Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘टीम अण्णा’ अखेर फुटली

$
0
0
‘भ्रष्टाचारमुक्त भारत हे आमचे उद्दिष्ट एक आहे, ध्येय एक आहे; पण केजरीवाल यांचा पक्ष काढण्याचा मार्ग स्वतंत्र आहे. मी पक्षही काढणार नाही आणि निवडणूकही लढविणार नाही,’ असे स्पष्ट करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘टीम अण्णा’मध्ये दुफळी निर्माण झाल्याचे मंगळवारी मान्य केले.

बजाज म्हणतात... हमारा महाराष्ट्र!

$
0
0
राज्यातील परिस्थितीही ही गेल्या वर्षीपेक्षा सुधारली असून, राज्य सरकारबरोबर असणारे वादही संपले आहेत. त्यामुळे गुजरातवर फुली मारून बजाज ऑटो भविष्यात नवा प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्रालाच प्राधान्य देणार आहे.

लाचखोर पोलिस गजाआड

$
0
0
पासपोर्टच्या व्हेरिफिकेशनसाठी दोन हजार रुपयांची लाच मागणा-या समर्थ पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले. समर्थ पोलिस स्टेशनच्या स्वागत कक्षातच सापळा लावण्यात आल्याने पोलिस स्टेशनमधील कर्मचा-यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

नवजात स्री अर्भक सोडले वा-यावर

$
0
0
मुलगी झाली म्हणून राज्य राखीव पोलिस दलातील (आरपीएफ) जवानाच्या पत्नीने नवजात अर्भकास स्वतः राहात असलेल्या इमारतीबाहेर सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिसांनी जवानाच्या पत्नीला आणि तिच्या बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

इतिहासातील लुप्त जागा शिवाजीरावांनी भरल्या

$
0
0
चरित्रात्मक कादंबऱ्या अनेक निर्माण होतात. परंतु नुसता इतिहासाचा आलेख म्हणजे चरित्रात्मक कादंबरी नव्हे. इतिहासातील लुप्त जागा भरणे हेच खरे चरित्रकाराचे कसब असते. आणि ते केवळ शिवाजीराव सावंत यांनीच साध्य केले होते, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. ता. भोसले यांनी मंगळवारी व्यक्त केले.

पासपोर्ट एजंटची धावाधाव

$
0
0
पासपोर्ट कार्यालयात प्रवेश बंद करण्यात आल्यानंतर सर्व एजंट्सनी आता परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव घेतली असून स्वतंत्र लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

पैशांचा मोह भोवला!

$
0
0
बॉम्ब असल्याच्या संशयावरून बेवारस वस्तूंची तपासणी करणाऱ्या बॉम्बशोधक पथकाला (बीडीडीएस) मंगळवारी एका वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात कडेकोट बंदोबस्तात एक तिजोरी त्याला उघडावी लागली.

सरकारी मालमत्तेवर टॅक्स

$
0
0
उत्पन्न बुडत असल्याने सरकारी मालमत्तांची करपात्र रक्कम ठरविण्याचा अधिकार विशेष अधिकाऱ्याऐवजी महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागप्रमुखांना देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

उलट्यांनी पुणेकर बेजार...!

$
0
0
गेल्या वर्षीच्या तुलनेत अवघ्या आठ महिन्यात शहरातील २९०० जण उलट्यांमुळे (अतिसार) ‘बेजार’ झाले असून या वर्षी तो दहापटीने वाढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उपचारासाठी दवाखान्याकडे धाव घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका संतप्त नागरिकांनी केली.

देखाव्यांवर ‘पोलिसी सेन्सॉर’

$
0
0
मंडळांवर कोणतीही जाचक बंधने नाहीत, असे खुद्द पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनीच जाहीर केले असले, तरी ऐतिहासिक देखाव्यांना आक्षेप घेत पोलिसांनी गणेशोत्सवावर अघोषित ‘सेन्सॉरशिप’च लादली आहे. उत्सव अवघ्या दोन-तीन दिवसांवर आला असताना पर्यायी देखाव्या उभारण्याचा आदेश पोलिसांनी कोथरूड, सातारा रोड परिसरातील मंडळांना बजावला.

