Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘कोंडुसकर’ पुन्हा ड्रग वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

खासगी परिवहन क्षेत्रातील बडे प्रस्थ असलेली कोंडुसकर ट्रॅव्हल्स कंपनी पुन्हा ड्रग्ज वादात अडकली आहे. तळेगावजवळ 'एक्स्प्रेस वे'वरील उर्से टोलनाका येथे इस्लामपूरहून मुंबईला नेण्यात येत असलेले 'मेफेड्रोन' हे ड्रग महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि पुणे कस्टम यांनी संयुक्त कारवाईत पकडले. या प्रकरणी कोंडुसकरच्या मालकीची उपकंपनी असलेल्या ओंकार इंडस्ट्रीजच्या सहा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कारमधून तीन कोटी रुपये किमतीचे ५० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्यानंतर जिथे ड्रग बनवण्यात आले, त्या कंपनीवर छापा टाकून तब्बल साडेतीनशे किलो ड्रग जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मुंबई येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

'डीआरआय'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून मुंबईला अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती डीआरआय आणि कस्टमच्या अधिकाऱ्यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यावरून अधिकाऱ्यांनी संबंधित गाडीचा पाठलाग सुरू करून उर्से टोलनाक्याजवळ व्हीआयपी लेनमधून पुढे जाणारी गाडी अडवली. त्यातून नासिर या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या गाडीमध्ये पन्नास किलो मेफेड्रोन नावाचे ड्रग्ज आढळले. हे ड्रग्ज इस्लामपूर येथील एका कंपनीत तयार करण्यात आल्याचे नासिर याने सांगितले. त्यामुळे तेथे जाऊन पथकाने तपासणी केली असता तेथे ३४० किलो ड्रग्ज लपवून ठेवल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी हे ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र कनेक्शन

मागील महिन्यामध्ये दिल्ली येथे अशाच प्रकारचे ड्रग जप्त करण्यात आले होते. ते सांगलीतील कुर्डुवाडी येथे तयार करण्यात आले होते. त्यामुळे या ड्रग्जची मुख्य पाळेमुळे महाराष्ट्रातच असावीत, असा अंदाज 'डीआरआय'च्या केंद्रीय टीमला होता. त्यावरून पथकाने कुर्डुवाडी औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीवर धाड घातली होती, तेव्हा ट्रकमध्ये ५०० किलो मेफेड्रोन सापडले होते. त्याची किंमत ३० कोटी रुपये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस गिझर वापरताय?...सावधान!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गॅस गिझरमुळे होणाऱ्या दुर्घटना या प्रामुख्याने बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नसल्याने होतात. त्यामुळे बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी 'एक्झॉस्ट फॅन' बसवून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बाथरूममध्ये ऑक्सिजनअभावी होणाऱ्या दुर्घटना टाळणे शक्य होईल.

गेल्या आठवड्यात धुळवड साजरी केल्यानंतर अंघोळीसाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाला. कोथरूड येथील कुंबरे पार्क येथे ही घटना घडली. गॅसगिझरमुळे गुदमरून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 'मटा'ने गॅस गिझर विक्रेत्यांशी संवाद साधून नागरिकांनी गॅस गिझर वापरताना काय काळजी घ्यावी, याबाबतची माहिती घेतली. बाजारात इलेक्ट्रिक व गॅस गिझर उपलब्ध आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक गिझरला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, गॅस गिझरलाही चांगली मागणी आहे.

गॅस गिझरमुळे वाफ तयार होते. बाथरूमधून वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्यास मोठ्या प्रमाणावर वाफ साठत जाते आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परिणामी, तेथे कार्बन डायऑक्साईड तयार होण्यास सुरवात होते. त्यानंतरही गॅस गिझर चालूच राहिल्यास ऑक्सिजन नाहीसा होऊन संपूर्ण कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे माणसाचा श्वास गुदमरतो, असे तज्ज्ञ सांगतात.

साधारणपणे बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी असते. मात्र, बहुतांश ठिकाणी ती बंद केली जाते. त्यामुळे आतील वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. यावर उपाय म्हणून बाहेरील हवा आत घेणारा आणि आतील हवा बाहेर सोडणारा एक्झॉस्ट फॅन बाथरूममध्ये बसवावा.

- मनीष पटणे, गॅस गिझर विक्रेते

कोणती खबरदारी घ्याल?

गॅस गिझर खरेदी केल्यानंतर त्याची फिटिंग प्रशिक्षित व्यक्तींकडून योग्य ठिकाणी करून घ्यावी.

गॅस पुरवठ्यासाठी फक्त रबरी पाइप न वापरता त्याला कॉपर फिटिंग करून घ्यावी.

बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन बसवावा किंवा किमान खिडकी उघडी ठेवावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिर्ला हॉस्पिटलला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कायद्यानुसार दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी खाटा राखीव न ठेवल्याच्या तक्रारीवरून आदित्य बिर्ला हॉस्पिटलला जिल्हा प्रशासनाने नोटीस बजाविली आहे. यासंदर्भात योग्य खुलासा न केल्यास हॉस्पिटलची मिळकत सरकारजमा करण्याचा इशारा या नोटिशीत देण्यात आला आहे.

सरकारी जागा किंवा अन्य सवलती देण्याच्या बदल्यात गोरगरीब रुग्णांवर उपचारांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवण्याची अट सरकारकडून घालण्यात येते. त्याची माहितीही सरकारला सादर करणे बंधनकारक आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटलला थेरगाव येथील सहा हेक्टर ३७ आर इतकी जागा देण्यात आली आहे. त्यामध्ये संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये दहा टक्के खाटा आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची शर्त घालण्यात आली आहे. मात्र, या हॉस्पिटलमध्ये गोरगरीबांना तशा सुविधा मिळत नसल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. हे सरकारी शर्तीचे उल्लंघन असल्याचा मुद्दा या तक्रारीत उपस्थित करण्यात आला होता. त्यासंदर्भात मावळच्या प्रांतअधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार प्रांतअधिकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला नोटिसाही बजाविल्या. मात्र, हॉस्पिटलकडून त्याला उत्तर देण्यात आले नाही.

त्यानंतर मावळच्या प्रांतअधिकाऱ्यांनी अहवाल जिल्हा प्रशासनास सादर केला असून, या वस्तुस्थितीची माहिती देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या आदेशानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी हॉस्पिटलला नोटिस बजाविली आहे. शर्तीचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीप्रकरणी पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा, अन्यथा हॉस्पिटलची मिळकत इमारतींसह सरकारजमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे या नोटिशीत बजाविण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून अद्याप हॉस्पिटलला कोणतेही पत्र किंवा नोटिस अद्याप मिळालेली नाही, पत्र मिळाल्यानंतर यासंदर्भात योग्य उत्तर देण्यात येईल, असे आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या सीइओ रेखा दुबे यांनी सांगितले.

नियमांचे पालन नाही

शहरातील अनेक धर्मादाय हॉस्पिटलना सरकारने जमीन किंवा अन्य सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी सामान्यांवरही उपचार करावेत, अशी अट घालण्यात आली आहे. या सुविधेबाबत हॉस्पिटलनी दर्शनी भागात तसे बोर्डही लावणे आवश्यक असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वीच काढला आहे. मात्र, अनेक हॉस्पिटलमध्ये नियमांचे पालन होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांचाच जीव टांगणीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बोर्डाच्या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासामधील अडचणींपेक्षा परीक्षा केंद्रांविषयीच्याच अडचणी जास्त सतावत असल्याचे आता समोर येत आहे. त्यातही मोठ्या शहरांमधील विद्यार्थ्यांचे पालकच विद्यार्थ्यांपेक्षा जास्त दडपण घेत असल्याचा अनुभव बोर्डाने नेमलेल्या समुपदेशकांकडून सांगितला जात आहे.

पिंपरी-चिंचवडमधील एका परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्थेमध्ये गडबड झाल्याची बाब सोमवारी समोर आली. त्या पार्श्वभूमीवर बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधला असता, संबंधित समुपदेशकांनी हा अनुभव विषद केला. परीक्षांदरम्यान विद्यार्थी अभ्यास कसा करावा, लक्षात राहत नसल्यास काय करावे, पेपर कोणत्या शाईच्या पेनने लिहावेत, असे प्रश्न विचारत आहेत. मोठ्या शहरांमधून येणाऱ्या बहुतांश फोनकॉल्समध्ये विद्यार्थ्यांऐवजी त्यांचे पालकच अधिक चिंतीत झाल्याचे त्यांच्या प्रश्नांवरून जाणवत आहे. परीक्षेविषयीच्या भितीमधून आणि दडपणामुळेच असे प्रश्न निर्माण होत असल्याचे डॉ. सोपान बोराटे यांनी स्पष्ट केले. अशा प्रश्नांबाबत समुपदेशन करताना विद्यार्थी आणि पालकांनाही शांत राहण्याचा आणि जास्त चिंतीत न होता परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला समुपदेशक देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अशा वेळी काय करावे?

