Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘स्री-भ्रूणा’च्या गुन्हेगारांना ‘मोक्का’ लावा

$
0
0
‘स्त्री-भ्रूणा’च्या घडविल्या जाणा-या हत्या म्हणजे एक प्रकारचा ‘वैद्यकीय दहशतवाद’ (मेडिकल टेररिझम) असून, अशा हत्या करणा-यांवर आता संघटित गुन्हेगारीचा ‘मोक्का’च लावला पाहिजे, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी मांडली.

‘एम्स’ कराराच्या फेरतपासणीचे आदेश

$
0
0
औंधमधील ‘एम्स हॉस्पिटल’साठी महापालिकेने केलेल्या वादग्रस्त कराराची फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीमध्ये सदस्यांनी मंगळवारी केली. या पाश्वर्भूमीवर ही तपासणी करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचा आदेश समितीने प्रशासनास दिला.

‘पुणे पॅटर्न’चा पुणेकरांना फटका

$
0
0
माननीयांच्या परस्परविरोधातील राजकारणाचा फटका पुणेकरांना सोसावा लागत असल्याचे चित्र आहे. या राजकारणामुळे सहकारनगरमधील चव्हाण उद्यानातील ‘सेव्हन वंडर्स’ पाहण्यासाठी नागरिकांना तब्बल पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये भाजप-सेना आणि राष्ट्रवादी यांनी हातमिळवणी करून हा अव्वाच्या सव्वा दराचा ठराव मंगळवारी मतदानाने मंजूर केला.

बेकायदा बांधकामांवर ‘हातोडा’ ऑक्टोबरमध्येच

$
0
0
जिल्ह्यातील बेकायदा बांधकामांवर १५ सप्टेंबरपासून ‘हातोडा’ पडणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले असले, तरी गणेशोत्सव आणि बंदोबस्तासाठी उपलब्ध न होणारे पोलिस दल यामुळे कारवाईला ऑक्टोबरचा मुहूर्त लागणार आहे.

‘ऑनलाइन’ परीक्षा सुरळीत सुरू

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षासाठी घेण्यात येत असलेली ऑनलाइन परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धत अवलंबण्यात आली आहे.

संतप्त विद्यार्थ्यांचा कुलगुरू कार्यालयावर मोर्चा

$
0
0
पुणे विद्यापीठामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिफेक्टरीच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने विद्यापीठातील संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी कुलगुरूंच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

चांगल्या वागणुकीच्या हमीपत्रावर सुटका

$
0
0
हडपसर येथील एका कुटुंबातील सासरे मुलासह महिलेला हाकलून दिल्याप्रकरणी चौघा नातेवाईकांची कोर्टाने चांगले वागणुकीच्या हमीपत्रावर सुटका केली. तसेच, घरात तोडफोड केल्याप्रकरणी दहा हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विनय मुगळीकर यांनी हा निकाल दिला.

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

$
0
0
चिंचवड येथील चिंतामणी चौकातील सोनाराच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट तीनने अटक केली असून त्यातील एक आरोपी फरार झाला आहे. आरोपींकडील वाहने, मोबाइल आणि इतर असा सव्वा आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

खडकवासल्याच्या पाण्यावर पुरंदरनेही सांगितला हक्क

$
0
0
पावसाअभावी पुरंदर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या कालव्यातून पुरंदरला पिण्यापुरते पाणी द्यावे, अशी मागणी आमदार विजय शिवतारे यांनी केली आहे.

स्त्री-रोगतज्ज्ञांना सोनोग्राफीची अनुमती

$
0
0
गर्भवतींची सोनोग्राफी करण्यासाठी आता स्त्री रोग व प्रसूतितज्ज्ञांना केंद्र सरकारसह राज्याच्या आरोग्य खात्याने परवानगी दिली आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारने आरोग्य खात्याला परिपत्रक पाठविले असून स्त्री रोगतज्ज्ञांना सोनोग्राफी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सीसीटीव्हीसाठी तांत्रिक सल्लागार नेमणार

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर शहरातील संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तांत्रिक सल्लागारांची मदत घेण्यात येणार आहे. या संदर्भातील तांत्रिक प्रकल्प अहवाल दोन आठवड्यांत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विसर्जन हौद गाळाने भरले, निर्माल्य कलश गायब झाले

$
0
0
जलप्रदूषण टाळून पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी विसर्जन घाटांवर बांधण्यात आलेले हौद गाळाने गच्च भरले आहेत. तसेच, निर्माल्यासाठी ठेवण्यात आलेल्या कलशांचा अनेक ठिकाणी पत्ताच नाही. गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आला असताना सुविधांची दुरवस्था दूर करण्याचे आवाहन महापालिकेपुढे आहे.

