Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बँकेची फसवणूक,आरोपीला पो.कोठडी

$
0
0
सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी बनावट नावाने खाते उघडून आणि बनावट दागिने देऊन एचडीएफसी बँकेची सुमारे सव्वा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने बुधवारी दिला.

..तरी बस थांबली नाही!

$
0
0
रस्त्याच्याकडेला असलेल्या लोकांना आणि वाहनचालकांना एसटी बस फरफटत नेत आहे. त्यामुळे अनेकजण रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडले आहेत, अशी माहिती कानावर आली. माझ्याकडील दुचाकीने बसचा पाठलाग सुरू केला. तिला थांबविण्यासाठी आधी टायरवर गोळी झाडल्या तरीही बस ‘नो एन्ट्री’तून जात होती. शेवटी काचेवर गोळ्या झाडल्या... परंतु, बस थांबलीच नाही...

कामास ‌लवकर मिळावी गती

$
0
0
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न, वाहतूक आणि बाह्यवळण रस्त्यावरील सर्व्हिस लेनचा प्रश्न सोडविण्याच्या कामास गती मिळावी, अशी अपेक्षा विधान परिषदेच्या आश्वासन समितीच्या बैठकीत आमदारांनी बुधवारी व्यक्त केली.

एकेरी पादचारी मार्गाचा वापर नाही

$
0
0
गणेशोत्सवात मध्यवस्तीत विविध मंडळांच्या सजावटी पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना करावा लागणारा एकेरी पादचारी मार्गांचा वापर यंदापासून थांबण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या मंडळांसह नागरिकांमधून त्याला होणारा विरोध लक्षात घेऊन यंदा त्याचा फेरविचार करण्याची तयारी पोलिसांनी दर्शविली आहे.

पुण्यात पाऊस कायम

$
0
0
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. रात्री साडेआठपर्यंत ५.३ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली. पुढच्या दोन दिवसांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

पुणेः १४.५४ टीएमसी पाणी मंजूर

$
0
0
पुणे शहराचा पाणीकरार आणि प्रत्यक्ष वापर यावरून वाद सुरू असताना, शहरासाठी खडकवासला, पवना आणि भामा आसखेड धरणातून १४.५४ टीएमसी पाणी यापूर्वीच मंजूर करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. भामा आसखेडचे मंजूर पाणी लवकर न उचलल्यास त्यावरचा हक्क मात्र भविष्यात गमावला जाण्याची भीती आहे.

मुळशीतून १० हजार क्युसेक विसर्ग

$
0
0
भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोटात गेल्या चोवीस तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे मुळशीसह नऊ धरणांच्या सांडव्यातून बुधवारी पाणी सोडण्यात आले. मुळशी धरणातून नीळा नदीत सायंकाळी दहा हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात २४.३९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

ध्वनीप्रदूषण बंदी रात्री बारापर्यंत?

$
0
0
गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणाच्या बंदीची कालमर्यादा रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्याचे अधिकार संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली.

कॉलेजमधील पार्किंग मोफत हवे

$
0
0
कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पार्किंगची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून शहरातील निरनिराळ्या विद्यार्थी संघटनांनी बुधवारी कॉलेज प्रशासनांकडे निवेदने सादर केली. भारतीय विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेस इंटक या संघटनांतर्फे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र परदेशी आणि डीईएस लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. रोहिणी होनप यांना निवेदन देण्यात आले.

पीएमपीची दरवाढ अटळ?

$
0
0
दिवसागणिक वाढत चाललेला तोटा, दोन्ही महापालिकांनी आर्थिक मदत देण्यास दिलेला नकार आणि पुन्हा डिझेल दरवाढीची टांगती तलवार या पार्श्वभूमीवर पीएमपीची पीएमपीची तिकिट दरवाढ अटळ असल्याची चर्चा आहे. येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये दरवाढीसंदर्भात चर्चा होईल, असे सांगण्यात आले.

...म्हणून सिद्दीकीची हत्या झाली!

