Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कायदा नीट वाचाः तावडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शुल्कनियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीविषयी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना स्वारस्य नसल्याची बाब आता स्पष्ट होत आहे. कायद्यामध्ये संदिग्धता असल्याचे मत मांडणाऱ्या अधिकाऱ्यांनी 'कायदा नीट वाचावा, म्हणजे कळेल,' असा टोला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला. 'कायदा सुस्पष्ट असल्याने, त्याची अंमलबजावणी व्हायलाच हवी,' अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली.

राज्यात गेल्या वर्षीपासून शुल्कनियंत्रण कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार यंदाच्या वर्षात शाळांच्या फी वाढीवर सरकारचे नियंत्रण ठेवले जाणार होते; मात्र कायद्यातील विविध मुद्द्यांबाबत संदिग्धता असल्याची बाब शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांकडूनच पुढे केली जात होती. त्यामुळेच यंदाच्या वर्षात या कायद्याच्या अंमलबजावणीविषयी कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचेही समोर आले होते. त्या विषयी राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे, असा सवाल उपस्थित होत होता. ही भूमिका स्पष्ट करताना तावडे यांनी खात्यातील अधिकाऱ्यांनाच फटकारले.

तावडे म्हणाले, 'राज्यात लागू झालेल्या शुल्कनियंत्रण कायद्याविषयी कोणतेही गोंधळाचे वातावरण नसून, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायलाच हवी. कायदा ज्यांनी वाचला आहे, त्यांनाच तो कळेल. मूळ कायदा सुस्पष्ट असल्याने त्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्याही अडचणी नाहीत. सीबीएसई-आयसीएसई बोर्डाच्या शाळांविरोधात बेसुमार फी वाढीच्या तक्रारी पुढे येत आहेत. या शाळांवरही राज्य सरकार कायदेशीर कारवाई करेल.' शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतानाच त्यांनी २५ टक्के आरक्षित जागांचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांनाही फटकारले.

परतावा देणार नाहीच

२५ टक्के आरक्षित जागांवरील पूर्वप्राथमिक वर्गांसाठीच्या प्रवेशांसाठी राज्य सरकार कोणताही फी परतावा देणार नसल्याचे तावडे यांनी रविवारी सांगितले. 'शिक्षण खात्याला मुळातच निधी कमी पडत आहे. त्यातूनही जी बाब कायद्यातच नाही, त्यासाठी पैसा देणे योग्य नाही. पूर्वप्राथमिक प्रवेशांची अडचण ही शहरी भागात पुढे येणारी समस्या आहे. त्यासाठी पैसा देऊन, राज्यातील ग्रामीण भागातील शाळांकडचा निधी कमी करण्यात रस नाही,' असेही त्यांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण हक्काचा आता नवा कायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) अंमलबजावणीमधील समस्या टाळण्यासाठी राज्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात येणार आहे. प्राधान्याने बालवाडी की पहिली, या 'एंट्री पॉइंट'संदर्भातील समस्येवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न या नवीन कायद्याच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच, सध्या अस्तित्वात असलेल्या केंद्रीय कायद्यातील त्रुटी टाळून खऱ्या अर्थाने वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षणहित जपण्याचा त्याद्वारे प्रयत्न केला जाईल.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी पुण्यात ही माहिती दिली. 'केंद्राच्या कायद्यामध्ये ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचाच विचार करण्यात आला आहे. त्यानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी हा कायदा आहे. राज्यात पूर्वप्राथमिक वर्गांचा विचार नेमका का झाला, हेच लक्षात येत नाही. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत असून, शाळा त्या विरोधात कोर्टात जात आहेत. कायद्यातील त्रुटींमुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे. ते टाळण्यासाठी राज्यात नवा आरटीई तयार केला जाणार आहे,' असे तावडे यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने २००९ मध्ये देशभरात 'आरटीई' लागू केला. या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची हमी देण्यात आली. वंचित आणि दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांची तरतूदही या कायद्याद्वारे करण्यात आली. पहिली ते आठवीच्या वर्गांमधील अशा प्रवेशांसाठी फी परतावा देण्याची सरकारी जबाबदारीही निश्चित करण्यात आली. राज्याच्या पातळीवर या कायद्याची अंमलबजावणी होत असताना, १५ मार्च २०१३ रोजीच्या शासकीय आदेशनानुसार राज्य सरकारने कायद्यामध्ये 'एन्ट्री पॉइंट'चा मुद्दा विचारात घेतला. त्यानुसार राज्यात पहिली वा त्यापूर्वीच्या पूर्वप्राथमिक वर्गांच्या प्रवेशासाठीही हा कायदा लागू करण्यात आला. त्यानंतरच्या टप्प्यात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक वर्गांमधील 'आरटीई'च्या अंमलबजावणीवरून सातत्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे राज्यात अनुभवायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री तावडे यांनी या नवीन कायद्यासंदर्भात सूतोवाच केले. 'प्रवेश देणारच नाही, हे म्हणणे चुकीचे. कायद्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढायला नको, अन्यथा कायदेशीर कारवाई करू,' असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला.

शिक्षण या विषयाचा केंद्र आणि राज्य सरकारसाठीच्या सामाईक सूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच, राज्याच्या पातळीवर स्वतंत्र कायदा करण्याची मुभा आहे.

- विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाग आंब्यामुळे निर्यात घटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अवकाळी पाऊस, गारांमुळे कोकणच्या राजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी यंदाच्या वर्षी उत्पादन घटल्याने स्थानिक बाजारपेठेत आंबा आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे निर्यातीला महागडा आंबा पाठविणे शक्य होणार नसल्याने यंदाच्या वर्षी आंब्याची निर्यात घटणार आहे, अशी माहिती पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अवकाळी पावसामुळे कोकणातील आंब्याचे नुकसान झाल्याने तेथे पंचनामा सुरू केला आहे. आंबा उत्पादकांना काही प्रमाणात भरपाई देण्याचा विचार सरकार करीत असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

पणन मंडळाच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनानंतर पत्रकारांना पणनमंत्र्यांनी माहिती दिली. कोकणात मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. गारामुळे आंबा डागाळला. परिणामी आंब्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन घटले आहे. स्थानिक बाजारपेठेत आंबा महाग झाला आहे. पुरवठा कमी होत असल्याने निर्यातीला आंबा पाठविणे फारसे शक्य नाही. त्यामुळे आंब्याची यंदाच्या वर्षीची निर्यात घटणार आहे, अशी माहिती पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आंबा निर्यातीला युरोप, अमेरिकेचे दरवाजे खुले झाले आहेत. त्याशिवाय दक्षिण कोरिया, ऑस्ट्रोलिया, न्यूझीलंड, तसेच आखाती देशांत आता आंबा निर्यात होत आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत 'इररेडिएशन' (विकिरण) प्रक्रियेद्वारे आंबा पाठविण्यात आला होता. यंदा ३०० टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट आहे. तर युरोपमध्ये पाच हजार मेट्रिक टनाचे उद्दिष्ट आहे. जगभरात देशातून ५० हजार मेट्रिक टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरशी घालून तरुणाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोंढव्यातील अश्रफनगर येथे तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच, त्याच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा जाधव (वय २७, रा. कोंढवा) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जाधव यांचे पती अविनाश उर्फ शिवा मधुकर जाधव (वय २९) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल उर्फ उदल जगतबली सिंग (रा. कोंढवा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांनी आरोपीच्या मामाचे पेंटिंगचे पैसे दिले नव्हते. याच कारणावरून आरोपी आणि जाधव यांच्यात बाचाबाची झाली. आरोपीने जाधव यांना बेदम मारहाण करूत त्यांच्या डोक्यात फरशी घातली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाळीव कुत्र्यांचाही आता सिंहगडावर उपद्रव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगडावर व्यायामासाठी जाणाऱ्या हौशी मावळ्यांना मोहिमेदरम्यान आणखी एका समस्येचा सामना करावा लागत आहे. गडावर येणाऱ्या काही उत्साही श्वानप्रेमींनी आता डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, बुलडॉग अशा आक्रमक वृत्तीच्या कुत्र्यांनाही व्यायाम आणि प्रातःविधीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लहान मुलांबरोबच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही कुत्री अतिशय त्रासदायक ठरीत आहेत.

सिंहगड हा पुणेकरांसाठी अतिशय संवेदनशील विषय असून, दर आठवड्याला गडावर जाणाऱ्यांची संख्या काही हजारांमध्ये आहे. मुख्यतः गुरुवार, शनिवार आणि रविवारी सिंहगडाच्या पायवाटेवर पहाटे साडेतीन वाजल्यापासून गिर्यारोहकांच्या टॉर्च दिसायला लागतात. सकाळी सहा ते आठ या वेळेत हौशी गिर्यारोहकांची सर्वाधिक वर्दळ दिसते. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यापासून काही उत्साही श्वानप्रेमींनी कुत्र्यांनाही ट्रेकिंगसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. स्वतःबरोबरच कुत्र्यालाही व्यायामाची सवय लावण्याचा हा त्यांचा प्रयत्न सर्वसामान्यांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. यातील बहुतांश नागरिकांकडे जर्मन शेफर्ड, बुलडॉग, डॉबरमॅन, लॅब्रेडॉर अशी आक्रमक जातीची कुत्री असतात. गड चढणाऱ्या व्यक्तींच्या अचानक जवळ जाणे, काहींच्या अंगावर भुंकणे, लहान मुलांवती घुटमळणे असे प्रकार ही कुत्री करीत असल्याने गिर्यारोहक त्रस्त झाले आहेत.

गडावर चढताना मूळातच व्यक्ती दमलेली असते. अशावेळी अचानक कुत्रे जवळ आल्यास लोक दचकतात किंबहुना त्यांचा तोल जाण्याचीही शक्यता असते. तरी देखील लोक स्वतःची हौस भागविण्यासाठी गडावर कुत्र्यांना फिरायला घेऊन येणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. दोनच दिवसांपूर्वी एक पाळीव कुत्रे ट्रेकिंगला आलेल्या मुलांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला होता. एवढेच नव्हे तर ही कुत्री पायवाटेवर घाण करीत असल्याने अस्वच्छताही वाढली आहे. त्यामुळे वन विभाग आणि सिंहगड घेरा समितीने याबाबत तातडीने लक्ष घालून पाळीव कुत्र्यांच्या 'गिर्यारोहणा'वर बंदी आणावी अशी मागणी गडावर नियमित येणाऱ्यांनी केली आहे.

गड चढणाऱ्यांमध्ये तरुणांबरोबरच ज्येष्ठांचे प्रमाण उल्लेखनीय आहे. पाळीव कुत्र्यांमुळे चढताना त्यांना त्रास होतो. अचाकन कुत्रे धावून आल्यास गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याचीही शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी एखादेच कुत्रे दिसायचे आता मात्र, प्रत्येक वेळी किमान दहा ते बारा कुत्री गड चढताना दिसतात. गड चढणाऱ्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. ही संख्या वाढण्यापूर्वीच नियंत्रण आणले पाहिजे.

- श्रीकृष्ण पाटील, स्कायलार्क माउंटेनिअर्स

सिंहगड आणि पायवाटेवर पाळीव कुत्री आणण्यास बंदी आहे. अलीकडे पाळीव कुत्र्यांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी वाढत असल्याने आता पायवाटेवर ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावणार आहोत. गडाच्या पायथ्याला असलेल्या वनरक्षकांनाही कुत्रा घेऊन जाणाऱ्या नागरिकांना अडविण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेली कुत्र्यांची संख्या पाहता आता कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

- दत्ता जोरकर, घेरा सिंहगड समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटकर, गोखले यांना जीवनसाधना पुरस्कार

$
0
0

पुणे : ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले, 'युक्रांद'चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. उत्तम भोईटे यांना 'भारती विद्यापीठ विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

भारती विद्यापीठाच्या येत्या रविवारी (२६ एप्रिल) होणाऱ्या २० व्या स्थापना दिन समारंभामध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. विद्यापीठाचे सहकार्यवाह व्ही. बी. म्हेत्रे आणि कुलसचिव जी. जयकुमार यांच्यासह विद्यापीठाचे इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचा स्थापना दिन समारंभ होणार आहे. विद्यापीठाच्या पुणे-सातारा रोडवरील संकुलामध्ये रविवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात विद्यापीठाच्या गेल्या वीस वर्षांमधील कामगिरीचा आढावा घेण्यात येईल. तसेच, विद्यापीठाच्या गुणवंत कर्मचाऱ्यांचाही या वेळी गौरव करण्यात येणार असल्याचे डॉ. कदम यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर कोयत्याने वार

$
0
0

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तेजस पडवळ (वय १९, रा. पर्वती) या तरुणाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक हारे (रा.नाना पेठ) याच्यासह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला कॅम्पला जायचंय!

