार

नागरिकांनी या पुलाच्या वापरावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा तरंगता पूल धोकादायक आहे, तसेच ही तात्पुरती तडजोड आम्हाला मान्य नसून, या समस्येवर कायमस्वरूपी रस्ता हाच या प्रश्नावरील तोडगा आहे, अशी भूमिका बोपखेलमधील नागरिकांनी मांडली आहे. आज (शनिवार, ८ जून) जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये या प्रश्नाबाबत पुन्हा बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चित्रबलाक’ची दौंडमध्ये नवी वस्ती

$
0
0

नरेंद्र जगताप, दौंड

एकीकडे राखी बगळ्यांनी (ग्रेहेरॉन) व पानकावळ्यांनी त्यांच्या दौंड शहरातील बंगलासाइड या दाट झाडी असलेल्या परिसरातील पारंपारिक वसाहतीकडे पाठ फिरवली असताना, याच परिसरात चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) या स्थलांतरित पक्षांची वसाहत आढळली आहे.

या भागात पूर्वी खूप मोठ्या संख्येने राखी बगळे व पानकावळे दिसायचे. भीमा नदी व उजनीचा फुगवटा जवळ असल्याने या पक्षांना त्यांचे खाद्य असलेले मासे मुबलक प्रमाणात मिळत. परंतु, भीमेच्या पात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यांना सहज अन्न मिळेना. त्यामुळेच त्यांनी दौंडचा अधिवास सोडला असल्याचा अंदाज दौंडमधील पक्षी मित्र प्रल्हाद जाधव व नचिकेत अवधानी यांनी सांगितले.

चित्रबलाक पक्षी राखी बगळ्यांच्या तुलनेत मोठे असल्याने अन्नाच्या शोधात भिगवणच्या पुढे सहजी जावू शकतात. त्यामुळे दौंड शहरातील ब्रिटीशकालीन वसाहतीत जुन्या उंच झाडावर त्यांनी आपली वसाहत वसवली. याबाबत अवधानी म्हणाले, 'चित्रबलाक पक्षी लगेच नव्या जागी वसाहत बनवत नाही. काही महिने सुरक्षिततेची पाहणी करून घरटी बनवतात. त्यांची घरटी झाडाच्या टोकाला असतात. या पक्षांची अंडी मोठी असतात एका प्रजननात एकच अंडे घालतात. लहान असताना या पिल्लांच्या पंखांचा रंग काळपट असतो. पूर्ण वाढ झाल्यावर पांढऱ्या रंगावर गुलाबी रंगाची छटा येते.'

दोन पिलांना जीवदान

मध्यंतरी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने झाडाच्या फांद्या तुटून चित्रबलाक पक्षांची घरटी विस्कटून दोन पिल्ले जमिनीवर पडून जखमी झाली होती. या जखमी पिलांना डॉ. सतीश पांडे व प्रल्हाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नचिकेत अवधानी, करण नगरे गणेश सांगळे, संतोष पवार, दिनेश कणसे यांनी उपचार करून जीवदान दिले. भीमा नदी किनारपट्टी, दौंड शहर व परिसरात नेहमी नवनवीन पक्षांचे आगमन होत असते. त्यांच्या या हालचालींचे निरीक्षण करायला हौशी पक्षीप्रेमी येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोडशेडिंग मॉडेल आता देशभरात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची लोडशेडिंगपासून सुटका करणारे महाराष्ट्राचे मॉडेल केंद्र सरकारने स्वीकारले आहे. राज्याचे मॉडेल आता संपूर्ण देशभरात लागू करण्यात येणार आहे. महावितरणच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता नीळकंठ वाडेकर यांनी ही माहिती दिली.

यापूर्वी पूर्ण विभागात लोड शेडिंग करण्यात येत होते. मात्र, त्यात नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांनाही त्याचा फटका बसत होता. ही अडचण सोडवण्यासाठी महावितरणने वेगळ्या पद्धतीने मॉडेल तयार केले. त्यात ग्राहकांचे सूक्ष्म विश्लेषण (मायक्रो अॅनालिसिस) करण्यात आले.

ग्रामीण भागात ४५ टक्क्यांपेक्षा कमी व शहरात ४२ टक्क्यांपेक्षा कमी वीजहानी असलेल्या भागात लोडशेडिंग न करण्याचा निर्णय घेण्यात आला. वीजहानीमध्ये थकबाकी आणि वितरण हानी यांचा समावेश होतो. या मॉडेलला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने त्याला मंजूरी दिली. महाराष्ट्रात जानेवारी २०१३पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. या मॉडेलमुळे सर्व भागांत लोडशेडिंग करण्याची गरज राहिलेली नाही.

