Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘वरसगाव’ गळती दुरुस्ती लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वरसगाव धरणातून सेकंदाला पाचशे लिटरहून अधिक प्रमाणावर होणारी पाण्याची गळती थांबविण्यासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त उजाडणार आहे. राज्याच्या बजेटमधील तरतुदीचा आढावा घेतल्यानंतरच या कामाची निविदा काढण्यात येणार आहे.

वरसगाव धरणातून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते. या गळतीमुळे वरसगाव धरणाच्या फुटीचा धोका असल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने गळतीच्या दुरुस्तीसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात या कामाच्या निविदा काढल्या जाणार होत्या. त्याची तयारीही करण्यात आली होती. परंतु त्यात माशी शिंकली आणि हे काम लांबणीवर पडले.

राज्य सरकारने नुकतेच बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये सिंचन व त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमधून वरसगावसाठी वाटा मिळणार आहे. त्याचा सर्वंकष आढावा गेतल्यानंतर एप्रिलमध्ये हा निधी मिळून काम सुरू होईल, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, हा निधी लवकर न मिळाल्यास धरणाच्या दुरुस्तीचे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यामध्ये धरणाचा पाणीसाठा कमी होतो. अशा स्थितीतच गळतीच्या दुरुस्तीचे काम करणे शक्य होणार आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर डिसेंबर-जानेवारीपर्यंत धरणात जादा पाणीसाठा असतो. त्या काळात हे काम करणे अशक्य होणार आहे.

वरसगाव धरणाचा माती बांध, फाउंडेशन गॅलरी व इन्स्पेक्शन गॅलरीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असल्याचे वास्तव 'मटा'ने मांडले होते. वरसगाव हे धरण मोसे नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणाचे बांधकाम १९७६ मध्ये हाती घेण्यात आले. धरणाचे बांधकाम १९९३ पर्यंत सुरू होते. हे बांधकाम सुरू असतानाच इन्स्पेक्शन आणि फाउंडेशन गॅलरीमध्ये लिकेज होत असल्याचे दिसले होते. तसेच, माती बांधांतून पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर तातडीने उपाय करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

या धरणाची पाणीसाठवण क्षमता १३.२० अब्ज घनफूट (टीएमसी) असल्याने पाण्याच्या दबावाने ही गळती वाढत गेली. १९९७ मध्ये साधारणतः प्रतिसेकंद ३३८ लिटर असे पाणी गळतीचे प्रमाण होते. ते दर वर्षी वाढत गेले. २००८ मध्ये पाणी गळतीचे प्रमाण प्रतिसेकंद ४२२ लिटरवर पोहोचले. ही गळती आता पाचशे लिटरहून अधिक झाली आहे. धरणातून साधारणतः प्रतिसेकंद १५० लिटरपर्यंत पाणीगळती ग्राह्य धरली जाते. वरसगावमधील गळती जादा असल्याने त्यासंबंधीचे अहवाल राज्य सरकारला वेळोवेळी पाठविण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते खोदाईचे ‘ऑडिट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील रस्त्यांवर विविध कंपन्यांतर्फे सुरू असणारी बेसुमार खोदाई... थकबाकी असूनही संबंधित कंपन्यांसाठी पालिकेतर्फे घातल्या जाणाऱ्या पायघड्या... आणि खोदाईच्या कामांमुळे होणारी नागरिकांची गैरसोय, यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी शुक्रवारी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर, शहरातील खोदाईबाबतचा सविस्तर अहवाल आणि त्याचे 'थर्ड पार्टी ऑडिट' करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले.

महावितरणला सवलतीच्या दरांत रस्ते खोदाईला परवानगी देण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना, बहुसंख्य सदस्यांनी केबल खोदाई, त्यामध्ये होणारा गैरव्यवहार आणि त्यातून होणारे पालिकेचे नुकसान याबाबत प्रशासनाला जाब विचारला. शहरात कधी सीसीटीव्हीसाठी, कधी केबलसाठी, तर कधी पालिकेच्याच कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जात असून, त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.

'पालिकेतर्फे रस्ते खोदाईसाठी दिलेल्या परवानगीपेक्षा नेहमीच अधिक खोदाई केली जाते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. तरीही, त्याबाबत तपासणी केली जात नाही किंवा संबंधित कंपनीवर कारवाई केली जात नाही. पथ विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच पालिकेचे नुकसान होते,' असा थेट आरोप मनसेच्या किशोर शिंदे आणि काँग्रेसच्या अविनाश बागवे यांनी केला.