$
0
0

चिन्मय पाटणकर, पुणे

परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यामुळे विविध प्रकारच्या कार्यशाळा-शिबिरांचा मोसम सुरू झाला आहे. नाट्य, फिल्म मेकिंग, इंग्लिश स्पीकिंग, हस्तकला, शाहिरी, नृत्य, संगीत, ट्रेकिंग, विविध प्रकारचे खेळ आदी कार्यशाळा-शिबिरांची लगबग सुरू झाली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाणे ठरलेले असते. तसेच, वर्षभर हात न लावता आलेले पत्ते, कॅरम, व्यापार, प्ले स्टेशन सुट्टीत बाहेर काढली जातात; मात्र खेळण्याबरोबरच मुलांनी काहीतरी कला, कौशल्य आत्मसात करण्यासाठी पालक मुलांना कार्यशाळांना पाठवतात. सुट्टीच्या काळात मुलांना वेळ देणे पालकांना शक्य होतेच असे नाही. त्यामुळे मुलांनी घरी बसून वेळ घालवण्यापेक्षा त्यांना कुठेतरी गुंतवण्याचाही पालकांचा हेतू असतो. या कार्यशाळांना प्रवेशशुल्क असूनही, दर वर्षी विविध प्रकारच्या कार्यशाळांना प्रतिसाद वाढतो आहे. आठवडाभरापासून महिन्याभराच्या कार्यशाळा-शिबिरांचा त्यात समावेश असतो. या कार्यशाळांबाबत वृत्तपत्रे, सोशल मीडिया, सोसायट्यांच्या परिसरात फलक लावून जाहिरात केली जात आहे.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या माध्यमातून गेली १९ वर्षे शाहीर हेमंत मावळे शाहिरी कार्यशाळा घेतात. या कार्यशाळेला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी ते म्हणाले, 'शाहिरीसारख्या वेगळ्या लोककलांना आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शाहिरीमध्ये एकपात्री, संगीत, अभिनय यांचा मिलाफ होतो. त्यातून व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो. उन्हाळी सुटीच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळाही मुलांसाठी शाहिरीची कार्यशाळा आयोजित करतात.'

'उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना गुंतवण्यासाठी मुलांना कार्यशाळा-शिबिरांना पाठवले जाते. नाट्य कार्यशाळा सर्वाधिक लोकप्रिय आहेत. मुक्त वातावरण, त्याचा उपयोग त्यांना आयुष्यात होतो. मुलांनी स्वतःला शोधावे. या कार्यशाळेतून मुलांनी काहीतरी घडण्यापेक्षा मुलांचा कल काय आहे, हे पालकांना समजून घेता येतो. जाहिरातींना भुलून पालकांनी मुलांना कार्यशाळा-शिबिरांना पाठवू नये,' असे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी सांगितले.

पाल्याला शिबिरात घालण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

आपल्या पाल्याला कशात रस आहे?

शिबिराची जागा, मुलांची संख्या, वेळ काय?

जास्त मुले असल्यास वैयक्तिक लक्ष दिले जाते का?

मार्गदर्शक कोण? मार्गदर्शकाची पार्श्वभूमी काय?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावांचा आराखडा १५ मेपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने सुरू केलेल्या खासदार दत्तक गाव योजनेमध्ये निवडण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील आठ गावांचा विकास आराखडा १५ मेपर्यंत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, ग्रामस्थांच्या मागणीनुसार आवश्यक विकासकामांचा त्यामध्ये समावेश केला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांच्या विकासासाठी संबंधित खासदाराच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका स्तरावरील अधिकारी, संबंधित गावातील सरपंच आणि ग्रामस्थांचा सहभाग आहे. या गावांच्या विकासासाठी कोणती कामे, योजना राबवणे गरजेचे आहे. स्थानिकांची मागणी काय आहे, या गोष्टींचा विचार करून आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी ग्रामसभा, महिलांच्या सभा, बालसभा घेऊन सर्वांची मते विचारात घेतली जात आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी व या योजनेचे पुण्याचे समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

गावांचा आराखडा तयार करण्यासाठी गावातील समन्वयक अधिकाऱ्यांचे गुजरातच्या गांधीनगर येथील आपत्ती व्यवस्थापन संस्थेमध्ये नुकतेच तीन दिवसांचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यातील आणि दीव दमण, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून प्रतिनिधी उपस्थित होते, असेही जगताप यांनी सांगितले.

माजिद मेनन ठिकेकरवाडी, ता. जुन्नर

अॅड. वंदना चव्हाण सुदुंबरे, ता. मावळ

अनिल शिरोळे वडगाव शिंदे, ता. हवेली

शिवाजीराव आढळराव-पाटील करंदी, ता. शिरूर

सुप्रिया सुळे दापोडी, ता. दौंड

अशोक गांगुली गुळुंचे, ता. पुरंदर

डी. पी. त्रिपाठी मुर्टी, ता. बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएड’ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबवण्यात येणारी बी. एड. अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी संचालनालयाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, राज्य सरकारची परवानगी मिळताच, त्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्याचे नवनियुक्त उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी नुकतीच पत्रकारांना ही माहिती दिली.

यंदापासून राज्यात सर्वत्र दोन वर्षांचा 'बीएड'चा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश संचालनालयाने यापूर्वीच विद्यापीठांना दिलेले आहेत. 'बीएड'च्या प्रवेशांसाठीच्या काही तांत्रिक मुद्द्यांबाबत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडून (एनसीटीई) अधिक सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. ही माहिती आणि प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीची सरकारी मान्यता मिळताच ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे माने यांनी नमूद केले.