केंद्र सरकारने हे मॉडेल स्वीकारले आहे. त्यांनी याला रोल मॉडेल ठरवले. त्यामुळे देशभरात ते लागू करण्यात येणार आहे. बिहार, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

- नीळकंठ वाडेकर, मुख्य अभियंता, पुणे परिमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोटारसायकलने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मलबार हिल्स सोसायटी येथे हा अपघात झाला होता. लक्ष्मण भिकोबा नेटके (वय ५० रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड), असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नेटके यांचा मुलगा गणेश याने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. लक्ष्मण यांना एका १७ वर्षीय मुलीच्या दुचाकीची धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घडना घडली. अमरजितसिंग रामनरेश (३१, रा. भारतमातानगर, दिघी), असे मृताचे नाव आहे. पुणे-आळंदी रोडवर काळुबाई मंदिराच्या शेजारी रस्त्यावर लावण्यात आलेल्या ट्रकला मागून सिंग यांच्या दुचाकीची धडक बसली.

तरुणाला लुटणाऱ्या तिघा जणांना अटक

तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील दुचाकी, मोबाइल आणि रोख रक्कम काढून घेतल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. १ जून रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रामटेकडी हडपसर येथे ही घटना घडली होती.

या प्रकरणी वानवडी पोलिसांनी विशाल श्रावण गायकवाड (२७, रा. वाल्मिकी वस्ती, हडपसर), प्रशांत रमेश पवार (२२), राहुल राजु सजलानी (१९ रा. हडपसर) यांना अटक केली आहे. याबाबत आकाश कांबळे (२० रा. हडपसर) याने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी आकाश १ जून रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथील सतीश लोंढे कार्यालयाजवळ जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवून त्याच्याकडील दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम असे मिळून ३१ हजार ७३० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून चोरुन नेला.

नोकरीच्या आमिषाने तरुणांना हजारोंचा गंडा

जुन्नर : नारायणगाव येथे नोकरीच्या अमिषाने गरजू युवकांकडून पैसे गोळा करून दोघा युवकांनी अनेकांना गंडा घातला आहे. पवन सुनील भंडारी आणि त्याचा भाऊ गौरव अशी त्यांची नावे असून, दोघेही फरार आहेत. त्यांच्यावर फासवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडित युवकांनी नारायणगाव पोलिसांकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारी बंधूंनी नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक युवकांकडून आठ हजार रुपये परतीच्या बोलीवर जमा करून घेतले. वेगवेगळ्या क्रमांकांवर एसएमएस पाठविल्यास. प्रती महिना दहा हजार रुपये पगार देण्यात येईल, असे या तरुणांना सांगण्यात आले होते.

बनावट नोटांप्रकरणी दोघा तरुणांना अटक

पुणे : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून हजार रुपयांच्या ८० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करून बनावट नोटा चलनात आणत असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी रमजान बारीक शेख (२६), रेजारुल शेख ऊर्फ अलीखान नसरुद्दीन शेख (२०, दोघे रा. प​श्चिम बंगाल) यांना अटक केली आहे. रास्ता पेठेत संत कबीर चौकाजवळ दोन व्यक्ती बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती सहायक पोलिस फौजदार संजय दळवी यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य वितरणातील दलालांना रोखणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग जनतेशी निगडीत असून, सर्वसामान्य जनतेला पुरवठा सुरळीत होण्यासाठी विभागाला अधिक लोकाभिमूख करण्यात येणार आहे. मात्र, अन्न-धान्य वितरणाबाबतचे कठोर कायदा लवकरच करणार असून, यात दलालांच्या मुसक्या आवळण्याचा विडा उचलला आहे, अशी माहिती राज्याचे अन्नपुरवठामंत्री गिरीश बापट यांनी बारामतीत येथे पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत बाटप यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेला अन्न-धान्य रास्त दरात पुरविण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची आहे. आता शिधापत्रिकेचे संगणकीकरण करून बायोमेट्रिक पद्धत लागू करण्यात येणार असून, शिधापत्रिका आधारकार्डाशी जोडली जाणार आहे. त्यामुळे धान्य वितरणातील वेळ वाचेल आणि आपल्या हक्काचे धान्य मिळेल. तसेच, वितरणात होणारा काळाबाजार रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल. वेळ पडल्यास महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बायोमेट्रिक पद्धतीमुळे राज्यातील जनतेला किती धान्याची गरज आहे, याची नेमकी माहिती लवकरच मिळणार आहे.