$
0
0
इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी कातील महमंद सिद्दीकी हा उद्धट स्वभावाचा असल्यानेच गँगस्टर शरद मोहोळ आणि अलोक भालेरावने त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. येरवडा पोलिसांनी बुधवारी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये भालेराव आणि सिद्दीकी यांच्यातील भांडणाचे पर्यावसन सिद्दीकीच्या खुनात झाल्याचे म्हटले आहे.

आरक्षणाचा अभ्यास करा: राज

$
0
0
पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात लोकसंख्येच्या घनतेच्या तुलनेत किती जागेवर आरक्षण ठेवले आहे, याचा बारकाईने अभ्यास करा, अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केली. दरम्यान, पार्किंगची आरक्षण कोणत्याही परिस्थितीत बदण्यात येऊ नयेत, अन्यथा पुण्याची मुंबई होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जादूटोण्याने घेतले ५ लोकांचे बळी

$
0
0
पुण्यात कोथरुड परिसरात लोकमान्य नगर झोपडपट्टीत जादूटोण्यातून एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी आणि तीन मुलांवर विषप्रयोग करून कुटुंबप्रमुखाने स्वतःला जाळून घेतल्याची घटना काल रात्री घडली.

राज्यात अपंग जनगणना

$
0
0
राज्यातील अपंग व्यक्तींची निश्चित आकडेवारी समोर यावी, आणि राज्य सरकारच्या वतीने दिल्या जाणऱ्या सोयीसुविधांचा फायदा अपंग नागरिकांना व्हावा, यासाठी अपंग व्यक्तींची जनगणना करण्याचा महत्वपूर्ण अपंग कल्याण कार्यालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही जनगणना केली जाणार आहे.

मदनलाल नहार यांचे निधन

$
0
0
दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष मदनलाल नहार यांचे दीर्घ आजाराने बुधवारी (५ ऑगस्ट) रात्री निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

पुण्यात सोन्याचा भाव ३२,३००

$
0
0
साठेबाज आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे भारतात सोन्याची किंमत दहा ग्रॅमला ३२ हजार रुपयांच्या पुढे गेली. पुण्यात सोने ३२,३०० या विक्रमी पातळीवर गेले.

लाउडस्पीकर सवलतीचा वापर नाही

$
0
0
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वर्षातून १५ दिवस रात्री बारापर्यंत लाउडस्पीकर लावण्यास परवानगी असली, तरी महाराष्ट्रात गणेशोत्सवातील तीन दिवस वगळता इतर दिवसांचा वापरच झालेला नाही. त्यामुळे, गणेशोत्सवात सर्व दिवस रात्री बारापर्यंत लाउडस्पीकर सुरू ठेवणे नियमानुसारच शक्य आहे.

भावाला जळताना पाहिले...

$
0
0
पौडरोडवरील लोकमान्य कॉलनी लगत असलेल्या मैदानावर काही तरी जळत असल्याचे पाहिले... मनात शंकेची पालही चुकचुकली... सुरक्षा ​भितींवरून उडी मारली आणि जाळाच्या दिशेने पळालो... पाहतो तर काय माझा भाऊ परशुराम जळत होता आणि दोन्ही मुले बाजूला पडलेली होती.... काही करायच्या आतच सारे काही संपले होते... ही हृदय पिळवटून टाकणारी ही करुण कहाणी आहे, परशुरामचा सख्खा भाऊ शरणप्पा कळकंटी याची.

इन्शुरन्स कंपनीला कोर्टाचा दणका

$
0
0
अपघातात गमावलेल्या तरुण मुलाची नुकसानभरपाई मिळावी, म्हणून त्याच्या आईवडिलांनी कोर्टात दावा दाखल केला. मात्र, मुलगा अविवाहित असल्याचे कारण देऊन नुकसानभरपाईची रक्कम कमी देणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला कोर्टाने चांगलाच दणका दिला.

शाळांमध्ये अॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सुमारे चारशे शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात ‘अॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग’ (कृतीतून शिक्षण) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर या उपक्रमाचा ‘श्रीगणेशा’ होईल.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images