Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पटना हायकोर्टावर शताब्दी टपाल तिकीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पटना हाय कोर्टाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल टपाल खात्याने विशेष टपाल तिकीट काढले आहे. हे तिकीट लवकरच शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. पटना हायकोर्टाच्या इमारतीचे भूमिपूजन एक डिसेंबर १९१३ रोजी करण्यात आले. तीन फेब्रुवारी १९१६ रोजी या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू झाले. त्यास १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे टपाल तिकीट काढण्यात आले आहे. पाच रुपयांचे हे तिकीट असून, ते शहरातील सर्व कार्यालयांमध्ये उपलब्ध असणार असल्याचे टपाल खात्याकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीसमोरच पत्नीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाशीम येथे नऊ वर्षांच्या सावत्र मुलीसमोर पत्नीचा खून करणाऱ्या पतीला कोथरूड पोलिसांनी मंगळवारी पहाटे पुण्यात पकडले. हा खुनाचा प्रकार शनिवारी घडला. खून केल्यानंतर काही घडलेच नसल्याच्या अर्विभावात तो चालकाची नोकरी करत होता.

श्याम भारत चव्हाण (वय ३०, रा. कसवा, वाशीम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वाशीम येथील पोलिस पथक पुण्यात दाखल झाले होते. कोथरूड पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक श्वेता चव्हाण आणि वाशिमचे सहायक निरीक्षक एस. पी. आंबुलकर यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे चव्हाणला अटक केली. चव्हाण हा पुण्यातील एका ठेकेदाराकडे वर्षभरापासून नोकरी करत होता. त्याचे दोन वर्षांपूर्वी सविता लोंढे (वय ३२) यांच्याबरोबर लग्न झाले होते. त्याचे हे दुसरे लग्न होते. सविताला पहिल्या पतीपासून नऊ वर्षांची मुलगी होती. सविता आपल्या मुलीसह कसवा गावात, तर चव्हाण पुण्यात राहात होता. महिन्यातील चार-पाच दिवस तो आपल्या गावी जात असे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यात पैशांवरून वाद होत होते.

चव्हाण हा गेल्या आठवड्यात गावी गेला असताना पुन्हा त्यांच्यात वाद झाले होते. यावेळी रागाच्या भरात त्याने सवितावर कात्रीने वार केले आणि घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांना माहिती मिळाल्यावर सविताला खासगी हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या चौकशीत सविताच्या मुलीने चव्हाणचे नाव घेतले. आपल्यासमोरच आईवर हल्ला केल्याचे तिने सांगितले. त्यानुसार वाशीम पोलिस पुण्यात दाखल झाले. कोथरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी संजय पायगुडे, अबू शेख, मिलिंद कांबळे यांनी सापळा रचून चव्हाणला ताब्यात घेतले आणि वाशीम पोलिसांच्या हवाली केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मावळ गोळीबाराचा अहवाल सादर करा

$
0
0

पिंपरी : मावळ गोळीबार प्रकरणामध्ये शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांना दिला. त्यानुसार येत्या चार-पाच दिवसांत अहवाल सादर होईल, अशी माहिती आमदार बाळा भेगडे यांनी बुधवारी (२२ एप्रिल) दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना धरणाहून थेट जलवाहिनी प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर चार वर्षांपूर्वी गोळीबार झाला होता. त्यामध्ये तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांची ही कारवाई जुलमी असल्याचा आरोप करीत आमदार भेगडे यांनी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारबद्दल नाराजीही व्यक्त केली होती.

राज्यात युतीचे सरकार येताच गोळीबारप्रकरणी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देणाऱ्या भेगडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. एम. जी. गायकवाड समिती अहवालाव्यतिरिक्त राजकीय गुन्ह्यासंदर्भातील प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक लोहिया यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंच, उपसरपंचावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लोणावळ्यातील कुसगाव बुद्रुक, ओळकाईवाडी (ता. मावळ) या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांवर मंगळवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पंचायत समिती सदस्य हरीश कोकरे यांना अटक करण्यात आली असून, परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनंता घुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सरपंच भाऊ धोंडिबा गायकवाड (वय ५०, रा.कुसगाव) आणि उपसरपंच अनंता सखाराम घुले (वय ५०, रा. साठेवस्ती, कुसगाव) हे दोघे चालले होते. त्यावेळी ओळकाईवाडी रस्त्यावर पंचायत समितीचे अपक्ष सदस्य हरीश कोंडू कोकरे (वय ३५), प्रदीप कोंडू कोकरे, ऋषीकेश शिंगाडे आणि विलास चोरगे (सर्व रा.ओळकाईवाडी) या चौघांनी त्यांची गाडी अडविली.

