Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘शिवनेरी’ची अजून प्रतीक्षाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाडेकरारावरील शिवनेरी बसचा करार संपुष्टात आल्याने एसटी महामंडळाकडून प्रस्तावित नवीन बसची खरेदी अद्याप झालेली नाही. १० एप्रिलपर्यंत नवीन बस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने आता २० एप्रिलचा मुहूर्त काढण्यात आला आहे. त्यासाठी पुणे विभागातील तांत्रिक शाखेच्या तज्ज्ञांचे पथक बेंगळुरूला गाड्यांच्या तपासणीसाठी रवाना झाले आहे. पुणे-मुंबई आणि पुणे-औरंगाबाद मार्गावरील 'शिवनेरी'ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, शिवनेरी गाड्यांची संख्या कमी झाल्याने या सेवेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे या गाड्यांचा करार संपुष्टात येण्यापूर्वीच एसटीने स्वमालकीच्या नवीन गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या गाड्या १० एप्रिलपर्यंत ताफ्यात दाखल होतील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.

शिवनेरी बस सेवेसाठी एसटीने ठेकेदारांकडून ४० बसगाड्या भाडेतत्वावर घेतल्या आहेत तर, एसटीकडे स्वतःच्या मालकीच्या १० शिवनेरी आहेत. भाडेतत्वावरील नऊ गाड्यांचे करार नुकतेच संपले आहेत. करार संपणाऱ्या गाड्यांच्या कराराचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय एसटीने यापूर्वीच घेतला आहे. त्याऐवजी एसटी स्वतःच शिवनेरी गाड्या खरेदी करणार आहे. बेंगळुरू येथून पुण्यासाठी नऊ आणि मुंबईसाठी तीन गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या तपासणीसाठी एसटीच्या तांत्रिक विभागातील तज्ज्ञांचे पथक तिकडे रवाना झाले आहे, अशी माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नवी डेडलाइनही चुकणार?

'एसटी'साठी ज्या गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत, त्यांचा रंग, आसनव्यवस्था, सस्पेन्शन आणि अन्य सर्व तांत्रिक बाबींची तपासणी हे पथक करणार आहे. या तपासणीनंतर 'शिवनेरी' खरेदी केली जाईल. त्यासाठी लागणारी प्रक्रिया पाहता, २० एप्रिलपर्यंत एसटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल होण्याची शक्यता धूसर असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विविध मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर

$
0
0

पुणेः पर्यवेक्षक पदोन्नती, वाहतूक भत्ता मिळावा, मुख्याध्यापक पदोन्नती त्वरीत द्यावी, ३३ टक्के उर्वरित बोनस मिळावा, २०१० पासूनची वरिष्ठ वेतन श्रेणी व २८ वर्षांपासून रखडलेली निवड श्रेणी त्वरीत मिळावी आदी मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांनी शनिवारी पुणे महापालिकेवर धडक मोर्चा काढला.

महापौर दत्तात्रय धनकवडे आणि शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांना निवेदन देऊन मागण्या तातडीने मान्य करण्याचा आग्रह शिक्षकांनी धरला. अनेक वर्षांपासून अर्ज विनंत्या आणि वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या समस्या ऐकण्याऐवजी कार्यालयीन लेखनिक टोलवाटोलवी करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देण्याकरीता प्राथमिक शिक्षक रस्त्यावर उतरले होते.

पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आयोजित केलेल्या या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणेचे अध्यक्ष नितीन राजगुरू, महाराष्ट्र राज्य उर्दू प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष परवीन शेख, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय गायकवाड, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोहर बाबर यांच्यासह शेकडो शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते. दत्तात्रय धनकवडे, प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पारा ३९ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आकाश पूर्णतः निरभ्र झाल्याने शहरात कडक उन्हाळा पुन्हा जाणवू लागला आहे. शनिवारी पारा यंदाच्या हंगामातील उच्चांकी पातळीवर पोहोचला. शहरात शनिवारी ३८.९ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

पश्चिम राजस्थान, कच्छ आणि लगतच्या परिसरात उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याबरोबरच राज्यातही तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्र कमाल तापमान ३० अंशांवर नोंदले गेले. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव येथे (४१.२ अंश सेल्सियस) नोंदवले गेले. तर, सर्वात नीचांकी तापमान महाबळेश्वर येथे (१६.९ अंश सेल्सियस) नोंदवले गेले.

गेल्या १५ दिवसात राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू होती. त्यामुळे पुण्यासह राज्यात हवामान पूर्णतः अथवा अंशतः ढगाळ होते. अधूनमधून बसरणाऱ्या पावसामुळे वातावरणातील उकाडा गायब होऊन काहीशी थंडीच जाणवत होती. परंतु, मागील चार दिवसांपासून पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणचा पाऊस थांबला आहे. तसेच ढगाळ वातावरणही दूर झाल्याने प्रखर सूर्यकिरणांमुळे जमिनीचा पृष्ठभाग तापून हवेतील उकाडा चांगलाच वाढला आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवसात पुण्यातील तापमानात एक किंवा दोन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. तर राज्यात कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालक, शाळांकडे सरकारचे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय फी वाढीच्या मुद्द्यावरून पुण्याचे पालकमंत्री आमदार गिरीश बापट यांनी राज्य सरकारला शनिवारी घरचा आहेर दिला. फी वाढीवरून पालक आणि शाळांमध्ये खुला संघर्ष सुरू असताना, राज्य सरकार त्याकडे हवे तेवढे लक्ष देत नसल्याची टीका बापट यांनी केली. कायदे निर्मिती करणाऱ्या विधिमंडळामध्येच 'प्रॉब्लेम' असल्याने, तेथून परिपूर्ण कायदे तयार होऊ न शकल्याची कबुलीही त्यांनी दिली.