शहरात केबलसाठी खोदाई करणाऱ्या अनेक कंपन्यांनी पालिकेचे कोट्यवधी रुपये थकविले आहेत. ही थकबाकी वसूल करण्याऐवजी त्यांना मागील दाराने परवानगी दिली जात असल्याची टीका रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली. अवघ्या काही दिवसांपूर्वी केलेले नवे रस्ते आणि फूटपाथ सातत्याने उखडले जात असल्याने नागरिक नगरसेवकांनाच जबाबदार धरतात. त्यामुळे, नेमके कोणते काम सुरू आहे, याचे माहितीफलक संबंधित कामाच्या ठिकाणी लावण्यात यावे, असे आवाहन केले गेले.

सीसीटीव्ही, गॅस पाइपलाइन, वीज आणि केबल कंपन्या; तसेच पालिकेच्या विभागांसाठी खोदाईची परवानगी दिली जाते. पालिकेच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचे लक्षात आलेल्या काही ठिकाणी काम थांबविण्यात आले आहे. थकबाकीदार कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले आहे, असा खुलासा पथ विभागप्रमुख विवेक खरवडकर यांनी केला.

एका महिन्यात अहवाल द्या

शहरातील रस्ते खोदाईबाबतचा सविस्तर अहवाल आणि त्याचे 'थर्ड पार्टी ऑडिट' एका महिन्यात सर्वसाधारण सभेसमोर सादर करावे, असे आदेश महापौरांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्ग पर्यटनाला चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल निसर्गसंपदेमुळे पर्यटनाला चालना मिळावी आणि या निसर्गसंपदेचा ग्रामीण भागाला रोजगार देण्यासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेला मानव आणि वन्यप्राणी संघर्ष कमी करून वनक्षेत्रात लगत राहणाऱ्या गावकऱ्यांना चांगला रोजगार मिळवून देण्यासाठी या मंडळाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन करण्यात येणार आहे.

एकीकडे शहरातील जीवनशैली सुखकर होत असताना वनक्षेत्रालगत राहणाऱ्या नागरिकांवर अनेक बंधने वाढत आहेत. यामुळे त्यांच्या मनात निसर्गाविषयी नकारात्मक भूमिका निर्माण होऊ नये, यासाठी या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी राज्य सरकारने निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करण्यात निर्णय घेतला आहे. यासाठी बजेटमध्ये पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निसर्गांचे संवर्धनाच्या कामात स्थानिक लोकांचा सहभाग वाढावा आणि त्यांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंडळ काम करणार आहे.

गेल्या काही वर्षात राज्यात मुख्यतः अभयारण्याच्या लगतच्या मानवी वस्त्यांमध्ये मानव आणि वन्यप्राणी संघर्ष वाढत आहे. हा तणाव कमी करण्यासाठी सामूहिक निसर्ग संवर्धन ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे.

हा उपक्रम पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर उमरेड-कराड या अभयारण्यालगतच्या गोठणगाव येथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) माध्यमातून राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्पात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात शासकीय अनुदान आणि सीएसआर यातून ही संकल्पना राबविण्यात येईल. याशिवाय राज्यातील विविध भागात संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या सहभागातून निसर्ग पर्यटनाला चालना देणारे उपक्रम आयोजित करण्याची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे.

रायगडावर महोत्सवासाठी आर्थिक तरतूद करून सरकारने मूळ समस्येपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नये. गडांच्या संवर्धनासाठी नियोजनाची गरज आहे. शिवाजी महाराजांचे भक्त असल्याचे सांगणाऱ्या सरकारने किल्ल्यांच्या संवर्धनातून महाराजांप्रती असलेला आदर दाखवावा.- संभाजीराजे छत्रपती, कोल्हापूरचे युवराज

किल्ल्यांचे जतन

राज्यातील संरक्षित किल्ल्यांचे संवर्धन आणि स्थानिक लोकाभिमुख पर्यटनासाठी राज्य सरकारतर्फे बृहत आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या धर्तीवर एकात्मित विकास आणि संवर्धनासाठी १० किल्ल्यांची निवड करण्यात येणार आहे. या प्रत्येक किल्ल्यात माहिती केंद्र; तसेच मूलभूत सुविधा करण्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे. गडाचा परिसर स्वच्छ राखणे आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत वनीकरण आणि त्यांचे संरक्षण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पसंख्याक समाजाचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पुण्यातील ख्रिश्चन समाजातर्फे मंगळवारी (२४ मार्च) शांती माेर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता बोट क्लब रोड परिसरातील सेंट फिलिक्स स्कूलपासून ते कौन्सिल हॉलपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बिशप थॉमस डाबरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. बिशप नरेश अंबाला, मॅडम चित्रलेखा जेम्स, फादर माल्कम सिक्वेरा आदी या वळी उपस्थित होते.

देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्या विरोधात सरकारकडून कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली जात नाही. हल्लेखोरांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही. 'घरवापसी'सारख्या प्रकारांमधून ख्रिश्चन धर्मीयांच्या देशभक्तीवरही शंका घेतली जात आहे. मदर तेरेसांसारख्यांच्या कार्याचा लाभ अनेक बहुसंख्यांकांनी घेतला असूनही, आता सरसंघचालकांसारखे लोक केवळ मतलबापोटी त्यांच्यावर आरोप करत आहेत. ख्रिश्चन धर्मीय लोक धर्मांध असल्याचे खोटे आरोप होत आहेत. हे सर्व प्रकार थांबविण्यासाठीच या मोर्चाच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने प्रयत्न केले जाणार असल्याचे डाबरे यांनी या वेळी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या आदेशावरून राज्य सरकार चालते

$
0
0

रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून चालत असल्याचा आरोप रिपब्लिकन जनशक्तीचे नेते अर्जुन डांगळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. जनशक्तीच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीची पुनर्बांधणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन जनशक्तीच्या संघटना बांधणीसाठी आज, रविवारी पुण्यात राज्यस्तरीय मेळावा आयोजिण्यात आला आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी ज्यांच्यावर घणाघाती टीका केली. आज त्यांना जवळ घेऊनच सरकार चालविले जात आहे. जनतेला ते मान्य नाही, असे डांगळे यांनी स्पष्ट केले. शेतककी कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत. भूसंपादन विधेयक, कंत्राटी कामगार कायदा हे सामान्यांच्या विरोधातील कायदे आणले जात आहेत. तसेच, या सरकारकडून मुंबईचे महत्त्व कमी केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

तरूणांना एक नवीन पर्याय, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, जनशक्तीच्या माध्यमातून रिपल्बिकन चळवळ पुढे नेताना चळवळीती अपप्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संघटनेच्या नावावर गैरकारभार करणे, दोषी व्यक्तींच्या पाठीशी उभी राहणे आदी प्रकार यापुढे होऊ देणार नाही, असे अर्जुन डांगळे म्हणाले. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांचे खूनी सापडत नाही, हा मोठा विनोद आहे. त्यांचे खून हे धर्मांध हिंदुत्ववाद्यांकडूनीच केले असल्याचा आरोप डांगळे यांनी केला.

शिवसेनेचे हिंदुत्व प्रखर राष्ट्रवादी

विधानसभेच्या निवडणुकीपासून शिवसेनेसोबत आहोत. शिवसेनेचे हिंदुत्व हे प्रखर राष्ट्रवादी आहे. भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हे धार्मिकतेकडे झुकलेले आहे. त्यामुळे सेनेसबोत राहण्यात आम्हाला अडचण वाटत नाही, अशी स्पष्टोक्ती डांगळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू

$
0
0

पुणे

'स्वाइन फ्लू'ने एकाचा मृत्यू झाला असून शहरात आतापर्यंत मृतांची संख्या ६६ एवढी झाली आहे. नव्याने १३ जणांना लागण झाली असून २५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. तर राज्यात आठ जणांचा बळी गेला आहे.

शहरात २२०४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २५२ जणांना टॅमी फ्लूचे उपचार देण्यात आले. नव्याने तेरा जणांना लागण झाली आहे. उपचारानंतर बरे झाल्याने आतापर्यंत ५७० जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्याशिवाय २५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

राज्यात आठ जणांचा बळी

राज्यात नव्याने शंभर जणांना 'स्वाइन फ्लू'चा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज्यातील लागण झालेल्यांची संख्या चार हजाराच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत राज्यात ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या चोवीस तासात आठ जणांचा बळी गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिमरित्या आंबा पिकविल्याने दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करून आंबा पिकविण्यास मनाई असतानाही कृत्रिमरित्या आंबा पिकविणाऱ्या मार्केट यार्डातील चार व्यापाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्यात आली. चौघांकडून एक लाख तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.मार्केट यार्डातील गावडे फ्रुट कंपनी, गोरक्षनाथ विठ्ठल बडदे, दादालाल शहाबुद्दीन बांगी आणि एन. सी. भोले या चौघा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आंब्याच्या पेटीतल कॅल्शिअम कार्बाईडच्या पुढ्या ठेऊन कृत्रिमरित्या आंबे पिकवित असल्याचे आढळून आले. पाच लाख २३ हजार ३८० रुपये किमतीचे ६ हजार १३४ किलो आंबे कारवाईत नष्ट करण्यात आले. त्याशिवाय १२ किलो कॅल्शिअम कार्बाईडचा साठाही जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी, पराग नलवडे, सायली पटवर्धन, मेघना पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली. चौघा व्यापाऱ्यांना न्याय निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दोषी ठरविले. गावडे यांना ४० हजार, बडदे यांना ५० हजार तर अन्य दोन व्यापाऱ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती एफडीएचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्रांक शुल्काची २ हजार प्रकरणे निकाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जमीन वा सदनिका खरेदीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर त्यापोटी शासनाच्या तिजोरीत भरलेले मुद्रांक शुल्क परत करण्याची सुमारे दोन हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली असून हा परतावा थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मुद्रांक शुल्काचा परतावा थेट बँक खात्यात जमा करण्याचा पहिला प्रयोग लवकरच करण्यात येणार आहे.