हरीश कोकरे आणि ऋषीकेश शिंगाडे यांनी अनंता घुले यांना तू भाऊ गायकवाड यांच्यासोबत का फिरतोस असे विचारले आणि तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच प्रदीप कोकरे, विलास चोरगे यांनी भाऊ गायकवाड यांच्या गळ्यावर आणि छातीवर हातातील चाकूसारख्या धारदार हत्याराने ५ ते ६ वार केले. काही महिन्यांपूर्वी सरपंच भाऊ गायकवाड आणि हरीश कोकरे या दोन्ही गटांमध्ये भांडणे झाली होती. त्यामुळे दोन्ही गटामध्ये कमालीचा तणाव होता. त्या तणावातूनच ही भांडणे झाल्याचे घुले यांनी म्हटले आहे. विलास मधू चोरगे (वय २४, रा. ओळकाईवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत भाऊ गायकवाड आणि उपसरपंच अनंता घुले हे गाडीतून जात होते. मात्र, त्यांच्या गाडीला साइड न दिल्याने आपल्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांनी पंचायत समिती सदस्य कोकरे यांना रात्री उशिरा अटक केली असून, अन्य आरोपी अद्याप फरारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकुर्डीत तणाव

$
0
0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातर्फे आकुर्डीत चालू असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्यावेळी बुधवारी (२२ एप्रिल) तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी विरोध केल्यामुळे पोलिसांच्या मदतीने कारवाई पूर्ण करण्यात आली.

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी मुदतवाढ देण्यास हाय कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील सुमारे ६६ हजारांहून अधिक बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार आहे. पालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी रोजचा अहवाल तयार केला जात आहे. नजीकच्या काळातही कारवाई चालूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. महापालिकेच्या अ प्रभागांतर्गत आकुर्डी-दत्तवाडी भागातील साईदर्शनगरमध्ये कारवाईच्यावेळी विरोध झाला. पालिकेचे पथक येताच स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले. कारवाई होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. संभाव्य परिस्थिती लक्षात घेताच पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यानंतर या बंदोवस्तात कारवाई करण्यात आली.

दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाई पथकाने दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण पाडण्याची कारवाई केली. यामध्ये अ प्रभागात आकुर्डी परिसरात साडेचार हजार चौरस फुटाची पाच बांधकामे, ब प्रभागात थेरगाव भागात सुमारे साडेतीन हजार चौरस फुटाची चार बांधकामे, क प्रभागात बोपखेलमधील चौदाशे चौरस फुटाची तीन बांधकामे, ड प्रभागात पिंपळे निलखमधील दोन हजार दोनशे चौरस फुटाची नऊ बांधकामे आणि इ प्रभागात वडमुखवाडी भागातील दोन हजार चारशे चौरस फुटाच्या एका बांधकामाचा समावेश आहे. एक एप्रिलपासून आजपर्यंत महापालिकेने १६५ बांधकामे (एक लाख ४२ हजार ५०० चौरस फूट) कारवाईद्वारे जमीनदोस्त केली आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी क्षेत्रावरही हातोडा

$
0
0

रोहित आठवले, पिंपरी

शहरातील अनधिकृत बांधकामांवर हायकोर्टाच्या आदेशावरून सध्या विशेष कारवाई महापालिकेने हाती घेतली आहे. त्याची तीव्रता येत्या सोमवारी (२७ एप्रिल) वाढविण्यात येणार असून, आता निवासी अनधिकृत बांधकामांवरही हातोडा पडणार आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मिळावा अशी मागणी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी पोलिस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्याकडे केली आहे.

हायकोर्टाच्या आदेशावरून उपअधीक्षक-सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील कोणत्या भागात कधी आणि कशा स्वरूपाची कारवाई करायची आहे, याचा अहवाल महापालिका प्रशासनाकडून पोलिसांना पाठविण्यात येतो. त्यानुसार नुकताच एक अहवाल शहराचे नोडल ऑफिसर सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश भुरेवार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. हा अहवाल उपायुक्त डॉ. माने यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

शहरातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ही कारवाई थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण सध्या तरी ते सर्व फोल ठरले आहेत. नव्याने सत्तेत आलेल्या पक्षाचे मंत्री आणि स्थानिक पदाधिकारीदेखील प्रयत्नशील आहेत. मात्र, ही कारवाई हायकोर्टाच्या आदेशानंतर सुरूच आहे. आत्तापर्यंत पूररेषेमधील आणि आरक्षित जागांवर कारवाई करण्यात आली. तसेच, काही ठिकाणी पूर्ण बांधकामांवर नव्याने काही चौरस फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. पण आता थेट रहिवासी बांधकामांवर हातोडा पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

एकीकडे अधिकृत होऊ शकणाऱ्या बांधकामांचे सर्वेक्षण करण्याबाबत शासनाकडून कोणताच आदेश आलेला नाही. त्यामुळे कारवाई सरसकट करणार असल्याचे नुकतेच प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच कारवाई सुरू झाल्यानंतर आता त्याची तीव्रता वाढणार हे निश्चित मानले जात आहे. सोमवारपासून हाती घेण्यात आलेल्या कारवाईत सर्वाधिक विरोध होण्याची शक्यता जास्त असल्याचा अंदाज पथकाने बांधला आहे. संवेदशील परिसर आणि वाढता विरोध लक्षात घेता प्रत्येक कारवाई होणाऱ्या ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकात नियुक्त असलेल्या पोलिसांसह अतिरिक्त फौजफाटा तैनात असणार आहे. एक पोलिस निरीक्षक, दोन फौजदार, पंधरा कर्मचारी (महिला कर्मचाऱ्यांसह) असा फौजफाटा देण्यात यावा, असे महापालिका आयुक्तांनी नोडल ऑफिसरना आणि उपायुक्तांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