ग्राहक हितवर्धिनीतर्फे टिळक स्मारक मंदिरामध्ये आयोजित शाळांमधील फी वाढीविषयीच्या परिसंवादामध्ये अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बापट यांनी ही टीका केली. या विषयी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिवांनाही पत्र लिहून आपली भूमिका कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवृत्त शिक्षणाधिकारी प्रकाश परब, व्यवस्थापन सल्लागार मार्कस् देशमुख, हितवर्धिनीचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर वेलणकर, अध्यक्ष हरदेव साहनी, नम्रता शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

शिक्षण क्षेत्रातील कायद्यांच्या संदर्भाने बापट म्हणाले, 'कायद्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा फायदा व्हायला हवा; तर ते तोडणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी. मात्र सध्याच्या परिस्थितीत कायदे तोडणाऱ्यांनाच जास्त फायदा होतो आहे. चांगला कायदा करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याऐवजी सवंग लोकप्रियता आणि राजकीय फायद्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. शाळा, पालक, नेतेमंडळीच्या एकमेकांचे उट्टे काढण्याच्या प्रयत्नांमध्ये विद्यार्थ्यांचा बळी जात असल्याचे विसरले आहेत. त्यामुळे आपण असमाधानी असून, लवकरच शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिवांना पत्र लिहून कळविणार आहोत,' असे त्यांनी सांगितले. समाजानेही आपली जबाबदारी विचारात घेणे गरजेचे असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. अॅड. ज्ञानराज संत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

'एक अभ्यासक्रम, एक फी'

फी वाढीच्या अडचणीवर मात करण्यासाठी देशात सर्वत्र 'एक अभ्यासक्रम, एक फी'चे तत्त्व लागू करणे रास्त ठरणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. शालेय फीवाढ कालसुसंगत हवी, मात्र त्यातून नफेखोरी व्हायला नको. ते टाळण्यासाठी फीची नेमकी व्याख्या करणे गरजेचे असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची यंत्रणा सक्षम करण्याची विनंतीही त्यांनी बापट यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पटेलांच्या पुतळ्याला आक्षेप

$
0
0

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची गुजरात सरकारला नोटीस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुजरातमधील सरदार सरोवराच्या जलाशयात पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आक्षेप घेतला आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या संमतीशिवाय पुतळ्याचे काम सुरू केल्याबद्दल न्यायाधिकरणाने गुजरात सरकार तसेच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.

या नोटिशीवर एक महिन्याच्या आत आपली बाजू मांडण्याची मुदत हरित न्यायाधिकरणाने गुजरात सरकार आणि केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला दिली आहे. हरित न्यायाधिकरणाने नोटीस बजावल्यामुळे सरदार वल्लभभाईंचा पुतळा पुन्हा वादात सापडला आहे.

'स्टॅच्यु ऑफ युनिटी' असे वर्णन करून पंतप्रधान मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा सरदार सरोवरातील साधू बेटावर बांधण्याचा संकल्प केला आहे. या पुतळ्याच्या उभारणीचे कामही सुरू झाले आहे. त्यावर पर्यावरणवाद्यांनी तक्रार केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या संमतीपत्राशिवाय पुतळ्याचे काम सुरू केल्याची तक्रार करीत पर्यावरण अभ्यासकांनी न्यायाधिकरणामध्ये याचिका दाखल केली आहे. त्याची दखल न्यायाधिकरणाने घेतली आहे.

सरदार पटेल यांच्या पुतळ्यामुळे नर्मदा नदीमध्ये असलेल्या साधू बेट आणि गरुडेश्वर राखीव पाणी साठ्याला तसेच पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील शुलपणेश्वर वन्यजीव अभयारण्यातील जैवविविध्य धोक्यात येणार आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून पुतळ्याचे काम सुरू असल्याचे पर्यावरण अभ्यासक तृप्ती शहा, गिरीश पटेल, कृष्णकांत चौहान, महेश पंड्या यासह काही पर्यावरणप्रेमींनी एकत्रितरित्या पुण्यातील हरित न्यायाधिकरणाकडे याचिकेत म्हटले आहे.

या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती विकास किनगांवकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी प्रतिवाद्यांना नोटीस देऊन पुढील महिन्यात स्वतःची बाजू मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्ट, गुजरात राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय, लॉर्सन अँड टर्बो लिमिटेड यांसह सहा जणांना नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी योग्य अर्ज करून पर्यावरण मंत्रालयाची संमती घेण्यात आली मग गुजरात शासनासाठी कायदा आणि कायद्याची प्रक्रिया वेगळी आहे का, असा प्रश्न आम्ही याचिकेतून उपस्थित केला आहे, अशी माहिती अॅड. मिहीर देसाई व असीम सरोदे यांनी दिली.