ढाले खून प्रकरणी मोझरला अटक

$
0
0
साता-यात नीलेश गौतम ढाले (वय २७) या तरुणाच्या खून प्रकरणी स्वराज प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप मोझर याच्यासह सात जणांना शहर पोलिसांनी आज, गुरुवारी अटक केली.

‘नीट’ निर्णय नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

$
0
0
देशपातळीवर मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणा-या ‘नीट’ परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमईआर) सोमवारी जाहीर करण्यात आलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्रासदायक असल्याची तक्रार होत आहे.

व्यापा-यांचा बंद यशस्वी

$
0
0
‘शॉप अॅक्ट’च्या जाचक आणि सुधारित नियमांची पूर्तता करणे छोट्या विक्रेत्यांना अशक्य असल्याने त्याला स्थगिती द्यावी या सह विविध मागण्यांसाठी शहरातील व्यापा-यांनी गुरुवारी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

सुरक्षारक्षक मंडळाची तातडीने पगारवाढ

$
0
0
‘पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तातडीने पगारवाढ करावी आणि पुढील पगारवाढ मुंबईच्या सुरक्षा रक्षक मंडळाप्रमाणे देण्यात यावी,’ असे असे आदेश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतेच दिले आहेत.

‘डीपी’बाबतची बैठक पुन्हा तहकूब

$
0
0
राजकीय पक्षांत एकमत न झाल्याने शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी बोलाविण्यात आलेली शहर सुधारणा समितीची बैठक गुरूवारी पुन्हा तहकूब करण्यात आली. आता ही बैठक येत्या सोमवारी होणार असून त्यामध्ये तरी आराखड्याच्या मान्यतेला मुहूर्त लागणार की नाही, असा प्रश्न उभा राहिला आहे.

...तर व्यापारी बेमुदत बंद पुकारणार

$
0
0
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात व्यापारी संघटनांनी बंद पुकारूनही शहर आणि उपनगरातील बाजारपेठा गुरुवारी सुरळीत सुरू होत्या. त्यामुळे बाजारात बंदचा परिणाम जाणवला नाही. मात्र, सरकारने नमते न घेतल्यास ऑक्टोबरमध्ये बेमुदत बंद संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असा इशारा ‘द पूना मर्चंटस चेंबर’ने दिला.

एलईडीच्या प्रकाशझोताने झळकली गणेश मंडळे

$
0
0
गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस स्पिकरच्या भिंती उभारून होणारे ध्वनीप्रदुषण आणि वाढत्या वीज बिलावर मा‌त करीत शहरातील काही गणेशमंडळांनी एलईडीचा वापर करून मनमोहक विद्युत रोषणाई केली आहे. सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती मंडळ तसेच नवी पेठेतील शिवांजली मित्र मंडळांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.

पोलिसांना मोफत उपचाराची ‘सेवा’

$
0
0
लाडक्या विघ्नहर्त्याचे नानाविविध रुप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी दर्शनाला येणा-या हजारो लाखो गणेशभक्तांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणा-या पोलिसांचे आरोग्य जपले जावे, यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यांच्यासाठी उत्सवादरम्यान मोफत औषधोपचार सुरू ठेवत भक्तांच्या रक्षणाची सेवा करणा-यांच्या ‘सेवे’चा हा अनोखा उपक्रम साकारण्यात येत आहे.

जातीय अत्याचारविरोधीरॅली येत्या रविवारी पुण्यात

$
0
0
राज्यामध्ये दलित आणि आदिवासींवर होणा-या जातीय अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी या प्रश्नावर काम करणाऱ्या १८ अठरा संघटनांतर्फे ‘जातीय अत्याचार विरोधी अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेली ‘खैरलांजी ते मुंबई जातीय अन्याय, अत्याचार विरोधी रॅली’ रविवारी पुण्यात येणार आहे.

‘गुजरात’च्या बदल्याविषयी बेग होता बोलला

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी हिमायत बेग २००४ मध्ये पुण्यात शिकत असताना जिहाद आणि गुजरात दंगलीचा बदला घेण्याविषयी बोलत असायचा, अशी साक्ष त्यावेळी बेग बरोबर महाविद्यालयात शिकत असलेल्या नांदेडच्या एका विद्यार्थ्यांने कोर्टात दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images