Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘डायनिंग कार’ची घरवापसी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या जिव्ह्याळ्याचा विषय बनलेल्या 'डेक्कन क्वीन'मधील 'डायनिंग कार' सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. दुरूस्तीच्या नावाखाली डिसेंबर महिन्यात 'डायनिंग कार' काढून घेऊन या सेवेला कायमची तिलांजली देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रवाशांच्या आग्रहास्तव रेल्वे प्रशासनाने निर्णय मागे घेतला आहे.

पुणे - मुंबई या मार्गावर डेक्कन क्वीनची सेवा एक जून १९३० पासून सुरू झाली. तेव्हापासून या गाडीत डायनिंग कारची सेवा होती. इतक्या वर्षांच्या सेवेनंतर दुरूस्तीसाठी म्हणून डिसेंबर २०१४मध्ये प्रशासनाने डायनिंग कार सेवेतून बाद केली. मात्र, पाच महिने उलटल्यानंतरही डायनिंग कार सेवेत दाखल करण्यात आली नाही. माहितीच्या अधिकारात माहिती मागविल्यानंतर डायनिंग कार भंगारात काढल्याचे समोर आले. आणि त्यानंतर ती कायमस्वरूपी बंद केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रेल्वे प्रवासी संघटनांनी त्याविरोधात आवाज उठवला. परिणामी, रेल्वे प्रशासनाने डायनिंग कार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या एसी डब्याचे नूतनीकरण करून त्याचे रूपांतर डायनिंग कारमध्ये केले जाणार असून, त्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या एक जूनला डेक्कन क्वीनच्या ८६ व्या वर्धापनदिनी डायनिंग कार सेवेत आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.

देशात कमी पल्ल्याच्या गाड्यांमध्ये डायनिंग कार सुविधा दिली जात नाही. मात्र, डेक्कन क्वीन त्याला अपवाद ठरली आहे. या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डायनिंग कार अविभाज्य भाग बनली आहे.
.......

ही सेवा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांचा विजय झाला आहे. डायनिंग कारमुळे डेक्कन क्वीनमधील वातावरण पुन्हा उत्साहवर्धक होईल.
हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी बसचालक व्याधीग्रस्त

$
0
0

'जेटी ओबेसिटी सोल्यूशन्स'च्या सर्वेक्षणातील वास्तव

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पीएमपी बसचालक हृदयरोग, डायबेटिस, उच्च रक्तदाब, रक्तदाब अशा व्याधींनी ग्रासल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेटी ओबेसिटी सोल्यूशन्सच्या संचालिका डॉ. जयश्री तोडकर यांनी ही माहिती दिली. संस्थेच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या चालकांपैकी अर्ध्याहून अधिक चालक तंबाखू, सिगरेट, मद्यपान, गुटख्याचे सेवन करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

'जेटी ओबेसिटी सोल्यूशन्स'ने 'पीएमपीएमएल'च्या सहकार्याने १० फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ३५ वर्षे आणि त्यापुढील १६७० बसचालकांना सहभागी करून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात बसचालकांचे हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, मेदाचे प्रमाण, रक्तदाब, इसीजी आदी चाचण्या करण्यात आल्या. त्यातून हे निष्कर्ष समोर आले. पीएमपीचे माजी संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

'बसचालक ताणापासून मुक्त होण्यासाठी व्यसनांच्या आहारी जातात. त्यात धूम्रपान व इतर व्यसनांनी हृदयरोग, कॅन्सर आणि पक्षाघाताची शक्यता बळावते. अनेक बसचालक त्यांना असलेल्या व्याधींविषयी अनभिज्ञ होते. तर, काहींना कल्पना होती. बसचालकांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे अत्यावश्यक आहे,' असे डॉ. तोडकर यांनी सांगितले.

२७ टक्के बसचालकांना डायबेटिस
२७ टक्के बसचालकांचे चयापचय अस्वाभाविक
४५ टक्के बसचालक स्थूल
३३ टक्के बसचालक निरोगी
१७ टक्के चालकांना बीएमआय धोक्याच्या पातळीवर

पुढील सहा महिने उपचार

व्याधीग्रस्त बसचालकांना त्यांच्या आरोग्याविषयी जागृत करण्यात येत आहे. तसेच त्यांची नियमित तपासणी केली जाणार आहे. कमला नेहरू हॉस्पिटल व यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल येथे पुढील सहा महिने त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.
...