सर्वात उंच

सरदार वल्लभभबाई पटेल यांचा प्रस्तावित पुतळा लोंखड आणि तांबे यांच्या मिश्रणातून तयार करण्यात येणार असून तो जगातील सर्वात उंचीचा पुतळा ठरणार आहे. अमेरिकेतील 'स्टॅच्यू ऑप लिबर्टी' या पुतळ्यापेक्षा दुप्पट उंचीचा असेल. प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ २०१३ मध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते होता. पुढील चार वर्षात हा पुतळा पूर्ण होणार असून लॉर्सन अँड टर्बो या कंपनीला २ हजार ९९७ कोटी रुपयांचा कार्यादेश देण्यात आला आहे.

याचिकेतील आक्षेप

प्रकल्पामुळे नैसर्गिक परिसंस्था आणि जैवविविधता नष्ट होण्याचा धोका
पर्यटकांच्या वर्दळीमुळे वन्यजीवन संकटात येणार
प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी जनसुनावणी झाली नाही
स्थानिक आदिवासांच्या स्वातंत्र्यावर बाधा
विनापरवाना काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेरॉइनची विक्री; तरुणास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवाजीनगर येथे हेरॉइनची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून साडेपाच लाख रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले. साजिद असद खान (वय २६ रा. बौद्ध कॉलनी, कुर्ला अंधेरी रोड), असे अटक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील प्रफुल्ल साबळे यांना सिमला ऑफिस चौक ते संचेती हॉस्पिटल चौकादरम्यान असलेल्या एचडीएफसी हाऊस बिल्डींसमोर एक व्यक्ती हेरॉइन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून पाच लाख ४८,००० रुपयांची २७४ ग्रॅम हेरॉईनची पावडर जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक फत्तेसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अविनाश शिंदे, रामदास जाधव, ज्ञानदेव घनवट, प्रफुल्ल साबळे, कुणाल माने, विठ्ठल खिलारे, ​सचिन चंदन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसरमधील कालवा बनला मृत्यूचा सापळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

हडपसर, वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुळा-मुठा कालव्यामध्ये सापडणाऱ्या मृतदेहांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल २०१४पासून १५ एप्रिल २०१५पर्यंत २८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामुळे मुळा-मुठा कालवा मृत्यूचा सापळा बनल्याची चर्चा आहे.हडपसर पोलिस ठाणे हद्दीतून जाणाऱ्या कॅनॉलमधून २२ मृतदेह, तर वानवडी पोलिस ठाणे हद्दीत सहा जणांचे मृतदेह अग्निशामक दलाच्या मदतीने बाहेर काढले आहेत. कॅनॉलमध्ये पोहणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

विशेष म्हणजे साडेचारशे ते पाचशे क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने वाहणाऱ्या पाण्यात ही लहान मुले पोहत असतात. पालक कामावर गेल्यावर घरातील मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणीही नसते. त्यामुळे मित्रांच्या संगतीने ही मुले रोज कालव्यात पोहतात. पोहता येत नसले तरी मित्रांसोबत कॅनॉलमध्ये जाणे, पाय घसरून पडणे, खेळता खेळता तोल जाऊन पाण्यात पडणे अशा घटना घडतात. पाण्यात उडी मारताना दगडाचा मार लागल्याने, तसेच उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतीला पाणी मिळावे या उद्देशाने कॅनॉलची निर्मिती झाली आहे; मात्र अशा घटनांनी हा कालवा मृत्यूचा सापळा बनला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाझर तलावासाठी आदिवासींचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

आंबेगाव तालुक्यातील असाणे येथील 'पाईरडोह' या पाझर तलावाचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी नऊ आदिवासी गावांतील ग्रामस्थांनी राजगुरुनगर येथील लघुपाटबंधारे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून एकदिवसीय उपोषण केले.

दरम्यान, या वेळी आंदोलनकर्त्यांनी 'पाझर तलावाचे काम तत्काळ सुरू करण्यासाठी लेखी द्या, अन्यथा आंदोलन बेमुदत सुरूच ठेवण्यात येईल,' असा इशारा दिल्यानंतर पुणे येथील लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गायकवाड तातडीने आंदोलनाच्या ठिकाणी आले.

पाझर तलावाचे काम आणि तेथील रस्ता एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतरच ग्रामस्थानी उपोषण मागे घेतले. कार्यकारी अभियंता गायकवाड यांच्या हस्ते आंदोलनाचे प्रमुख शंकर मुद्गुण यांना रस पाजून उपोषण सोडण्यात आले. खेड तहसीलदार कार्यालयापासून लघु पाटबंधारे उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील माळीण गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या असाणे गावाजवळील बुब्रा नदीवर साडेतीन कोटी रुपये इतका खर्च असलेल्या या पाझर तलावाचे काम २०१०मध्ये सुरू करण्यात आले होते. तसेच या कामासाठी वाढीव दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तरीदेखील अद्याप या तलावाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. भविष्यात या कालावधीमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दोन वर्षांपासून या तलावाचे काम बंद पडलेले आहे. या पाझर तलावामुळे असाणे, माळीण, आमडे, कोंढरे, अडिवरे, पांचाळे, डोण, वचपे आणि तिरपाड या गावांच्या हद्दीतील सुमारे २१५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नाशिक येथील गजानन प्राइम कन्स्ट्रक्शन ही कंपनी संबंधित काम करत असून, ही कंपनी एका राजकीय नेत्याच्या जावयाची असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळेच शासकीय अधिकारी सबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यास धजावत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही या आदिवासी गावांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात या परिसरात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे या पाझर तलावाचा काही भाग वाहून गेला आहे.