नवीन अभ्यासक्रम ठरणार परीक्षेची भीती घालविणारा

$
0
0
राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार करण्यात आलेला पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याची परीक्षेची भीती घालवणारा ठरावा, असे प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम मसुद्याने सुचवले आहे. यामध्ये शिक्षकाची भूमिका माहिती देणा-याची न राहता मिळालेल्या माहितीचे काय करायचे, हे सांगणा-या ‘फॅसिलिटेटर’ची व्हावी, अशी अपेक्षाही मसुद्यात व्यक्त करण्यात आली आहे.

३७ हजार मोलकरणींना विमा कवच

$
0
0
‘घरेलू कामगारां’च्या राज्य सरकारच्या नावनोंदणी मोहिमेला शहर आणि जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘घरेलू कामगार मंडळा’कडे नोंदणी झालेल्या शहर आणि जिल्ह्यातील ४६ हजार मोलकरणींपैकी आतापर्यंत सुमारे ३७ हजार मोलकरणींचा ‘जनश्री विमा योजने’अंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे.

तुम्हीच ठरवा...राष्ट्रीय सूक्ष्मजीव!

$
0
0
वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी, तर हत्ती हा वारसा प्राणी; कमळ हे राष्ट्रीय पुष्प, तर मोर हा राष्ट्रीय पक्षी....यांमध्ये आता आता भर पडणार आहे ती जैवविविधतेतील महत्वाचा घटक असलेल्या सूक्ष्मजीवांची. आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांकडून झालेल्या मतदानानुसार हा राष्ट्रीय सूक्ष्मजीव ठरणार आहे.

पिंपरीतही मेट्रोचा प्रस्ताव

$
0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरिता संयुक्त मेट्रो प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून, त्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांना ५३ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला. अहवाल तयार झाल्यानंतर स्थायी समितीची प्रशासकीय मान्यता घेऊन पुढील कार्यवाहीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

पुणे शहरात उद्या पाणी नाही

$
0
0
पर्वती, पद्मावती आणि इंदिरानगर पंपिंग स्टेशनमधील दुरुस्तीची कामे महावितरणकडून केली जाणार असल्याने गुरुवारी पुण्यातील सर्व पेठांसह बहुतांश परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

पुणे-लोणावळा १३ डब्यांची लोकल

$
0
0
पुणे-लोणावळा मार्गावर तेरा डब्यांची लोकलसेवा चालू करण्याचे नियोजन सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विशाल आगरवाल यांनी सांगितले.

‘पीसीएमबी’च्या अभ्यासक्रमात बदल; पण पुढील वर्षी

$
0
0
अकरावी आणि बारावीच्या विज्ञान व गणिताच्या अभ्यासक्रमात आयआयटी किंवा मेडिकल प्रवेशासाठी होणा-या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांना अनुरूप बदल करण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयारी दर्शवली आहे. अभ्यासक्रमाबाबत सूचना असल्यास तज्ज्ञांनी त्या बोर्डाला द्याव्यात, असे आवाहन बोर्डाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी केले आहे.

पुण्यात जन्म घेणार शेकरूचे लेकरू

$
0
0
राज्याचा अधिकृत प्राणी म्हणून दर्जा मिळालेल्या, परंतु दिवसेंदिवस संकटात सापडलेल्या शेकरू या प्राण्याचे पहिले प्रजनन केंद्र कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात लवकरच सुरू होत आहे. या केंद्रासह आणखी विविध उपक्रमांचा समावेश असलेल्या संग्रहालयाच्या मास्टर प्लॅनला नुकतीच ‘सेंट्रल झू ऑथोरिटी’ने मान्यता दिली असून त्यामुळे येथील अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images