Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नेट न्युट्रॅलिटी हा हक्कच!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारतासारख्या विकसनशील देशात नेट न्युट्रॅलिटी असणे हा नागरिकांचा हक्कच आहे. दूरसंचार कंपन्यांनी नेट न्युट्रॅलिटी नाकारत ओव्हर द टॉप पद्धतीने पैसे आकारल्यास त्याचा फटका विकासालाही बसणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांसाठीही ते धोकादायक ठरणार आहे,' अशी माहिती दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

नेट न्युट्रॅलिटीला पाठिंबा देण्यासाठी देशभर सध्या व्यापक चळवळ उभी राहिली आहे. आतापर्यंत लाखो नेटिझन्सनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. याबाबत 'मटा'ने काही तज्ज्ञांशी संवाद साधला.

सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सुनील पाटील म्हणाले, 'नेट न्युट्रॅलिटी हा नागरिकांचा हक्कच आहे. केवळ इंटरनेटवरच नव्हे तर त्यातून माहिती मिळविण्याचाही त्यांना हक्क आहे. भारतात ७० टक्क्यांहून अधिक नागरिक खेड्यात राहतात. विकासाच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी त्यांना परवडणाऱ्या दरात इंटरनेट सेवा पुरविणे आवश्यक आहे,'.

कंपन्यांच्या भूमिकेची कारणमीमांसा करताना ते म्हणाले, 'दूरसंचार कंपन्यांचा नफा कमी होत आहे. त्यातच या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. अॅप्लिकेशन डेव्हलपर्सचा व्यवसाय वाढत आहे. दूरसंचार कंपन्यांनी पायाभूत सुविधा द्याव्यात तर अॅप्लिकेशन डेव्हलपर्स ग्राहकांना हवी ती अॅप्लिकेशन्स व अन्य सेवा आम्ही पुरवतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून 'ओव्हर द टॉप' सारख्या योजनांमधून ग्राहकांकडून अधिक पैसे वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारही दूरसंचार कंपन्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसते,'

कंपन्यांनी 'ओव्हर द टॉप' पद्धतीने पैसे आकारण्यास सुरुवात केल्यास ग्राहकांना मर्यादितच वेबसाइट्स किंवा अॅप्लिकेशन वापरता येणार आहेत. त्यामुळे नव्या संशोधनाला, अॅप्लिकेशन्सच्या निर्मितीला पर्यायाने विकासालाही खीळ बसण्याची शक्यता आहे. प्रत्येक युजरला कोणत्याही नियंत्रणाशिवाय, हस्तक्षेपाशिवाय मोबाइल इंटरनेट सेवा मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी नेट न्युट्रॅलिटीला पाठिंबा देणे आवश्यक आहे. - डॉ. सुनील पाटील, संचालक, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एनजीओंची मुस्कटदाबी

$
0
0

केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पुण्यातील संस्थांतर्फे निषेध पत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारकडून ग्रीनपीस इंडियासारख्या नामांकित स्वयंसेवी संस्थेला मिळणाऱ्या गैरवागणुकीच्या विरोधात पुण्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांच्या १८० प्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना निषेध पत्र पाठविले आहे. सामाजिक न्याय, पर्यावरणीय सातत्य आणि वंचितांच्या अधिकारांबाबत सक्रिय असलेल्या नामांकित संस्थेची सरकारकडून होणारी मुस्कटदाबी लाजिरवाणी आहे, अशा शब्दांत संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'केंद्र सरकारने ग्रीनपीस इंडिया यासंस्थेची बँक खाती गोठवली असून निधीचे स्रोतही थांबविण्यात आले आहेत. या कारवाईने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संघटीत होण्याचे स्वातंत्र्य या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली होते आहे. देशाचे विकास धोरण आणि प्राधान्यक्रम यापेक्षा भिन्न अशी स्वयंसेवी संस्थांची मते खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा यातून प्रतीत होतो आहे,' असे मत कल्पवृक्ष संस्थेचे आशिष कोठारी व्यक्त केले.

सरकारी विकास धोरणापेक्षा भिन्न मते मांडणे, तसेच जे जनसमुदाय या धोरणामुळे विस्थापित होणार आहेत, त्यांना संघटीत होण्यास मदत करणे अथवा पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनमत तयार करणे हे देशविरोधी कार्य नाही. अथवा जनहिताच्या विरोधातही नाही. पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि मानवी हक्क अबाधित राखणे ही घटनेने दिलेली नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आहेत. तरी देखील सरकार स्वयंसेवी संस्थांची मुस्कटदाबी करते आहे, असा आक्षेप मत आणि मंथनचे श्रीपाद धर्माधिकारी यांनी घेतला आहे.

खाणकाम, ऊर्जा आणि अन्य प्रकल्पांना सरकार चालना देते आहे. सातत्यपूर्ण विकासाच्या सरकारच्या धोरणामुळे अनेक प्रश्न चिन्ह उभी राहिली आहेत, असे सोपेकॉम संस्थेचे के. जे. जॉय यांनी सांगितले.

या निषेध पत्रामध्ये परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन, एसएएनडीआरपीच्या परिणीता दांडेकर, लोकायतच्या नीरज जैन, सतीश खोत, जुगर राठी यांनी सरकारने बेकायदेशीर, अयोग्य, दडपशाहीची कृती त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.

'लोकशाहीच्या मुळावर'

'सरकारचा केवळ ग्रीनपीसला गप्प बसविण्याचा प्रयत्न नाही तर लोकशाहीच्या मूळावर घाव आहे. जे लोक अभिव्यक्ती जाणतात, पर्यावरण विरोधी धोरणे आणि कार्यक्रमांना विरोध करण्याचे महत्त्व जाणतात, त्या सर्वांना या लढ्यात सहभागी करून घेतले पाहिजे. आपण सरकारला योग्य वेळेत विरोध केला नाही तर ते उद्या इतर संस्थांच्या मागे येतील,' असे मत लोकायतचे नीरज जैन यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिरंगाईचा अडथळा

$
0
0


म. टा. प्रतिनिध‌ी, पुणे

सिंहगड रोड, कर्वेनगर, कोथरूड भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून उपयुक्त ठरणारा म्हात्रे पूल डीपी रोड ते नदीकाठचा रोड वर्षानुवर्षे रखडला आहे. हा रोड करण्यामध्ये अडथळा ठरत असलेले जागामालक आपली जागा पालिकेला देण्यास तयार असतानाही केवळ अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा रस्ता पूर्ण होत नसल्याचे समोर आले आहे.