राज्यातील १ कोटी ७७ लाख केशरी कार्डधारकांचा रेशनकोटा बंद झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, योजनेचा लवकरच आढावा घेऊन गरजूंना धान्य देण्यात येणार आहे. रेशन दुकानदार किंवा रॉकेल दुकानदार यांच्याबाबत जनतेच्या तक्रारी असतील, तर अधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीरदखल घ्यावी.

- गिरीश बापट, अन्नपुरवठामंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेचे बांधकाम जमीनदोस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

धानोरीतील मुंजाबा वस्ती येथील नैसर्गिक नाल्यात शेकडो ट्रक राडारोडा टाकून जमिनीचे सपाटीकरण करून त्यावर बांधण्यात आलेले शाळेचे अनधिकृत बांधकाम शुक्रवारी पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आले. पुढील काही दिवसांत क्षेत्रीय कार्यालयाकडून नाल्यात टाकलेला राडारोडा उचलण्यात येईल, अशी माहितीही पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून मुंजाबा वस्ती येथील नैसर्गिक नाल्यात शेकडो ट्रक राडारोडा टाकून नाला बुजविण्याचा घाट घातला जात होता. याबाबत 'इथेही बुजले नाले.....'या मथळ्याखाली 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये गुरुवारी प्रसिद्ध केले होते. याची दाखल घेत पालिकेच्या बांधकाम विभागाकडून शुक्रवारी राडारोडा टाकून नाल्यात उभारण्यात आलेले बाराशे चौरस फुटाचे पत्र्याच्या शेडचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. बांधकाम विभागाचे उपअभियंता सुभाष पवारा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

कठोर कारवाई का नाही?

येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी, नगररोड, वडगांव शेरी परिसरात ठिकठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून मोकळ्या जागेत, नाल्यात, शासकीय जागेत बांधकामाचा राडारोडा टाकण्यात येतो. याची माहिती स्थानिक क्षेत्रीय कार्यालय आणि पालिका अधिकाऱ्यांना असूनही त्यांचाकडून वेळत ठेकेदारांवर कठोर कारवाई होत नसल्याने असे प्रकार वाढताना दिसतात. येरवड्यातील मेंटल हॉस्पिटलच्या मागील बाजूस हॉस्पिटलच्या जागेत देखील हजारो ट्रक राडारोडा टाकण्यात आला आहे. पावसाळ्यात राडारोड्यावरील पाणी मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा धोका आहे.

नाल्यात खूप मोठ्याप्रमाणात भराव टाकून जमिनीचे सपाटीकरणाचे काम सुरू होते. त्यावर इंग्रजी शाळेसाठी बाराशे चौरस फुटाचे पत्राच्या शेडचे बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम अनधिकृत असल्याने पालिकेकडून कारवाई करण्यात आली.

- सुभाष पवारा, उपअभियंता, बांधकाम विभाग

मुंजाबा वस्तीमधील नाल्यात हजारो ट्रक भराव टाकून नाला बुजविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणवर राडारोडा काढणे खर्चिक आहे. त्यामुळे ज्यांनी राडारोडा टाकला. त्यांनीच हा राडारोडा उचलावा, अशी नोटीस पालिकेकडून बजाविण्यात येणार आहे.

- संध्या गागरे, सहायक आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याघ्रसंवर्धनाचे आव्हान कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीच्या कार्यपद्धतीमुळे वाघांची संख्या वाढविण्यात यश आले. पण आव्हाने संपलेली नाहीत. व्याघ्र प्रकल्पांना आता बेटांचे स्वरुप आले असून त्यांच्या फिरवण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पांना जोडणारे कॉरिडॉर तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे,' असे मत ग्लोबल टायगर फोरमचे महासचिव डॉ. राजेश गोपाल यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान गोपाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इतर देशांच्या तुलनेत भारत खूप पुढे आहे. शास्त्रीय अभ्यास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन अॅथॉरिटीने चांगले काम केले आहे. प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा कायम राहावा यासाठी दरवर्षी त्यांचे मूल्यांकनही होते आहे, असे सांगून गोपाल यांनी महाराष्ट्र व्याघ्र संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करीत असल्याचे नमूद केले.