परीक्षेसाठीच्या बैठक व्यवस्थेमध्ये ऐनवेळी बदल झाल्यास विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव पुष्पलता पवार यांनी केले. बोर्डाने पूर्णपणे विद्यार्थिभिमुख विचार करून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नानाविध उपाय योजिले आहेत. वाहतुकीमधील अडचणींमुळे परीक्षेला उशिर झाल्यास विद्यार्थ्यांनी आपल्याला जवळ असलेल्या परीक्षा केंद्रावर संपर्क साधावा. अशा वेळी ऐनवेळी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठीची सुविधाही बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाविना परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन पवार यांनी केले.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काळातील ताणतणावापासून सुटका करण्यासाठी राज्य बोर्डाने समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षेच्या काळात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत राज्यभरातील विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध असेल. समुपदेशनाच्या माध्यमातून परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे, परीक्षेविषयीची भीती दूर करणे आदी काम केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ९४२२४५३२३५, ९८५०२४६३८९, ९७६३६६७४१६, ९९६०७६०११४, ९४२२०५३३९१, ९८९०१४४१८५, ९८२२७१३९९५, ९८९००५४५१८, ९९२३६८८१९१, ९७६६६६६०९४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य बोर्डाने केले आहे. विद्यार्थी आणि पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिका आदी संदर्भात या समुपदेशकांना प्रश्न विचारू नयेत, असे आवाहन बोर्डाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवितव्याशी खेळ

$
0
0

योगेश बोराटे, पुणे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात घालून उत्तरपत्रिकांची वाहतूक चक्क 'टू-व्हीलर'वरून केली जात आहे. उत्तरपत्रिकांची वाहतूक करण्यासाठी रिक्षाभाडे मंजूर केले जात असले, तरी अनेक ठिकाणी ते वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित धोक्यात घालून ही जोखीम पत्करावी लागत आहे. शासकीय स्तरावर एरवी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असताना दहावी-बारावीसारख्या अतिसंवेदनशील विषयाबाबत मात्र आर्थिक कारण पुढे केले जात आहे.

परीक्षा केंद्रांवरून उत्तरपत्रिका संकलित करून त्या कस्टडीपर्यंत नेण्यासाठी रिक्षाची तरतूद आहे. 'मटा'ने सोमवारी पुण्यात या उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीचा माग काढला. कॅम्प, स्वारगेट, कोथरूड आणि हडपसर या परिसरांत 'मटा'च्या प्रतिनिधीने दुपारी पाहणी केली. त्या वेळी संबंधित भागातील कस्टडीपर्यंत उत्तरपत्रिका पोहोचवण्यासाठी रिक्षाऐवजी 'टू व्हीलर'चा उपयोग केला जात असल्याचे आढळले. 'मटा'च्या प्रतिनिधीला पाहिल्यानंतर त्यापैकी काही जणांनी टू-व्हीलर थांबवून घाईगडबडीने रिक्षासाठी शोधाशोध केली. काही जणांनी तातडीने प्राध्यापकांच्या 'फोर-व्हीलर'चा आधार घेतला. काही कॉलेजांवर रिक्षा उपलब्ध असली, तरी त्यामधून उत्तरपत्रिकांची बोचकी नेताना कोणतीही खबरदारी बाळगली जात नसल्याचे स्पष्ट झाले; तसेच कस्टडीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्तही तैनात करण्यात आला नव्हता. 'टू व्हीलर'वरून उत्तरपत्रिका हरविण्याचे प्रकार घडले आहेत. तरीही त्यांचा वापर केला जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोती-बोचकी आणि आग

उत्तरपत्रिका ठेवण्याच्या कस्टडीत पोती आणि बोचक्यांचा वापर केला जात आहे; तसेच त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्थादेखील नाही. उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या ठिकाणी प्रशासकीय कामांसाठी सर्रास मेणबत्त्यांचा वापर केला जातो. तसेच, त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणादेखील तैनात करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत कस्टडीच्या ठिकाणी कोणती दुर्घटना ओढवल्यास आपत्कालीन व्यवस्थेचा पत्ताच नव्हता, असेही 'मटा'ने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले.

मारहाणप्रकरणी एकास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

किरकोळ कारणावरून पाच जणांवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. गिमेकर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

गोपालसिंग धूलसिंग दुधानी (वय ६०, रा. मुळा मुठा झोपडपट्टी, जुनी सांगवी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मल्लमा मल्लप्पा बहादूर (वय ३०, रा. जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली होती.
२० सप्टेंबर २०१२ रोजी पंपिंग स्टेशनसमोर, मुळा मुठा झोपडपट्टी येथे ही घटना घडली होती. बहादूर यांचा भाऊ परशुराम देवेंद्र भंडारी याच्या शेजारी दुधानी राहायला होता. सायकलचा धक्का लागला या कारणावरुन झालेल्या किरकोळ भांडणाचा राम मनात ठेवून दुधानीने बहादूर यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या चौघांवरही दुधानीने वार केले होते. या केसमध्ये सरकारी वकील सुनील हांडे यांनी १४ साक्षीदार तपासले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपावरील मारहाणप्रकरणी तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील चाळीस हजारांची रोकड पळविणाऱ्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सोमवारी भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. अमोल उत्तम झेंडे (वय २१, रा. कोजागिरी अपार्टमेंट, भारती हॉस्पिटलसमोर), सोमनाथ मारुती खोपडे (वय़ ३५) आणि संदीप साहेबराव कटके (वय २६, रा. गुजरवाडी, कात्रज) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात हारुण खान (वय ३३, रा. वानवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