मुद्रांक शुल्क परताव्यामधील गोंधळ टाळून त्यात सुसूत्रतता आणण्यासाठी मुद्रांक व नोंदणी विभागाने 'ऑनलाइन' सेवा सुरू केली आहे. मुद्रांकाचा परतावा मिळण्यासाठी संबंधितांना अर्ज ऑनलाइनच करावा लागणार आहे. मुद्रांक शुल्क भरणारी व्यक्ती तिच असल्याची खात्री व संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातच रक्कम जमा झाली याची शहानिशा करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच 'ऑनलाइन' परतावे दिले जाणार आहेत. मुद्रांक जिल्हाधिकारी नीलिमा धायगुडे यांनी ही माहिती दिली. जमीन, सदनिका तसेच अन्य मालमत्ता खरेदीसाठी मुद्रांक भरला जातो. मात्र, तांत्रिक वा अन्य कारणामुळे हा खरेदी व्यवहार रद्द झाल्यास संबंधितांना मुद्रांक परत करण्यात येतो. मुद्रांक व नोंदणी विभागाकडे अशी न्यायिक व न्यायिकेत्तर प्रकारची मुद्रांक शुल्क परताव्याची प्रकरणे दाखल होतात. सद्यस्थितीत अशी परताव्याची प्रकरणे दाखल झाल्यानंतर त्यावर मुद्रांक जिल्हाधिकारी निर्णय घेऊन ती मंजूर करतात. या मंजूर प्रकरणांमध्ये संबंधितांना त्या तेवढ्या रकमेचा चेक दिला जातो. हा चेक काढल्यानंतर अनेकजण तो घेण्यासाठी येतच नाहीत. काही अर्जदार चेक काढल्यानंतर उशिरा येतात आणि तोवर या चेकची मुदत संपलेली असते. अशा स्थितीत संबंधित अर्जदारांचा चेक पुन्हा काढण्यासाठी फाइल शोधण्यापासून चेक काढण्यापर्यंतची कामे करावी लागतात.

या पार्श्वभूमीवर, मुद्रांक परताव्याची प्रकरणे सुलभ व पारदर्शक करण्यासाठी 'ऑनलाइन' सुविधा देण्यात येत आहे. मुद्रांक परत मिळण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज करून त्यास मुद्रांकाच्या रकमेसह त्याचे बँक खाते व बँक पासबूक, मुद्रांक खरेदी केलेला जिल्हा, नाव, पत्ता अशी माहिती देणे आवश्यक आहे. परताव्याचा अर्ज मिळाल्यानंतर त्याला पोच पावती दिली जाणार आहे. फाइल मंजूर झाल्यावर संबंधित अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे, असेही धायगुडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेट जलाओ अभियान

$
0
0

पुणे

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये एस.सी., एस.टी., ओ.बी.सी आणि अल्पसंख्याक समुदायांसाठीच्या अत्यल्प तरतुदींच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीतर्फे देशभरात 'बजेट जलाओ अभियान' राबविण्यात येणार आहे. त्या निमित्त पुण्यात आज (रविवार) मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

लाल महालापासून सकाळी ११ वाजता सुरू होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे. केंद्रीय बजेटमध्ये उद्योगपतींना सबसिडी देताना, अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून सर्वसाधारण नागरिकांवरील करांचा बोजा वाढविला आहे. बजेटमधील तरतुदी या सर्वसामान्यांसाठी अन्यायकारकच ठरणार असल्याचा आरोप पार्टीतर्फे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचा रोष पार्टीचे राजेंद्र चव्हाण, शतायु भगळे, डॉ. योगेश फुले, प्रशांत वाघ, सुमीत जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्तृत्वाचा आविष्कार दाखवावा

$
0
0

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ब्राह्मण समाजाने कर्तृत्त्व गाजवले असून ते किती दिवस झाकून ठेवणार, असा सवाल करून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या समाजातील नवीन पिढीने त्याचा आविष्कार दाखविला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

'आम्ही सारे ब्राह्मण' पाक्षिकाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त टिळक स्मारक मंदिर येथे एअरमार्शल भूषण गोखले यांना 'ब्राह्मण भूषण पुरस्कार' पुरंदरे यांच्याहस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पाक्षिकाचे संपादक गोविंद हर्डीकर, कार्यकारी संपादक भालचंद्र कुलकर्णी, मैत्रेय ग्रुपच्या श्रद्धा वर्धे उपस्थित होते.

ब्राह्मण समाजातील अनेकांनी कर्तृत्त्व गाजवले आहे. वडगाव मावळ येथील खिंडीमध्ये नऱ्हे गावातील नारो बापूजी देशपांडे यांना हौतात्म्य आले. त्यांचे स्मारक त्या ठिकाणी आहे. मात्र, आपला इतिहास आणि भूगोल आपणास माहीत नसल्याची खंत पुरंदरे यांनी व्यक्त केली.