अतिक्रमण कारवाईची यादी मोठी

अतिसंवेदनशील, संवेदनशील व सर्वसाधारण अशा तीन टप्प्यांत कारवाईची विभागणी करण्यात आली आहे. कारवाईला किती प्रमाणात तसेच कोणत्या स्वरूपाचा विरोध होऊ शकतो याची चाचपणी करण्यात आली. त्यानुसार प्रभागात कधी आणि कोणत्या टप्प्यातील कारवाई करण्यात येणार आहे ते निश्चित करण्यात आले आहे. महापालिकेच्या अ, ब, क, ड, फ या पाचही प्रभागात संवेदनशील टप्प्याची नोंद तुलनेने अधिक आहे. त्यामुळे बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोन जणांचा मृत्यू

$
0
0

पुणे : वडगाव बुद्रूक तसेच विमाननगर चौकापुढे अंडरग्राउंड सब-वेच्या दरवाज्यासमोर झालेल्या दोन स्वतंत्र अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले. यामध्ये एका ८२ वर्षांच्या आजोबांचा समावेश आहे. वडगाव बुद्रूक येथील शिवाजी पुतळा परिसरात दुचाकीवर निघालेले शांताराम विष्णू भोले (वय ८२, रा. वडगाव बुद्रूक) यांचा तोल गेल्याने त्यांची दुचाकी घसरली होती. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात, रत्नाकर राजेंद्र श्रीवास्तव (वय ४२, रा. खराडी) हे विमाननगर चौकापुढे अंडर ग्राऊंड सब-वेच्या दरवाज्यासमोरून जात होते. दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने ते त्यांच्या पुढे असलेल्या सहा आसनी रिक्षाला पाठीमागून धडकले. त्यानंतर मागून येणाऱ्या पीएमपी खाली सापडले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोनसाखळी चोरीचा तपास पोलिस निरीक्षकांनी करावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सोनसाखळी हिसकावण्याची घटना घडलेल्या ठिकाणी पोलिस उपायुक्तांनी भेट द्यावी, असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त के. के. पाठक ​यांनी दिली. तसेच, सोनसाखळी हिसकावण्याच्या गुन्ह्यांचा तपास हा पोलिस निरीक्षकांनी करावा, असेही सांगण्यात आले आहे. 'पुणे शहरात घडणाऱ्या सोनसाखळी हिसकावण्याचे गुन्हे पोलिस दलासाठी भूषणावह नाहीत. गेल्या काही महिन्यांमध्ये सोनसाखळी हिसकावण्याच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूरमध्येही हीच समस्या होती. विशेष प्रयत्नानंतर नागपूरमधील गुन्हे रोखण्यात यश आले आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत,' अशी माहिती पाठक यांनी दिली. 'सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार सोनसाखळी हिसकावल्याच्या ठिकाणी बीट मार्शलला पाठवण्यात येते. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले तर गुन्हा कसा घडला, नेमकी परिस्थिती काय आहे, गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा होऊन त्यातून प्रतिबंधक योजना पुढे येतील. त्यासाठी पोलिस उपायुक्तांना घटनास्थळांना भेटी देण्यास सांगण्यात आले आहे,' असे पाठक म्हणाले.

सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना उघडकीस आणण्यासाठी कौशल्यपूर्ण तपास होणे गरजेचे आहे. सध्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी गुन्ह्याचा तपास हा पोलिस निरीक्षकांकडेच असला पाहिजे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तपास असेल तर तो अधिक जबाबदारीने गुन्ह्याचा तपास करेल.

- के. के. पाठक, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅप्स व्यावसायिकांना ‘ओव्हर द टॉप’चा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतात मोबाइलचा आणि इंटरनेटचा प्रसार होण्यात केवळ टेलिकॉम कंपन्यांचाच नव्हे, तर ग्राहकांचाही मोठा वाटा आहे. ग्राहक त्यांच्या मोबाइलवर मिळणाऱ्या इंटरनेटसाठी पैसेही भरत आहेत. त्यामुळे नेट न्युट्रॅलिटी हा ग्राहकांचा हक्कच आहे. तसेच, टेलिकॉम कंपन्यांनी नेट न्युट्रॅलिटी नाकारून 'ओव्हर द टॉप' पैसे आकारण्यास सुरुवात केल्यास त्याचा फटका मोबाइल अॅप्लिकेशन क्षेत्रातील व्यावसायिकांनाही बसण्याची शक्यता आहे.