राज्यातील विद्यापीठांना राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) विविध योजनांचे फायदे मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियाही आता पूर्ण होत आहेत. त्यातूनच राज्य उच्च शिक्षण परिषदही लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पातळीवर विचाराधीन आहे. तो झाला, की राज्यातील विद्यापीठांना 'रुसा'चे फायदे मिळण्याचा मार्गही मोकळा होणार असल्याचे माने यांनी सांगितले. डॉ. अरुण निगवेकर यांच्या समितीने सादर केलेल्या नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्याचे कायद्यामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. येत्या तीन आठवड्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचेही डॉ. माने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिमोफिलियावर मोफत उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हिमोफिलिया या रक्ताच्या दुर्धर अशा आजारावर उपचार करण्याचे केंद्र ससून हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. या सुविधेमुळे हिमोफिलियाच्या पेशंटना मोफत सुविधा मिळणार आहे.

हिमोफिलियाच्या पेशंटना सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्याबाबतचा राज्य सरकारकडे महाराष्ट्र हिमोफिलिया सोसायटीमार्फत प्रस्ताव देण्यात आला होता. त्या प्रस्तावानंतर राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली. त्यानंतरही ससूनमध्ये मोफत उपचार सुरू झाले नव्हते. परिणामी, पेशंटची गैरसोय होत होती. अखेर हिमोफिलियाच्या पेशंटना उपचार देण्यासाठी ससून हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या उपचार केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे ही सुविधा हिमोफिलियाच्या पेशंटना उपलब्ध होऊ लागली आहे. ससून हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हे उपचार केंद्र सुरू करण्यात आले.

हिमोफिलिया हा आजार आनुवंशिक असल्याने एका पिढीतून दुसऱ्या पिढीत त्याचा प्रसार होतो. या आजाराच्या पेशंटच्या रक्तात गुठळी होण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी घटक क्रमांक आठ व नऊ यांची कमतरता असते. त्यामुळे रक्तस्राव सुरू झाल्यानंतर तो लवकर बंद होत नाही. रक्तस्राव बंद करण्यासाठी बाहेरून घटकांचा पुरवठा करावा लागतो. हे घटक बाहेरून न मिळाल्यास रक्तस्राव पेशंटच्या जिवावर बेतण्याची भीती असते. उपचार केंद्रात हिमोफिलियाच्या पेशंटना आवश्यकतेनुसार आठ किंवा नऊ क्रमांकांचे घटक बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) देण्यात येतील.

उपचार केंद्रासाठी वास्तुशोध प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कुलकर्णी यांनी ससून हॉस्पिटलला एक लाख रुपयांची देणगी दिली. उद‍्घाटनावेळी हिमोफिलिया सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. सुनील लोहाडे, अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी, डॉ. डी. बी. कदम, डॉ. गिरीश बारटक्के, डॉ. आर. टी. बोरसे, डॉ. आरती किणीकर आदी उपस्थित होते. डॉ. कल्पना कुलकर्णी या उपचार केंद्राच्या समन्वयक म्हणून जबाबदारी पाहत आहेत.

हिमोफिलिया पेशंटच्या रक्तात गुठळी होण्यासाठी आवश्यक घटक क्रमांक आठ व नऊ यांची कमतरता असते. हे घटक ससूनच्या उपचार केंद्रात मोफत दिले जाणार आहेत.

- डॉ. डी. जी. कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक, ससून हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात पडताळणीचा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यात जिल्हावार जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करून दीड महिना उलटला; तसेच १५ दिवसांत या समित्यांचे कामकाज सुरू होईल,' अशी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधिमंडळात केली होती; त्याला २६ दिवस झाले, तरीही महसूल विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे सध्या तरी या समित्या कार्यान्वित होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

आघाडी सरकारच्या काळात जून २०१४ मध्येही जिल्हावार समित्या स्थापन करण्याचा आदेश काढण्यात आला होता. या समित्यांचे अध्यक्षपद महसूल विभागाकडे सोपविण्यात आले होते. मात्र, सामाजिक न्याय विभागाला या समित्यांचे अध्यक्षपद हवे होते, त्यामुळे सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांनी असहकाराची घोषणा करून या गोष्टीला कडाडून विरोध केला. त्यानंतर तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. आताच्या राज्य सरकारने विभागीय जात प्रमाणपत्र समित्या बरखास्त करून जिल्हावार समित्या स्थापन करण्याचा निर्णय दोन मार्चला घेतला. त्या आदेशात या समित्यांच्या अध्यक्षपदी सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांचीही वर्णी लावण्याचा निर्णय झाला. मात्र, त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी असहकाराचे अस्र बाहेर काढून जात दाखले देण्याचे काम बंद केले. त्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी महसूल विभागाकडेच असेल, असे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू केले.

सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागातील अधिकाऱ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्षपद मिळालेच पाहिजे. त्यासाठी जिल्हावार समित्यांच्या अध्यक्षांची निम्मी पदे राखीव ठेवावीत, अशी मागणी विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेच्या नुकत्याच पुण्यात झालेल्या अधिवेशनात करण्यात आली. अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्याशिवाय आणि या समित्यांच्या कामकाजासाठी स्वतंत्र पदनिर्मिती झाल्याशिवाय या समित्यांचा चार्ज स्वीकारणार नसल्याची भूमिका सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

जिल्हावार जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांबाबत सामाजिक न्याय विभाग व महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या समित्या कार्यान्वित होईपर्यंत विभागीय समित्या बरखास्त केल्या जाणार नाहीत. तोपर्यंत त्यांचे काम सुरू राहील.

- दिलीप कांबळे, राज्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपोडीत जमावाची दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

बोपोडीतील हॅरिस पुलाजवळील गांधीनगर परिसरामध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यास गेलेल्या पुणे महानगरपालिकेच्या पथकावर २० ते २५ जणांच्या जमावाने दगडफेक केली. यामध्ये कोणीही जखमी झाले नसले, तरी पालिकेच्या गाड्यांचे नुकसान झाले. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी बोपोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बोपोडीतील गांधीनगर परिसरामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू होती. एका वसाहतीमध्ये दोन महिन्यांपूर्वीसुद्धा अशीच कारवाई करून तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले होते.

