Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विनयभंग: कर्नलच्या मुलाला अटक

0
0
आयएलएस लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या चिरंजीवाने आपल्या ओळखीच्या तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार बुधवारी घडला. त्या तरुणीला मारहाणही करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वायूगळतीने रोखला एक्स्प्रेस वे

0
0
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर आणि टेम्पो यांच्यातील भीषण अपघातात टँकरमधील वायूची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने गुरुवारी सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी पावणेबाराच्या सुमारास खंडाळा एक्झिट येथे हा अपघात झाला.

पिंपरीत आठ मजली इमारत पडली

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष मागविलेल्या हायराईज बूम पोकलेनच्या सहाय्याने वैभवनगर येथील आठ मजली इमारत गुरुवारी पाडली. महापालिकेच्या ड प्रभागांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

'करणी'च्या अंधश्रद्धेतून संपवले कुटुंब

0
0
आपल्यावर करणी करण्यात आल्याच्या अंधश्रद्धेतून पुण्यातील पौड रोड परिसरात एका ३० वर्षीय गवंड्याने पत्नी व तीन चिमुरड्यांची हत्या करून स्वतःला जाळून घेतल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. अंधश्रद्धेपोटी कुटुंबच संपवण्याची ही पुण्यातील गेल्या वर्षभरातील तिसरी घटना आहे.

ह. मो. मराठेंविरुद्ध गुन्हा दाखल

0
0
ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी मतदारांना लिहिलेल्या प्रचारपत्रकात जेम्स लेनच्या पुस्तकाचा उल्लेख करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मंगळवारी कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संभाजी ब्रिगेडने मराठेंविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

चिमुकला अबीर हरवला-गवसला...

0
0
शिवाजीनगर एसटी स्थानकातून अडीच वर्षांचा लहानगा अबीर संदीप जोशी याचे सोमवारी दुपारी अपहरण केल्याप्रकरणी तळेगाव येथील एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. अबीरला घेऊन जाणारी महिला मंगळवारी दुपारी पुन्हा शिवाजीनगर एसटी स्थानकात त्याच्या समवेत आली असताना अबीरच्या पालकांनी तिला ताब्यात घेतले.

ह. मो. मराठे यांच्यावर गुन्हा दाखल

0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांच्यावर जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे लेखन केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठे यांनी आपल्या प्रचारपत्रात जेम्स लेनचा उल्लेख केल्याप्रकरणी संभाजी ब्रिग्रेडने त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

कार आणि ट्रकच्या धडकेत दोघे ठार

0
0
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगरजवळील पानमळा येथे कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार, तर चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला.

ग्राहकांना पर्यावरणपूरक सजावटीची क्रेझ

0
0
गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून सजावटीचे विविध साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. मुकुट, मखर, आसन, आकर्षक खड्यांचा वापर करुन केलेले पडदे, फुलांचे गुच्छ या सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी असून, ग्राहक यंदा पर्यावरण पूरक सजावटीच्या साहित्याला पसंती देत असल्याचे, चित्र आहे.

सीसीटीव्हीबाबत मंडळांनी दक्ष रहावे

0
0
गणेशोत्सवामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी दक्ष रहावे आणि साखळी बॉम्बस्फोटानंतर नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यास मदत करावी, अशी सूचना पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मंगळवारी केली.

विद्यार्थिनीला मारहाण, शिक्षकाला अटक

0
0
वर्गातल्या बाकावर शिक्षकांबद्दल अपमानास्पद वाक्य लिहिल्याच्या कारणावरून एका शिक्षकाने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. संबंधित पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. थेरगाव येथील खिंवसरा-पाटील शाळेमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.

शनिवारवाडा महोत्सव एकच अन् शनिवारवाड्यावरच!

0
0
पुणे महालिकेकडून घेण्यात येणारा शनिवारवाडा महोत्सव यंदा फक्त एकाच ठिकाणी म्हणजे शनिवारवाड्यावर घेण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. हा महोत्सव आपापल्या प्रभागात घेऊन मतदारांना खूश करण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांचा डाव समितीतील अन्य सदस्यांच्या विरोधामुळे उधळला गेला.

पाणीमीटरसाठी हवा ५०७ कोटींचा निधी

0
0
शहरात पाणीपुरवठ्याचे मीटर खरेदी करण्यासाठी ५०७ कोटी रूपयांचा निधी आवश्यक असल्याची शिफारस या संदर्भात नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने पुणे महापालिकेस नुकतीच केली आहे. शहरात समान पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यासाठी महापालिकेने एसजीआय या कंपनीस सल्लागार म्हणून नियुक्त केले असून, या कंपनीने आपला अंतरिम अहवाल महापालिकेस सादर केला आहे.

पार्किंगच्या लुटीला पोलिसांच्या बेड्या

0
0
पार्किंगसाठी एफएसआय किंवा अन्य सवलती घेतलेल्या सर्व इमारतींमधील पार्किंग मोफतच असावे, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी पुणे महापालिकेस पाठविला आहे. तो मान्य झाल्यास अव्वाच्या सव्वा दराने पैसे उकळणा-या मॉल-मल्टिप्लेक्ससह इतर अनेक ठिकाणचे पार्किंग मोफत होऊ शकते.

घैसास खून : सुटलेल्या आरोपींकडून धोका

0
0
पुण्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय घैसास यांच्या खून खटल्याचा निकाल नुकताच लागला असून, पुराव्याअभावी या केसमधून निर्दोष सुटलेल्या आरोपींकडून जिवाला धोका वाटत असल्याचे डॉ. घैसास यांच्या पत्नी वासंती यांनी पुणे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांना कळविले आहे.

गावांचा कचरा; पालिका करणार निचरा

0
0
मांजरी गावातील कचरा स्वीकारून त्या बदल्यात संबंधित ग्रामपंचायतीकडून दरमहा दहा हजार रुपये घेण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. त्यामुळे पुण्याभोवतालच्या गावांचा कचरा पुणे महापालिकेच्या कचराडेपोमध्ये टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुचाकी चोरांकडून ११ दुचाकी ताब्यात

0
0
फरासखाना पोलिसांनी दोघा वाहन चोरांना अटक केली असून, त्यांच्याजवळील चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट चावीने चोरलेल्या दुचाकींच्या नंबरप्लेट बदलून अगदी किरकोळ भावात त्यांची विक्री करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पूजा जाधवचा खूनच

0
0
पाषाण येथे दहावीत शिकणा-या पूजा जाधव (वय १६) हिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पूजाचा खून एकतर्फी प्रेमातून झाला आहे का, याचा पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, पोस्टमार्टेमच्या अहवालानंतर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहित तरुणीवर बलात्कार : तरुणावर गुन्हा

0
0
एका चोवीस वर्षीय विवाहित तरुणीचे अश्लील फोटो काढून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याप्रकरणी गुजरात येथील तरुणावर बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्ध पादचारी ठार

0
0
भरधाव वेगात चाललेल्या एसटीची धडक बसल्याने ७५ वर्षीय पादचा-याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील टीसीएस कंपनीसमोर हा प्रकार घडला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images