'ओव्हर द टॉप' या योजनेच्या नावाखाली भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) टेलिकॉम कंपन्यांच्या नियंत्रणाचा एक प्रस्ताव मांडला आहे. प्रत्येक वेबसाइट किंवा अॅप्लिकेशन वापरण्यासाठी वेगवेगळे पॅकेज देण्याची सोय यामुळे कंपन्यांना उपलब्ध होणार आहे. यामुळे काही संकेतस्थळांच्या सेवा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना (यूजर) पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक संकेतस्थळासाठी वेगवेगळे पैसे मोजावे लागण्याचीही शक्यता आहे. या प्रस्तावाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.

या बाबत इन्टेलिमेंट टेक्नोलॉजिजचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत पानसरे म्हणाले,'भारतातील मोबाइल व इंटरनेटच्या प्रसारात दूरसंचार कंपन्यांच्या सुविधा आणि नेटवर्किंगबरोबरच ग्राहकांचाही मोठा वाटा आहे. प्रत्येक मोबाइल इंटरनेटधारक इंटरनेट पॅकसाठी पैसे भरत आहे. त्यामुळे डेटा पॅकच्या माध्यमातून जमा होणाऱ्या महसूलात त्यांचाही वाटा आहे. त्यामुळे हवी ती वेबसाइट किंवा अॅप्लिकेशन योग्य वेगाने वापरता येणे हा ग्राहकांचा हक्क आहे. मोबाइल कंपन्यांना त्यांचा नफा सांभाळण्यासाठी अशा प्रकारे ग्राहकांमध्ये भेदभाव करता येणार नाही.'

देशात नेट न्युट्रॅलिटी नसल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतील, अशी भीतीही पानसरे यांनी व्यक्त केली. 'येत्या काही वर्षांत भारतातील मोबाइल, इंटरनेट आणि पर्यायाने मोबाइल अॅप्लिकेशन्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र, नेट न्युट्रॅलिटी नसल्याचा त्याचा मोठा फटका भारतातील इंटरनेटच्या प्रसाराला बसेल. इंटरनेट स्वस्त झाले तरी त्यात न्युट्रॅलिटी नसेल, तर त्याचा फायदा ग्राहकांना होणार नाही. 'ओव्हर द टॉप' लागू झाल्यास किमतीबाबत संवेदनशील असलेल्या ग्रामीण वापरकर्त्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल,' असे पानसरे म्हणाले.

नेट न्युट्रॅलिटी नसल्याचा फटका ग्राहकांना नक्कीच बसेल. प्रीमियम सर्व्हिससाठी त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. सध्या डीटीएच सेवेमध्ये वापरण्यात येणारा फंडाच या कंपन्यांनी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, नेट न्युट्रॅलिटी नसल्यास त्याचा फटका मोबाइल अॅप्लिकेशन व आयटी व्यावसायिकांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- गजानन साखरे, संस्थापक, स्मार्ट क्लाउड इन्फोटेक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावेतमध्ये बिल्डरवर झाडल्या गोळ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

रावेत येथे बांधकाम व्यावसायिकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या चार गोळ्यांचे नेम चुकल्याने उद्योजक थोडत्यात बचावले. विठ्ठल किसन चव्हाण (वय ४९, रा. मारुंजी, मुळशी, पुणे) या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल चव्हाण हे रावेत येथे लग्नासाठी आले होते. मंगलाष्टका सुरू असताना चव्हाण मंगल कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी अचानक समोरून आलेल्या चार-पाच जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हातामध्ये पिस्तूल असणाऱ्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून अनेकांनी कार्यालयाबाहेर धाव घेतली. गर्दी जमल्याचा फायदा घेऊन मारेकऱ्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड विभागीय पोलिस अधिकारी विवेक पानसरे, तळेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर, देहूरोडचे फौजदार अदिनाथ महानवर, नाना तेली, लाला गव्हाणे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चव्हाण यांना गेल्या वर्षी हिंजवडीत मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारजे, कर्वेनगरला वीजपुरवठा खंडित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कर्वेनगर येथील वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे वारजे, कर्वेनगर आणि आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा बुधवारी सायंकाळी खंडित झाला. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. कर्वेनगर येथून येणाऱ्या वीजवाहिनीत सायंकाळी बिघाड झाला. त्यामुळे वारजे, हायवे परिसर, कर्वेनगरचा काही भाग येथील वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले. परीक्षेच्या काळातच वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

तसेच, वीजपुरवठा खंडित झालेल्या परिसरात टप्प्याटप्प्याने पर्यायी मार्गाने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचेही काम सुरू झाले. मात्र, सायंकाळी मागणी अधिक असल्याने भार व्यवस्थापनात अडचणी आल्याची माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनसाखळी चोरटे सोकावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात सोनसाखळी हिसकावण्याच्या तीन घटनांमध्ये सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज हिसकावण्यात आला. तिन्ही घटनांमध्ये दुचाकीवरील आरोपींचा समावेश आहे. एंरडवण्यात तर अवघ्या हाकेच्या अंतरावर एकाच वेळी दोन घटना घडल्या आहेत. गणेशनगरमधील पांडुरंग कॉलनीतून पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावल्याचा प्रकार सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडला.