शिल्लक राहिलेल्या सहा घरांवर दुसऱ्या टप्प्यात कारवाई करण्यात येणार होती. त्यानुसार सोमवारी सकाळी अकरा वाजता अतिक्रमणविरोधी पथक तेथे पोहोचले. यामध्ये दोन गाड्या आणि कर्मचारी सहभागी झाले होते. सोमवारी १० हजार १७५ चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. सलग चौथ्या दिवशी ही कारवाई झाली. सुरुवातीला कारवाई होणार असेलल्यांनी स्वतः बांधकामे पाडण्यास सुरवात केली होती; मात्र दुपारी बाराच्या सुमारास अचानक काही तरुणांनी वाद घालण्यास सुरुवात केली. आम्हाला नोटिसा मिळाल्या नाहीत, असे सांगून काही स्थानिक नागरिकांनी कारवाईला विरोध केला. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांमध्ये वाद सुरू असतानाच २० ते २५ जणांच्या जमावाने अतिक्रमण पथकाच्या वाहनावर अचानक दगडफेक सुरू केली. यामध्ये वाहनाच्या काचा फुटल्या आणि वाहनाचे नुकसान झाले. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई थांबवून खडकी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वेक्षण अद्याप नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरातील अधिकृत होऊ शकणाऱ्या बांधकामांबाबत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते; मात्र याबाबत अद्याप कोणताच आदेश प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे; पण सर्वेक्षणाबाबत अजून कोणतीच कार्यवाही महापालिकेने हाती घेतली नसल्याचे दिसून येत आहे.

शहराचे राजकारण ढवळून काढणाऱ्या अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर नुकत्याच झालेल्या अधिवेशनात कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणे आणि कारवाई रोखणे याबाबत चांगलाच गदारोळ झाला. महापालिकेने याबाबत सादर केलेले प्रतिज्ञापत्र कोर्टाने फेटाळून लावले. अधिकृत होऊ शकतील अशा किमान ७० टक्के बांधकामांचे सर्वेक्षण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. दुसरीकडे कोर्टाच्या आदेशामुळे एक एप्रिलपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार सध्या कारवाई सुरू आहे.

अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असतानाच काही तांत्रिक मुद्द्यांमुळे हा प्रश्न पुन्हा अडकला; पण उतावळ्या स्थानिक नेत्यांनी फ्लेक्सबाजी केली. 'आम्ही दिलेला शब्द पाळला', 'दिलेल्या शब्दाला जागलो' असे फ्लेक्स लावून टिमकी वाजवली. त्यानंतर कारवाई होणार असल्याने अखेर हे फ्लेक्स उतरवले गेले.

शहरातील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर आतापर्यंत दोन निवडणुका झाल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकांपर्यंत तरी राज्यकर्ते हा विषय मार्गी लावतील की नाही, अशी धास्ती नागरिकंच्या मनात कायम आहे. शासनाकडून अधिकृत होऊ शकतील अशा कोणत्याही आरक्षणावर उभारलेली नसलेल्या घरांचे वेळीच सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. त्याच बरोबर हायकोर्टाच्या आदेशामुळे कारवाई सुरूच राहणार आहे. कारवाई करत असताना आरक्षित जागांवरील बांधकामे, फ्लडलाइनवरील बांधकामे प्रथम पाडणे किंवा राहत्या वाढीव घरांवर प्रथम कारवाई असा कोणताही निकष ठेवण्यात आलेला नाही. कारवाई

सरसकट होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या सर्व बाबींचा विचार करता शासनाकडून प्रशासनाला सर्वेक्षण होण्यासाठी आदेश लवकर कसे मिळतील हे पाहणे स्थानिक नेत्यांचे काम आहे. खासदार आणि आमदारांनी वेळीच मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून हा आदेश काढला, तर किमान राहत्या घरांवर तरी हातोडा पडणार नाही.

हायकोर्टाच्या आदेशावरून यापुढील काळातदेखील कारवाई सुरूच राहणार आहे. अद्याप तरी सर्वेक्षणाबाबत कोणताच आदेश अथवा सूचना आलेल्या नाहीत.

- एम. टी. कांबळे, शहर अभियंता, पिं. चिं. पालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विऱ्हाम गावामध्ये बेकायदा वृक्षतोड

$
0
0

अतुल काळे, राजगुरुनगर

भीमाशंकर अभयारण्याच्या दक्षिण टोकाला विऱ्हाम (ता. खेड ) गावाच्या हद्दीतील तांबडेवाडी येथे एका खासगी जमिनीत सुरू असलेली बेकायदा वृक्षतोड महसूल विभागाने कारवाई करून बंद केली. रस्ता करण्यासाठी वृक्षतोड सुरू होती.

संबंधित जमिनीत असलेल्या मठापासून घाट माथ्याकडे जाण्यासाठी झाडी तोडून मधल्या खिंडीतून हा रस्ता तयार केला जात आहे. यापूर्वी घाटमाथ्यावर जंगल साफ करून बारा खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. बांधकाम वाढविण्यासाठी आणखी पाच मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. या ठिकाणी गेल्या पाच सहा वर्षांपासून विनापरवाना झाडे तोडून जमिनीचे सपाटीकरण केले जात आहे. त्यामध्ये विविध बांधकामे करण्यात आली आहेत. परंतु, हा सर्व प्रकार माहिती असूनही वनविभागाचे कर्मचारी याकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहेत. परिणामी निसर्गसंपदेची अपरंपार हानी होते आहे.