आपल्या महत्त्वाकांक्षा थिट्या होत चालल्या आहेत. बँकेत कारकून होणे ही महत्त्वाकांक्षा समजली जाते, हे दुदैव आहे. आता नवीन पिढीने महत्त्वाकांक्षी बनले पाहिजे, असेही ते म्हणाले.

आपण गैरसमजांना कवटाळून बसलो आहोत. त्यामध्ये इंग्रजांनी खतपाणी घातले. मात्र, सत्य कधीही विझत नाही. आपल्याकडे बुद्धी आणि प्रतिभा आहे. त्याचा अविष्कार दाखविला गेला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

भूदल, नौदल आणि वायूदलाला 'संरक्षण दल' असे म्हणण्याऐवजी 'सशस्त्र दल' असे संबोधले जावे, अशी सूचना एअरमार्शल गोखले यांनी केली.

इतिहास आणि भूगोलाची सांगड असते. भूगोलामुळे दोन देशांमध्ये युद्ध होतात. जगात कोणतीही घटना घडली की, त्याचे परिणाम आपल्यावर होत असतात, असे त्यांनी सांगितले.

आपल्यामध्ये स्वाभिमान असला पाहिजे. त्याचबरोबर सर्वजण एक असल्याची भावना महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉकिंग, साय‌कलिंग, योग अन् झुंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मनमोकळ्या गप्पा मारत वॉकिंगचा आनंद लुटण्यात कुणी मश्गुल, तर कुणी सायलिंगमध्ये दंग... कुणी योगाभ्यासात गर्क तर कुणी फिटनेस फंड्यात... कुठे झुंबाच्या तालावर थिरकणारी तरुणाई, तर कुठे भोवऱ्यापासून फुटबॉल-बॅडमिंटनचा रंगणारा खेळ !

... हे दृश्य होते कल्याणनगरमधील 'हॅपी स्ट्रीट'चे. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'तर्फे आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमात गेल्या रविवारी महिला दिन जल्लोषात साजरा झाला. आज, रविवारी (२२ मार्च) पुन्हा हा फॅमिली ड्रामा रंगणार आहे. तेवढ्याच उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात.

कल्याणीनगरमधील रस्ते गेल्या तीन रविवारपासून वाहतुकीची कोंडी, प्रदूषण दूर ठेवून मोकळा श्वास घेत आहेत. या उपक्रमातील धम्माल अनुभवणारे नागरिक आता शहराच्या इतर भागांतही 'हॅपी स्ट्रीट'चे आयोजन करण्याची मागणी करीत आहेत. गेल्या वेळी दोन-तीन रविवारी तुमच्या हातून ही संधी हुकली असेल, तर या रविवारी (२२ मार्च) सकाळी सात ते दहा या वेळेत तुम्हाला या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या सुहृदांसमवेत खऱ्या अर्थाने 'फन अँड फिटनेस'चा मंत्र प्रत्यक्षात आणण्याची पर्वणी मिळणार आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष उपक्रम हॅपी स्ट्रीटमध्ये आयोजित केले होतेच, याशिवाय सर्व वयोगटातील नागरिकांसाठीही वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध होते. काही जण स्वतःची सायकल घेऊन आले होते; तर काहींनी बॅडमिंटन, फुटबॉल, स्केटिंग, लगोरी असे मैदानी खेळ रस्त्यावरच खेळले. एकीकडे तरुणाई खेळण्यात दंग असताना नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने योगसाधना केली. या उपक्रमामुळे त्यांना सामूहिक व्यायामाचा आनंद घेता आला. प्रदूषणाला आळा घालून समाजातील सुसंवाद वाढीस लावण्यासाठी हॅपी स्ट्रीट उपक्रम आवश्यक असल्याची एकमुखी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त झाली होती.

झुंबा ः आपण कायमच फिटनेसबाबत आग्रही असतो. हॅपी स्ट्रीटवर 'झुंबा' उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला फिटनेसचे धडे गिरविता येणार आहेत.

एरोबिक्स ः फिटनेस राखण्यासाठी आपण व्यक्तिगत स्तरावर जागरूक असतो. अनेक प्रयत्नदेखील करतो. पण, सर्वांसमवेत येऊन एरोबिक्सच्या माध्यमातून स्ट्रेचिंग आणि वर्कआऊट करण्याची मजाच काही और आहे.

स्ट्रीट सॉकर ः गल्लीमध्ये आपण क्रिकेट कायमच खेळतो. पण, हॅपी स्ट्रीटच्या माध्यमातून क्रिकेट आणि फुटबॉलच्या समन्वयातून साकारण्यात आलेल्या स्ट्रीट सॉकर उपक्रमाची धमाल वेगळीच असेल.