शहराचा चारही दिशांना विकास झाल्याने सिंहगडरोडबरोबरच वारजे, कोथरूड, कर्वेनगर या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. डेक्कन मार्गे खंडूजीबाबा चौकातून कर्वेरोड, कोथरूडकडे जात असताना वाहनचालकांना प्रत्येक चौकात वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. म्हात्रे पूल डीपी रोड ते रजपूत झोपडपट्टी दरम्यान असलेला रस्ता अत्यंत अरुंद असल्याने या भागातही वाहतुकीचे तीन-तेरा वाजलेले असतात. या भागात होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्याबरोबरच वाहनचालकांना नदीपात्रातून थेट डीपीरोडवर जाता यावे, यासाठी म्हात्रे पूल ते नदीपात्रातील रस्ता दरम्यान असलेली जागा ताब्यात घेऊन हा रस्ता केला जाणार आहे.

हा रस्ता करण्यासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने जागामालकांना नोटीस बजाविली होती. या नोटिशीच्या विरोधात संबंधित जागामालक कोर्टात गेल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. रस्त्याला अडथळा ठरणारी जागा ताब्यात घेण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या मध्यस्थीनंतर जागामालकाने रेडिरेकनरच्या दराने पालिकेला जागा देण्याची तयारी दाखविली आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या कार्यालयात याबाबत बैठकाही झाल्या. या जागेसाठी नऊ ते सव्वा नऊ कोटी रुपये देखील पालिकेने निश्चित केले; मात्र महिना होऊनही अद्याप फाइल पुढे सरकली नसल्याचे समोर आले आहे.

पालिकेने रेडिरेकनरचा दर निश्चित केलेला असतानाही या जागेची निश्चित किंमत किती अशी विचारणा करणारे पत्र गेल्या महिन्यातच पालिकेने नगर रचना विभागाला पाठविले आहे; मात्र त्यावर अद्यापही कोणतेही उत्तर आलेले नाही. पालिकेतील अधिकारी याकडे फारसे गांभिर्याने पाहत नसल्याने हा रस्ता होत नसल्याचा आरोप केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून होणार DNA टेस्ट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वातंत्र्य सैनिकाची सून असल्याचे सिद्ध करण्यासाठी सांगलीतील सरकारी नोकरदार असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची डीएनए टेस्ट करण्याचा अजब आदेश विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिला आहे. गेली पंधरा वर्षे निलंबनाचा वनवास सोसलेल्या या महिलेला सरकारी सेवेत रुजू करण्याचा निर्णय कोर्ट व तत्कालीन राज्यमंत्र्यांनी देऊनही डीएनए टेस्टसाठी आटापिटा केला जात आहे.

या महिलेच्या कुटुंबियांची डीएनए टेस्ट घेण्यास परवानगी मिळावी यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या परवानगीनंतर संबंधित महिलेच्या कुटुंबियांच्या रक्ताचे नमूने तपासण्यात येतील आणि त्यातील निष्कर्षावर या महिलेला सरकारी सेवेचे लाभ देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

सांगलीतील मीना श्रीकांत दिवकर यांना स्वातंत्र्य सैनिक कृष्णाजी रामचंद्र दिवेकर यांची सून म्हणून सरकारी सेवेत नोकरी मिळाली. मात्र, मीना या स्वातंत्र्य सैनिक कृष्णाजी यांच्या सूनबाई नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी होऊन मीना यांना जानेवारी २००० मध्ये नोकरीतून निलंबित करण्यात आले आणि त्यांच्यावर खोटी कागदपत्रे सादर केल्याचा फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला. तसेच, त्यांची विभागीय चौकशी (डीई) सुरू करण्यात आली.

सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर मीना यांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केले. मात्र, या अपिलाचा निर्णय देताना विभागीय आयुक्तांनी मीना यांना निलंबित करण्याचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाविरोधात मीना यांनी मॅटमध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) धाव घेतली. मॅटने मीना यांचे निलंबन रद्द ठरवून त्यांना कामावर घेण्याचे आदेश दिले. याचदरम्यान, मीना दिवाणी कोर्टातही धाव घेतली होती. दिवाणी कोर्टात सरकारतर्फे कोणीच उपस्थित न राहिल्याने कोर्टाने केस निकाली काढली. या डिसमिस फॉर डिफॉल्टच्या आदेशावर सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी अपिल केले. केसच्या सुनावणीलाही कोणी उपस्थित राहिले नाही.

मीना यांना आता सेवेत परतण्याची आशा असतानाच विभागीय चौकशीमध्ये त्या दोषी आढळल्या. त्यामुळे त्यांना पुन्हा निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर २०१२ मध्ये मीना यांनी तत्कालीक राज्यमंत्र्यांकडे अपिल दाखल केले. या अपिलावर सुनावणी होऊन मीना यांना सरकारी सेवेत पुर्नस्थापित करण्याचा आदेश राज्यमंत्र्यांनी दिला. या आदेशानंतर मीना यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि सेवेत रुजू करून घेतना निलंबित केले त्याच्या वेतनाचीही मागणी केली. ही मागणी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली. त्यामुळे मीना यांनी विभागीय आयुक्तांकडे वेतनासाठी अपिल केले.

या अपिल अर्जावर आदेश देताना, मीना या स्वातंत्र्य सैनिकाची सून आहे हे कोठेही सिद्ध झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील आवश्यक त्या संबंधितांची डीएनए टेस्ट करावी व त्यासाठी लागणारे आदेश सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी काढावेत. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी, असा आदेश विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी काढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटींनाही ‘पीएफ’

$
0
0

'बीएसएनएल'चा निर्णय; तीन हजार कर्मचाऱ्यांना लाभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये (बीएसएनएल) कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या देशभरातील कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंडचे (पीएफ) संरक्षण देण्याचा निर्णय 'बीएसएनएल' आणि एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशन (ईपीएफओ) या विभागांनी संयुक्तपणे घेतला आहे. या निर्णयामुळे तीन हजार ४६९ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. मात्र, त्यापोटी 'बीएसएनएल'ला आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे.