पूर्व बाजूच्या उतारावर विनापरवाना मठ आणि काही इमारतींची बांधकामे करण्यात आलेली आहेत. आदिवासी लोकांच्या जमिनीवर अतिक्रमण करून दहशतीच्या जोरावर ही बांधकामे करण्यात आलेली आहेत, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. या वाडीतील आदिवासी लोकांना त्यांच्या जमिनीकडे जाण्यास व परिसरात गुरे चारण्यास संबंधित मठातील बाबा आणि त्याच्या सुरक्षारक्षकांकडून मज्जाव केला जात असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. 'रामखंड' या नावाने ओळखला जाणारा घाटावरील हा भाग अभयारण्याच्या सीमेपर्यंत घनदाट वृक्षराजीने व्यापलेला आहे. हा सर्व भाग अभयारण्यापासून हाकेच्या अंतरावर असून, 'इको सेन्सिटिव्ह झोन'मध्ये आहे. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालामध्ये देखील विऱ्हाम गावाचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी शेकरूसह अनेक वन्यजीवांचे आश्रयस्थान आहे. ज्या जागेत रस्ता व इतर बांधकामांची कामे सुरू आहेत, ती जागा पुण्यातील एका बड्या व्यावसायिकाची आहे. ही संपूर्ण जागा एक हजार एकरपेक्षा अधिक असून, घाटमाथा व माथ्याच्या दोन्ही बाजूंना आहे. संबंधित व्यावसायिकाकडून या जमिनीत कोकण कड्यावर बारा ज्योतिर्लिंगांच्या हुबेहूब प्रतिकृती उभारण्याचा प्रकल्प साकरला जात आहे. तीन वर्षांपूर्वी महाशिवरात्रीला या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. हा भाग 'इको सेन्सिटिव्ह झोन'मध्ये असल्यामुळे बांधकाम व रस्ते करण्यास परवानगी मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन संबंधित लोकांकडून बेकायदा काम सुरू आहे. या प्रस्तावित मंदिराच्या अलीकडे तीन वर्षांपूर्वी एक मठ बांधण्यात आला आहे. मठाची ही जागा बिगरशेती करण्यात आलेली नाही. या मठापर्यंत जाण्यासाठी जे दोन रस्ते तयार करण्यात आले, त्यासाठी विनापरवाना झाडी तोडण्यात आली.

घाटमाथ्यावर जाण्यासाठी हक्काचा रस्ता नाही. त्यामुळे वांद्रे गावाच्या हद्दीतील कोकण कड्यावर असलेल्या वांगणीचे पाणी येथून संबंधित बांधकामस्थळी जाण्यासाठी राखीव जंगलाचा वापर करण्यात आला. राखीव जंगलातून अवजड गाड्यांमधून बांधकामाचे नेण्यात आले. परंतु चाकण वनविभागाने याबद्दल जराही आक्षेप घेतला नाही. वनकायदा व वन्यजीव संरक्षण कायदा पायदळी तुडवून हा प्रकल्प होत असून, त्यामुळे वन्यजीवांच्या संचारावर मर्यादा येत आहेत.

आदिवासींना वाली कोण?

या भागामध्ये आदिवासी लोकांच्या मालकीची जमीन मोठ्या प्रमाणात आहे. मुळातच डोंगररांगा व घनदाट वृक्षराजीमुळे आपली जमीन नेमकी कुठे आहे, हेच या आदिवासी लोकांना माहिती नाही. असे असताना संबंधित व्यावसायिकाकडून सर्रास बांधकामे करण्यात आलेली आहेत. आमच्या हिश्श्याची जमीन मिळावी, अशी या लोकांची मागणी आहे. मात्र, या मागणीकडे कुणीही लक्ष दिलेले नाही.

महसूल विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता या ठिकाणी उत्खनन करून रस्ता आणि इमारतींची कामे केली जात असून हा सर्व भाग 'इको सेन्सिटिव्ह झोन'मध्ये मोडतो. झालेल्या सर्व अवैध कामांची मी घटनास्थळी समक्ष जाऊन पाहणी करणार आहे.

- प्रशांत आवटे, तहसीलदार, खेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकांचा शिक्षण संचालकांना घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश मिळण्यात येणाऱ्या अडचणींनी वैतागलेल्या पालकांनी अखेर सोमवारी राज्याच्या शिक्षण संचालक कार्यालयावरच मोर्चा काढला. प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून आपल्या तक्रारींचा पाढा वाचणाऱ्या पालकांनी बालकांचे प्रवेश व्हायलाच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका घेतली.

'आरटीई'मधील २५ टक्क्यांच्या आरक्षित जागांवरील प्रवेशांसाठी शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नुकतीच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून प्रवेश निश्चित झालेले पालक आता संबंधित शाळांमध्ये प्रवेश अंतिम करण्यासाठी जात आहेत. फी परताव्याच्या मुद्द्यावरून शहरातील शाळा पूर्वप्राथमिक वर्गांमध्ये निश्चित झालेले प्रवेश देण्यात टाळाटाळ करीत आहेत.

शाळांना धाकात ठेवण्यात अधिकारी कमी पडत असल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचेही रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या विवेक बनसोडे यांनी माने यांच्या निदर्शनास आणून दिले. येत्या शुक्रवारपर्यंत या प्रवेशांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली.

दरम्यान, पहिलीसाठीच्या आरक्षित जागांवरील प्रवेश नाकारणाऱ्या शहरातील शाळांना भेटी देऊन, त्यांना नोटिसा बजावण्याचे सत्र पालिकेच्या शिक्षण मंडळाने सोमवारी केले. विखे पाटील स्कूल, गोखलेनगर, न्यू इंडिया स्कूल, भुसारी कॉलनी, सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, वारजे माळवाडी, युनिक इंग्लिश मीडियम स्कूल, गोकुळनगर, हुजुरपागा इंग्लिश मीडियम स्कूल, लक्ष्मी रोड या शाळांना मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी भेटी दिल्या. आरटीईचे प्रवेश येत्या २३ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश या शाळांना देण्यात आले आहेत. पहिलीसाठीचे आरक्षित जागांवरील प्रवेश नाकारल्यास मान्यता काढून घेण्याचा इशाराही देण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्त उतरले रस्त्यावर

$
0
0

पुणेः सोनसाखळी चोरी व रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्यासाठी नवनियुक्त पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी शहरात नागपुर पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री आठ ते अकरा या वेळेत शहरात अचानक नाकाबंदी करण्यात आली. पाठक यांनी स्वत: नाकाबंदीच्या ठिकाणांना भेटी देत स्पॉटवर हजर नसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