या प्रकरणी एरंडवणा येथील ५२ वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन्ही आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर अवघ्या काही अंतरावर कर्वेनगर येथील २७ वर्षांची महिला पायी जात होती. आरोपींनी तिच्याही गळ्यातील ५० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि तेथून पळ काढला. तिसऱ्या घटनेत, सहकारनगर येथे शिंदे हायस्कूलसमोरील वसंत बहार बंगल्याजवळून पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि साखळी असा सुमारे ६५ हजार रुपयांचा ऐवज हिसकावण्यात आला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार पेठेतील ४० वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

परेश खेतानचा जामीन फेटाळला

बालाजी इन्व्हेस्टमेंटमध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची चार कोटी आठ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी परेश अशोककुमार खेतान (वय ३१, रा. कोथरूड) याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या कोर्टाने फेटाळला.

लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अजय प्रकाश लवळेकर (वय ३८, रा. शिवाजीनगर गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सात ऑगस्ट २०१३ ते २८ फेब्रुवारी २०१५ दरम्यान मोतीराम विहार, उजवी भुसारी कॉलनी, न्यू इंडिया स्कुलजवळ, कोथरूड येथे घडली. बालाजी इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणूकीवर सहा-सात टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीसह १४ जणांकडून चार कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केली. मुदतपूर्तीनंतरही ठेवी परत न करता परस्पर अपहार केल्याने परेश खेतानविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाचा अधिक तपास ‌कोथरूड पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदाशे हेक्टर वनजमीन राखीव?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निरा देवघर धरणात बुडालेली सुमारे चौदाशे हेक्टर जमीन संरक्षित वन क्षेत्रातून वगळून राखीव वनक्षेत्रामध्ये रूपांतरीत करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावामुळे बुडीत क्षेत्र व लगतची जमीन वनखात्याच्या अखत्यारित येणार आहे.

भोर तालुक्यातील सुमारे वीस गावांमधील ही जमीन संरक्षित वनक्षेत्रात येते. १९८० च्या दशकामध्ये भोरमधील या जमिनींवर संरक्षित वनांचे शेरे मारण्यात आले. त्यातील काही जमिनी त्यातून वगळण्यातही आल्या. याच दरम्यान निरा देवघर धरणाच्या उभारणीचे काम सुरू झाले. निरा देवघरच्या बुडित क्षेत्रासह लगत असलेली ही जमीन आता राखीव वनांमध्ये रूपांतरीत करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

निरा देवघर धरणाची विमोचक तसेच काही यांत्रिकी भाग या क्षेत्रात येतो. त्यामध्ये प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना जाण्यास परवानगी देण्यात यावी. धरणाच्या लगतच्या जागेतील माती व मुरूम काढण्यास मुभा असावी आणि या धरणातील मच्छिमारीसाठी परवानगी देण्याचा प्रस्तावामध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे धरणालगत वननिर्मिती व स्थानिकांचा वावर रोखण्यात मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारींना करणार ‘टाटा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खासगी वाहिन्यांच्या प्रसारणामध्ये वारंवार येणाऱ्या तक्रारी लाखांच्या घरात पोहोचल्याने टाटा स्कायची दिल्लीची विशेष टीम पुण्यात दाखल झाली आहे. कंपनीच्या तक्रार निवारण प्रक्रियेतील अठरा दिवसांचा 'बॅकलॉग' भरून काढण्याचे काम ही टीम करणार आहे. यासाठी टीमचा प्रत्येक प्रतिनिधी सकाळपासूनच शहराच्या विविध भागात फिरून दिवसाला १८ ते २० तक्रारींचे निवारण करतो आहे.

टाटा स्कायतर्फे तंत्रज्ञान प्रणालीचे आधुनिकीकरणाचे काम सुरू असल्याने वेगवेगळ्या राज्यातील वाहिन्यांच्या प्रसारणामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. वैतागलेल्या नागरिकांचा टाटा स्कायच्या हेल्पलाइनवर दररोज तक्रारींचा पाऊस पडतो आहे. दिल्ली, मुंबईसह काही शहरातील आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले असून पुण्यासह काही शहरांतील कामे अपूर्ण राहिली आहेत. पुण्यातील टाटा स्कायचे स्थानिक प्रतिनिधी अकार्यक्षम असल्याने गेल्या काही दिवसात एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी प्रलंबित राहिल्या आहेत. यामुळे कंपनीने केलेल्या नियोजनापेक्षा तक्रार निवारणाची कामे अठरा दिवस मागे राहिली आहे.

पुण्यातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी अखेर दिल्लीच्या स्पेशल टीमला चार दिवसांपूर्वी पाचारण करण्यात आले आहे. ही साठ जणांची टीम सध्या रास्ता पेठेतील एका हॉटेलमध्ये उतरली असून, त्यांना शहराचे वेगवेगळे विभाग वाटून दिले आहेत. ही मंडळी रोज सकाळी बाहेर पडतात आणि नागरिकांच्या सोयीनुसार प्रत्येक घरी जाऊन कामे करीत आहेत. प्रत्येक जण दिवसभरात १८ ते २० तक्रारी सोडवत आहेत. पुढील काही दिवसातच सगळ्या तक्रारी संपतील, अशी माहिती टीमच्या प्रतिनिधीने दिली.