'बीएसएनएल'मध्ये अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. तसेच काही कर्मचारी टेम्पररी स्टेटस मजदूर (टीएसएम) म्हणूनही कामाला आहेत. त्यांना 'पीएफ'चे संरक्षण देण्यात येत नाही. याबाबत कामगार मंत्रालयामध्ये अनेकदा चर्चाही झाली होती. तसेच 'पीएफ' आयुक्त, 'बीएसएनएल'चे वरिष्ठ अधिकारी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे 'ईपीएफओ'च्या पुणे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्यांची माहिती 'बीएसएनएल'ने संकलित केली असून, देशभरात तीन हजार ४६९ कर्मचारी आहेत. त्यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांची संख्या अवघी १४ आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयांच्या हद्दीत असलेल्या 'बीएसएनएल'च्या सर्कलमध्ये किती कामगार कंत्राटी पद्धतीने कामावर आहेत, याबाबतचा अहवाल पाठविण्याच्या सूचना मुख्यालयाकडून देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयाचा लाभ कंत्राटी किंवा 'टीएसएम' म्हणून काम करणाऱ्या कामगारांना होणार आहे. मात्र, त्याचा अर्थिक बोजा 'बीएसएनएल'वर पडणार आहे. या कर्मचाऱ्यांना नेमणुकीपासून आतापर्यंतचा 'पीएफ' हा 'बीएसएनएल'ला भरावालागणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कंत्राटी कामगार

'बीएसएनएल'ने देशभरातील कंत्राटी कामगारांची सर्कलनिहाय यादी तयार केली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगाल सर्कलमध्ये सर्वाधिक दोन हजार १०१ कर्मचारी आहेत. त्यानंतर आसाममध्ये २०६, गुजरातमध्ये १५६, आंध्रप्रदशमध्ये ११६, हिमाचल प्रदेशात ९८, उत्तरप्रदेशमध्ये ८१ कर्मचारी आहेत. अन्य ठिकाणी किरकोळ संख्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून केले अवयवदान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

क्रिकेटर मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दुसऱ्याला देणाऱ्या माता-पित्यांच्या सत्कार समारंभातून प्रेरणा घेत अवघ्या काही दिवसानंतरच 'ब्रेनडेड' झालेल्या पतीचे अवयदान करण्यास सावित्रीच्या लेकीला बळ मिळाले. जगाचा निरोप घेता घेता संचित सरकार यांनी पाच व्यक्तींना जीवदान देऊन जगात निस्वार्थपणे आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

एका चित्रपटाला शोभेल अशी पूना ह़ॉस्पिटलमध्ये घडलेली सत्यघटनेवर आधारित ही कहाणी. जाहीर कार्यक्रमातून ही कहाणी समाजासमोर लवकरच येणार आहे. अवयवदान जनजागृती मोहिमेस समाजातील विविध स्तरातून हातभार लागत आहे. दिव्याने दिवा जसा पेटावा तसा अवयवदानाची महती वाढू लागल्याची प्रचिती सरकार यांच्या अवयवदानातून आली आहे.

'क्रिकेटर अभिषेक ठाकूर याच्या मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे धाडस दाखविणाऱ्या नरेंद्र ठाकूर दाम्पत्याला नुकताच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या कार्यक्रमात कुरकुंभ येथील एका कंपनीत नोकरीस असलेले संचित सरकार (वय ६३) यांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्या नंतर काही आठवड्यांनी त्यांना मेंदूचा विकार (ब्रेन हॅमरेज) बळावला. त्यामुळे पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारास प्रतिसाद देत नसल्याने ते 'ब्रेन डेड' झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सरकार यांना काही वर्षापासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर अॅँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. हृदयविकारतज्ज्ञ डॉ. हसमुख गुजर यांनी तपासणी केली. मात्र ते 'ब्रेन डेड' असल्याचे पुन्हा निदान झाले. अखेर सरकार यांच्या पत्नीसह कुटुंबीयांना त्यांच्यासंदर्भात माहिती द्यावी लागली. ते 'ब्रेन डेड' असून त्यांचे अवयवदान करता येईल असे सुचविण्यात आले. त्यावर सरकार यांच्या पत्नीसह मुलाने तयारी दर्शविली. त्यामुळे रुबी हॉस्पिटलमधील एकाला लिव्हर, केईएम, तसेच पूना हॉस्पिटलच्या पेशंटना किडनी आणि मंगेशकर नेत्रपेढीस डोळे दान करून पाच जणांना त्यांनी जीवदान दिले,' अशी माहिती पूना हॉस्पिटलच्या अवयव प्रत्यारोपण समन्वयक वैशाली फणसळकर यांनी 'मटा'ला माहिती दिली.

सरकार यांच्या पत्नीसह मुलगा अवयवदान करण्यास विनासंकोच तयार झाल्याचे आश्चर्य वाटले. मात्र, याबाबत विचारता ठाकूर दाम्पत्यांनी मुलाचे अवयवदान करून समाजासमोर आदर्श घालून दिला. कौटुंबिक वातावरण हे समाजसेवेशी निगडित असल्याने अवयवदानासंदर्भात कुटुंबीयांमध्ये जनजागृती असल्याचे दिसून आले. येत्या २८ एप्रिलला एका कार्यक्रमात कुटुंबीयांच्या धाडसाचे कौतुक करणार असल्याचे फणसळकर यांनी सांगितले.

दरम्यान, 'खरे तर देण्यातच प्रेम असते. निस्वार्थपणे दिले तर ते खरे प्रेम असते, असे माझे वडील नेहमी म्हणायचे. वडिलांचे तेच विचार आईच्या मनात मृत्यूनंतर घोळत होते. वडील 'ब्रेन डेड' असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वडिलांच्या निस्वार्थ भावनेतून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला,' अशी प्रतिक्रिया सन्मित सरकार यांनी दिली.

वडिलांचे अवयवदान केले तरी कोणाला तरी जीवदान मिळेल. मृत्यूच्या दोन आठवड्यापूर्वी जाहीर कार्यक्रमातून अवयवदान करण्याची प्रेरणा वडिलांना मिळाली होती. त्याचवेळी आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करावे अशी इच्छा त्यांनी आईकडे बोलून दाखविली होती. त्यामुळे अवयवदानाचा आम्ही निर्णय घेतला. - सन्मित सरकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेट न्युट्रॅलिटी हा हक्कच!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारतासारख्या विकसनशील देशात नेट न्युट्रॅलिटी असणे हा नागरिकांचा हक्कच आहे. दूरसंचार कंपन्यांनी नेट न्युट्रॅलिटी नाकारत ओव्हर द टॉप पद्धतीने पैसे आकारल्यास त्याचा फटका विकासालाही बसणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांसाठीही ते धोकादायक ठरणार आहे,' अशी माहिती दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

नेट न्युट्रॅलिटीला पाठिंबा देण्यासाठी देशभर सध्या व्यापक चळवळ उभी राहिली आहे. आतापर्यंत लाखो नेटिझन्सनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. याबाबत 'मटा'ने काही तज्ज्ञांशी संवाद साधला.

सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सुनील पाटील म्हणाले, 'नेट न्युट्रॅलिटी हा नागरिकांचा हक्कच आहे. केवळ इंटरनेटवरच नव्हे तर त्यातून माहिती मिळविण्याचाही त्यांना हक्क आहे. भारतात ७० टक्क्यांहून अधिक नागरिक खेड्यात राहतात. विकासाच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी त्यांना परवडणाऱ्या दरात इंटरनेट सेवा पुरविणे आवश्यक आहे,'.

