Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टपालाचे करा घसबसल्या ट्रॅकिंग

$
0
0
रजिस्टर्ड पोस्टाने पत्र पाठविल्यानंतर ते मिळेपर्यंत रामभरोसे राहण्याची आता गरज नाही. आता असे पत्र पाठविल्यानंतर ग्राहकांना पोस्ट खात्याच्या वेबसाईटवर त्याचे ट्रॅकिंग करता येणार आहे. कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता पोस्ट खात्यातर्फे नुकतीच ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१० वी अभ्यासाचे वेळापत्रक आखा ‘ऑनलाइन’

$
0
0
दहावीतील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना अडचणी येऊ नयेत आणि प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास व्हावा, यासाठी एडनेक्सा एज्युकेशनच्या वतीने ‘ऑनलाइन टाइमटेबल प्लॅनर’ तयार करण्यात आले आहे. संस्थेचे संचालक निखिल बांदिवडेकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. प्रा. संजय रानडे, डॉ. जयश्री अत्रे यावेळी उपस्थित होते.

PMP दरवाढीस भाजपचा विरोध

$
0
0
पीएमपीच्या नियोजित दरवाढीस भारतीय जनता पक्षाने विरोध केला असून ही दरवाढ रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पक्षाचे महापालिकेतील गटनेते अशोक येनपुरे आणि नगरसेवक धनंजय जाधव यांनी ही माहिती दिली. तोट्यात अडकलेल्या पीएमपीने एका रूपयाच्या दरवाढीचा ठराव मान्य केला आहे.

मार्केट यार्ड गुन्हेगारीच्या विळख्यात

$
0
0
डझनभर गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव, बाल गुन्हेगारांचा सुळसुळाट, भुरट्या चोरी आणि शेतकरी-व्यापाऱ्यांना धमकावणे यामुळे मार्केट यार्ड गुन्हेगारांच्या विळख्यात अडकल्याचे पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून बुधवारी स्पष्ट झाले. आडते आणि व्यापा-यांना वेठीस धरणा-या गुंडांची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला.

बोगस आडत्यांची ‘जुनीच रेकॉर्ड’

$
0
0
मार्केट यार्डातील बोगस आडते, मदतनीस आणि डमी हमालांना आता थारा न देण्याची ‘जुनी रेकॉर्ड’ प्रादेशिक बाजार समितीच्या प्रशासकांनी बुधवारी पुन्हा एकदा वाजविली. अशा लोकांवर आता कठोर कारवाई करण्याचा इशारा देऊन, बोगस लोकांना मार्केट यार्डात आणले कुणी, असा प्रश्न उपस्थित करून या वादाचे खापर त्यांनी आडत्यांवरच फोडले.

पक्ष्यांची घरटी अन् मार्गदर्शक विद्यार्थी...

$
0
0
भारतातील जैवविविधतेचे पैलू उलगडणा-या सायन्स एक्स्प्रेसच्या ताफ्यात पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे पक्षीही झळकले. वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी आणि छायाचित्रे घेऊन आलेल्या छोट्या अभ्यासकांनी पुणेकरांना पक्षिविश्वाची सफर घडविली.

गुजरवाडी येथे अपघातात १ ठार

$
0
0
पुणे सातारा-रोडवर गुजरवाडी फाटा येथे मंगळवारी मध्यरात्री दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण ठार झाला, तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वे आरक्षण केंद्रात चोरीचा प्रयत्न

$
0
0
शंकरशेठ रोडवरील रेल्वे आरक्षण केंद्रात सोमवारी रात्री चोरी करण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी केंद्राच्या आवारात असलेले एटीएम सेंटरही फोडण्याचा प्रयत्न केला असल्याने स्वारगेट पोलिसांत तक्रार गुन्हा दाखल झाला आहे.

विद्यार्थीही करणार ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’

$
0
0
दुष्काळाच्या झळांमुळे होरपळलेल्या ग्रामीण भागातील जनतेला काहीसा दिलासा मिळावा यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेत विद्यार्थी उतरणार आहेत. अतिशय दुर्गम असलेल्या वेल्हे तालुक्यातील ४० गावांतून या मोहिमेला येत्या आठवड्यात सुरूवात होणार आहे.