मोफत तक्रार निवारण

टाटा स्कायचे चॅनेल आम्ही सुरू करून देतो. त्यासाठी तीनशे, पाचशे रुपयाचे शुल्काची मागणी करून काही इलेक्ट्रिशियन आणि खासगी केबल ऑपरेटर्स नागरिकांची फसवणूक करीत आहेत. पण नागरिकांनी या कोणाला शुल्क देऊ नये. टाटा स्कायचे प्रतिनिधी मोफत तक्रार निवारण करणार आहेत, असे आवाहन टाटा स्कायच्या प्रतिनिधींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारित प्रमाणपत्रे नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सुधारित पदवी प्रमाणपत्रे देण्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी 'सिनेट'मध्ये दिलेल्या आश्वासनाला परीक्षा मंडळाने बुधवारी हरताळ फासला. सुधारित प्रमाणपत्रे देण्यास असमर्थता दर्शवित चुकीचीच प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांकडे ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला.

विद्यापीठाने नुकत्याच झालेल्या पदवीदान सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची प्रमाणपत्रे वितरीत केली होती. विद्यापीठाच्या चुकीमुळेच ही निकृष्ट दर्जाची प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना स्वीकारावी लागणार असल्याची बाब 'मटा'ने पदवीदान सोहळ्यापूर्वीच मांडली होती. त्यानंतरही विद्यापीठाने ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना वाटली. पदवीदान समारंभानंतर विद्यापीठाच्या या कारभारावर चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर, विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला आला होता. विद्यापीठाच्या लौकिकास अशोभनीय अशी निकृष्ट दर्जाची प्रमाणपत्रे विद्यापीठाने परत मागवावीत अशी मागणी सिनेट सदस्यांनी केली होती.

सिनेट सदस्यांच्या भावना लक्षात घेत, कुलगुरू डॉ. गाडे यांनी विद्यार्थ्यांना सुधारित प्रमाणपत्रे देण्याचे आश्वासन दिले होते. त्या विषयीचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरच त्या विषयीचा स्थगन प्रस्ताव मागे घेण्यात आला होता. परीक्षा मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या निर्णयाला फाटा देत, चर्चा झाल्याचे समोर आले.

कॉलेज पातळीवरही 'कॉन्व्होकेशन'

विद्यार्थ्यांना दिलेली निकृष्ट दर्जाची प्रमाणपत्रे परत मागविण्याऐवजी या पुढील काळात अशी चूक होऊ नये, यासाठी पावले उचलण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला. या पुढे विद्यार्थ्यांना चांगली प्रमाणपत्रे देण्यासोबतच विद्यार्थ्यांना आपापल्या कॉलेजमध्ये वा विद्यापीठाच्या उपकेंद्रांवर पदवी प्रमाणपत्रे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचाही निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत झाला. प्रमाणपत्र वितरणाविषयीच्या परीनियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही या वेळी झाला. मात्र पदव्युतर अभ्यासक्रमांची पदवी प्रमाणपत्रे व सुवर्णपदकांचे वितरण विद्यापीठाच्याच पदवीदान समारंभातच करण्याचा निर्णय या वेळी झाला.

'इंजिनीअरिंग'साठी 'ऑनलाइन असेसमेंट'

यंदाच्या परीक्षांपासून इंजिनीअरिंग विद्याशाखेमध्ये ऑनलाइन असेसमेंट सुरू करण्याचा निर्णयही विद्यापीठाने घेतला. यंदा पदव्युत्तर पातळीवरील ई अँड टीसीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासल्या जातील. या उपक्रमाचे यशापयश विचारात घेत टप्प्याटप्प्याने इतर विद्याशाखांसाठी ही पद्धत वापरली जाणार असल्याचेही विद्यापीठातील सूत्रांनी बुधवारी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावांवर दोन हजार कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका हद्दीलगतची ३४ नवीन गावे पालिकेत समाविष्ट करायची झाल्यास या गावांमध्ये तातडीने अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी दोनशे कोटींची गरज भासणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी या गावांचा विकास करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची आवश्यकता भासू शकते, असा अंदाज पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी वर्तविला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात शहराच्या हद्दीलगत असलेली ३४ गावे लवकरच पालिकेत समाविष्ट करण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने प्राथमिक तयारी म्हणून या गावांच्या विकासासाठी तत्काळ आणि पुढील पाच वर्षांसाठी नक्की किती निधी लागेल याची चाचपणी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात महपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी याच विषयावर पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक देखील बोलाविली होती. यामध्ये सर्व खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना या गावात आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी नक्की किती निधी लागेल याची लिखीत माहिती देण्याचे आदेश दिले होते. या माहितीचे सर्व अहवाल पालिकेतील विभागप्रमुखांनी आयुक्त कार्यालयाकडे दिले आहे. त्याच्या आधारे तातडीने २०० कोटी रुपयांचा तर त्यानंतर पाच वर्षांसाठी सर्वसाधारण दोन हजार कोटी रुपयांपर्यंतच्या निधीची आवश्यकता आहे.