कंपन्यांच्या भूमिकेची कारणमीमांसा करताना ते म्हणाले, 'दूरसंचार कंपन्यांचा नफा कमी होत आहे. त्यातच या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. अॅप्लिकेशन डेव्हलपर्सचा व्यवसाय वाढत आहे. दूरसंचार कंपन्यांनी पायाभूत सुविधा द्याव्यात तर अॅप्लिकेशन डेव्हलपर्स ग्राहकांना हवी ती अॅप्लिकेशन्स व अन्य सेवा आम्ही पुरवतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून 'ओव्हर द टॉप' सारख्या योजनांमधून ग्राहकांकडून अधिक पैसे वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारही दूरसंचार कंपन्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसते,'

कंपन्यांनी 'ओव्हर द टॉप' पद्धतीने पैसे आकारण्यास सुरुवात केल्यास ग्राहकांना मर्यादितच वेबसाइट्स किंवा अॅप्लिकेशन वापरता येणार आहेत. त्यामुळे नव्या संशोधनाला, अॅप्लिकेशन्सच्या निर्मितीला पर्यायाने विकासालाही खीळ बसण्याची शक्यता आहे. प्रत्येक युजरला कोणत्याही नियंत्रणाशिवाय, हस्तक्षेपाशिवाय मोबाइल इंटरनेट सेवा मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी नेट न्युट्रॅलिटीला पाठिंबा देणे आवश्यक आहे. - डॉ. सुनील पाटील, संचालक, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनजीओंची मुस्कटदाबी

$
0
0

केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पुण्यातील संस्थांतर्फे निषेध पत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारकडून ग्रीनपीस इंडियासारख्या नामांकित स्वयंसेवी संस्थेला मिळणाऱ्या गैरवागणुकीच्या विरोधात पुण्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांच्या १८० प्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना निषेध पत्र पाठविले आहे. सामाजिक न्याय, पर्यावरणीय सातत्य आणि वंचितांच्या अधिकारांबाबत सक्रिय असलेल्या नामांकित संस्थेची सरकारकडून होणारी मुस्कटदाबी लाजिरवाणी आहे, अशा शब्दांत संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'केंद्र सरकारने ग्रीनपीस इंडिया यासंस्थेची बँक खाती गोठवली असून निधीचे स्रोतही थांबविण्यात आले आहेत. या कारवाईने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संघटीत होण्याचे स्वातंत्र्य या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली होते आहे. देशाचे विकास धोरण आणि प्राधान्यक्रम यापेक्षा भिन्न अशी स्वयंसेवी संस्थांची मते खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा यातून प्रतीत होतो आहे,' असे मत कल्पवृक्ष संस्थेचे आशिष कोठारी व्यक्त केले.

सरकारी विकास धोरणापेक्षा भिन्न मते मांडणे, तसेच जे जनसमुदाय या धोरणामुळे विस्थापित होणार आहेत, त्यांना संघटीत होण्यास मदत करणे अथवा पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनमत तयार करणे हे देशविरोधी कार्य नाही. अथवा जनहिताच्या विरोधातही नाही. पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि मानवी हक्क अबाधित राखणे ही घटनेने दिलेली नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आहेत. तरी देखील सरकार स्वयंसेवी संस्थांची मुस्कटदाबी करते आहे, असा आक्षेप मत आणि मंथनचे श्रीपाद धर्माधिकारी यांनी घेतला आहे.

खाणकाम, ऊर्जा आणि अन्य प्रकल्पांना सरकार चालना देते आहे. सातत्यपूर्ण विकासाच्या सरकारच्या धोरणामुळे अनेक प्रश्न चिन्ह उभी राहिली आहेत, असे सोपेकॉम संस्थेचे के. जे. जॉय यांनी सांगितले.

या निषेध पत्रामध्ये परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन, एसएएनडीआरपीच्या परिणीता दांडेकर, लोकायतच्या नीरज जैन, सतीश खोत, जुगर राठी यांनी सरकारने बेकायदेशीर, अयोग्य, दडपशाहीची कृती त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.

'लोकशाहीच्या मुळावर'

'सरकारचा केवळ ग्रीनपीसला गप्प बसविण्याचा प्रयत्न नाही तर लोकशाहीच्या मूळावर घाव आहे. जे लोक अभिव्यक्ती जाणतात, पर्यावरण विरोधी धोरणे आणि कार्यक्रमांना विरोध करण्याचे महत्त्व जाणतात, त्या सर्वांना या लढ्यात सहभागी करून घेतले पाहिजे. आपण सरकारला योग्य वेळेत विरोध केला नाही तर ते उद्या इतर संस्थांच्या मागे येतील,' असे मत लोकायतचे नीरज जैन यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खडकीत भरणार नोकरी महोत्सव

$
0
0

खडकी:

खडकी आणि परिसरातील नागरिकांसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खडकी कँटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक मनीष आनंद आणि नगरसेविका पूजा आनंद यांच्यातर्फे मंगळवारी (२८ एप्रिल) सकाळी नऊ ते चार या वेळेत खडकीतील लाल बहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये महोत्सव आयोजिण्यात आला आहे.

हा महोत्सव नुसता खडकीवासीयांपुरता मर्यादित नसून, बोपोडी, दापोडी, बोपखेल, सांगवी, औंध, मुळा रोड, वाकडेवाडी, विश्रांतवाडी, कळस, साप्रस, संगमवाडी या भागातील नागरिकांनाही त्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

सहभागी होण्यासाठी संबंधितांनी २७ एप्रिल पर्यंत ९७६३६५१४१४, ८४८२९६३९५९, ९६०४३८३८३३, ७७९८९७७६०४ या क्रमांकांवर नावनोंदणी करावी, असे आवाहन मनीष आणि पूजा आनंद यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रानडे इन्स्टिट्यूट’ विद्यापीठात हलविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग (रानडे इन्स्टिट्यूट) विद्यापीठाच्या आवारात हलविण्याचे संकेत विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी दिले. विभागाविरोधात सातत्याने येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी स्पष्ट केले.

विभागातील गैरप्रकार आणि गैरसौयींविरोधात विभागाच्याच विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या विषयी विद्यापीठाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांनी अखेर शुक्रवारी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले. त्यानंतर कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आणि कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी विभागाला भेट दिली. डॉ. गाडे यांनी हे गैरप्रकार थांबविण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

विभाग विद्यापीठामध्ये हलविण्याची विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेत, त्या विषयी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विभागातील अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्व मागण्या न्याय्य असून त्यांचा त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही डॉ. गाडे यांनी विद्यार्थ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटी लागली; तिकिटे वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उन्हाळी सुट्यांमुळे प्रवाशांची वाढलेली संख्या... तुडूंब भरून वाहणाऱ्या एसटी बस... रेल्वेच्या आरक्षित तिकिटांची अनुपलब्धता... आणि प्रवाशांची गरज..., या गोष्टींमुळे प्रवासी वाहतूक करणारे खासगी व्यावसायिक नागरिकांकडून गर्दीच्या हंगामात जादा पैसे घेतात. सुट्यांचा काळ म्हणजे या बसवाल्यांचा पैसे कमाविण्याचाच काळ असल्याची उपरोधिक टीका नागरिक करीत आहेत.

नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आपले गाव सोडून अनेक जण स्थलांतरित झालेले असतात. पुण्यातही अशा स्थलांतरिताची संख्या अधिक आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्या लागल्या, की प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन गर्दीचा हंगाम सुरू होतो. या काळात एसटी, रेल्वे याबरोबरच प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसही खचाखच भरलेल्या असतात. वेळप्रसंगी प्रवासी संख्येच्या तुलनेत उपलब्ध साधने कमी पडतात. याच गोष्टीचा फायदा घेत खासगी वाहतूकदार त्यांच्या मनाप्रमाणे तिकीट दर आकारत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भाकडे जाणाऱ्या खासगी गाड्यांचे दर ३०० ते ७०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. शनिवारी आणि रविवारी तिकीट वाढीचा दर हा अन्य दिवसांपेक्षा जास्त असतो. तसेच, कडाक्याच्या उन्हामुळे 'एसी' बसला अधिक मागणी अाहे. त्यामुळे त्या बसचे तिकीटही तुलनेने जादा आहे.

पुण्यात शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन येथे बहुतांश खासगी वाहतुकदारांची दुकाने आहेत. यापैकी शिवाजीनगरचे एसटी स्टँड आणि पुणे स्टेशनचे एसटी स्टँड येथे येणाऱ्या प्रवाशांना या खासगी वाहतुकदारांचे एजंट स्टँडच्या दारातच थांबवून कोठे जायचे अशी चौकशी करताना आढळून आले.

'कायद्याच्या चौकटीत आणा'

खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून केल्या जाणाऱ्या भरमसाठ तिकीट दर वाढीवर कोणाचेच नियंत्रण नाही. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन ते त्यांना लुटत असतात. मात्र, पोलिस किंवा आरटीओ या दोहोंचे यावर नियंत्रण नाही. त्यामुळे त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. परिवहन विभागाकडून रिक्षा, टॅक्सी यांना दर ठरवून देण्यात आले आहेत. एसटी व रेल्वेचे दर प्रशासन ठरवते. मग, या खासगी वाहतुकदारांना मोकळीक का, त्यांना कायद्याच्या चौकटीत आणता येणार नाही का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

नागपूरवरून पुण्याला येण्यासाठी 'स्लिपर एसी' बसचे तिकीट सव्वा महिन्यापूर्वी एक हजार ५० रुपये होते. मात्र, तेच पुण्यातून नागपूरला जाण्यासाठी आता बाराशे ते पंधराशे रुपये तिकीट मागितले जात आहे.

- मोहन कांबळे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या जागामालकांची अडवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वतन, इनाम किंवा कोणतीही शर्त नसलेल्या आणि शहरातील विकास आराखडा (डीपी) तसेच प्रारूप विकास आराखड्यात असलेल्या वर्ग एकच्या जमिनींवर बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बंधनकारक नाही, असा अध्यादेश राज्य सरकारने काढलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत पालिकेतील अधिकारी अशा जागामालकांचे बांधकाम नकाशे मंजूर करत नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एनओसी आल्यानंतरच बांधकाम परवानगी देण्यात येईल, अशी अडवणूक करण्यास बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सुरुवात केल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

महापालिका तसेच नगरपालिकेमध्ये दाखल होणाऱ्या बांधकाम नकाशे व बिगरशेती (एनए) जमिनीच्या एनओसीबाबत शासनाने जुलैमध्ये २०१४ मध्ये कायदा केला आहे. शहराच्या डीपी तसेच प्रस्तावित डीपीमध्ये वतनाच्या तसेच इनामाच्या जमिनी असल्यास त्यावर बांधकाम करताना केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एनओसी घ्यावे, याव्यतिरिक्त इतर कोणत्याही जमीन मालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाची एनओसी घेण्याची आवश्यकता नाही, असा स्पष्ट उल्लेख शासनाने काढलेल्या अध्यादेशात करण्यात आलेला आहे. मात्र, असे असतानाही याकडे दुर्लक्ष करत पालिकेच्या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची अडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एनओसी घेऊन आल्यानंतरच बांधकाम नकाशे मंजूर करून त्यानंतरच जोते तपासणी केली जाईल, अशी आडमुठी भूमिका बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

वतन तसेच इनाम जमिनीबाबत एनओसी देण्याचे सर्व अधिकार पालिका आयुक्तांना शासनाने दिले असतानाही नागरिकांची अडवणूक करत असल्याचे तक्रार केली जात आहे. छोट्या प्लॉटधारकांनी सादर केलेले ९२ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली. राज्य सरकारचा अध्यादेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांना टोलवाटोलवीची उत्तरे देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्विकृत नगरसेवक संजय बालगुडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

'शहर अभियंत्यांकडून मान्यता आणा, परवानगी देतो'

छोट्या प्लॉटचे बांधकाम करताना जिल्हाधिकारी कार्यालयाची एनओसी घेण्याची गरज नसल्याचा अध्यादेश बांधकाम विभागातील अधिकारी मानत नाहीत. तुम्हाला बांधकाम तसेच जोते तपासणी कराचयी आहे ना, मग शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडून मान्यता आणा तातडीने परवानगी देऊ असा 'उद्योग' बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सुरू करत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेचे खळ्ळ... खट्याक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यातील २५ टक्के प्रवेशांच्या गोंधळाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी महापालिकेच्या शिक्षण मंडळात तोडफोड केली. सरकारी पातळीवरील बैठका आणि आदेशांच्या पलिकडे प्रत्यक्ष प्रवेशांच्या पातळीवर कोणतीही पावले उचलली जात नसल्याने, आक्रमक होत 'मनसे'ने कायदा हातात घेतला. त्या विरोधात महापालिका शिक्षण मंडळाने पोलिसात तक्रार दाखल केली.

शाळा आणि शिक्षण खात्यामध्ये फी परतावा आणि एन्ट्री पॉइंटच्या मुद्द्यावरून सध्या वाद सुरू आहेत. त्या वादात शाळा आरक्षित जागांवरील प्रवेश नाकारत आहेत. ही बाब चुकीची आहे. त्यात शिक्षण खाते आणि शाळाही दोषी आहेत. प्रवेश नाकारण्याचा बालमनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच खात्याचे अधिकारीच आपल्या नोटिसा गांभीर्याने घेऊ नका, असे वक्तव्य करीत आहेत. या सर्व बाबींचा निषेध करत हे आक्रमक पाऊल उचलल्याचे पक्षाचे शहर उपाध्यक्ष अजय शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रवेश सुरळीत न झाल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. या प्रकरणी शिक्षण मंडळाने पोलिसात तक्रार दिल्याचे महापालिका शिक्षण मंडळ प्रमुख बी. के. दहिफळे यांनी सांगितले. तसेच, प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरकारच्या धोरणात पुन्हा बदल !

