Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दिवसातून दोनदा पाणी शक्य

$
0
0
गेल्या सहा महिन्यांत पाणीकपातीला तोंड देऊन पुणेकरांनी तब्बल सव्वा टीएमसी पाणी वाचविल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणांमध्ये आता पुरेसा साठा असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि वेळा ठरवून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेकडून सुरू आहे.

कोट्यवधींच्या जमिनीला 'अभय'

$
0
0
पवना धरणालगतची सरकारी मालकीची कोट्यवधी रुपयांची ८८ एकर जमीन मूळ मालकांना परत करण्याच्या नावाखाली बिल्डरची तळी उचलणारा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे.

गणेशोत्सवात जादा लोकलसेवा

$
0
0
गणेशोत्सवासाठी लोणावळा, तळेगाव या उपनगरातून पुण्यात येणाऱ्यांच्या सोयीसाठी पुणे-लोणावळा मार्गावर २२ ते ३० सप्टेंबरदरम्यान जादा लोकलसेवा चालवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

शिर्डीला जोडणारे चार नवे मार्ग

$
0
0
शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्टेशनला जोडणारे चार नवे रेल्वे मार्ग सुरू करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री के. एच. मुनीअप्पा यांनी गुरुवारी केली.

‘सी-डॅक’ देणार ५ वर्षांत ‘जेननेक्स्ट सुपरकॉम्प्युटर’

$
0
0
भारताचा ‘जेननेक्स्ट सुपरकॉम्प्युटर’ बनविण्यासाठीच्या प्रयत्नांना ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’मध्ये (सी-डॅक) या पूर्वीच सुरुवात करण्यात आली आहे. येत्या पाच वर्षांमध्येच सध्याच्या सुपर कॉम्प्युटरच्या तुलनेत हजार पट अधिक कार्यक्षम आणि वेगवान सुपर कॉम्प्युटर तयार करणार असल्याचे संकेत सी-डॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी दिले आहेत.

अखेर मल्टिप्लेक्सना ६८ कोटींच्या वसुलची नोटीस

$
0
0
करमाफी असताना प्रेक्षकांकडून करमणूक कर आकारणा-या शहरातील सहा मल्टिप्लेक्स थिएटर्सना ६८ कोटी ६५ लाख ९३ हजार ८७७ रुपयांची कर वसुलीची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावली आहे. मल्टिप्लेक्सचालकांनी केलेली ही ‘लूट’ वसूल करून ती शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे.

...प्रशासन आले रे अंगणी

$
0
0
मुळशी तालुक्यातील खारवडे गावासह सोळा गावांतील ग्रामस्थांच्या अंगणी जिल्हा प्रशासन पोहोचले आणि तब्बल ३९ योजनांचा पावणेचार हजार लाभार्थ्यांना लाभ दिला. इतकेच नव्हे, तर एक वा दोन मुलींवर ‘थांबलेल्या’ कुटुंबांचा विशेष सत्कार करण्यात आला.

चाळीस टक्के पुणेकर केस गळतीने हैराण

$
0
0
बदलत्या जीवनशैलीमुळेच पुणेकरांना केसगळती, टक्कल पडणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. शंभरातील अंदाजे चाळीस पेशंटला केस गळतीसह टक्कल पडण्याच्या समस्येला तोंड द्यावे आहे. तर, दहा टक्के पुरुषांना केशरोपण करून घेण्याची आ‍वश्यकता भासत आहे.

आरटीओतील वायरिंग बदलण्याची सजगची मागणी

$
0
0
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) जुनाट वायरिंग आणि इलेक्ट्रिक बोर्ड दुरुस्त करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे. याबाबत पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

निर्दोष इलेक्ट्रॉनिक मीटर द्या

$
0
0
इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार होत असल्याचा आक्षेप नोंदविल्यानंतर निर्दोष मीटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्यातील ‘आरटीओ’ना परिवहन खात्याने दिल्या आहेत. मीटरच्या रचनेसंदर्भात ठरवून दिलेल्या नियमांची काटेकारेपरणे अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्नही खात्याने उपस्थित केला आहे. उपलब्ध मीटरमध्ये दोष असल्याने, त्यात फेरफार होत असल्याचे रिक्षा संघटनांनी निदर्शनास आणून दिले आहे.

