Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीला नोटीस

$
0
0
कोथरूड येथील गांधी भवनाच्या जागेत मिनी थिएटरचे उद्घाटन केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य गांधी स्मारक निधीला नोटीस बजावण्यात आली आहे. नवी दिल्लीच्या गांधी स्मारक निधीतर्फे ही नोटीस बजावण्यात आली. या जागेचा वापर केल्याप्रकरणी स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

रस्‍त्यासाठी ९ कोटी ७६ लाख रुपये

$
0
0
म्हात्रे पूल ते राजाराम पूल यांना जोडणारा नदीकाठचा रस्ता तयार करण्याच्या बदल्यात विशेष भूमी संपादन कार्यालयाला नऊ कोटी ७६ लाख रुपये देण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. या रस्त्यामुळे नवसह्याद्री आणि कर्वेनगर परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्ता मिळणार आहे.

मग आरक्षण का वेगवेगळे?

$
0
0
समाविष्ट गावांमधील टेकड्यांवर बीडीपीचे आरक्षण आणि शहराच्या जुन्या हद्दीतील टेकड्यांवर चार टक्के बांधकामास परवानगी, असा विरोधाभास विकास आराखड्यात असण्याच्या शक्यतेमुळे २३ गावांमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. एका शहराला एकच न्याय असावा, अशी भावना खासगीत व्यक्त करण्यात येत असून त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान कारभा-यांपुढे उभे राहिले आहे.

स्थायी समिती प्रशासनासमोर हतबल ?

$
0
0
गेले पंधरा दिवस शहरभरात गाजत असलेल्या एम्स हॉस्पिटलशी केलेल्या कराराचा तपशील प्रशासनाने स्थायी समितीला अद्यापही उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे या कराराच्या फेरविचाराचा प्रस्ताव पंधरा दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय समितीने घेतला. दरम्यान, याप्रकरणी स्थायी समिती प्रशासनासमोर हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिवसेनेचे नगरसेवक देशमुख यांच्यावर गुन्हा

$
0
0
उमेदवारी अर्जासोबतच्या अफिडेव्हिटमध्ये चुकीची माहिती दिल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी महापालिकेकडून अधिक तपशील मागविला आहे.

आज रात्रीपासून वाहतूकसेवा ठप्प

$
0
0
व्यापा-यांपाठोपाठ राज्यातील वाहतूकदारांनी बुधवारी मध्यरात्रीपासून बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूकसेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. डिझेलची दरवाढ मागे न घेतल्यास बेमुदत बंदचा इशारा महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूकदार महासंघाने मंगळवारी दिला.

व्यापारी बाजारपेठा गुरुवारी बंद

$
0
0
रिटेल बाजारात परकीय गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पुण्यातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला असून, गुरुवारी शहरातील सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच, शॉप अॅक्टचे सुधारीत नियम अंमलात आणून नये, अशी मागणीही त्यांनी केली.

पंचधातूंच्या मूर्तींचा नवा ट्रेंड

$
0
0
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे पंचधातूची मूर्ती साकारण्याचा ट्रेंड वाढत असून, यंदा हत्ती गणपती मंडळ आणि नागनाथ पार मंडळाने या स्वरूपात उत्सवमूर्तींच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. यंदा दोन्ही मंडळांच्या उत्सव मंडपात या मूर्ती भाविकांना पाहता येऊ शकतील.

जादा दराने सिलिंडर विकण्यास मज्जाव

$
0
0
केंद्र सरकारने वर्षाला केवळ सहा सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला असला तरी, ग्राहकांकडून सिलिंडरसाठी नक्की कि‌ती दर आकारावेत या बाबतच्या कोणत्याही सूचना अद्याप वितरकांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या स्पष्ट सूचना येईपर्यंत जादा दराने वितरकांना सिलिंडर विकता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांनी सांगितले.