बसचालकांवर असलेला ताण कमी करण्यासाठी त्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. 'कैवल्यधाम' या संस्थेच्या सहकार्याने हे मार्गदर्शन करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन हजार चालकांनी त्याचा लाभ घेतला आहे. नियमितपणे योग वर्ग चालवले जात आहेत.
दीपक परदेशी, जनसंपर्क अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँडबाजा नाही, फक्त वरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मंगल कार्यालये आणि लॉनबाहेर लग्नसमारंभांच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या डीजे-बँडवाल्यांच्या मिरवणुकांमुळे ध्वनिप्रदूषणाबरोबरच सामाजिक उपद्रव होत आहे, असे निरीक्षण नोंदवून पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने राज्यभरातील अशा वरातींवर बंदी घातली आहे. लग्नाच्या धार्मिक विधी आणि परंपरेमध्ये वरात काढणे किंवा मोठ्याने संगीत लावणे अशी कोणतेही प्रथा नाही, त्यामुळे या उपक्रमातून होणारा गोंगाट टाळण्यासाठी बंदी घालण्यात येत आहे, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले आहे.

पुण्यातील म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी रोडवरील लॉनमध्ये लग्नसमारंभानिमित्त सातत्याने मोठे ध्वनी आणि वायूप्रदूषण होत आहे, अशी तक्रार या परिसरातील सुजल सहकारी गृहनिर्माण संस्थेतील त्रस्त झालेल्या नागरिकांनी लवादाकडे दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोल्हापूर, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, सिंधुदुर्ग आणि नागपूरमधील वकिलांनीही महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मंगल कार्यालयातील मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण होत असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या याचिकेच्या प्राथमिक सुनावणीनंतर न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

केवळ पुण्यातच नव्हे; तर इतर शहरांमध्येही लग्नाच्या मिरवणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे. लग्नाचे धार्मिक विधी अथवा परंपरांचा यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सामाजिक उपद्रव आणि ध्वनिप्रदूषणाला जबाबदार ठरणाऱ्या या उपक्रम आयोजित करण्याची गरज नाही, असे सांगून न्यायाधिकरणाने मिरवणुकीच्या निमित्ताने होणारी वाहतुकीची कोंडी, गोंगाट आणि पैशांच्या उधळपट्टीला लगाम लावला आहे.

पुण्यातील डीपी रोडवर सिद्धी गार्डन, कृष्णसुंदर गार्डन, गुरुकुल लॉन्स, शुभारंभ लॉन्स याशिवाय लहान मोठी हॉटेल आहेत. या लॉनमध्ये वर्षभर लग्नसमारंभ, स्वागतसमारंभ; तसेच विविध कार्यक्रम होतात. या समारंभात वरातीसाठी बँड, डॉल्बी सिस्टीम वापरली जाते. मोठ्या प्रमाणावर फटाके वाजविण्यात येतात, एवढेच नव्हे तर तीव्र प्रकाशझोत आकाशात सोडले जातात, या उपक्रमांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ झाली होती. त्यामुळे वैतागलेल्या स्थानिक नागरिकांनी न्यायाधिकरणाकडे दाद मागितली, असे याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे यांनी सांगितले.

.....

'केवळ डीपी रोडच नव्हे तर शहरात ७९ मंगल कार्यालये आहेत. त्याठिकाणच्या नागरिकांना वर्षभर प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो आहे. न्यायाधिकरणाने दिलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व लॉन आणि मंगल कार्यालयांमधील 'आवाजा'ला कायदेशीर चाप बसणार आहे.'

- अॅड. असीम सरोदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृषीकेश मूळगावकर कालवश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल हृषीकेश मूळगावकर (९५) यांचे गुरुवारी रात्री १० वाजता निधन झाले. भारतीय हवाई दलामध्ये अतिशय परिणामकारक सुधारणा घडविण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. विमान सुरक्षेसाठी त्यांनी राबविलेली धोरणे अतिशय परिणामकारक ठरली होती.

मूळगावकरांचा जन्म मुंबईमध्ये १४ ऑगस्ट १९२० रोजी झाला. त्यांचे वडील निष्णात शल्यविशारद होते. मूळगावकरांचे शालेय शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूल आणि सेंट मेरीजमध्ये झाले. त्यांचे कॉलेजशिक्षण (१९३७-१९३९) इंग्लंडमध्ये मालव्हर्न कॉलेजमध्ये आणि नंतर मुंबईत सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये झाले. वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी रॉयल इंडियन एअर फोर्ससाठी अर्ज केला आणि त्यांची निवड होऊन ३० नोव्हेंबर १९४० रोजी ते पायलट ऑफिसर म्हणून रूजू झाले.