यामुळे येथील रस्त्याचे मोठे नुकसान झालेले आहे. या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी समाजसेवक शंकर मुद्गुण असाणे गावाचे सरपंच रामदास भोकटे यांनी केले. या आंदोलनात आदिवासी क्रांती संघटना सक्रिय झाली आहे. असाणे, माळीण, आमडे, कोंढरे, अडिवरे, पांचाळे या गावांसह आठ गावांतील ग्रामस्थ या मोर्चावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून त्याला काळ्या यादीत टाकण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर मदत घेतली जाणार आहे. या ठेकेदाराने पाच वर्षांत केवळ ६० टक्के काम केलेले आहे. या पाझर तलावाचे काम एप्रिल २०१६पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाणार आहे. या वर्षी पावसाळा सुरू होईपर्यंत होईल तितके काम केले जाणार आहे.

- डी. एन. गायकवाड, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या कामाची मुदत संपली, तरीदेखील हे काम पूर्ण झालेले नाही. आदिवासी नागरिकांवर सरकार अन्याय करत असून, ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम संबंधित अधिकारी वर्गाकडून केले जात आहे.

- शंकर मुद्गुण, आंदोलनाचे नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावकाराविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

सावकारी परवाना नसतानाही कर्ज देऊन तसेच कर्जाची रक्कम परत करूनही तारण ठेवलेले सोने परत न केल्याने एका खासगी सावकाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण शिरसाट (३५, नवी सांगवी) यांनी फिर्याद दाखल केली आहे तर श्रवणसिंग कानसिंग राजपुरोहित (४७, किर्तीनगर, नवी सांगवी) व रामलाल (माहिती उपलब्ध नाही) या दोघांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसाट यांना पैश्यांची गरज असल्याने त्यांनी राजपुरोहित याच्याकडून पाच लाख रुपये कर्ज स्वरुपात घेतले. त्याबदल्यात शिरसाट यांनी आपल्या जवळील ५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याच्याकडे गहाण ठेवले होते. काही दिवसांनी राजपुरोहित यांच्याकडे जमा केलेल्या रकमेची पावती व गहाण ठेवलेले दागिने मागण्यास गेले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

राजपुरोहित याने शिरसाट यांच्यासह इतर बारा जणांची अशाच प्रकारचा व्यवहार करत त्यांचीही बारा लाख ६५ हजार ३६० रुपये किमतीच्या सोन्या-चांदीची आणि रोख रकमेची फसवणूक केली आहे. सावकारी परवाना नसतानाही साध्या कागदावर बेकायदा रकमा टाकून खोट्या सह्या घेऊन फसवणूक केल्याबद्दल राजपुरोहित व त्याचा साथीदार रामलाल या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फौजदार डी. जे. जाधव तपास करीत आहेत.

हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार

पिंपरी ः हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकाच्या जेवणाची ऑर्डर देण्यास उशिर झाल्याच्या कारणाने ग्राहकाने हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार केला. ही घटना शनिवारी (१८ एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास तळवडे येथील हॉटेल शिवरत्न येथे घडली.अमोल तुकाराम भालेकर (२९, रा. रुपीनगर,तळवडे) असे गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे.

या प्रकरणी राहुल पवार, दत्ता वाळके आणि त्यांचे इतर दोन साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास राहुल आणि त्याचे मित्र मद्यधुंद अवस्थेमध्ये तळवडेतील शिवरत्न हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, ऑर्डर यायला उशिर झाल्याने त्यांनी हॉटेलमधील नोकरांसोबत वाद घालण्यास सुरवात केली. हा प्रकार पाहून हॉटेलचे मालक अमोल भालेकर वाद सोडवण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी वादाचे रुपांतर भांडणामध्ये झाले. या वेळी राहुलने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून अमोलवर गोळी झाडली. ही गोळी अमोलच्या पायाला लागल्यामुळे ते जखमी झाले. या घटनेनंतर राहुल आणि त्याचे साथीदार तेथून पळून गेले. पो​लिस त्यांचा शोध घेत आहेत.यापुर्वीही पिंपरी भागामध्ये अशा अनेक घटना घ़डल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये हॉटेलचालकांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाणही वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निगडीकडे जाणारा ग्रेडसेपरेटर बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी पिंपरी

पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या कामामुळे ग्रेडसेपरेटरमधून पिंपरीकडून निगडीच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शनि मंदिर ते अॅटोक्लस्टर व एम्पायर इस्टेट या दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याच प्रमाणे उड्डाणपुलाखाली येणाऱ्या ग्रेडसेपरेटरमधील रस्त्याचे नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यामुळे ग्रेडसेपरेटरमधून पिंपरीकडून निगडीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहनचालकांनी ग्रेडसेपरेटरचा वापर न करता सर्व्हिस रस्त्याचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

याच टप्प्यात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होत असते. या भागात असलेले मॉल, दुकाने, रस्त्याच्या कडेला होत असलेली पार्किंग आणि चिंचवड चौकातून विरुद्ध दिशेने नो-एन्ट्रीमध्ये येत असलेल्या गाड्यांमुळे या भागात वाहतूक कोंडी होत होती. थेट पुढे जाणारी वाहने ग्रेड सेपरेटरमधून जात असल्याने त्यांचा वाहतुकीवर परिणाम होत नव्हता. मात्र, आता ती सर्व वाहने याच अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यावर येणार असल्याने वाहतूक कोंडीत भरच पडणार आहे. हा ग्रेडसेपरेटर बंद केल्याच्या पहिल्याच दिवशी या भागामध्ये दोन्ही बाजूने एक किलोमीटर पर्यंतच्या गाड्यांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गाजलेल्या आणि सध्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीविना रखडलेल्या कारवाईला आजच्या सभेत मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, गेल्या सभांमध्ये काही लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांचीच बाजू घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आजच्या सर्व साधारण सभेत तरी चर्चेनंतर 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाईला गती मिळते का ते स्पष्ट होणार आहे.