सायकलिंग ः मस्तपैकी सायकलवर रपेट मारण्याचा आनंद काही औरच असतो. त्यातच, गप्पागोष्टी करीत सायकलिंगचा आनंद या उपक्रमात लुटता येणार आहे.

किड्स कॉर्नर ः बच्चे कंपनीला सध्या खेळण्यासाठी जागाच नसते. मग काय, कम्प्युटर वा मोबाइलगेमिंगवर त्यांना समाधान मानावे लागते. या हॅपी स्ट्रीटच्या तीन तासांमध्ये मात्र बच्चे कंपनी किड्स कॉर्नरच्या माध्यमातून फुल धमाल करताना दिसेल.

योगा ः योगाला सध्या जगभरातून मागणी आहे. आता तर आंतरराष्ट्रीय योग फेस्टिव्हलदेखील सादर करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये योगाच्या माध्यमातून विविध धडे घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकाने वर्षभर खुली राहणार !

$
0
0

उद्योग, कामगार विभागाची 'पाडवा भेट'

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्यातील सर्व दुकाने वर्षभर म्हणजेच ३६५ दिवसही खुली राहतील, अशी अधिसूचना उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने जारी केली आहे. यानिमित्ताने व्यापाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट मिळाली आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८अंतर्गत नोंदित सर्व दुकाने यापूर्वी आठवड्यातून एकदा बंद ठेवण्यात येत असे. दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असे. त्याबाबतचे आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर आणि तक्रारींची दखल घेऊन उद्योग आणि कामगार मंत्रालयाने सर्व दुकाने वर्षाच्या ३६५ दिवशीही खुली राहतील, अशी परवानगी दिली आहे. परंतु, त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

प्रत्येक कामगाराला त्याच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात न करता एक दिवस भरपगारी सुट्टी द्यावी आणि सुट्टीसंबंधीचे प्रत्येक महिन्याचे वेळापत्रक सूचना फलकावर आगाऊ लावण्यात यावे, प्रत्येक कामगाराला सलग पाच तास काम केल्यावर एक तासाची विश्रांती द्यावी, दररोज नऊ तास किंवा आठवड्यामध्ये ४८ तासापेक्षा जास्त काम करणे आवश्यक असणार नाही, या अटींचा अधिसूचनेत समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय कोणतेही दुकान रात्री दहानंतर उघडे राहणार नाही. कामगारांना ओळखपत्र द्यावीत. महिला कामगारांना रात्री साडेनऊनंतर कामावर ठेवण्यात येऊ नये, इत्यादी अटीही लागू राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनाथांसाठी मदतीची गुढी

$
0
0

एडसग्रस्त मुलांसाठी इंजिनीअरचा आगळावेगळा उपक्रम

सचिन वाघमारे, पुणे

समाजापासून वेगळ्या पडलेल्या एड्सग्रस्त, गरीब आणि अनाथांच्या जीवनात गुढीपाडव्याचा आनंद ‌फुलविण्याचे काम एका इंजिनीअरने आपल्या मित्रांच्या सहकार्याने केले आहे. सणाच्या आनंदापासून वंचित राहू नये म्हणून 'स्पर्श' या एडसग्रस्त मुलांच्या संस्थेत आणि रस्त्यावरील गरिबांना पुरणपोळीचे वाटप केले. सोबतच त्यांना आर्थिक मदत करून इतरांपुढे आदर्श ठेवला आहे.

'वेबोनाइज लॅब' मध्ये एचआर पदावर कार्यरत असलेल्या सचिदानंद कुलकर्णी यांना लहाणपणापासूनच समाजसेवेची आवड आहे. त्यातूनच ते विविध कार्यक्रमाचे आयोजन करून अनाथांना मदत ‌करीत असतात. चार वर्षांपासून ते सिग्नलवरील अनाथ व गरीब मुले यांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने ते पुरणपोळीचे जेवण देण्याचा उपक्रम राबवितात.

या वर्षीही त्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सिग्नलवरील अनाथ व गरीब मुले व रस्त्याच्या कडेला आढळून येणाऱ्या अनाथ महिला व नागरिकांना देखील पुरणपोळीचे जेवण देऊन सणालाही गोड जेवणापासून वंचित राहणाऱ्या १५० जणांना पोटभर जेवण दिले. त्यासोबतच एडसग्रस्त मुलांसाठी कार्य करीत असलेल्या 'स्पर्श' या बालकश्रमातील मुलांसाठी त्यांनी पाडव्याच्या निमित्ताने पुरणपोळीचे जेवण ‌दिले. त्यासोबतच काही वेळ त्यांच्या सोबत व्यतीत करतानाच त्यांना आवश्यक साहित्य व खेळणीही भेट दिली. त्याशिवाय मित्रांच्या मदतीने कुलकर्णी यांनी अर्थिक मदतही केली. कुलकर्णी यांच्या या उपक्रमाला त्यांचे मित्र सतीश कुलकर्णी, विजय जाधव, सौरव मिश्रा, श्रेणिक पाटील, गणेश कुलकर्णी, स्वानंद देशपांडे, कपिल सावकारे व नीलम सिंह यांनी मदत केली.