भवन विभागासाठी तातडीने १२० कोटींची आणि पुढील काही वर्षात महापालिकेची कार्यालये बांधण्यासाठी १९० कोटींचा निधी लागणार आहे. शिक्षण विभागासाठी सध्या १८; तर पुढील काही वर्षांसाठी ६ कोटीची आवश्यकता लागेल. आरोग्यासाठी तातडीने एक कोटी आणि पुढील पाच वर्षासाठी ९ कोटींची गरज लागेल. तसेच, पथ विभागासाठी तातडीने ५० कोटी; तर पुढील पाच वर्षासाठी ६०० कोटींची गरज पडणार आहे. उद्यानांसाठी सध्या एक कोटी आणि पुढील काही वर्षांसाठी ३०० कोटींची गरज पडणार आहे. पालिकेत गावे समाविष्ट झाल्यानंतर प्रशासकीय कामकाज आणि सेवक वर्गासाठी २२ कोटींची गरज पडेल, असे अंदाज संबधित विभागांनी व‌र्तविले असल्याचे अ‌तिरिक्त आयुक्त जगताप यांनी स्पष्ट केले.

पाण्यासाठी मोजावे लागणार १६ कोटी

पालिकेतील विभागप्रमुखांनी दिलेल्या अहवालानुसार या नवीन गावांना तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे; तर पुढील पाच वर्षांत पाणीपुरवठ्यासाठी २२० कोटींची गरज लागेल. सांडपाणी वाहून नेण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी सुरुवातीच्या काळात ११ कोटी; तर पुढील पाच वर्षांसाठी १७० कोटींची गरज भासणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाही पावसाचा दगा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एल निनो'सारख्या प्रतिकूल घटकामुळे यंदाचा मान्सून पावसाची दीर्घकालीन सरासरी गाठणार नाही, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी जाहीर केला. यंदाच्या मोसमात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता आयएमडीच्या सांख्यिकी मॉडेलने वर्तविली आहे; तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीट्रिऑलॉजीच्या (आयआयटीएम) डायनॅमिकल मॉडेलनुसार हंगामात सरासरीच्या ९१ टक्के पावसाची शक्यता आहे.

यंदा पाऊस सरासरीच्या खाली (सरासरीच्या ९० ते ९६ टक्के) राहण्याची शक्यता ३५ टक्के असून, अपुऱ्या पावसाची (सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी) शक्यता ३३ टक्के असल्याचे या अंदाजात म्हटले आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज पत्रकार परिषदेत मान्सूनचा पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. प्रशांत महासागरात निर्माण झालेली 'एल निनो'ची स्थिती आणि हिंदी महासागरातील निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल यांचा प्रतिकूल प्रभाव यंदा मान्सूनवर राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

'आयएमडी'तर्फे २००७ पासून पाच घटकांवर आधारित सांख्यिकी मॉडेलच्या साह्याने मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यात येतो. त्यानुसार यंदा हंगामात सरासरीच्या ९३ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अंदाजात पाच टक्के चूक गृहीत धरण्यात आला आहे.

अर्थ सिस्टीम सायन्स ऑर्गनायझेशन (ईएसएसओ) आणि आयआयटीएम यांच्या वतीने 'मान्सून मिशन'अंतर्गत फेब्रुवारीतील हवामानाच्या प्रत्यक्ष नोंदींवर आधारित प्रायोगिक अंदाज देण्यात येतो. त्यानुसार हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या ९१ टक्के पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यातील मान्सूनचा अंदाज जूनमध्ये देण्यात येणार असून, त्यावेळी पावसाचे चित्र अधिक स्पष्ट असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशासाठी नियोजन महत्त्वाचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुढे काय वाढून ठेवले आहे, याचे ज्ञान असेल, तर परदेशी शिकायला जाण्याच्या अनुभवातील गंमत आणखी वाढू शकते,' असे टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज फॉरेन लँग्वेज या परीक्षेच्या (टोफेल प्रोग्राम) कार्यकारी संचालक जेनिफर ब्राउन यांनी सांगितले.

परदेशात शिक्षणासाठी जाताना या प्रवासाचे उत्तम नियोजन कसे करायचे, हा परदेशी शिकायला जाणाऱ्या अनेकांपुढे मोठा प्रश्न असतो. त्याची माहिती देताना ब्राउन म्हणाल्या, 'परदेशी शिकायला जाणे ही आपल्यापेक्षा वेगळी संस्कृती अनुभवण्याची संधी असते. नवे कॉलेज, नवे विद्यापीठ, नवे विद्यार्थीजीवन याव्यतिरिक्त नवे पदार्थ आणि नवे लोक यांचीही ओळख या निमित्ताने होते. विविध मनोवृत्तीच्या व्यक्तींबरोबर प्रत्यक्ष संवादामुळे जगाचे आणखी सखोल ज्ञान होण्यास मदत होते.'