परगावी जाणा-यांसाठी रेल्वेतर्फे जादा डबे

$
0
0
गणेशोत्सवानिमित्त परगावी जाणा-या नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने पुणे-अहमदाबाद दुरांतो, पुणे-सिकंदराबाद जनशताब्दी एक्स्प्रेस आणि मुंबई- कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस या तीन गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून हे जादा डबे जोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

बाप्पाच्या स्वागताची ‘फुल्ल’ तयारी!

$
0
0
लाडक्या बाप्पाला सजविण्यासाठी पुणेकर तयारीला लागले आहेत. गणरायाला फुलांची आरास करण्यासाठी यंदाही फुलांना मोठी पसंती असून, परिणामी, मंगळवारी फूल बाजार गर्दीने फुलला होता. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची मागणी असल्याने फूल आणि हारांच्या किमती वाढल्या आहेत.

गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी ‘मोबाईल अॅप’ विकसित

$
0
0
श्री गणेश प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी ‘मराठी वेबसाइट्स डॉट कॉम’तर्फे ‘मोबाईल अॅप’ विकसित करण्यात आले आहे. हे अॅप सर्वांसाठी मोफत असून, अॅन्ड्रॉईड मोबाईल आणि टॅबलेट्ससाठी ते ‘गूगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे.

‘रोजगाराची हमी महत्त्वाचीच’

$
0
0
बहुराष्ट्रीय कंपन्या आणि लघुउद्योगामधील कामगारांची सुरक्षितता, त्यांच्या कायमस्वरूपी कामाची हमी ही सध्याची कामगार आणि कामगार संघटनांपुढील आव्हाने असल्याचे मत इंडस्ट्री ऑलचे दक्षिण आशियाई विभागाचे सचिव सुदर्शन सरडे यांनी व्यक्त केले.

बाप्पाचे आगमन, कार्यकर्त्यांची लगबग

$
0
0
गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच सजावट पूर्ण करण्यासाठी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग चालू आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना देखावे पाहण्यासाठी खुले करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे.

गणरायाच्या आगमनासाठी नागरिक आतूर

$
0
0
गणरायाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी मंगळवारी दिवसभर बाजारपेठ गजबजली होती. श्रींच्या स्थापनेसाठी लागणारे साहित्य, गौरी स्वागतासाठी सजावट अशा विविध खरेदीमुळे शहरात उत्सवाच्या मंगलमय वातावरणाची अनुभूती येत आहे.

काही बांधकामे नियमित करणे शक्य

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धोरणानुसार समासिक अंतरामध्ये वीस टक्क्यांपर्यंत फरक करून आणि अनुज्ञेय चटई क्षेत्रापेक्षा दहा टक्क्यांपर्यंत जादा चटई क्षेत्राचा वापर करून केलेली काही अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करणे शक्य आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.

फसवणूक करून मंगळसूत्र चोरी

$
0
0
एका अज्ञात इसमान जेष्ठ नागरिकांची फसवणूक करून १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि पाचशे रुपये चोरून नेले. राजाराम बाबूराव डेंगळे (वय ७२, रा. स्मृती सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

भंगारमाल व्यावसायिकाचा खून

$
0
0
भंगार माल व्यावसायिकाचा धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला. सोमवार (१७ सप्टेंबर) रोजी रात्री साडेनऊ वाजता फुलेनगर येथे झालेल्या खून प्रकरणी पोलिसानी चौघांना अटक केली आहे. युसूफ आबिद खान (वय ३३, रा.दिघी रोड, भोसरी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

गडाचे अखंडत्व कायम ठेवा

$
0
0
राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत श्री क्षेत्र भंडारा आणि भामचंद्र डोंगराचे अखंडत्व कायम राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी मागणी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने केली आहे.

चिमुरड्या भावांचे मृतदेह सापडले

$
0
0
गुलटेकडी आणि हडपसर येथील कॅनॉलमध्ये फेकण्यात आलेल्या युवराज (वय ३) आणि गणराज (वय ५) पानसरे या दोघा चिमुरड्या भावांचे मृतदेह मंगळवारी सकाळी सापडले. या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images