आपण सर्वच गोष्टी स्वतःच्या बळावर मिळवू शकत नाही. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यातूनच मला इतरांसाठी काही तरी करण्याची आणि समस्या सोडविण्याची प्रेरणा मिळते.

- सचिदानंद कुलकर्णी,

एचआर, वेबोनाइज लॅब, पुणे

आमच्या संस्थेला केलेल्या मदतीमुळे मी भारावून गेलो आहे. त्यांनी ‌दिलेल्या पुरणपोळीमुळे मुलांचा पाडवा खऱ्या अर्थाने गोड झाला. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे संस्थेच्या काही समस्या सोडवणे आता शक्य होणार आहे.

- महेश यादव, अध्यक्ष,

स्पर्श बालग्राम, बोपोडी

लिंक रोडची दुरवस्था दूर कधी होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध

पाषाण, सूसरोड व बाणेर लिंकरस्ता परिसरात रस्त्याची कामे अर्धवट राहिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही कामे पूर्ण करण्यात यावीत, तसेच इतर नागरी समस्याही सोडविण्यात याव्यात, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ही कामे पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही भाजप उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांनी दिला आहे.

पाषाण-सूसरोड परिसरात केबल टाकण्यासाठी तोडण्यात आलेल्या पादचारी मार्गाची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. लिंक रस्ता परिसरात अनियमित होणारा पाणीपुरवठा, बालाजी मंदिर परिसरातील ओढात पावसाळी ड्रेनेज लाइनचे अर्धवट करण्यात आलेले काम, पाषाण तलावचे सुशोभीकरण, जलतरण तलाव, उद्यानांची अपूर्ण कामे, नो हॉकर्स झोनमध्ये वाढलेले हातगाडी आणि पथारीवाले या सर्व गोष्टींची दखल घेण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. चांगले रस्ते असतानाही रस्त्याचे काँक्रिटीकरण कशासाठी असा सवालही नागरिकांनी केला आहे.

'अर्धवट कामांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कामे अपूर्णच आहेत. अनेक कामे अपूर्ण असताना नव्या कामांना निधी पुरवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हेतूविषयी शंका निर्माण होते आहे,' असे राहुल कोकाटे यांनी सांगितले.

पाषाण परिसरातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय या परिसरातील कामांची लवकरच पाहणी करण्यात येईल.

ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाटघर प्रकल्पग्रस्तांना मिळाला ‘प्रकल्पग्रस्त’ दाखला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

गेली दोन दशके विविध मार्गाने लढे उभारल्यामुळे अखेर भोर तालुक्यातील भाटघर प्रकल्पग्रस्तांच्या कुटंबीयांना प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला मिळणे सुरू झाले आहे. या योजनेतील पहिला दाखला पहिल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांना देण्यात आला आहे. या दाखल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या सुटणार आहेत.

आघाडी सरकारने भाटघर, वीर, मुळशी येथील मूळ धरण प्रकल्पग्रस्तांच्या खापर पणतूला खास बाब म्हणून प्रकल्पग्रस्त दाखले देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल आणि वनविभागाने घेतला होता. भाटघर गावातील प्रकल्पग्रस्त दिवंगत बापू बाळा वीर यांचा पणतू योगेश दत्तात्रय वीर याला सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी सतिश धुमाळ यांचे हस्ते या योजनेतील पहिला दाखला देण्यात आला.

प्रकल्पांर्गत ४१ गावातील सहा हजार जणांना पुणे विभागातून दाखल्यांचा लवकरच लाभ मिळणार आहे. गेल्या दोन दशकातील लढ्याला अखेर यश आले असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे. या दाखल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.

पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत प्रकल्पग्रस्त व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबातील आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या एकाच व्यक्तीला हा दाखला मिळणार आहे.

ज्या प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादनाची कार्यवाही २ जून १९६५ पूर्वी झाली आहे, अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील जास्तीत जास्त दोघांना सरकारी नोकरीचा लाभ मिळणार आहे.

लाभ मिळाल्यावर दाखला रद्द होणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजगुरूंच्या स्मारकाला मुहूर्त केव्हा?