मूळगावकर हे अतिशय निष्णात वैमानिक म्हणून ओळखले जात. ते निवृत्त होईपर्यंत विमान उड्डाण करीत होते. टायगर मॉथ्स आणि हरिकेन; तसेच मिग-२२ आदी ६७ विविध प्रकारची विमाने त्यांनी चालवली होती. त्यांची १ फेब्रुवारी १९७६ रोजी हवाईदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. ३१ ऑगस्ट १९७८ रोजी ३८ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांचे वास्तव्य पुण्यात होते. नुकतेच त्यांना २९ मार्चला कमांड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांच्या मागे मुलगा डॉ. प्रकाश मूळगावकर आणि मुलगी ज्योती राय आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. यशवंत सुमंत यांचं निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

सुप्रसिद्ध विचारवंत, राजकीय विश्लेषक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांचे आज (शनिवार) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. सुमंत गेल्या चार महिन्यांपासून आजारी होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.

'डॉ. सुमंत यांना रुग्णालयात दाखल करत असतानाच त्यांच्या हृदयाचे कार्य बंद झाले होते. त्यानंतर तातडीने उपचार करून त्यांच्या हृदयाचे कार्य सुरू करण्यात आले. मात्र, अचानक मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण उपचारांना यश आलं नाही,' असं डॉ. समीर जोग यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हरामखोर’च्या निर्मात्याविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हरामखोर' या हिंदी सिनेमाच्या जाहिरातीसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बोधचिन्हाचा वापर केल्याप्रकरणी सिनेमाचे निर्माता अजय यादव, दिग्दर्शक श्लोक शर्मा, डिझायनर तारिणी डी. यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक, 'कॉपी राइट' कायद्याचा भंग तसेच 'आयटी अॅक्ट'खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'हरामखोर' या चित्रपटाच्या पोस्टरसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बोधचिन्हाचीच उचलेगिरी केल्याचे उघडकीस आल्यावर टीका झाली होती. बालभारतीचे विधी सल्लागार मोहन वीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

दिग्दर्शक श्लोक शर्मा यांनी 'हरामखोर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून, सध्या ट्रेलर दाखविले जात आहेत. प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात शिक्षकाची भूमिका बजावत आहे. अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे. बोधचिन्हावर असलेल्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी नवाजउद्दीनचे, तर विद्यार्थिनीच्या जागेवर श्वेताचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

'हरामखोर' सिनेमाच्या जाहिरातींमध्ये हे बोधचिन्ह झळकू लागल्यानंतर सहा एप्रिल रोजी 'बालभारती'मध्ये तक्रारींचे फोन खणखणू लागले. त्यानंतर 'बालभारती'ने कायदेशीर बाजू तपासल्यानंतर कारवाईची भूमिका घेण्याचे धोरण स्वीकारले. 'बालभारती'चे विधी सल्लागार वीर यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात सिनेमाच्या संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. चित्रपटासाठी बोधचिन्हाचा वापर करणाऱ्या डिझायनर तारिणी डी. यांच्यासह तंत्रज्ञांनाही या गुन्ह्यांत सहआरोपी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ हजार एकर जमीन एसईझेडमुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजगुरूनगर परिसरातील तेरा गावांमधील शेतकऱ्यांच्या सुमारे २५ हजार एकर जमिनींवरील एसईझेडचे शिक्के काढण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले. या संदर्भातील आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

राजगुरूनगर परिसरातील भारत फोर्जच्या एसईझेडसाठी काही जमिनी संपादित करून त्यावर एसईझेडचे शिक्के मारण्यात आले होते. कालांतराने एसईझेडचा प्रकल्प रद्द झाला. मात्र, संपादित केलेल्या जमिनी कंपनीकडेच आहेत. अन्य जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर शिक्के असल्याने शेतकरी अडचणीत आले होते. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजगुरूनगर ते पुणे पदयात्रा काढून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी या प्रश्नावर बैठक घेण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मुंबईत स्वाभिमानीचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी कल्याणी कंपनीच्या वतीने कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यामुळे शेट्टी यांनी याबाबत नापसंती व्यक्त केली.

कंपनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांनाही दाद देणार नसेल, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. 'शेतकऱ्यांकडून स्वस्तात घेतलेली जागा आता वाढीव दराने विमानतळासाठी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला आपला विरोध आहे. एसईझेड रद्द झाल्याने शेतकऱ्यांना जमिनी परत कराव्यात आणि विमानतळासाठी सरकारने शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून जमिनी खरेदी कराव्यात,' अशी मागणी शेट्टी यांनी केली.

या भागातील २५ हजार एकर क्षेत्रावरील एसईझेडचे शिक्के काढण्याचे आश्वासन फडणवीस यांनी या वेळी दिले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, एमआयडीसीचे अजित रेळेकर, जिल्हाधिकारी सौरव राव आदी यावेळी उपस्थित होते. या व्यतिरिक्त सांगली जिल्ह्यातील दोन हजार एकर जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवरील असेच शिक्के काढण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

$
0
0

पुरेसे प्रशिक्षण, उपकरणांशिवाय करावी लागतायेत कामे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येत नसून सुरक्षेसाठी आवश्यक असलेली उपकरणेही बहुतांश जणांना उपलब्ध करून दिली जात नाहीत. तसेच, कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणीही केली जात नसल्याचे एका सर्व्हेमध्ये समोर आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) १४ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा एक पायटल सर्व्हे केला. त्यामध्ये महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयातील १२० कर्मऱ्यांच्या वैयक्तिक माहितीसह कामाच्या पद्धतीपासून त्यांना मिळणाऱ्या सुट्या, कामासाठी आवश्यक प्रशिक्षण, वैद्यकीय चाचणी आदींची माहिती प्रश्नावलीद्वारे कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांपासून पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी वंचित राहत आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९३ टक्के सफाई कर्मचारी कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसून अनेकांना योजनांची माहिती नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कर्मचाऱ्यांनी काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी, याबाबत कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. त्याबरोबर सुरक्षेसाठी आवश्यक व कायद्यामध्ये नमूद असलेल्या ४४ उपकरणांपैकी मोजकी उपकरणे कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहेत. ऑक्सिजन मास्क, क्लोरिन मास्क, सुट, हेल्मेट, इमर्जिन्सी ऑक्सिजन किट, प्रथमोपचार बॉक्स आदी वस्तू मिळण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे निदर्शनास आले.

बार्टीने केलेला हा पायलट सर्व्हे होता. त्यांच्याकडून या विषयाचा अभ्यास सुरूच ठेवला जाणार असल्याचे तेथील संशोधन अधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले. 'बार्टी'तील सहायक प्राध्यापक अनघा इंगोले, संशोधन अधिकारी अमृता देसर्डा, विदुला सोनाग्रा, पौर्णिमा बागवत, सविता भालेराव आणि रोहिणी वाघमारे यांनी हा सर्व्हे केला.

वैद्यकीय तपासणीतही ढिसाळपणा...

सफाई कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नियमितपणे करण्याचे बंधनकारक आहे. मात्र, पाहणीमध्ये अभ्यासलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ५५ ते ५८ टक्के कर्मचाऱ्यांची एकदाही वैद्यकीय तपासणी झालेली नाही. वर्षात एकदा तपासणी झालेले ९ टक्के कर्मचारी आहेत. तर २६ टक्के कर्मचाऱ्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले असून उर्वरित कर्मचाऱ्यांची एक महिन्याने व सहा महिन्यांनी तपासणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेसाठी वीस जणांचे अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी आमदार रमेश थोरात, दिलीप मोहिते, संचालक रेवणनाथ दारवटकर यांच्यासह वीस जणांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज दाखल केले.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी येत्या पाच मे रोजी निवडणूक होणार आहे. येत्या सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. शुक्रवारी थोरात, मोहिते, दारवटकर यांच्यासह जयश्री पलांडे, राजेश कांडगे, प्रकाश पवार आणि सदाशिव पवार अशा वीस जणांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत अ गटातून १३, पणन प्रक्रिया गट, नागरी बँका-पतसंस्था, गृहनिर्माण-पाणीपुरवठा संस्था या गटांमध्ये प्रत्येकी एक, महिला गटातून दोन व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी या गटांमधून एक संचालकाची जागा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (शनिवारी) पुण्यात येत असून त्यानंतर पॅनेलच्या समीकरणांची जुळणी होईल, असे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉट लाटण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक दोनमधील (एसआरपीएफ) काही प्लॉट बनावट कागदपत्रे तयार करून विकसनासाठी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणारे, विकसित करण्यासाठी घेणारे आणि या व्यवहारांतील एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी 'एसआरपीएफ'चे पोलिस निरीक्षक मधू सकट यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शरद सोपान शेंडे, राहुल विलास नहाटा, अब्दुल बारी अब्दुल बशीर कुरेशी, अब्रार अहमद मोहमंद हनीफ कुरेशी, सिद्धार्थ प्रकाश परदेशी यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल बारी आणि अब्रार कुरेशी यांनी राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक दोनच्या सर्व्हे नंबर ५४/३/४/१ हा प्लॉट स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे तयार केलीत. कुरेशी यांचा हा कथित प्लॉट विकसित करण्यासाठी आरोपी परदेशी हे मध्यस्थ आहेत. परदेशी यांनी या कागदपत्रांची कुठलीही पडताळणी न करता प्लॉट शेंडे आणि नहाटा यांना विकसित करण्यासाठी दिला. कुरेशी आणि शेंडे, नहाटा यांच्यात प्लॉट विकसित करण्यासाठीचा करारही झाला. त्यापोटी ११ लाख रुपये देण्यात आले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभागृहनेते पदावरून जगताप पायउतार