२५ टक्के प्रवेशांच्या मुद्द्यावरून घोळ सुरू असतानाच, सरकारने पुन्हा एक नवे धोरण शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार आरटीईचे प्रवेश देताना, शाळांनी आपल्याकडील पहिलीच्या प्रवेश संख्येच्या २५ टक्के प्रवेश देणे अपेक्षित आहेत. ते प्रवेश थेट पहिलीला किंवा शाळांकडील एन्ट्री पॉइंटनुसार पहिली आणि संबंधीत पूर्वप्राथमिक वर्गामध्ये एकत्रितरीत्या दिले तरी चालणार असल्याचे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी 'मटा'ला सांगितले. 'आरटीई' प्रवेशांविषयी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारी हा निर्णय झाल्याचे जाधव यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’चे खापर शिक्षण खात्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

''आरटीई'च्या अंमलबजावणीतील अपयशासाठी शिक्षण संस्थांना जबाबदार धरणे सोडा,' अशा शब्दांमध्ये संस्थाचालकांनी शिक्षण खात्याच्या कारभारावर शुक्रवारी थेट टीका केली. फी परतावा आणि एन्ट्री पॉइंटच्या मुद्द्याची परिपूर्ण अंमलबजावणी होणार असेल; तर संस्थाचालकही २५ टक्क्यांचे सर्व प्रवेश देण्यास तयार असल्याचे आश्वासनही संस्थाचालकांनी खात्याला दिले.

शिक्षणहक्क कायद्यामधील २५ टक्क्यांच्या प्रवेशाबाबत शहरात निर्माण झालेल्या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शहरातील शिक्षण संस्थाचालकांची एक बैठक बोलविली होती. मात्र, या बैठकीमध्ये दोन्ही घटकांना एकमेकांवर आरोप करण्यातच स्वारस्य असल्याचे अनुभवायला मिळाले. राजीव गांधी ई-लर्निंग शाळेमध्ये झालेल्या या बैठकीदरम्यान एकीकडे संस्थाचालक प्रतिनिधी कायदेशीर तरतुदींवर बोट ठेवून आपली मांडणी करत असताना, खात्यातील अधिकारी मात्र त्या विषयी मोघम उत्तरे देताना दिसून आले. अधिकाऱ्यांनी कोणताही ठोस निर्णय न देताच बैठक संपल्याने बैठकीच्या आयोजनाविषयी समाधान व्यक्त करणाऱ्या संस्थाचालकांनीच खात्याच्या अकार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महापौर दत्तात्रय धनकवडे, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांच्यासह मंडळाचे इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधीही या बैठकीला हजर होते. महापौर धनकवडे यांनी शिक्षण खाते आणि संस्थाचालकांनी समन्वयाची भूमिका ठेवत गरजू पालकांना लवकरात लवकर प्रवेश मिळवून देण्याचे आवाहन या वेळी केले. दोन एन्ट्री पॉइंटची भानगड थांबवून एकाच एन्ट्री पॉइंटमधून २५ टक्क्यांचे प्रवेश व्हावेत, पूर्वलक्षी प्रभावाने कायद्याची अंमलबजावणी होऊ नये, फी परताव्याची रक्कम तातडीने मिळावी आदी मागण्या या वेळी संस्थाचालकांनी शिक्षण खात्याकडे केल्या.

बैठकीत काय झाले...

बैठक वेळेत सुरू न झाल्याने, सुरुवातीलाच बैठकीवर बहिष्कार टाकण्याची संस्थाचालकांची भूमिका. अखेर महापौरांच्या आगमनानंतर आणि संस्थाचालक प्रतिनिधी नंदकुमार काकिर्डे यांच्या मध्यस्थीनंतर तासभर उशिराने बैठक सुरू.

'शाळांना मान्यता काढून घेण्याबाबत पाठविलेल्या नोटिसा हे आमचे हत्यार आहे. ते कधीकधी वापरावे लागते, पण त्याचे फारसे मनावर घेण्याची गरज नाही,' असे रामचंद्र जाधव यांचे वक्तव्य. खात्याच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या वक्तव्यानंतर, संस्थाचालकांनीही नोटिसा मनावर घेणारच नसल्याचे स्पष्ट केले.

बैठकीच्या सुरुवातीलाच शिक्षण मंडळ प्रमुख बी. के. दहिफळे यांचे 'मीडियाच्या माध्यमातून बोलायचे झाले, तर मीडियावाले काहीतरी वेगळेच छापतात. त्यामुळे समोरासमोर भेटून बोलण्यासाठी ही बैठक बोलवली आहे,' असे वक्तव्य. कायद्यातील अंमलबजावणीला संस्थाचालकांसोबतच माध्यमांनाही अपयशी धरण्याचा दहिफळे यांचा प्रयत्न.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला ‘घरचा आहेर’

$
0
0

पुणे : पुण्यात होणाऱ्या साखर परिषदेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शुक्रवारी हल्लाबोल केला. विधानसभेच्या निवडणुकीत पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरूद्ध ट्रॅक्टरभर पुरावे असल्याने त्यांना तुरुंगात टाकण्याचे आश्वासन देऊन भाजपने मते मागितली. मात्र, सत्तेवर आल्यावर त्यांचाच सल्ला घेतला जाणार असल्यास निवडणुकीत आपण खोटे बोललो किंवा केलेले आरोप खोटे होते, यापैकी एक भाजपच्या नेत्यांनी कबूल करावे, असे आवाहन करून शेट्टी यांनी 'घरचा आहेर' दिला.

भाजप अजूनही सुधारेल, याची आम्ही वाट बघत आहोत. मात्र, ते फारच सत्तातूर झाल्याचे दिसल्यास आम्ही 'निष्कर्षा'पर्यंत येऊ, असा इशाराही खासदार शेट्टी यांनी भाजपला पत्रकार परिषदेत दिला. 'आता ‌कोठे एक वर्ष झाले आहे. भांडण झाल्या झाल्या वेगळे रहायचे नसते', अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

शेट्टी म्हणाले...

साखर उद्योग अडचणीत आहे, अशी हाकाटी मारून सरकारच्या तिजोरीतून निधी मिळविण्यासाठी परिषद.

साखर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते यांच्यासाठीच!

वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संचालक मंडळावर 'रेणुका शुगर' या खाजगी साखर कारखान्याचा प्रतिनिधी कसा?

वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटसाठी शेतकऱ्यांनी क्विंटलमागे दिलेल्या अडीच रुपये वर्गणीतून काय साध्य झाले?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साखर परिषदेवर हल्लाबोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुण्यात होणाऱ्या साखर परिषदेसाठी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि ऊसतोडणी मजूर यांनाच निमंत्रण नसल्याने पुढील दहा वर्षांचा 'रोड मॅप' (कार्य आराखडा) कसा बनविणार,' असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला. 'विशिष्ट कंपू'ची ही परिषद असल्याने त्यामागील काळेबेरे बाहेर काढण्यासाठी तीन मे रोजी सांगलीत साखर परिषद घेऊन भांडाफोड करणार असल्याचे त्यांनी शुक्रवारी जाहीर केले.

पुण्यात मांजरी येथील वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटमध्ये २५ आणि २६ ​एप्रिल रोजी ही परिषद होणार आहे. या परिषदेला विशिष्ट व्यक्तींनाच बोलविण्यात आल्याने खासदार शेट्टी यांनी परिषदेला आक्षेप घेतला आहे. साखर उद्योगाचा पुढील दहा वर्षांचा 'रोड मॅप' काढण्यासाठी ही परिषद होणार आहे.

'या परिषदेत साखर कारखानदारीचा 'रोड मॅप' काढण्यासाठी गेली १५ वर्षे राज्य, सहकार आणि साखर कारखानदारी यावर सत्ता असलेल्यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्यांना 'रोड मॅप' करायचा असता, तर त्यांनी यापूर्वी केला असता. त्यामुळे या परिस्थितीबद्दल संशय असल्याने याचा खुलासा झाला पाहिजे,' असे खासदार शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या परिषदेचा भांडाफोड करण्यासाठी तीन मे रोजी सांगली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर परिषद घेतली जाणार आहे. त्यामध्ये काळेबेरे बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले. शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

मळीवरील निर्बंध उठवा

'सध्या मळीवर निर्बंध आहेत. ते निर्बंध उठविले गेल्यास साखर कारखानदारांना टनामागे ११० ते १२० रुपये जास्त उत्पन्न मिळेल. याबाबतचा निर्णय घेण्यात आला असला, तरी अध्यादेश काढलेला नाही. त्यामागे कोण आहे,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ​मळीवरील निर्बंध उठवा, अशी मागणी ऊस उत्पादकांकडून केली जाते; पण साखर उद्योगातून करण्यात येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारने परिषद आयोजित केली असल्यास सरकारनेच नेमलेल्या साखर बोर्डाचा सदस्य या नात्याने मला निमंत्रण का देण्यात आले नाही?

- राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकाच्या खेळपट्टीवर सचिन ‘ह‌िट’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

क्रिकेटच्या खेळपट्टीवर वीस हजार धावांचा विक्रम करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मराठी पुस्तकविश्वातही धडाकेबाज पदार्पण करत आहे. मेहता पब्लिशिंग हाउसच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या सचिनच्या 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाची वीस हजार प्रतींची आवृत्ती बाजारात येत असून, पुस्तकांच्या खेळपट्टीवरही वीस हजारी मनसबदार ठरण्याचा मान सचिनने पटकावला आहे.

मेहता पब्लिशिंग हाउसच्या सुनील मेहता यांनी ही माहिती दिली. ३० मे रोजी हे पुस्तक मराठी वाचकांच्या भेटीला येणार आहे. दीपक कुळकर्णी यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. मराठी साहित्यविश्वात साधारणपणे एक हजार पुस्तकांची आवृत्ती प्रकाशित केली जाते. इंग्रजीत प्रकाशित झालेल्या सचिनच्या आत्मचरित्राची मोठी चर्चा झाली. त्यामुळे मराठीजनांमध्येही सचिनच्या पुस्तकाविषयी खूप उत्सुकता आहे. या पुस्तकाविषयीची उत्सुकता आणि सचिनप्रेम लक्षात घेऊन मराठी आत्मचरित्राची मोठी आवृत्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यंत आकर्षक पद्धतीने साकारत असलेल्या या पुस्तकात ६६ फोटोंचा समावेश आहे.

'रमेश तेंडुलकरांची साहित्यिक पार्श्वभूमी असलेला सचिन मराठी पुस्तकाविषयी खूप उत्सुक आहे. त्याचा भाऊ नितीन याने पुस्तकाचा अनुवाद बारकाईने तपासला. मराठी पुस्तकात कोणतीही उणीव राहू नये यासाठी सचिन आणि नितीन या दोघांचाही आग्रह आहे,' असे मेहता यांनी स्पष्ट केले. मराठीतील कोणत्याही अनुवादित पुस्तकापेक्षा या पुस्तकासाठी सर्वाधिक रॉयल्टी देण्यात आली आहे. या पुस्तकाला देण्यात आलेली रॉयल्टीची रक्कम विक्रमी असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू

सचिनच्या मराठी आत्मचरित्राची प्रकाशनपूर्व नोंदणी 'मेहता पब्लिशिंग'ने सुरू केली आहे. पुस्तकाची मूळ किंमत ६४० रुपये असून, प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये ते ५४० रुपयांना मिळणार आहे. २० मेपर्यंत नोंदणी http://www.mehtapublishinghouse.com/ या वेबसाइटवर आणि कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष करता येईल.

लता मंगेशकर-आशा भोसलेंना पहिली प्रत

सचिनचे गानकोकिळा लता मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले या भगिनींशी खूप जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे आत्मचरित्र मराठीत प्रकाशित होत असल्याने त्याची पहिली प्रत या भगिनींना देण्याची इच्छाही त्याने प्रकट केली आहे. त्यानुसार त्यांना पुस्तक भेट दिले जाणार असल्याचेही मेहता यांनी सांगितले.

वेध आत्मचरित्राचे

मराठी वाचकांना आता सचिनच्या 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादाचे वेध लागले आहेत. हे पुस्तक ३० मे रोजी वाचकांच्या भेटीला येणार असून, दीपक कुळकर्णी यांनी अनुवादाची जबाबदारी निभावली आहे.

मेहता पब्लिशिंग हाउसच्या वतीने सचिनच्या वाढदिवसाच्या औचित्याने मराठी पुस्तकाचे कव्हर प्रकाशित करण्यात आले. अनिल मेहता, सुनील मेहता आणि दीपक कुळकर्णी या वेळी उपस्थित होते. 'गेले पाच महिने भारावून जाऊन या पुस्तकाचा अनुवाद करतो आहे. या पुस्तकाशी जोडले जाणे हीच प्रचंड आनंददायी घटना आहे. मराठी पुस्तकात सचिनच्या 'साहित्य सहवास'मधील दिवसांचा छान अनुभव वाचकांना मिळेल. शक्य तितक्या मराठमोळ्या पद्धतीने सचिनच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे,' असे कुळकर्णी यांनी सांगितले.