कात्रज कोंढवा रस्त्यावरील ए. एम. के. एंटरप्रायझेस पेट्रोल पंपावर झेंडेसह त्याचे अन्य दोन साथीदार टेम्पोमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते. पंपावरील कर्मचाऱ्याला न विचारता नोझल स्वतः घेऊन त्यांनी चारशे रुपयांचे डिझेल भरले. याबाबत कामगार सिकंदर शेख यांनी त्याच्याकडे पैसे मागितले. त्यावेळी झेंडे आणि त्याच्या मित्रांनी शिवीगाळ करून मारहाण केली. घाबरलेले शेख केबीनमध्ये गेले. त्यावेळी खान यांनी झेंडे आणि त्यांच्या मित्रांना समजविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिघांनी खान यांना शिवीगाळ करून पेट्रोल पंप पेटवून देण्याची धमकी दिली. पंपाबाहेरील कॅशिअर राहुल रायपुरे आणि मॅनेजर सचिन जयस्वाल यांना मारहाण करून चाळीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर चार लाखांची घरफोडी

कात्रज कोंढवा रस्त्यावरील जय गणेश रेसिडेन्सीमधील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज घरफोडी करून पळविला. या वेळी चोरट्यांनी इमारतीमधील दुसऱ्या सदनिकेतही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. गणेश गांधी (वय २६, रा. कात्रज) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. सोमवारी सकाळी साडेनऊ ते पावणेबाराच्या सुमारास दरम्यान गांधी परिवार सदनिकेला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. लाकडी कपाटातील रोख ३६ हजार ५०० रुपये आणि सोन्याचे दागिने, असा एकूण चार लाख १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याच इमारतीतील ऋषीकेश मोहन किणींगे यांच्या सदनिकेचाही कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलिस निरीक्षक देवकर तपास करीत आहेत.

खुनी हल्ल्याप्रकरणी पतीस सात वर्षे शिक्षा

पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन खुनी हल्ला करणाऱ्या पतीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी सुनावली. तसेच त्याला तीन हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. निर्मलसिंग सुरजसिंग प्रसादसिंग (वय ४०, रा. मोरे वस्ती, चिखली) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. या संदर्भात विजय प्रकाश पवळे (वय २२, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलिसांकडे तक्रार दिली होती. आरोपीची पत्नी १२ एप्रिल २०१४ रोजी घरात झोपली होती. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्याने तिच्यावर चाकूने वार केले. सरकारी वकील संजय पवार यांनी खटल्यात सहा साक्षीदार तपासले. जखमी पत्नीची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. गुन्ह्यात तपास अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक विपुल साळुंखे व हवालदार नकोते यांनी काम पाहिले.

खून प्रकरणातील चौघांना पोलिस कोठडी

धारदार हत्याराने वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केलेल्या आणखी चौघांना १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आकाश भरत थोरात (वय २०), अक्षय दाजीराव इंगुळकर (वय २०), चेतन शिवाजी सरोदे (वय २०), गणेश मारूती मांगडे (वय २०, सर्व रा. रा. सच्चाईमाता मंदिराच्या मागे, आंबेगाव खुर्द) या चौघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी यापूर्वी भावड्या उर्फ मृणाल गोवर्धन ओव्हाळ (वय २०) याला अटक करण्यात आली आहे. विजय रामा चांदणे (वय ३५, रा. आंबेगाव खुर्द) याचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी रवींद्र रामा चांदणे (वय २३, रा. आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना चार मार्च रोजी रात्री साडे आठच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथील समृद्धी एन्टरप्रायझेस सर्व्हे नं. ५० या कंपनीच्या शेजारील मोकळ्या जागेत घडली. याप्रकरणी आरोपींना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले.

मारहाणप्रकरणी एकास सक्तमजुरी

किरकोळ कारणावरून पाच जणांवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. गिमेकर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. गोपालसिंग धूलसिंग दुधानी (वय ६०, रा. मुळा मुठा झोपडपट्टी, जुनी सांगवी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मल्लमा मल्लप्पा बहादूर (वय ३०, रा. जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली होती. २० सप्टेंबर २०१२ रोजी पंपिंग स्टेशनसमोर, मुळा मुठा झोपडपट्टी येथे ही घटना घडली होती.