$
0
0

म. टा. प्रतिनिध‌ी, पुणे

महापालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे जगताप यांनी राजीनामा सादर केला. जगताप यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सभागृहनेतेपदी नक्की कुणाची वर्णी लागते, याचा निर्णय पुढील दोन दिवसांत होणार आहे.

पुणे महापालिकेत गेले काही दिवसांपासून सभागृह नेते बदलावरून जोरदार धुसफूस सुरू होती. मात्र त्याविषयी निर्णय होत नव्हता. जगताप यांचा सभागृह नेते पदाचा राजीनामा घेऊन पीएमपीएमएलच्या संचालक मंडळावर त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना, भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने जगताप यांचा पराभव झाला. त्यामुळे सभागृह नेतेपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. शुक्रवारी जगताप यांनी धनकवडे यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला.

पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीकडून नगरसेवक दिलीप बराटे, बंडू केमसे, विशाल तांबे यांची नावे चर्चेत आहेत. पक्षांतर्गत गटबाजी वाढल्याने सभागृह नेतेपदाच्या स्पर्धेतून तांबे यांनी माघार घेतल्याने केमसे, बराटे यांच्यापैकी एकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका शिक्षणमंडळाला सर्वाधिकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणमंडळाला अधिकार देण्याबाबत राज्य सरकारने पाठविलेले पत्र आणि पालिकेच्या सर्वसाधारण सभेने केलेल्या ठरावाद्वारे पालिकेच्या शिक्षणमंडळाला सर्व अधिकार देण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. मंडळाला अधिकार देण्याबाबतचे पत्र आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समित‌ीला पाठविले आहे.

महापालिकेने पूर्वीप्रमाणे शिक्षण मंडळाला सर्व अधिकार द्यावेत, असे आदेश राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी विधी व न्याय विभागाचे आदेश लक्षात घेऊन विद्यमान शिक्षणमंडळाच्या सभासदांना कार्यकाल संपेपर्यंत अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत बोलताना शिक्षणमंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ म्हणाले, 'पालिका आयुक्तांनी अधिकार देत असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे मंडळाच्या सभासदांना आता कामकाज करण्याची परवानगी मिळाली आहे. शिक्षण मंडळ सदस्यांची बैठक येत्या १५ तारखेला बोलावण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य वेळेत मिळावे यासाठी मंडळ प्रयत्न करणार आहे.'