महापालिकेच्या हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार आणि लाच घेताना पकडले गेलेल्या अधिकाऱ्यांवरील कारवाई संदर्भातील भ्रष्टाचार प्रकरणाशी संबधित विषय आज (सोमवार २० एप्रिल) होणाऱ्या महापालिका सभेच्या अजेंड्यावर आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामधील काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे अजूनही सुरू आहेत.

पुनावळे येथील विकास आरखड्याचा नकाशा देण्यासाठी नगररचना विभागातील सर्व्हेअर संजय रणदिवे आणि त्याचा सहायक अनुरेखक मिलिंद निकाळजे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना तीन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्यांची खातेनिहाय चौकशी झाली असून त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला भरण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. मात्र, नियमाप्रमाणे महापालिका सभागृहाला माहिती देण्यासाठी हा विषय अजेंड्यावर आहे.

वैद्यकीय विभागाबरोबरच, विद्युत, भांडार, नगररचना विभागातील भ्रष्टाचारी प्रकरणेही समोर आली. त्यामध्ये महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या गाजलेल्या काही प्रकरणांपैकी यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलचे (वायसीएम) निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे यांचे प्रकरण चांगलेच चर्चेत आलेले आहे. त्यामध्ये एच.बी.ओटी मशिन खरेदी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, एन.एस.टी. मशीन खरेदी प्रकरणामध्ये नियमांचे पालन न केल्याचे खातेनिहाय चौकशीमध्ये समोर आलेले आहे.

डॉ. जगदाळे यांच्याबरोबरच आणखी काही भ्रष्टाचाराशी संबधित विषय महापालिकेच्या सोमवारी होणाऱ्या सभेसमोर आहेत. त्यामध्ये डॉ. जगदाळे यांच्या निवृत्ती वेतनातील २० टक्के भाग पाच वर्षांपर्यंत रोखून ठेवण्यास मंजुरी देण्याचा विषय सभागृहापुढे ठेवण्यात आला आहे. त्यांच्याबरोबर निवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर व निवृत्त वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शामराव गायकवाड यांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यासाठी मंजुरीचा विषय सभागृहापुढे आहे.

आजार होण्यापूर्वीच 'इंजेक्शन' का नाही?

महापालिकेच्या हॉस्पिटलमधील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही वर्षांत समोर आली. येथील सुविधा आणि खरेदी घोटाळा तर सर्वज्ञात आहे. त्यातच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा व पढतीचा विषय वादग्रस्त ठरला आहे. त्यामुळे महापालिकेच्या या आरोग्य-वैद्यकीय विभागाला कीड लागण्यापूर्वीच ठोस उपाययोजनांचे 'इंजेक्शन' का दिले जात नाही असा सवाल उपस्थित होतो. काही ठराविक लोकप्रतिनिधींमुळे संपूर्ण आरोग्य-वैद्यकीय विभागालाच आजाराने ग्रासल्याचे पाहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधारी आमदार सक्रिय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधिमंडळाचे अधिवेशन संपताच, मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी शहरातील आमदार सक्रिय झाले असून, विविध भागांत भेटी देऊन तेथील प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. नदीपात्रातील राडारोड्यापासून ते डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यापर्यंतच्या अनेक समस्यांकडे आमदारांनी स्थानिक प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले; तसेच ठराविक कालमर्यादेत हे प्रश्न सुटले नाहीत, तर प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कर्वेनगर परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असल्याने कोथरूडच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष त्याची पाहणी केली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार कुलकर्णी यांनी केली. येरवडा भागातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याला वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांनी भेट दिली.

सरकारची फसवणूक...

सरकारचे नाव व राजमुद्रा वापरून सरकारी नोकरीसाठी निवड झाल्याचे पत्र पाठवून व्यक्तीची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. आमदार जगदीश मुळीक यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिवेज भालेराव या व्यक्तीला गोवा येथून महाराष्ट्र सरकारच्या कॉल सेंटरमध्ये नोकरी देण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले. पैसे बँकेत जमा करण्यास सांगितले. या सर्व प्रकाराबाबत भालेराव यांना शंका आल्याने त्यांनी मुळीक यांच्याशी संपर्क साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना धमकी; तरुणास अटक

$
0
0

पुणेः भाई असल्याचे सांगत, वाहतूक पोलिसांना धकमावणाऱ्या आंबेगाव बुद्रूक येथील तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अमोल भरत ढावरे (वय २३, रा. आंबेगाव बुद्रूक) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर चौकात सिग्नल तोडून जात असताना वाहतूक पोलिस कर्मचारी विजय कदम यांनी अडवले होते. कदम यांनी ढावरेला दत्तवाडी वाहतूक विभागात कारवाई करण्यासाठी नेले असताना तेथे त्याने सहायक पोलिस निरीक्षक भुजबळ यांच्याशी झटापटी केली. कारवाई केल्यास बघून घेईन, अशा प्रकारे दम दिला असल्याचे तक्रारीत ​नमूद करण्यात आले आहे.