वाघांची संख्या वाढल्याने हुरळून जाण्यात अर्थ नाही. आव्हाने अजून संपलेली नाहीत. पुढील काही वर्षात वाघांचे अधिवास वाढविणे, मनुष्य आणि वाघ संघर्ष कमी करण्यासाठी ठोस पावले उचलणे आणि शिकारींवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.

देशाच्या प्रगतीसाठी विकास आवश्यक आहे. ग्रामीण क्षेत्र, वनक्षेत्राला लागून असलेल्या क्षेत्रातील सगळीच कामे थांबविता येणार नाहीत. मात्र हे करताना वन्यजीवांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, अशा पद्धतीने नियोजन झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

'गेल्या काही वर्षात व्याघ्र प्रकल्प ही बेटं झाली आहेत. वाघांची संख्या वाढणार असेल तर त्यांना फिरण्यासाठी जागाही अधिक देणे आवश्यक आहे. यासाठी व्याघ्र प्रकल्पांना जोडणारे कॉरिडॉर वाढविले पाहिजेत. त्यांच्या हालचालींवर मर्यादा आणल्यास त्यांच्या संख्येवर परिणाम होईल,' असे गोपाल यांनी सांगितले.

गोव्यातही व्याघ्र प्रकल्प ?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाहीर झाल्यानंतर आता गोव्यातील वनक्षेत्रातही वाघांचे अस्तित्त्व असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सुरुवातीला हे वाघ रहिवासी वाटले नाहीत, मात्र आता कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये फोटोही दिसले आहेत. या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यासाठी गोवा सरकारने प्रस्ताव पाठवावा, असे आम्ही त्यांनी सुचविले आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही, असे डॉ. राजेश गोपाल यांनी सांगितले.

व्याघ्र प्रकल्पांची संख्या ३८ वर

जगभरात सध्या १३ देशांमध्ये वाघांचे अस्तित्त्व असून यातील ७० टक्के वाघांची संख्या एकट्या भारतात आहे. वाघांची घटती संख्या हा अलीकडे जागतिक चिंतेचा विषय बनला असला तरी त्यांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात बहुतांश देश कमी पडत आहेत. भारताने १९७३ पासून वाघांना वाचविण्यास सुरुवात केली. त्यावेळी आपल्या ९ व्याघ्र प्रकल्प होते आता त्यांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन अॅथॉरिटीमुळे गेल्या दहा वर्षांत वाघांची संख्या वाढविण्याबरोबरच त्यांचे डॉक्युमेंटेनश करण्यातही आपण इतरांच्या पुढे आहोत. त्यामुळेच इतर देशातील अभ्यासकांनी आपले मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारमूल्याचे करणार मायक्रोप्लॅनिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जमीन व सदनिकांचे बाजारमूल्य अधिक वास्तववादी करण्यासाठी पुण्यापाठोपाठ बृहन्मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येत्या महिन्याभरात प्रायोगिक तत्वावर काम सुरू केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर राज्यातील अन्य महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत बाजारमूल्य दराचे मायक्रोप्लॅनिंग करण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक एन. रामास्वामी यांनी दिली.

बाजारमूल्य (रेडिरेकनर) अधिक वास्तव असावे, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून पुणे, बृहन्मुंबई आणि ठाणे महापालिकेतील प्रत्येकी एका गावाची पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. पुण्यातील औंधमध्ये रेडिरेकनरच्या मायक्रो प्लॅनिंगचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्याची दखल घेऊन या तीन महापालिकांच्या कार्यक्षेत्रात रेडिरेकनरचे मायक्रो प्लॅनिंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