सदस्यांना स्थायीत अधिकार

शिक्षण मंडळाचे अधिकार काढून पालिका आयुक्तांना देण्यात आल्याने २०१५-१६ चे मंडळाचे बजेट महापालिका आयुक्तांकडून स्थायी समितीला सादर करण्यात आले होते. स्थायी समितीने २९५ कोटी रुपयांच्या बजेटला मान्यता दिली होती. प्रशासनाचे बजेट मंडळाकडून खर्च करण्यात येणार आहे. यावर मंडळाचे सदस्य निर्णय घेणार असल्यामुळे स्थायी समितीमध्ये त्यांना अधिकार देण्याचा ठराव प्रशासनाला करावा लागेल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीवर मागण्यांचा पाऊस

$
0
0

महावितरणकडून शहरात सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरगुती ग्राहकांवर वीज दरवाढ लादू नका..., स्थिर आकारात वाढ करू नका... आणि डेबिट-क्रेडिट कार्डांद्वारे ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्यांना सर्व्हिस चार्ज लावू नका... अशा विविध मागण्या पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहक प्रतिनिधी आणि विविध संस्था-संघटनांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे शुक्रवारी केल्या. महावितरणने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आयोगाने पुण्यात सुनावणी घेतली. आयोगाच्या अध्यक्ष चंद्रा अय्यंगार, सदस्य अझिझ खान आणि दीपक लाड हे यावेळी उपस्थित होते. सकृद्दर्शनी हा प्रस्ताव सव्वाचार हजार कोटी रुपयांच्या दरवाढीचा वाटत असला, तरी राज्यातील परिस्थिती त्याहून खूप गंभीर आहे. त्यामुळे हा परिणाम १५ ते १६ हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची भीती आहे, याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करावा, असा इशारा प्रयास ऊर्जा गटाच्या अश्विनी चिटणीस यांनी दिला. ओपन अॅक्सेस धोरणामुळे मोठे ग्राहक महावितरणकडून जाण्याची भीती असून त्यामुळे वीज अतिरिक्त ठरण्याची भीती आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे यांनी ग्राहकसेवेविषयी अनेक तक्रारी मांडल्या. ग्राहकांना वीजबिले वेळेत मिळत नाहीत, त्यामुळे प्रॉम्प्ट पेमेंटची सवलत मिळत नाही, चुकीची बिले येतात, सरासरी बिले देण्यात येतात, अशा तक्रारींवर तातडीने कारवाईची मागणी त्यांनी केली. तसेच, विविध कारणांमुळे राज्यात सव्वातेरा हजार दशलक्ष युनिट्स (एमयू) वीज अतिरिक्त ठरणार आहे, ती तोट्यात विकण्याऐवजी राज्याच्या उर्वरित १५ भागातील लोडशेडिंग बंद करा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, घरगुती ग्राहक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठा योजना आणि पथदिवे यांची दरवाढ करू नये, स्थिर आकारात वाढ करू नये आणि डेबिट-क्रेडिट कार्डांद्वारे ऑनलाइन भरण्यात येणाऱ्या बिलांवर सर्व्हिस चार्ज आकारू नये, अशा मागण्या सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केल्या. तसेच, रात्रीच्या वेळी उद्योगांना वीजदरात देण्यात येणारी सवलत कमी करण्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. सर्वसामान्य ग्राहकांच्या वीजदरांत वाढ केल्यास दरमहा शंभर ते चारशे रुपयांनी वीजबिलांमध्ये वाढ होईल आणि महागाईच्या काळात अनेक कुटुंबाना फटका बसेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अजय शिंदे यांनी सांगितले. तसेच, आम आदमी पार्टीचे सचिव श्रीकांत आचार्य यांनीही दरवाढीस विरोध नोंदविला.

आयोगाचा 'उरक'

जनसुनावणीमध्ये अनेक संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी बाजू मांडली; मात्र प्रत्येक प्रतिनिधीने पंधरा मिनिटांतच बाजू मांडावी, अशी सूचना आयोगाकडून करण्यात आली. त्याचा फटका प्रयास ऊर्जा गटाच्या प्रतिनिधींना बसला. अधिकृत ग्राहक प्रतिनिधी म्हणून बाजू मांडताना त्यांना थांबविण्यात आले. अखेर सायंकाळी उरलेले सादरीकरण पूर्ण करण्याची संधी त्यांना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज आयोगाचा महावितरणला झटका

$
0
0

ग्राहकसेवांमधील गंभीर त्रुटी सुधारण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'वीजबिले वेळेवर न मिळणे, नव्या वीजमीटरना विलंब अशा महावितरणच्या विविध प्रकारच्या ग्राहकसेवांमध्ये गंभीर त्रुटी असून त्यात वेळीच सुधारणा झाली पाहिजे,' अशा शब्दांमध्ये राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्ष चंद्रा अय्यंगार यांनी शुक्रवारी महावितरणला फटकारले.