तीन लाखांचे दागिने लंपास

बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेच्या पर्समधील तीन लाख रुपयांचे दागिने एका महिलेने चोरून नेल्याची घटना येथे उघडकीस आली. आळंदी देवाची ते स्वारगेट या बसमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वा दहा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका २३ वर्षीय महिलेने लष्कर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुली झाल्याच्या कारणावरुन विवाहितेचा मानसिक आणि शारिरिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मनिषा दिनेश इंगळे (२३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा नवरा दिनेश जर्नादन इंगळे (२७ रा. घोरपडी गाव, मूळ बुलढाणा), सासरा जर्नादन मरी इंगळे, सासू लक्ष्मीबाई इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध समाधान पवार (५० रा. कुऱ्हा, जि. बुलढाणा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी मनिषा हिचे एप्रिल २०११ मध्ये दिनेश इंगळेबरोबर लग्न झाले होते. ती सासरी नांदत असताना तिला दोन्ही मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी तिचा मानसिक आणि शारिरिक छळ केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

हेरॉइनची विक्री; तरुणास अटक

शिवाजीनगर येथे हेरॉइनची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून साडेपाच लाख रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले. साजिद असद खान (वय २६ रा. बौद्ध कॉलनी, कुर्ला अंधेरी रोड), असे अटक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील प्रफुल्ल साबळे यांना सिमला ऑफिस चौक ते संचेती हॉस्पिटल चौकादरम्यान असलेल्या एचडीएफसी हाऊस बिल्डींसमोर एक व्यक्ती हेरॉइन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून पाच लाख ४८,००० रुपयांची २७४ ग्रॅम हेरॉईनची पावडर जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक फत्तेसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अविनाश शिंदे, रामदास जाधव, ज्ञानदेव घनवट, प्रफुल्ल साबळे, कुणाल माने, विठ्ठल खिलारे, ​सचिन चंदन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पिस्तुलाच्या धाकाने तरुणास धमकावले

मित्रासह रस्त्याच्याकडेला बोलत थांबलेल्या तरुणाला बनावट पिस्तुलाच्या धाकाने धमकावल्याचा प्रकार नगरवाला स्कूल कंपाउंडजवळ घडला. सिंहगड रोड पोलिसांनी धमकावणाऱ्या तरुणाला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून बनावट पिस्तूल जप्त केले आहे.

याबाबत गो​विंद रघुवंशी (वय २८, रा. हडपसर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अमोल अविनाश खरमाळे (वय २५, रा. आनंदपार्क), असे अटक केलेल्याचे नाव आहे. रघुवंशी हे नगरवाला स्कूल कपाऊंटजवळ थांबले असताना आरोपीने त्यांना बनावट पिस्तुलाच्या धाकाने धमकावले. येथे का थांबले आहात, असे म्हणत असतील त्या वस्तू देण्याची मागणी केली. रघुवंशी यांनी लगचेच पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खरमाळेला ताब्यात घेत त्याच्याकडील पिस्तुलही जप्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चहापानाचा निधी ४ महिन्यांत संपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात केल्या जाणाऱ्या चहापानावरील खर्चाची तरतूद गेल्यावर्षी अवघ्या चार महिन्यांतच संपल्याने ऑगस्ट ते मार्च या कालावधीतील बिले देण्यासाठी वर्गीकरण करण्याची वेळ ओढवली आहे. गेल्या वर्षाच्या चहापानाच्या बिलांसाठी नव्या आर्थिक वर्षाच्या बजेटमधून तीन लाख रुपये वळते करून द्यावे लागणार आहेत.

महापौर, उपमहापौर यांच्यासह पालिकेतील इतर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात येणाऱ्यांच्या चहापानासाठी पालिकेच्या बजेटमध्ये दरवर्षी तरतूद केली जाते. महापौर कार्यालयासाठी दोन लाख, तर उपमहापौर, पक्षनेते आणि विषय समित्यांच्या कार्यालयांसाठीही ठराविक तरतूद करण्यात येते. बजेटमध्ये करण्यात आलेली ही तरतूद पहिल्या चार महिन्यांतच संपल्याने ऑगस्टपासूनची बिले थकित आहेत.

महापौर कार्यालयाचे तब्बल एक लाख ६५ हजारांचे, तर उपमहापौर कार्यालयाचे सुमारे ५० हजारांचे बिल थकले आहे. त्याशिवाय, इतर कार्यालयांकडेही थकबाकी आहे. चहापानावरील एकत्रित खर्चाची ही रक्कम तीन लाखांच्या घरात असून, त्यासाठी नव्या बजेटमधून निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण मंडळाच्या बिलांचा प्रस्ताव दफ्तरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण मंडळाची गेली चार वर्षांपासूनची ४ कोटी ७२ लाख रुपयांची थकित बिले देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी स‌मितीने दफ्तरी दाखल केला. पुरेशी तरतूद उपलब्ध नसतानाही मंडळाने ही खरेदी केल्याने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करत स्थायी समितीने मंडळावर छडी उगारली.