$
0
0

अतुल काळे, राजगुरुनगर

राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये उल्लेख केल्यानंतर तरी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मवाड्याचे भव्य राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

'थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म ज्या राजगुरू वाड्यात झाला, त्या वाड्यात राजगुरूंचे भव्य आणि दर्जेदार असे 'राष्ट्रीय स्मारक' उभारण्यासाठी ४८ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे,' अशी माहिती खेडचे प्रांताधिकारी हिमंतराव खराडे यांनी दिली. एकूण निधीपैकी बारा कोटी रुपये इतका निधी भूसंपादनासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. राजगुरू वाड्यात राजगुरूंचे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांची मागणी आहे. अर्थसंकल्पात उल्लेख झाल्याने आणि त्यासाठी तरतूद करण्यात आल्याने स्मारकाच्या कामाला गती मिळेल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात भीमा नदीकाठी असलेला राजगुरू वाडा महाराष्ट्र सरकारने २००४ मध्ये 'राज्य संरक्षित स्मारक' म्हणून घोषित केला होता. प्रत्यक्षात या राज्य स्मारकाच्या बांधकामास पुरातत्त्व विभागाकडून २००७ मध्ये सुरुवात झाली. परंतु सात वर्षानंतरही जन्मघर वगळता इतर कामे प्रलंबितच आहेत. यामध्ये प्रामुख्याने देवघरासहित थोरल्या वाड्याचे काम रखडलेले आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वाडयाच्या एका भागातील नदीकडच्या बाजूने दक्षिण पश्चिम अशी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. प्रस्तावित नव्या राष्ट्रीय स्मारकामध्ये पन्नास आणि अडीचशे आसनी प्रेक्षक क्षमतेची दोन अॅम्फी थिएटर निर्माण केली जाणार असून, या ठिकाणी हुतात्मा राजगुरूंच्या जीवनपटावर आधारित विविध घटना व प्रसंग दाखविले जाणार आहेत. या ठिकाणी राजगुरूंच्या वापरातील वस्तूंचे म्युझियम, वाचनालय आणि स्मारक पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी दोन उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे. स्मारकाच्या कडेने ऐतिहासिक पद्धतीची दगडी भिंत बांधली जाणार आहे. स्मारकाच्या मध्यभागी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. अंतर्गत रस्ते, चारचाकी व दुचाकी गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था, सुरक्षा चौकी, स्वच्छतागृहांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचे प्रस्तावित राष्ट्रीय स्मारक अतिशय भव्य व दर्जेदार पद्धतीने विकसित केले जाणार आहे. या स्मारकाकडे पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील एक महत्त्वाचे प्रेरणास्थळ व पर्यटन स्थळ म्हणूनच पाहिले जाईल.

हिमंतराव खाडे, प्रांताधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेट-नेट’ परीक्षा सक्तीच्याच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्राध्यापक होण्यासाठी २००९पूर्वी पीएचडी मिळालेल्या वा नोंदणी केलेल्या उमेदवारांना 'नेट-सेट'मधून सूट देण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबादल ठरवला आहे. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका निकालामध्ये 'नेट-सेट'मधून सूट मिळण्याबाबतच्या यापूर्वीच्या सर्व निकालांनाही सुप्रीम कोर्टाने निकालात काढले आहे. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे निर्देशच योग्य असल्याचेही या निकालात स्पष्ट करण्यात आले आहे.

देशभरात सहायक प्राध्यापक किंवा व्याख्याता होण्यासाठी संबंधित उमेदवार राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा (नेट) किंवा राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण असणे सक्तीचे करण्यात आले आहे. गेल्या काही काळामध्ये या परीक्षेबाबत प्राध्यापकांकडून घेण्यात आलेले आक्षेप विचारात घेऊन, २००९पूर्वी पीएचडी मिळालेल्या वा त्यासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना नेट-सेट उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून सूट देण्याचा निर्णय 'यूजीसी'ने घेतला होता. त्या निर्णयानुसार, देशभरातील विद्यापीठांनी प्राध्यापकांसाठी नेट-सेट नसलेल्या उमेदवारांचीही भरती केली होती. हायकोर्टाच्या या निर्णयानुसार अशा सर्वच उमेदवारांनाही 'नेट-सेट'ची सक्ती लागू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पी. सुशीला विरुद्ध 'यूजीसी' या केसमध्ये न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. आर. एफ. नरिमन यांनी सोमवारी हा निकाल दिला. देशातील विविध हायकोर्टांचे यापूर्वीचे निर्णय रद्द करून, प्राध्यापक होण्यासाठी 'नेट-सेट'ची सक्ती लागूच राहणार असल्याचे या निकालात स्पष्ट करण्यात आले आहे. 'यूजीसी'ने उमेदवारांना 'नेट-सेट'मधून सूट देण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारने घेतलेला आक्षेपही या निकालामध्ये महत्त्वाचा मानला गेला आहे. 'यूजीसी'ने केंद्राच्या आदेशांचे पालन करूनच कार्य करण्याचे निर्देश या निकालात नोंदवण्यात आले आहेत. तसेच, एकाच विषयाबाबत देशभरातील विविध हायकोर्टांमधून वेगवेगळी मते नोंदवली गेल्याबद्दलही सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live

Latest Images