आयोगाच्या अध्यक्षांनी जाहीर सुनावणीत महावितरणच्या कारभाराला धारेवर धरल्यामुळे त्याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. महावितरणने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर राज्याच्या विविध भागांमध्ये जाहीर सुनावणी झाली, त्यामध्ये शुक्रवारी पुण्यात सुनावणी पार पडली. विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी बाजू मांडल्यानंतर समारोप करताना अय्यंगार यांनी महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढले. पुण्यासह अन्य ठिकाणच्या सुनावणीमध्ये महावितरणच्या ग्राहकसेवेबाबत काही समान तक्रारी आढळून आल्या आहेत. त्याची उत्तरे देणे, ही महावितरणची जबाबदारी आहे. प्रामुख्याने मीटरशिवाय होणाऱ्या शेतीच्या वीजपुरवठ्याबाबतची नेमकी आकडेवारी सादर करा, असा निर्देश अय्यंगार यांनी या वेळी दिला.

तसेच, महावितरणचा दृष्टिकोन ग्राहकाभिमुख नसल्याच्याही (कस्टमर्स अनफ्रेंडली) तक्रारी अनेकांनी मांडल्या. त्यामध्ये बिलिंगबाबत आणि बिलांच्या वितरणाबाबत अनेक तक्रारी आहेत. बिले वेळेवर न मिळाल्याने अनेक ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंटपासून वंचित राहावे लागते. बिलांमध्ये अनेकदा चुका होतात, त्याचा फटका ग्राहकांना बसतो. बिलांच्या वितरणातील अडचणी सोडविण्याची यंत्रणा नसेल; तर उभारा आणि असेल तर ती दुरुस्त करा, असे अय्यंगार यांनी नमूद केले. तसेच शेतीला मीटर देण्यात काही अडचणी आहेत, हे मान्य केले तरी शेतीव्यतिरिक्त सर्वसामान्य ग्राहकांना मीटर मिळण्यास विलंब होण्याचे काही कारण नाही, असे त्या म्हणाल्या. त्याबरोबरच ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी काही पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली. वीजवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती होते, तशीच ग्राहकजागृतीसाठीही वारंवार पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अधिक औद्योगिक वीजदर आणि शेतीचा वीजपुरवठा हे दोन्ही चिंतेचे विषय आहेत, असे महावितरणचे एमडी ओमप्रकाश गुप्ता यांनी मान्य केले. तसेच, ग्राहकसेवेत सुधारणा करण्यासाठी सातत्याने पावले उचलण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हरामखोर’ निर्मात्याविरुद्ध गुन्हा

$
0
0

'बालभारती'चे बोधचिन्ह वापरणे भोवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हरामखोर' या हिंदी सिनेमाच्या जाहिरात, प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बोधचिन्हाचा वापर केल्याप्रकरणी सिनेमाचे निर्माता अजय यादव, दिग्दर्शक श्लोक शर्मा, डिझायनर तारिणी डी. यांच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, 'कॉपी राइट' कायद्याचा भंग तसेच 'आयटी अॅक्ट'खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'हरामखोर' या चित्रपटाच्या पोस्टरसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बोधचिन्हाचीच उचलेगिरी करण्यात आल्याचे उघडकीस आल्यावर टीका झाली होती. बालभारतीचे विधी सल्लागार मोहन वीर (वय ५६, रा. कोथरूड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिग्दर्शक श्लोक शर्मा यांनी 'हरामखोर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून, सध्या ट्रेलर दाखविण्यात येत आहेत. प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात शिक्षकाची भूमिका बजावत आहे. अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे. बोधचिन्हावर असलेल्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी नवाजउद्दीनचे, तर विद्यार्थिनीच्या जागेवर श्वेताचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

'हरामखोर' सिनेमाच्या जाहिरातींमध्ये हे बोधचिन्ह झळकू लागल्यानंतर सहा एप्रिल रोजी 'बालभारती'मध्ये तक्रारींचे फोन खणखणू लागले. त्यानंतर 'बालभारती'ने कायदेशीर बाजू तपासल्यानंतर कारवाईची भूमिका घेण्याचे धोरण स्वीकारले. 'बालभारती'चे विधी सल्लागार वीर यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात सिनेमाच्या संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. चित्रपटासाठी बोधचिन्हाचा वापर करणाऱ्या डिझायनर तारिणी डी. यांच्यासह तंत्रज्ञांनाही या गुन्ह्यांत सहआरोपी करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुनील ताकवले करत आहेत.

Latest Images