‘HPV’ : गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निदान

$
0
0
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे लवकर निदान व्हावे यासाठी आयुजेन बायोसायन्सेस प्रा. लि. कंपनीने डायजिन एचपीव्ही चाचणीच्या सुविधा उपलब्ध केली आहे. या चाचणीमुळे कॅन्सरचे त्वरीत निदान होऊन पेशंटवर उपचार करणे शक्य होणार असून त्यापासून मुक्ती मिळू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

स्वारगेट ते रायगड रोपवे खास एसटी सुरू होणार

$
0
0
पर्यटनासाठी रायगडला जाणा-या मंडळींच्या सोयीसाठी एसटीतर्फे स्वारगेट ते रायगड रोपवे या मार्गावर खास एसटी बसची सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर या उपक्रमाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

‘सेप्टिसिमिया’ ठरतो घातक

$
0
0
कोणत्याही जंतूचा संसर्ग अथवा प्रादुर्भाव झाल्याने शरिराच्या विविध अ‍वयवांवर होणा-या परिणामांमुळे ‘सेप्टिसिमिया’ (सेप्सिस) होतो. त्यामुळे दर तासाला ३६ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

औंध कुटी रुग्णालय दुर्लक्षाच्या कक्षात...

$
0
0
एकीकडे खासगी सहभागातून एम्स हॉस्पिटलची फाइव्ह स्टार इमारत उभी राहिली असताना त्याच्या शेजारी पूर्वीपासून उभ्या असलेल्या महापालिकेच्या औंध कुटी रुग्णालयाची मात्र दुरवस्था कायम आहे. भविष्यात एम्स हॉस्पिटलने या कुटी रुग्णालयाची जबाबदारी करारानुसार मान्य केली असली, तरी त्याच्या सुधारणांबाबत अद्याप पावले टाकण्यात आलेली नाहीत.

‘स्व-रूपवर्धिनी’चे ढोलपथक सज्ज

$
0
0
तब्बल शंभरहून अधिक ढोल आणि त्यासह ढाल-तलवार पथक, लेझीम, घुंगुरकाठी, टिपरी आणि पथनाट्यांद्वारे जनजागृती करण्यासाठी ‘स्व-रूपवर्धिनी’चे ढोलपथक यंदाच्या गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे.

राजुरीच्या सरपंचांना चपलांचा हार घालून मारहाण

$
0
0
जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचे सरपंच बाळासाहेब हाडवळे यांना चपलांचा हार घालून त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी माजी उपसरपंच जी. के. औटी यांच्यासह नऊ जणांवर गुन्हे दाखल केले असून, सहा जणांना अटक केली आहे. या प्रकारामुळे राजुरी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकाराबद्दल निषेध सभा झाली आहे.

पर्यावरण अभ्यासाचे ‘सिपना’ साकार

$
0
0
निसर्गापासून दुरावलेल्या मानवाला पुन्हा जंगलाकडे आकर्षित करण्यासाठी नारगोळकर कुटुंबीयांनी परिश्रम घेऊन काही वर्षांपूर्वी ‘सिपना’ हे पहिले मानवनिर्मित जंगल सिंहगड पायथ्याशी साकारले. पर्यावरण अभ्यासकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरणारे हे जंगल आता ‘सिपना देवराई निसर्ग पर्यटन केंद्र’ या नव्या रूपात पुणेकरांसमोर येणार आहे.

आयुक्तालयात हेल्मेटसक्ती

$
0
0
पोलिस आयुक्तालयात दुचाकी घेऊन येणा-या कर्मचा-यांना आणि नागरिकांना हेल्मेट घालणे सक्तीचे राहणार आहे. पोलिस आयुक्तालयाकडून या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून करण्यात येणार आहे.

केरोसीनऐवजी अनुदान नको

$
0
0
रेशनवर स्वस्त दरात केरोसीन देण्याच्या योजनेला सुरुंग लावून त्याऐवजी रोख अनुदान देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.

पोस्ट ऑफिसांना हवी पोलिसांकडून सुरक्षा

$
0
0
शहरातील काही पोस्ट ऑफिसांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात रात्रीची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी पोस्टाच्या पुणे विभागातर्फे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

हॉटेल-पबवरील कारवाईला वेग

$
0
0
चिल्लर पार्टी आणि ‘डर्टी पार्टी’वर राज्यभरातून टीकेची झोड उठल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने शहर आणि परिसरातील हॉटेले, पबवर छापे घालून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images