औंधमधील पथदर्शी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या भागातील ६४० इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील अंतिम अहवाल येत्या आठवड्याभरात केला जाणार आहे. हा अहवाल आल्यानंतर मुंबई आणि ठाणे या ठिकाणच्या पथदर्शी प्रकल्पांचे काम सुरू केले जाणार असल्याचे रामास्वामी यांनी स्पष्ट केले. आयकर, मिळकतकर आकारणी, प्रीमिअम, विकास शुल्क, सरकारी जमिनीची मूल्य निश्चिती अशा कारणांसाठी बाजारमूल्य तक्त्याचा वापर करण्यात येतो. यामुळे रेडिरेकनरचे दर अधिक अचूक असावे, या हेतूने हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रेडिरेकनर ठरविण्याच्या सध्याच्या प्रचलित पद्धतीवर त्यामुळे आक्षेप घेण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांनी नाकारले गॅसवरील अनुदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्वयंपाकाच्या गॅसवर मिळणारे अनुदान परत केले आहे. त्याचप्रमाणे कोथरूडमधील इतर उच्चभ्रू, सधन व्यक्तींनादेखील त्या संदर्भात आवाहन केले आहे. ज्या व्यक्तींना सबसिडीची गरज नाही, अशांनी सरकारी अनुदानाचा लाभ घेऊ नये. तसे झाल्यास खरोखरीच गरजू असलेल्या व्यक्तींपर्यंत अनुदानाचे लाभ अधिक प्रभावीपणे पोचविणे शक्य होईल. याच भूमिकेतून हा निर्णय घेतला आहे, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थी वाहतूक महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बस व रिक्षाद्वारे होणारी शालेय विद्यार्थी वाहतूक गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही महागण्याची चिन्हे आहेत. बस व रिक्षाचालकांनी साधारणपणे १० ते २० टक्क्यांनी दरवाढ केल्याने पालकांवरील भार वाढणार आहे. शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक घटकावर दराबाबत 'आरटीओ'सारख्या शासकीय संस्थांचे नियंत्रण आहे. मात्र, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर कोणाचेच बंधन नसल्याने ते मनमानी करत असल्याचा आरोप पालक करीत आहेत.

उन्हाळ्याची सुटी संपत आली असून येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. त्यातच स्कूल बसच्या शुल्क वाढीचा चटका पालकांना बसणार आहे. वाढते डिझेलचे दर, वाढती विद्यार्थी संख्या यामुळे काही बसमालक व रिक्षाचालकांनी महिन्याच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे पालकांपर्यंत मेसेजही पोहोचविण्यात आला आहे.

पुण्यातील इंग्रजी माध्यमाच्या बहुतांश शाळांत विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल बसेस आहेत. या बसचे शुल्क राज्य सरकारच्या शालेय वाहतूक धोरणानुसार किलोमीटरप्रमाणे निश्चित केले जाते. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि बसमालक यांच्यात करारपत्र असते. यात संभाव्य डिझेल दरवाढ झाल्यास दरात वाढ करण्याची मुभा आहे.

पालकांना करारामुळे भूर्दंड

शाळा व्यवस्थापन समिती आणि बसमालक यांच्यातील करारानुसार निश्चित केलेले शुल्क पालकांना द्यावेच लागते. त्यामुळे त्यामध्ये कितीही वाढ केली, तरीही पालकांना ती स्विकारावी लागत आहे. तसेच, रिक्षानेही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वाहतूक केली जाते. रिक्षाच्या भाड्यावरही कोणाचे नियंत्रण नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेस्ट ड्राइव्हला आला; ऑडी चोरून गेला...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महागड्या गाडीची चैन एका तरुणाला चांगलीच महागात पडली. टेस्ट ड्राइव्हसाठी नेतो असे सांगून ऑडी कार चोरून नेणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी गजाआड केले आहे. ज्युबीलंट मोटार वर्क प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑडी शोरुम सूस ब्रिजशेजारी येथे २८ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या हिंजवडी पोलिसांनी प्रतीक भाऊसाहेब भोसले (वय २३, रा. धायरी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ऑडी कार जप्त केली आहे.

याप्रकरणी अरुण अखिलेंद्र (वय २६,रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी अखिलेंद्र हे ऑडी शोरुममध्ये काम करत असताना अतुल बलकवडे नावाचा व्यक्ती त्यांच्याकडे आला. त्याने आपल्याला ऑडी कार मॉडेल ए ३ तीन खरेदी करायची असल्याचे सांगितले. टेस्ट ड्राइव्हसाठी टेम्पररी नंबर असलेली कार घेऊन तो गेला. त्याच्या सोबत शोरुमचे सेल्स मॅनेजरला त्याने भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे सोडून दिले. त्यानंतर कार घेऊन तो पसार झाला. फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ स्टेशन येथे फिर्याद दिली. संबंधित आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच गुन्ह्यातील चोरलेली ऑडी कंपनीची डेमो कार त्याने पोलिसांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचप्रकरणी अधिकारी अटकेत

$
0
0

पुणे : औषधाची ऑर्डर देण्यासाठी औषध विक्रेत्याकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी ससून येथील औषध निर्माता अधिकाऱ्याला एक वर्ष सक्तमजुरी आणि आठ हजार रुपये दंडाची​ शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