देशी पिस्तुलासह एकास अटक

पुणेः शिवाजीनगर एसटी स्थानक येथे एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, दोन काडतुसे आणि मोपेड जप्त केली. सूरज कारले (वय २७, रा. हर्षल निवास, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पथक शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत रविवारी रात्री गस्त घालत होते. कारले हा शिवाजीनगर एसटी स्थानक येथे आला असल्याची माहिती पोलिस नाईक श्रीकांत वाघवले यांना मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कुख्यात गुन्हेगार रोहिदास चोरगे याच्यापासून धोका असल्याने संरक्षणासाठी पिस्टल बाळगल्याचे तो सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इनामदार हॉस्पिटलवर राज्यमंत्र्यांची ‘कृपादृष्टी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेची परवानगी न घेता बांधकाम करणाऱ्या वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घ्यावा, असे हायकोर्टाने स्पष्ट केले होते. महापालिकेने या हॉस्पिटलचे पाच मजले बेकायदा ठरवून हॉस्पिटल प्रशासनाने दिलेले बांधकाम नकाशे नामंजूर केलेले असतानाही नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून हॉस्पिटलवर कोणतीही कारवाई करण्यास मज्जाव केला आहे. भाजपचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी याला स्थगिती दिल्याने बेकायदा पद्धतीने पाच मजल्यांचे बांधकाम करणाऱ्या इनामदार हॉस्पिटलला 'अच्छे दिन' आणल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.

वानवडी येथील सर्व्हे क्रमांक १५ मध्ये 'आर ७'च्या जागेवर इनामदार हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. महापालिकेकडून सात मजल्याची परवानगी घेऊन हॉस्पिटल प्रशासनाने येथे तब्बल १२ मजले बांधले असल्याचे समोर आले होते. ही माहिती समोर आल्यानंतर खडबडून जागे होत पालिकेच्या बांधकाम विभागाने हॉस्पिटलच्या बेकायदा बांधकामाला नोटीस बजावून तातडीने हे बांधकाम काढून घ्यावे, असे सांगितले होते; तसेच 'आर ७' आरक्षणात हे हॉस्पिटल बांधण्यात आल्याने पालिकेबरोबर करण्यात आलेल्या करारानुसार दोन मजले पालिकेला द्यावेत, अशी मागणी केली होती. या हॉस्पिटलने केलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासाठी पालिकेचे अधिकारी काही महिन्यांपूर्वी गेले होते. मात्र वरिष्ठ पातळीवरून आलेल्या दबावामुळे ही कारवाई थांबली होती. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने हायकोर्टात धाव घेऊन स्थगिती मिळविली होती. गेल्या महिन्यात हायकोर्टाने यावर सुनावणी देताना 'बेकायदा बांधकामाबाबत पालिकेने निर्णय घ्यावा, तर राज्य सरकारने आर ७ बाबत सहा महिन्यांत निर्णय घ्यावा,' असे सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीच्या मुद्द्यावर विवाहाला विरोध नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जातिअंतासाठी आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत. आंतरजातीय विवाह हा विषय विनाकारण जटील बनवून ठेवण्यात आला आहे. या पिढीतील युवक-युवतींनी सारासार विचार करून त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडला असल्यास फक्त जात या एकाच मुद्द्यावर त्यांच्या लग्नाला विरोध करू नये,' असे आवाहन आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांनी पालकांना केले.

'मिळून साऱ्याजणी' मासिक आणि 'महात्मा फुले समता प्रतिष्ठान' यांच्यावतीने सावित्री-जोतिबा समता उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या अॅड. मीना व अॅड. विशाल जाधव आणि विजय वावरे व शबाना दिलेर या जोडप्यांची मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे-सोनावणे, 'मिळून साऱ्याजणी'च्या संपादक गीताली वि. म, महात्मा फुले प्रतिष्ठानचे सरचिटणीस नितीन पवार या वेळी उपस्थित होते.

मानवी संस्कृतीत स्त्री-पुरुष सहजीवन हे संस्कृतीला पुढे नेणारे नाते असते. त्यात शरीर, मन, भावना, एकमेकांची स्वप्ने आपसात सांगितली पाहिजेत. स्त्रीचा सन्मान राखला पाहिजे. स्वप्न-इच्छा फुलवणारे सहजीवन तिला मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा भिसे-सोनावणे यांनी व्यक्त केली. आम्ही विचारपूर्वक आंतरजातीय विवाहाचा निर्णय घेतला होता. विवाहानंतर मुलीच्या कुटुंबीयांकडून त्याचा स्वीकार करण्यास अडचण आली. अन्यथा आमच्या संसारात इतर कोणताही अडथळा आला नाही, असा सूर दोन्ही जोडप्यांकडून उमटला.

या वेळी विमेन्स नेटवर्ककडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण झाले. अभ्यासात्मक पुस्तकाचा पुरस्कार डॉ. नीला कोंडोलीकर यांना प्रदान करण्यात आला. विशेष पुरस्कार डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांना 'गोफ जन्मांतरीचा' या पुस्तकासाठी आणि रझिया पटेल यांना 'जगणं हिझड्याचे' या पुस्तकासाठी देण्यात आला. पुष्पा पोळघट यांना विशेष कौशल्य पुरस्कार आणि यशोमती द्वैवार्षिक स्मृती पुरस्कार कमल परांजपे यांना सामाजिक एकांकिकेसाठी प्रदान केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा तासांत नऊ बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/पिंपरी

स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील हॉस्पिटलमध्ये अवघ्या दहा तासांत नऊ जणांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. दीड ते दोन तासांच्या अंतराने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे.