अर्थात, परदेशी जाण्याबाबत उत्सुकता असली, तरी या प्रवासाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्याकडे लक्ष दिल्यास परदेशात राहताना येऊ शकणाऱ्या समस्यांवर मात करणे शक्य होते. ब्राउन यांनी याबाबत विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या चार महत्त्वाच्या टिप्स.

जागेविषयी माहिती घ्या

ज्या देशात शिकायला आणि पर्यायाने पुढचे काही महिने किंवा वर्ष राहायला जाणार आहात, तेथील संस्कृती, समाज, भाषा, हवामान, वाहतूक आणि जीवनशैली याबाबत जास्तीत जास्त माहिती करून घ्या. ही माहिती असेल, तर तेथे गेल्यावर तुम्ही अधिक आरामात राहू शकाल आणि नव्या गोष्टींचे दडपण तुम्हाला येणार नाही.

आर्थिक नियोजन

तुम्ही परदेशात शिकायला जाताना तेथील कोर्सची फी, राहण्याचा

खर्च आदी बाबींची माहिती गोळा केली असेलच; पण त्याशिवायही काही खर्च होऊ शकतात, याची तयारी ठेवा. स्थानिक प्रवास, सामाजिक उपक्रम, खरेदी आदींसाठी खर्च होऊ

शकतो. त्यामुळे अपरिहार्य प्रसंगांसाठीच्या खर्चाची तजवीज करून ठेवणे इष्ट.

कोर्सचे मूल्यमापन

जो कोर्स शिकायचा असेल आणि तो ज्या विद्यापीठात शिकायचा असेल, तो निवडताना त्याच्या ठिकाणाचे प्राधान्य त्याच्या आड येऊ नये. तुम्ही जो अभ्यासक्रम निवडला आहे, त्याबाबत व्यवस्थित माहिती घेऊन मगच योग्य तो निर्णय घ्या. म्हणजे एकदा अभ्यास सुरू केल्यावर, 'हे काही बरोबर नाही,' असे तुम्हाला वाटणार नाही.

गुंतवणुकीवरील परतावा

परदेशी शिकण्याची कल्पना आकर्षक असली, तरी अशी पदवी काय कामाची, ज्याचा तुमची व्यावसायिक उद्दिष्टे गाठण्यासाठी, नोकरी मिळण्यासाठी आणि पर्यायाने घेतलेले शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी काहीच उपयोग नाही! त्यामुळे जो कोणता पदवी अभ्यासक्रम शिकता आहात, त्याचे बाजारात मूल्य काय, याचीही माहिती घ्या. ही पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या कोणत्या संधी आहेत, त्यातून सरासरी पॅकेज काय मिळेल, याचाही अभ्यास करा.

सुरुवातीलाच या सोप्या प्रश्नांची उत्तरे मिळवलीत, तर तुम्हाला पदवी घेऊन बाहेरच्या जगात गेल्यावर परिस्थितीशी सामना करणे अधिक सोपे जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य-खाद्य महोत्सव उद्यापासून

$
0
0

मांडे, भाकरी, मासवडी मिळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने २५ ते २७ एप्रिल दरम्यान शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे धान्य व खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून गहू, तांदूळ, हरभरा, डाळी आदी शेतमाल थेट उपलब्ध करून दिला जाणार आहे.

जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी ही माहिती दिली. 'आत्मा'चे प्रकल्प संचालक सुनील बोरकर या वेळी उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शनिवारी (२५ एप्रिल) सकाळी नऊ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पणन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे या वेळी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांना शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करता यावी, या उद्देशाने हा महोत्सव होत आहे. महोत्सवातून पुणे जिल्ह्यातून तीन हजार सहाशे चाळी क्विंटल शेतमालाची विक्री करण्याचे उद्दिष्ट आहे. सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत महोत्सव खुला राहणार आहे.

धान्यासह भाजीपाला, फळे, कडधान्यही महोत्सवात उपलब्ध असतील. तसेच अस्सल ग्रामीण चवीचा अनुभव पुणेकरांना मिळण्यासाठी खर्डा भाकरी, मांडे, मासवडी आदी खाद्य पदार्थही महोत्सवात ठेवले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेजुरी गडाला सोन्याची झळाळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा मंदिराच्या शिखरास अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचा मुलामा देण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्याला चांदीचा मुलामा देण्यात येणार आहे. या दोन्ही कामांचा शुभारंभ विधिवत पूजा आणि होमहवन करून करण्यात आला. सोन्याचा मुलामा देण्यासाठी सुमारे आठ किलो सोन, तर चांदीच्या मुलाम्यासाठी ३०० किलो चांदी वापरण्यात येणार आहे.

देवस्थानचे विश्वस्त संदीप घोणे, माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका अमृता घोणे, पुजारी चेतन सातभाई यांनी सपत्निक धार्मिक विधी पार पाडले. मुख्य विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, नाझीरकर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे आदींच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरू करण्यात आला.

कुशल कारागिरांकडून येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामांमुळे खंडोबा गड आणि मंदिराचे प्राचीन गतवैभव पुन्हा प्राप्त होणार आहे. देवस्थान कमिटीकडे हे खर्चिक काम करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने दानशूर भक्तांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images