ऑनलाइन विश्व संमेलनात ८० हजारजण सहभागी

$
0
0
आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वेबसाईटवर घेण्यात आलेल्या ऑनलाईन बुकगंगा विश्व साहित्य संमेलनाला सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. जगभरातील सुमारे ८० हजार वाचक, साहित्यिक, लेखक-कवी, ब्लॉगर, विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले.

एसटी कर्मचा-यांचा भत्ता वाढणार

$
0
0
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचारी कराराची चर्चा सुरू असून, येत्या २५ तारखेला होणा-या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कराराच्या मसुद्याला मंजूरी देऊन तो सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले.

आयटीयन्स करणार वाहतूक जागृती

$
0
0
पुणेकरांमध्ये वाहतुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आयटी कंपन्यांच्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे. टेक महिंद्र कंपनीतील २० जणांना याचे प्रशिक्षण लवकरच देण्यात येणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

आता मिळणार २.५ लाखांची भरपाई

$
0
0
जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षाच्या मुलीच्या अपघातीमृत्यू प्रकरणी कोर्टाने ट्रकचालक आणि न्यु इंडिया इन्श्युरन्स कंपनीला अडीच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. जिल्हा न्यायाधीश व्ही. जी. जोशी यांनी हा निकाल दिला.

सिलिंडर पाहिजे... ७५० रुपये मोजा!

$
0
0
वर्षभरात सवलतीच्या दरात सहाच सिलिंडर देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत शहर व परिसरातील डिलरकडे कोणत्याही स्पष्ट सूचना नसल्यामुळे संभ्रमावस्था आहे. मात्र, त्याचाच गैरफायदा उठवून काही डिलर्सने सिलिंडरसाठी ७५० रुपये आकारून ग्राहकांची लूट करण्यास प्रारंभ केला आहे.

पुणे स्फोटः मोहसीन 'मोस्ट वाँटेड'!

$
0
0
जंगली महाराज रोडवरील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी तपास यंत्रणांनी पुणे शहरातील ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी मोहसीन चौधरी याच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

व्यापा-यांचाही ‘बंद’

$
0
0
दुकाने व संस्था नियमावलीत केलेल्या प्रस्तावित सुधारणांच्या विरोधात व्यापा-यांतर्फे येत्या गुरुवारी (२० सप्टेंबर) बंद पुकारण्यात आला आहे. शहर व परिसरातील सर्व बाजारपेठा या दिवशी बंद राहतील. याच दिवशी इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षांनी ‘देशव्यापी बंद’ची हाक दिली आहे.

हो, 'टीम अण्णा'त दुफळी आहे!- अण्णा

$
0
0
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय मैदानात उडी घेण्याचा बेत पूर्णतः रद्द केला असून आपल्या 'टीम'शीही फारकत घेतली आहे. अरविंद केजरीवाल आणि आपल्यात दुफळी निर्माण झाल्याचं खुद्द अण्णांनीच आज 'ऑन कॅमेरा' सांगितलं, तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

शिवाजी रोडवर चारचाकींना बंदी

$
0
0
दगडूशेठ, मंडई, बाबू गेनू अशी प्रचंड गर्दी खेचणा-या मंडळांच्या शिवाजी रोडवर वाहनांमध्ये स्फोटके ठेवून दहशतवाद्यांकडून घातपात घडविला जाण्याची शक्यता असल्याची ‘पक्की’ खबर मिळाल्याने गणेशोत्सवाच्या कालावधीत शिवाजी रोडवरील चारचाकी व बस वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी मंगळवारी घेतला.

निर्विघ्नं कुरुमे देव...

$
0
0
पुढील अकरा दिवस सगळीकडे फक्त उत्साह, प्रसन्न आणि मंगलमय वातावरण, आरत्यांचे सुस्वर, ढोल-ताशांचा निनाद आणि घरापासून ते चौकापर्यंत असलेलं विघ्नहर्त्याचं स्फूर्तिदायी अस्तित्व! सर्वसामान्यांच्या अडचणी, दुःख आणि कटकटींवर फुंकर घालण्यासाठी ‘गणपती माझा नाचत आला’ असून, आता सगळीकडं फक्त आणि फक्त बाप्पाचाच गजर असणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images