नलिनी आनंदराव चव्हाण (५०, रा. हडपसर), वसंत दत्तात्रय जोशी (७६, रा. पर्वती), शीतल भावसार (३४, रा. दत्तनगर, आंबेगाव), संजय शशिकांत पुरंदरे (४९, रा. भुसारी कॉलनी, कोथरुड), सूर्यकांत बोरावके (४८, रा. सासवड) अशी पुणे महापालिकेच्या हद्दीतील हॉस्पिटलमधील बळी गेलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या चोवीस तासांत 'स्वाइन फ्लू'मुळे चार जणांचा मृत्यू झाला. यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अनिल नरहरी गायकवाड (३४, रा. दिघी), शमीम अन्वर शेख (३२, रा. रहाटणी), शिवाजी गोपाळराव मधे (४४, रा. भोसरी) आणि रेखा गुलाबराव रासकर (५५, रा. वाकड), अशी पिंपरीतील मृतांची नावे आहेत.

'स्वाइन फ्लू'मुळे सव्वादोन महिन्यांत मृतांची संख्या सोळावर पोचली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांना दक्ष आणि जागरूक राहण्याचा इशारा दिला असून, वेळीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.

शहरात गेल्या चोवीस तासांत शमीम अन्वर शेख (वय ३२, रहाटणी), अनिल नरहरी गायकवाड (वय ३४, दिघी), रेखा गुलाब रासकर (वय ५५, वाकड), शिवाजी गोपाळराव मधे (वय ४४, भोसरी) यांचा 'स्वाइन फ्लू'मुळे मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सुरक्षारक्षक उत्तम नागू अडसूळ (वय ४०, पिंपळे सौदागर) यांचाही 'स्वाइन फ्लू'ने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होते आहे.

शेख १२ फेब्रुवारीपासून 'वायसीएम'मध्ये उपचार घेत होत्या. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे १६ फेब्रुवारीलाच स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. गायकवाड चार मार्चपासून 'वायसीएम'मध्ये उपचार घेत होते. सात तारखेला त्यांना स्वाइन फ्ल्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी (नऊ मार्च) रात्री नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

भोसरीतील मधे यांच्यावर सहा मार्चपासून आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यांचा रात्री अडीज वाजता मृत्यू झाला. याच हॉस्पिटलमध्ये रासकर यांचाही मृत्यू झाला. महापालिकेचे सुरक्षारक्षक अडसूळ स्वाइन फ्लूचे संशयित पेशंट होते.

हे करा

हात सातत्याने साबण व पाण्याचे धुवा

गर्दीमध्ये जाणे टाळा

खोकताना, शिंकताना तोंडाला रुमाल लावा

भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप घ्या

हे करू नका

हस्तांदोलन अथवा अलिंगन

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे

आजारी मुलांना शाळेत पाठविणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अनधिकृत फ्लेक्स हटवाच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'शहर विद्रुप होण्यास अनधिकृत फ्लेक्स कारणीभूत ठरत असल्याचा आरोप करून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या (दहा मार्च) स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली. अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करा मगच परवाना शुल्क दरवाढीला मंजुरी देऊ,' अशी भूमिका सदस्यांनी घेतली.

शहरात फ्लेक्ससाठी परवाना देताना परवाना शुल्काबरोबर फ्लेक्सचा आकार आणि जमिनीचे भाडेही आकारले जाते. त्यात दरवाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी होता. मात्र, अनधिकृत फ्लेक्सच्या मुद्यावरून सदस्यांनी प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अनधिकृत फ्लेक्स उभारणी होऊ नयेत, याबाबत नेहमी दक्ष असतात. त्यावरून ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची झाडाझडती घेतात. परंतु, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली होती. नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच बैठकीत परवाना शुल्कवाढीच्या प्रस्तावावरून प्रशासनाला धारेवर धरण्याची संधी सदस्यांनी सोडली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारयादीही होणार स्मार्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशभरातील सर्व मतदारयाद्या आधार कार्डांशी लिंक करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. त्याबरोबरच आता मतदारयादीवर मतदाराचा मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडीचाही समावेश करण्यात येणार आहे.