महापालिकेच्या शिक्षण मंडळाने गेल्या चार वर्षांपासून तरतूद नसतानाही तब्बल ४ कोटी ७२ लाखांचा खर्च केल्याचे समोर आले होते. चार वर्षांत खरेदी करण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या बिलांचा यामध्ये समावेश होता. वर्षानूवर्षे थकलेल्या या बिलांमध्ये मोठा गोंधळ असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला होता. यश मासिक, कलश मासिक, मंडळासाठी छापण्यात आलेले फ्लेक्स-बॅनर यांचा खर्च, संगणक प्रशिक्षण खर्च, राजीव गांधी ई-लर्निंग शाळेची सॉफ्टवेअर खरेदी आणि ई-लर्निंग शाळेसाठी करण्यात आलेल्या गणवेश खरेदीचा समावेश या खर्चात होता.

शिक्षण मंडळाने चार वर्षा‌त खरेदी केलेल्या या बिलांचा प्रस्ताव स्थायी समिती मान्य करणार की, नामंजूर करणार असा प्रश्न विचारला जात होता. शुक्रवारी झालेल्या स्थायी समित‌ीच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी आला असता त्याबाबतची माहिती सभासदांनी मागितली. शिक्षण मंडळाच्या बजेटची मुदत ३१ मार्चलाच संपली असल्याचे प्रशासनाने समितीच्या निदर्शनास आणून दिले. गेल्या चार वर्षापासून केलेल्या खरेदीची ही बिले असल्याने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्यांसह फळभाज्या स्थिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलटेकडीच्या मार्केट यार्डात बटाटा, फ्लॉवर, कोबीचे दर वाढले आहेत. तर अन्य पालेभाज्यांसह फळभाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत. भाज्यांचे दर स्थिरावल्याने ग्राहकांना या आठवड्यात दिलासा मिळणार आहे.

मार्केट यार्डात रविवारी १८० ते २०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. गेल्या आठवड्यात फळभाज्यांची २५० ट्रक आवक झाली होती. मध्य प्रदेशातून चार ट्रक मटारची आवक झाली. आंध्र प्रदेश, तामिळनाडूमधून शेवग्याच्या पाच ते सहा टेम्पोची आवक झाली. कर्नाटकमधून ४ ते ५ ट्रक तोतापुरीची कैरीची आवक झाली. ही आवक थोडी घटली आहे.

सातारी आल्याची मागील आठवड्याप्रमाणे ५०० गोणींची आवक झाली. टोमॅटो, कोबीची देखील नेहमीप्रमाणेच आवक झाली. फ्लॉवरची थोडीशी कमी आवक झाल्याने त्याच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे. सिमला मिरचीची १० ते १२ टेम्पोची आवक झाली.

शेवगा, गाजरची मागील आठवड्याऐवढीच आवक झाली आहे. स्थानिक भागातून मटारची होणारी आवक यंदा घटली आहे. अवघी ४० गोणींची आवक झाली आहे. गावरान कैरीची ७ ते ८ टेम्पो, चिंचेची १५० ते १७५ गोणींची आवक झाली आहे.

पुणे विभागातून कांद्याची सव्वाशे ट्रकची आवक झाली. बटाट्याची गुजरात, आग्रा, इंदौरहून ६० ट्रक आवक झाली आहे. आवक घटल्याने तसेच उन्हाळ्यात मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. लसणाची मध्य प्रदेशातून तीन हजार गोणींची आवक झाली आहे.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, चुका, मुळा यांच्या दरामध्ये वाढ नोंदली गेली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर जुडींच्या शेकड्यामागे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली. चुक्याच्या दरातही २०० रुपयांनी वाढ झाली आहे. पालकसह मेथीच्या दरात प्रत्येकी १०० रुपयांनी घट झाली आहे. कोथिंबीरची पावणेदान लाख जुडी, तर मेथीच्या एक लाख जुडींची आवक झाली आहे.

संत्रा, खरबूजाच्या दरात वाढ

संत्र्याना उन्हाळ्यामुळे ज्यूस विक्रेत्यांकडून मागणी वाढली आहे. मात्र बाजारात फारशी आवक नाही. अवघी चार टन आवक आहे. त्यामुळे त्याच्या दरात ४० टक्क्यांनी दर वाढ झाली आहे. द्राक्षांना देखील मध्यंतरी झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. सात टन आवक झाल्याने मागणीही घटली आहे. पपईला उष्णतेमुळे मागणी घटली आहे.

मासळीची आवक घटली

गुजरातहून मासळीची काही प्रमाणात आवक झाली. मात्र, परदेशातील मच्छिमारांनी विशेष परवानगी घेतल्याने आठवड्यात दोन ते तीन महिन्यांची मासळी घेऊन गेले आहेत. परिणामी स्थानिक मच्छिमारांना फारशी आवक मिळू शकली नाही. त्यामुळे बाजारातील मासळीचीही आवक घटली आहे. खोल समुद्रातील मासळीची साडे सात टन आवक झाली. खाडीची २०० किलो तर नदीची ३०० किलोची आवक झाली. आंध्र प्रेदशातून रहूची१६ टनाची आवक झाली.

फुलांना मागणी

अक्षय्य तृतीयेसाठी सजावटीच्या विविध प्रकारच्या फुलांना मागणी वाढली आहे. त्यामुळे सजावटीच्या कार्नेशियन, जर्बेररा, अबोली, गुलाबाच्या फुलांच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंगदाणा, बेसन, भगर महागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अक्षय्य तृतीयेमुळे गुळाला मागणी वाढल्याने क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे, तर शेंगदाणा, भाजकी डाळ, बेसन, वरई भगरच्या दरात या आठवड्यात वाढ झाली आहे. त्याशिवाय तेलासह डाळी, कडधान्ये, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, पोहे, रवा, आटा, मैदा, नारळ, मिरचीचे दर मात्र स्थिर आहेत.