पुस्तकाचे प्रकाशन वेगळ्या पद्धतीने करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी सचिनला विनंतीही केली आहे. ३० मे रोजी मेहता पब्लिशिंगच्या गॅलरीमध्ये सकाळी सहा वाजता सचिनने सही करून पुस्तकाची प्रत वाचकाच्या हाती द्यावी अशी कल्पना आहे. मात्र, हे सचिनच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. ३० मे, २ मे, ४ मे आणि ६ मे रोजी अनिल कुंबळे, रवी शास्त्री, हर्षा भोगले यांच्यासह कार्यक्रम करण्याचे नियोजन असल्याची माहिती मेहता यांनी दिली.

वीस हजार प्रतींच्या आवृत्तीची दुर्मिळ घटना

मेहता पब्लिशिंग हाउसच्या वतीने वीस वर्षांनी वीस हजार प्रतींची आवृत्ती प्रकाशित केली जाणार आहे. रणजित देसाईंनी लिहिलेल्या श्रीमान योगी आणि स्वामी या दोन कादंबऱ्यांची आवृत्ती अशा भव्य स्वरूपात प्रकाशित करण्यात आली होती. १९९३मध्ये 'श्रीमान योगी'च्या २२ हजार प्रतींची आणि १९९५-९६च्या सुमारास 'स्वामी'च्या ४० हजार प्रतींची आवृत्ती प्रकाशित झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजावर बंदीसाठी जनहित याचिका दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंमली पदार्थ विरोधी कायद्याने गांजावर घालण्यात आलेली बंदी बेकायदा असल्याचा दावा करणारी जनहित याचिका पुण्यातील वकिलाने हायकोर्टात दाखल केली आहे. गांजासंदर्भात लागू असलेल्या फौजदारी तरतुदींचा फेरविचार करण्यात यावा. तसेच या जनहित याचिकेचा निकाल लागेपर्यंत गांजावरील फौजदारी तरतुदी स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने केंद्रसरकार आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सहा मे रोजी सुनावणी होणार आहे. पुण्यातील वकील अॅड. आदित्य बारठाकूर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. गांजासंदर्भात करण्यात आलेल्या परदेशातील संशोधनाचा आधार आपण या जनहित याचिकेत दिला आहे. गांजाच्या सेवनामुळे अनेक असाध्य रोग बरे होत असल्याची उदाहरणे आहेत. कॅन्सरच्या रोगावरही गांजा उपायकारक आहे. गांजाचे औषधी गुणधर्म लक्षात न घेता गांजावर बंदी घालण्यात आली आहे, असे अॅड. बारठाकूर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत अर्जासाठी दोन रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशनवरील धान्य यापुढील काळात बायोमेट्रिक पद्धतीने देण्यासाठी रेशनकार्डधारक कुटुंबाची माहिती भरून घेण्याच्या मोफत अर्जांसाठी काही दुकानदारांकडून दोन रुपये सक्तीने वसूल करण्यात येत आहेत. या दुकानदारांना कारवाईची तंबी देताच एका अधिकाऱ्याकडून हा 'संदेश' आल्याची कबुली त्यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत देशातील गरीब कुटुंबांना सवलतीच्या दरात धान्य देण्यात येत आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका याचिकेमध्ये रेशनिंगचे संगणकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अन्नधान्य महामंडळातून शासकीय गोदाम व तेथून दुकानदारांपर्यंत धान्य पोहोचविण्याच्या यंत्रणेचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर संगणकीकृत रेशनकार्डही देण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

रेशन दुकानांतील व्यवहारांचे व्यवस्थापन संगणकाद्वारे करताना रेशनकार्डधारक लाभर्थ्यांना बायोमेट्रिक ओळख देण्यात येणार आहे. त्यासाठी १३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. रेशनकार्डचे संगणकीकरण करताना संबंधित रेशनकार्डधारकाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांकाची माहिती संकलित केली जाणार आहे. या संकलित माहितीधारे कार्डधारकाची ओळख पटल्यानंतरच संबंधितांना रेशनवरील धान्य वितरित केले जाणार आहे. त्यासाठी रेशनकार्डधारक कुटुंबांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. हे अर्ज मोफत असून अर्ज भरून घेतल्याबद्दल दुकानदाराला राज्य सरकारकडून प्रती अर्ज पाच रुपये कमिशन देण्यात येणार आहे.

मात्र, या मोफत अर्जांसाठी दोन ते तीन रुपये आकारले जात आहेत. तसेच, हे पैसे घेण्याचा 'संदेश' काही रेशन निरीक्षकांनी दुकानदारांना दिले आहेत. यासंबंधी काही दुकानदारांनी पुरवठा उपायुक्त प्रकाश कदम यांच्याकडे तक्रार केली. हा गैरप्रकार लक्षात येताच कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक कारवाईची तंबी दिली. तसेच, रेशन दुकानदारांना हे अर्ज भरण्यासाठी कोणीही पैसे देऊ नयेत, असे आवाहन केले आहे.

कारवाईचा इशारा

रेशनकार्ड संगणकीकरणाच्या अर्जासाठी पैसे आकारल्यास संबंधित दुकानदारांचा परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्याचा इशारा पुरवठा उपायुक्त प्रकाश कदम यांनी दिला आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा साठवलेले ३८० सिलिंडर जप्त

$
0
0

पुणे : वारजे येथील आर स्वेअर बिल्डिंगलगतच्या मोकळ्या जागेत अनधिकृतपणे साठवणूक केलेले ३८० सिलिंडर शहर पुरवठा कार्यालयाच्या दक्षता पथकाने धाड टाकून जप्त केले. निवासी इमारतींजवळ हे सिलिंडर धोकादायकरित्या साठविण्यात आले होते.

अंबिका गॅस एजन्सीचे मालक प्रमोद तुकाराम सावंत यांचे सर्व्हे क्रमांक १३२, रेव्हू रेसिडेन्सी शॉप नं. ४ येथे ऑफीस आहे. त्यांचे सिलिंडरचे गोडाउन भोरमधील वेळू या गावात आहे. असे असताना अंबिका गॅस एजन्सीने कोणतीही परवानगी न घेता वारजे येथे सिलिंडरची साठवणूक केली होती. त्यासंबंधी पुरवठा विभागाकडे तक्रार आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पुरवठा कार्यालयाच्या दक्षता पथकाच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी पथकासह तेथे दाद मारली. या धाडीत ३८० भरलेले सिलिंडर व ४८ रिकामे सिलिंडर सापडले. ते जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

फसवणूकप्रकरणी गुन्हा

विमाननगर येथील कॉर्पोरेशन बँकेच्या अकाउंटवरून परस्पर एक लाख रुपये काढल्याप्रकरणी विमाननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी ऑनलाइन व्यवहार केला आहे. श्रीया पांडे (वय १९, रा, विमाननगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणूक तसेच आयटी अॅक्टखाली गुन्हा दाखल झाला आहे. हा व्यवहार ठाणे येथे झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images