आजपासून (बुधवार) हे कामकाज सुरू होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी दिली. निवडणूक आयोगाने नॅशनल इलेक्टोरल रोल प्युरिफिकेशन अँड ऑथँटिकेशन प्रोग्राम हाती घेतला आहे. त्यामध्ये मतदारयादी आधार क्रमांकाशी लिंक करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत कामकाज चालणार आहे. यामध्ये मतदारांकडून आधारचा तपशील, मोबाइल नंबर आणि ई-मेल, असा तपशील जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे हा तपशील जमा करण्यात येईल, तसेच येत्या १२ एप्रिल रोजी शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर बूथलेव्हल ऑफिसर कामकाज करणार आहेत. तसेच त्यापुढील तीन महिन्यांतही एका रविवारी, अशी महामोहीम हाती घेण्यात येणार आहे.

७७ टक्के आधार नोंदणी

जिल्ह्यात आधार कार्डांसाठी ७७ टक्के नोंदणी करण्यात आली आहे. पुणे शहरात ६७ टक्के नोंदणी झाली आहे. सर्वाधिक, म्हणजे ९८.६४ टक्के नोंदणी झाली आहे, तर वेल्ह्यात सर्वात कमी, म्हणजे ६४ टक्के नोंदणी झाली आहे. यापुढील काळात आधार नोंदणीच्या कामाला पुन्हा गती देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत प्रत्येक गावात आधार नोंदणी शिबिर घेण्यात येणार असून, त्या गावातील आधार नोंदणीचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येईल, असे राव यांनी सांगितले.

मतदारयादीशी 'आधार'चे लिंकिंग

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात कागदपत्रे सादर करा

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टलवर ऑनलाइन तपशील भरा

५१९६९ या नंबरवर एसएमएस करा

ई-मेलद्वारे तपशील सादर करा

१९५०या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधून तपशील सादर करा

येत्या काही दिवसांत मोबाइल अॅप उपलब्ध होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घायवळ टोळीतील एकाकडून पिस्तूल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या निलेश घायवळ टोळीतील एका सदस्याकडून खंडणीविरोधी पथकाने पिस्तूल जप्त केले. दीपक ऊर्फ मोगल्या बाळासाहेब पासलकर (वय २३, रा. कुरण बुद्रुक, वरची वाडी, ता. वेल्हे, जि. पुणे) याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल जप्त केली. खंडणीविरोधी पथकातील कर्मचारी पोलिस नाईक संजय काळोखे यांना सिंहगड रस्त्यावरील भंडारी हॉटेलसमोर आरोपी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. पासलकरला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यात एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळाली. काळे यांनी पासलकरविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी फिर्याद दिली. या संदर्भात पोलिसांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पप्पू तावरे याने पासलकरला दोन वर्षांपूर्वी हे पिस्तूल दिले होते. या गुन्ह्याचा तपास खंडणीविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेलार करीत आहेत. पासलकरविरोधात हवेली व वेल्हा पोलिस ठाण्यात दुखापत, खुनाचा प्रयत्न यासारखे सहा गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपायुक्त जयंत नाईकनवरे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेलार, उपनिरीक्षक मारुती भुजबळ, प्रमोद मगर, सचिन अहिवळे, गणेश माळी आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने सव्वाआठ लाखांना गंडा

$
0
0

पुणे : भूजल सर्वेक्षण विभागात मुलास नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आठ लाख तीस हजार रुपये घेऊन मुलाच्या पालकास गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात कोंढवा पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप एजंटाला अटक करण्यात आलेली नाही.

जाकीर बशीर शेख (रा. कोंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख याच्याविरोधात लक्ष्मण कोंढेकर (वय ५२, रा. पिंपळगाव, ता. खेड ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एप्रिल २०१४ मध्ये हा प्रकार घडला. कोंढेकर हे त्यांच्या मुलासाठी धरणग्रस्तांच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्या ठिकाणी कोंढेकर यांची शेख याच्याशी ओळख झाली. शेख याने त्यांचा विश्वास संपादन करून 'तुमच्या मुलास भूजल सर्वेक्षण विभागात लिपिक म्हणून नोकरीला लावतो,' असे आमिष दाखविले. त्यासाठी फिर्यादीकडून आठ लाख तीस हजार रुपयांची रक्कम घेऊन मुलास नोकरीस न लावता फसवणूक केली. या संदर्भात सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’ अंमलबजावणीसाठी विद्यार्थी संघटना आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खासगी इंग्रजी शाळांच्या शिक्षणहक्क कायद्यामधील (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश न देण्याच्या भूमिकेला आता विद्यार्थी संघटनांकडूनही कडाडून विरोध केला जात आहे. या शाळांनी २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश न दिल्यास, 'नोटा दाखवा आंदोलन' करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने दिला आहे. तर पूर्वप्राथमिक वर्गापासूनच आरक्षित जागांचे प्रवेश न झाल्यास थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने दिला आहे.

'महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन'ने (मेस्टा) राज्य सरकारच्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाविषयीच्या आदेशाची होळी करत आरक्षित जागांवरील प्रवेश न देण्याची भूमिका मंगळवारी जाहीर केली. आरक्षित जागांवरील प्रवेशांची सक्ती केल्यास, पूर्वप्राथमिक वर्गांचे प्रवेशच न देण्याचा इशाराही 'मेस्टा'ने पुण्यात दिला. त्या विरोधात विद्यार्थी संघटनांनीच आवाज उठवला आहे.

पूर्वप्राथमिक इंग्रजी शाळांमधून विद्यार्थी आणि पालकांकडून फीच्या नावाखाली सर्रास पैसे उकळले जातात. या शाळा अद्यापही कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याने हे प्रकार होतात. मात्र, या शाळांनी वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारल्यास, संबंधित शाळांविरोधात नोटा दाखवा आंदोलन करून, हे प्रकार थांबविण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला. इंग्रजी शाळांमधील पूर्वप्राथमिक वर्गांचे प्रवेश मनमानी कारभाराने होतात. मात्र, शिक्षणहक्क कायद्यातील एन्ट्री पॉइंटची तरतूद लक्षात घेता, राज्यातील पूर्वप्राथमिक शाळांनीही २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश द्यायला हवेत. हे प्रवेश न दिल्यास, रिपब्लिकन विद्यार्थी सेना रस्त्यावर उतरणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल म्हस्के यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलच्या विरोधात दंडुका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी सवलती घेऊन त्याबदल्यात गरीब रुग्णांवर उपचार न करणाऱ्या हॉस्पिटलच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. या सर्व हॉस्पिटल्सनी गरीब रुग्णांवर केलेल्या उपचारांचा अहवाल दरमहा पाठविला पाहिजे, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई सुरू करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी दिला.

अनेक धर्मादाय हॉस्पिटलनी सरकारकडून जागा किंवा अऩ्य सोयी सवलती घेतल्या आहेत. या सवलती देताना त्यांनी दहा टक्के खाटा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखून ठेवल्या पाहिजेत, अशी अट सरकारने घातली आहे. त्यासंदर्भात हॉस्पिटलमध्ये बोर्डही लावणे आवश्यक आहे. मात्र, बहुसंख्य हॉस्पिटल्स या अटींचे पालन करीत नसल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात आलेल्या एका तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने आदित्य बिर्ला हॉस्पिटलला कारवाईची नोटीसही पाठविली आहे. मात्र, ही नोटीस मिळाली नसल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले होते. त्यासंदर्भात विचारले असता, यापुढील काळात त्यांना पुन्हा नोटीस बजाविण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल, असे राव यांनी सांगितले. या हॉस्पिटलने पूर्वी पाठविलेल्या नोटिशींनाही दाद दिली नव्हती.

दरम्यान, आदित्य बिर्ला हॉस्पिटलसह शहर व जिल्ह्यातील सर्वच धर्मादाय हॉस्पिटलमधून गोरगरीब रूग्णांवर उपचार होतात की नाही, याची झाडाझडती घेण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. या हॉस्पिटलनी नियमानुसार गोरगरीब रुग्णांवर केलेल्या उपचारांबाबत दरमहा धर्मादाय आयुक्तांकडे अहवाल सादर करणे आवश्यक आहे. या अहवालांवर आता नियमित देखरेख ठेवण्यात येईल आणि त्या अहवालांच्या आधारे किंवा अहवाल न मिळाल्यास संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल, असे राव यांनी सांगितले.याबाबत दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्यात येत असून, गरीब रुग्णांना सुविधा नाकारणाऱ्या हॉस्पिटलच्या विरोधात कारवाई हाती घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांसाठी PMP चा त्रैमासिक पास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महांडळातर्फे (पीएममी) ज्येष्ठ नागरिकांसाठीचा सवलतीचा पास आता तीन महिन्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सोमवारपासून (१६ मार्च) पीएमपीच्या सर्व पास केंद्रांवर त्रैमासिक पासची व्यवस्था उपलब्ध असेल, असे पीएमपीतर्फे कळविण्यात आले आहे.

पीएमपीतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनंदिन पास ४० रुपये, तर मासिक मास ४५० रुपये अशा सवलतीमध्ये दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांना मासिक पास घेण्यासाठी वारंवार पास केंद्रांच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी एकदाच त्रैमासिक पास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गेल्या महिन्यात यशदा येथे झालेल्या एका बैठकीत करण्यात आली होती. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रैमासिक पास उपलब्ध करून देण्याचे पीएमपीने निश्चित केले आहे. हा त्रैमासिक पास तेराशे पन्नास रुपयांत उपलब्ध होणार असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले असून, सोमवारपासून सर्व पास केंद्रांवर तो उपलब्ध असेल; तसेच सध्या ज्येष्ठ नागरिकांना नव्याने ओळखपत्र देण्याची मोहीम राबविण्यात येत असून, ३१ मार्चपर्यंत त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live

Latest Images