शंकर मारुती ढोबळे (४०, रा. व्यंकटेश संकुल, महादेवनगर, मांजरी बुद्रूक) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी विजया राजेश शेळके (४० रा. महादेवनगर, मांजरी) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. या केसमध्ये सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी तीन साथीदार तपासले. तक्रारदार विजया शेळके यांचा भाऊ संजय जगताप यांचा होलसेल औषध विक्रीचा व्यावसाय आहे. लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दिली. पाच फेब्रुवारी २०१३ रोजी ढोबळेला लाच घेताना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगडावर पोहोचणार अॅम्ब्युलन्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड परिसरासाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची घोषणा पुणे महापालिकेतर्फे शुक्रवारी अखेर करण्यात आली. सिंहगडावर एखादी दुर्घटना घडल्यास जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याकरिता अॅम्ब्युलन्स उपलब्ध असावी, अशी मागणी पर्यटकांकडून सातत्याने केली जात होती. 'महाराष्ट्र टाइम्स'ने याविषयी पाठपुरावा केला होता. खासदार सुळे यांनी त्याबद्दल आश्वासनही दिले होते. शुक्रवारी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पर्यटकांसाठी लवकरच अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केली.

माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्या पुढाकारातून सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळ परिसरात 'स्वराज्य निष्ठा' शिल्पाचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या. महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार भीमराव तापकीर, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

'सिंहगडाच्या स्वच्छतेसाठी अनेकांनी पुढाकार घेतल्याने गेल्या काही दिवसांत गडाचा कायापालट होत आहे. गडावर नेहमी येणारे नागरिक; तसेच नव्याने येणाऱ्या पर्यटकांसाठी तानाजी मालुसरे यांचे स्वराज्य निष्ठा शिल्प प्रेरणादायक ठरेल', असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला. गडावरील स्वराज्य निष्ठा शिल्पासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

आमदार भीमराव तापकीर यांनी पुरातत्त्व खात्यातर्फे सुरू असलेली कामे चुकीची असल्याचा टोला लगावला. वन आणि पर्यटन खात्यात समन्वय नसल्याचा आरोप त्यांनी केला. पांडुरंग बलकवडे, दिलीप बराटे यांचीही भाषणे झाली. दरम्यान, डेक्कन कॉलेजमधून सिंहगडावर प्रबंध सादर करणाऱ्या; तसेच त्यावर पीएचडी करणाऱ्या नंदकिशोर मते यांचा सत्कार सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लर्निंग टेस्ट’ खोळंबली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लर्निंग लायसन्सच्या टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या सिस्टिमच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारी लायसन्स काढण्यासाठी आलेल्या नागरिकांवर ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. पंधरा मिनिटात काम सुरू होईल, या आरटीओने वारंवार दिलेल्या आश्वासनानंतरही सिस्टिम सुरू न झाल्याने नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

दररोज सकाळी १० वाजता नापास झालेल्यांची टेस्ट घेतली जाते. त्यानंतर त्या दिवसाची अपॉइंटमेंट असलेल्या नागरिकांची टेस्ट होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्व्हर बंद पडला. त्या वेळी सुमारे २०० विद्यार्थ्यांची टेस्ट होणे बाकी होते. त्यामध्य नापासांची टेस्ट पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे बराच वेळ गेल्यानंतरही सिस्टिम सुरू होत नसल्याचे पाहून नागरिकांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर उर्वरित उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली.

आॅनलाइन टेस्ट घेण्याची यंत्रणा चालविण्यासाठी आरटीओत दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी हे दोनही कर्मचारी सुटीवर होते. तसेच, त्यांच्या बदल्यात पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही यंत्रणा सुरू होवू शकली नाही. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

अपॉइंटमेंट घेऊन लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची छाननी सर्व प्रथम केली जाते. तेथील निरीक्षक पात्र नागरिकांच्या अर्जावर स्वाक्षरी करून पुढील प्रक्रियेसाठी संमती देतात. त्यानंतर संबंधितांकडून फी स्वीकारून त्यांना परीक्षेला बसविले जाते. मात्र, परीक्षा झाल्यानंतर पुन्हा अर्जावर निरीक्षकाची स्वाक्षरी घेण्यासाठी रांग लावावी लागत आहे.

- राजू घाटोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images