पुणे शहराच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर 'शहरात सर्वत्र पोलिसांचे अस्तित्व जाणवेल', असा विश्वास त्यांनी पुणेकरांना दिला होता. आयुक्तांनी त्याच धर्तीवर रात्रीच्या सुमारास शहरात स्वत: पेट्रोलिंग करत पोलिसांना रस्त्यावर उतरविले. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढले आहेत. नागपूर येथे पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी संभाळत‌ाना पाठक यांनी वेगळा प्रयोग केला होता. असाच प्रयोग सोमवारी आयुक्तांनी शहरातील विविध भागांत केला. आठ वाजल्यापासूनच शहरातील रस्त्यावर फिरून पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीला पाठक यांनी भेट दिली. शहरातील वर्दळीचा भाग अशी ओळख असलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर लावण्यात आलेल्या नाकाबंदीला पाठक यांनी सव्वादहाच्या सुमारास भेट दिली. आपल्या गाडीतून खाली उतरून पाठक यांनी पोलिसिंग केले. नाकाबंदीच्या ठिकाणी हजर असलेल्या अधिकाऱ्यांची 'शाळा' घेत आयुक्तांनी स्पॉटवरील अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर, उडीदडाळीत वर्षात ३५ टक्क्यांची दर वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अवकाळी पावसाचा फटका बसल्याने तूरडाळ, उडीद, मसूरडाळीच्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्याबरोबरच आंतराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारातून डाळींना वाढत्या मागणीमुळे गेल्या वर्षीच्या एप्रिलपासून ते आतापर्यंत एका वर्षात तूर, उडीदडाळीत क्विंटलमागे तीन ते साडेतीन हजार रुपयांची दर वाढ झाली. म्हणजे, किलोमागे प्रत्येकी ३० ते ३५ रुपयांची वाढ होऊन दराने शंभरी गाठल्याने सामान्यांचे बजेट कोसळले.

हरभरा, मूग, मटकीच्या डाळीची देखील तशीच परिस्थिती असून त्यांच्या दरात उडीद डाळीच्या तुलनेत कमी दरवाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात सामान्यांच्या घरात वापरल्या जाणाऱ्या डाळींचे दर गगनाला चांगलेच भिडल्याने डाळी खरेदी करणे सामान्यांना परवडणे अशक्य होऊ लागल्याची प्रतिक्रिया ग्राहकवर्गातून व्यक्त होऊ लागली. यासंदर्भात डाळींच्या दराचा आढावा घेतला असता व्यापाऱ्यांनी डाळीच्या दरवाढीची कारणे स्पष्ट केली.

'मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला. उडीद, मसूर, तूरडाळीसह अन्य डाळींच्या पिकांना पावसाचा फटका बसला. काही प्रमाणात पिके खराब झाली. डिसेंबरमध्ये डाळींचा हंगाम सुरू होतो. तूरडाळीचे डिसेंबरमध्ये ६ ते ७ हजारांवरून २० एप्रिलपर्यंत ९५०० रुपयांपर्यंत क्विंटलमागे दर वाढले. तूरडाळीचे एक वर्षात तीन हजार रुपयांनी क्विंटलमागे वाढ झाली. किलोमागे थेट ३० रुपयांनी दर वाढ झाल्याने ग्राहकांना तूरडाळीच्या दरात भुर्दंड सहन करावा लागला. उडीद डाळीचे देखील वर्षापूर्वी ६,६०० रुपये दर होते; तर क्विंटलमागे उडिदाचे दर सोमवारी दहा हजार रुपये झाले आहेत. म्हणजेच साडेतीन हजार रुपयांची घसघशीत वाढ झाली,' अशी माहिती डाळींचे व्यापारी विजय राठोड यांनी 'मटा'ला दिली.

मार्च महिन्यात मसूरडाळीचे क्विंटलमागे ६,२०० रुपये दर होता. एका वर्षात ९०० रुपयांनी दर वाढ झाली. हरभरा डाळीचे देखील एका वर्षात दीड हजार रुपयांनी दरवाढ झाली. मूग तसेच मटकीडाळीच्या दरात १२०० ते १५०० रुपयांची वाढ झाली. मटकीच्या डाळीस उन्हाळ्यात फारशी मागणी नसते. हरभरा, तूर, मूग, उडीदडाळ यांची परदेशातून भारतात आयात होते; तर हरभरा ऑस्ट्रोलियातून येतो. भारतात मध्य प्रदेश हे त्याचे प्रमुख केंद्र मानले जाते. तूरडाळीची कॅनडा, बेल्जियम, टान्झानिया येथून आवक होते. या ठिकाणीच तूरडाळीचे कमी उत्पादन झाले. तेथेही पावसाचा फटका बसला. उडीदडाळीची म्यानमार देशातून आयात होते. मूगडाळीची चीन, केनिया आणि तांजेनिया या देशातून; तर केनिया, अमेरिकेतून मसूरडाळ आयात केली जाते. या देशांमध्ये आयातीला डाळींना मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डाळींचे दर वाढले. त्याचा परिणाम भारतातील स्थानिक बाजारपेठेवर झाला. यामुळे वर्षभरात डाळींच्या भावात मोठी दरवाढ झाल्याचे निरीक्षण राठोड यांनी नोंदविले.

मराठवाडा, विदर्भात तूर, उडदासह अन्य डाळींचे उत्पादन घेतले जाते; गेल्या वर्षी उशिरा पाऊस झाल्याने ४० ते ५० टक्के उत्पादन घटलेे. डिसेंबरनंतर दर वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारावरही मध्यंतरी झालेल्या पावसाचा परिणाम झाल्याने डाळींच्या दरवाढीला मदत झाली.

- नितीन नहार, डाळींचे व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आता हेलिकॉप्टरने फ‌िरायचे का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील विविध भागांत वर्षानुवर्षे रखडलेली उड्डाणपुलांची कामे, कोट्यवधी रुपये खर्च करून धूळ खात पडलेले भुयारीमार्ग आणि यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास, या सर्व गोष्टींचा निषेध करत प्रशासनाचा ‌धिक्कार करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी आंदोलन केले. पक्षाचे गटनेने बाबू वागस्कर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे आंदोलन करण्यात आले. मनसेबरोबरच सर्वपक्षीय सभासदांनी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाबद्दल भूमिका मांडल्याने सभासदांच्या भावना लक्षात घेऊन पुढील महिन्याच्या सर्वसाधारण सभेत शहरातील उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी‌ दिले.

पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच. उड्डाणपुलांची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर आणि चुकीच्या पद्धतीने पुलांचे नियोजन करणाऱ्या प्रकल्प सल्लागारांवर कारवाई करावी, अशी मागणी करत मनसेच्या सभासदांनी सभागृहात आंदोलन केले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या धिक्काराच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. शहरातील अनेक भागातील उड्डाणपुलांची कामे गेली अनेक वर्षे सुरूच आहेत. दिलेल्या मुदतीत काम न केल्यास ठेकेदारावर दंड करण्याची तरतूद आहे. मात्र, पालिकेतील अधिकारी ठेकेदाराचे हित जोपासण्यासाठी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेचे सभासद किशोर शिंदे यांनी केला. पूल बांधताना चुकीचा सल्ला देणाऱ्या सल्लागारांवर तातडीने कारवाई करावी, शहरातील सर्व उड्डाणपुलांची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली.

शहरातील वाहतुकीची कोंडी सुटावी, यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये उड्डाणपूल उभारण्यासाठी देते. ठरावीक वेळेत हे पूल पूर्ण करावे, याचे बंधन ठेकेदारावर घातलेले असते. मात्र, याकडे दुर्लक्ष करत कर्वेनगर, धनकवडी येथील उड्डाणपुलांची कामे सुरूच असल्याचे दिलीप बराटे यांनी सांगितले. सत्ताधारी पक्ष म्हणून काम करताना प्रशासनावर दबाब असणे गरजेचे असते. मात्र, असा दबाव सत्ताधारी पक्षाचा नसल्याने ठेकेदार आणि प्रकल्प सल्लागार मनमानी करत असल्याचा आरोप अविनाश बागवे यांनी केला. सभागृहातील सभासदांच्या भावना लक्षात घेऊन पुढील महिन्याच्या सर्वसाधारण सभेत याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर धनकवडे यांनी प्रशासनाला दिले.

'वर्षानुवर्षे रखडले पूल'

सत्ताधारी पक्षाच्या नाकर्तेपणामुळे शहरातील उड्डाणपुलांची कामे वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. यामुळे अनेक भागात वाहत‌ुकीची कोंडी निर्माण होऊन त्याचा त्रास सर्वसामान्य पुणेकरांना होतो. त्यामुळे पुणेकरांवर आता हेलिकॉप्टरने जाण्याची वेळ आली असल्याचे प्रशासनाला दाखवून देण्यासाठी मनसेने सभागृहात खेळण्यातील हेलिकॉप्टर उडवून प्रतिकात्मक आंदोलन केले. सत्ताधाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे हे घडत असल्याचा आरोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाउनश‌िपच्या मंजुरीचे ‘स्वामित्व’ कोणाकडे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील शंभर एकर क्षेत्रावरील विशेष महानगर वसाहतींच्या मंजुरीचे 'स्वामित्व' जिल्हाधिकारी प्रशासनाकडे राहणार, की पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) जाणार यावरून संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत. महानगर वसाहतीच्या मंजुरीच्या अधिकारांबाबत जिल्हाधिकारी प्रशासन व 'पीएमआरडीए' आग्रही असल्याचे समजते.

शंभर एकर व त्यावरील आकाराच्या भूखंडावर विशेष महानगर वसाहत (स्पेशल टाऊनशीप) मंजूर करण्यात येते. या टाउनशपीसाठी चटईक्षेत्रापासून बांधकामापर्यंत वेगळे नियम करण्यात आले आहेत. १६ नोव्हेंबर २००५ रोजी राज्य सरकारने अधिसूचना जारी करून टाउनश‌िप मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. गेल्या दहा वर्षांत मगरपट्टा सिटी, अॅमनोरा पार्क, नांदेड सिटी, ब्ल्यू रिज, रिव्हर व्ह्यू, आयवेन, भूगाव व कासारसाई या टाउनश‌िपला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. तसेच, आणखी काही टाउनश‌िप मान्यतेसाठी प्रस्तावित आहेत.

पुण्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच पीएमआरडीएची स्थापना केली आहे. या स्थापनेनंतर महापालिकांच्या हद्दीबाहेरील सुमारे तीन हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र 'पीएमआरडीए'मध्ये समाविष्ट करण्यात आले. या महानगर विकास क्षेत्रातील बांधकाम परवानगीचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार आता पीएमआरडीएकडे आले आहेत. या बांधकाम नकाशांच्या मंजुरीतून 'पीएमआरडीए'ला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. या क्षेत्रातील अॅमिनिटी स्पेस, सरकारी जमिनी, भाडेपट्ट्यावरील सरकारी इमारती आदी मालमत्ता पीएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. महानगर क्षेत्रामधील गायरान जमिनी व अन्य काही मालमत्ता पीएमआरडीए मिळण्यासंदर्भात सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येत आहे.

या प्रस्तावामध्ये टाउनश‌िपची मान्यता हा कळीचा मुद्दा ठरत आहे. राज्य सरकारने अधिसूचना काढून हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांकडून बांधकाम आराखडे मंजूर झाल्यावर जिल्हाधिकऱ्यांकडून त्यास अंतिम मंजुरी देण्यात येत होती. आता पालिकेबाहेरील क्षेत्रात पीएमआरडीए हे नियोजन प्राधिकरण असेल तर टाउनश‌िप मंजुरीचे अधिकार त्यांच्याकडे जातील; पण महापालिका क्षेत्रातील टाउनशपीचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय लोकेशन क्लिअरन्स, पर्यावरणीय मंजुरी आदी विषयांबाबत कोण निर्णय घेणार हा मुद्दाही उपस्थित झाला आहे.

निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

टाउनश‌िप मंजुरीचे स्वामित्व हे जिल्हाधिकारी व पीएमआरडीए या दोहोंना हवे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात हा विषय आता जाणार असल्याची चर्चा असून ते टाउनश‌िपचे पालकत्व कोणाला देतात याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images