या आठवड्यात शेंगदाण्याला आखाती देशांमधून मागणी वाढली आहे. निर्यात वाढल्याने एका क्विंटलमागे ३०० रुपयांनी दर वाढले. अक्षयतृतीया दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. सणासुदीला गुळाला मागणी वाढल्याने क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. कराड, कोल्हापूर, पाटण भागातील गुळाचा हंगाम संपला आहे. त्यामुळे सध्या कासर शिरसी, लातूर, केडगाव, राहू येथून आवक होत आहे. चार ते पाच हजार डाग एवढी गुळाची आवक झाली आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला भाजकी डाळ ही १५० ते २०० रुपयांनी वाढली होती. त्यानंतर आठवड्यात पुन्हा १५० रुपयांनी दर खाली उतरले. मात्र, आता दरात ५० ते ६० रुपये वाढ आहे. हरभरा महाग झाल्याने त्याचा परिणाम बेसनाच्या दरावर झाला. बेसनाच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे.

वरई भगरच्या कच्च्या मालाची आवक घटली आहे. तसेच यंदाच्या वर्षी उत्पादनही कमी आहे. दिवाळीनंतर नवीन माची आवक होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. त्याच्या दरात २०० ते २२५ रुपयांची वाढ झाली आहे.

मार्केट यार्डाच्या भुसार विभागात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर ८३ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्या कारवाईचा परिणाम काही प्रमाणात घाऊक बाजारपेठेवर झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्यांसह डाळी, तेलांची खरेदी होत असे. मात्र काही दुकाने सुरु तर काही बंद अशा प्रकारामुळे मालांना उठाव नसल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे पोहे, तेल, शाबुदाणा, गोटा खोबरे, साखर सारख्या वस्तूंच्या दरात बदल झाला नाही. या शिवाय रवा, आटा, मैदा, गहू, ज्वारी, बाजरी, नारळ, मिरची, मीठ यांचे दर स्थिर आहेत.

शेंगदाणा (क्विंटलमध्ये) ७४०० ते ७८००

गूळ २५५० ते २६५०

भाजकी डाळ (४० किलो) २४२५ ते २५५०

वरई भगर ७१०० ते ७२००

बेसन (५० किलो) २८०० ते २८७५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबा दोनशेंनी स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या सणासाठी ग्राहकांनी आंबा खरेदीसाठी मार्केट यार्डात गर्दी केली होती. रत्नागिरीच्या आंब्याची घटलेली आवक, ग्राहकांची मागणी आणि नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी तयार आंब्याची विक्री केली. त्यामुळे तयार आंबा २०० रुपयांनी, तर कच्चा आंबा ५०० रुपयांनी स्वस्त झाला आहे.

'मुंबई, सुरत, अहमदाबाद येथील बाजार बंद असल्याने रविवारी पुण्याच्या बाजारात तीन हजार पेटींची आवक झाली. अक्षय्य तृतीयेसाठी तयार आंब्याची मागणी अधिक होती. त्यामुळे तयार आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या परिसरात पावस, राजापूर, कणकवली येथे पाऊस पडला. त्यामुळे आंब्याचे नुकसान झाले. परिणामी, तयार आंब्याचे नुकसान होऊ नये, याची दक्षता व्यापाऱ्यांनी घेत पेटीमागे २०० रुपये स्वस्त दराने आंबा विकला. तर कच्च्या आंब्याच्या दरात ४०० ते ५०० रुपयांनी घट झाली', अशी महिती आंब्याचे व्यापारी करण जाधव यांनी दिली. आंब्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने तयार आंब्याचा माल संपला आहे, असेही त्यांनी सांगितले.

'रत्नागिरीबरोबरच कर्नाटक हापूस आंब्याला देखील चांगली मागणी होती. बाजारात कर्नाटकाहून दहा हजार पेटींची आवक झाली होती. मागणी बऱ्यापैकी आहे. तयार आंब्याला अधिक मागणी होती. तर किरकोळ ग्राहकांनीच मोठी खरेदी केली. मागणी वाढल्याने तसेच आवक वाढल्याने कर्नाटक हापूस आंब्याच्या दरातही पेटीमागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. पुढील आठवड्यात कर्नाटकाहून आणखी आवक वाढेल,' अशी माहिती रोहन उरसळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा चाळिशी गाठणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी पारा तब्बल ३९.४ अंशांवर पोहोचला. वाढत्या उन्हाच्या तीव्र झळांनी पुणेकर हैराण झाले आहेत. दरम्यान, आजपासून (सोमवार) सुरू होणाऱ्या आठवड्यात हवामान कोरडे राहून तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. परिणामी हा आठवडा उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ढगाळ हवामान दूर झाले आहे. आकाश निरभ्र राहत असल्याने प्रखर सूर्यकिरणांमुळे पुण्यासह राज्यात उकाड्याची तीव्रता वाढली आहे. रविवारी पुण्यात ३९.४ अंश सेल्सिअस या हंगामातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झाली, तर लोहगाव येथे ३९.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक होते. पुण्यात एप्रिल महिना हा सर्वाधिक तापमानाचा महिना म्हणून ओळखला जातो. एप्रिलमध्ये पारा अनेकदा ३५ ते ४० अंशांदरम्यान राहतो. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ४०.७, तर २०१३ मध्ये ४१.३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानात नोंदले गेले होते.

पुढील दोन दिवसांत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तापमानात आणखी दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images