Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुख्यालयातच पोलिसाची आत्महत्या

$
0
0
पुणे पोलिस दलात प्रशिक्षण घेत असलेल्या नवनियुक्त पोलिस कर्मचाऱ्याने मुख्यालयातील झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. दोघा प्रशिक्षकांनी पैशांची मागणी केल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने पाठवलेल्या एसएमएसमध्ये तसेच अंगावरील पॅन्टवर पेनाने ​लिहिले आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघा प्रशिक्षकांना अटक केली आहे.

मध्यरात्रीनंतरही... 'वाजवा रे वाजवा'

$
0
0
गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशासारखी पारंपरिक वाद्ये मध्यरात्रीनंतरही वाजविण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणावरून खटल्यांना सामोरे जावे लागणाऱ्या गणेश कार्यकर्त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सुपर सायनाला पुण्यात 'सुपर होम'

$
0
0
भारताची 'फुलराणी' म्हणून ओळखली जाणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आता पुणेकर होणार आहे. लंडन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदकावर नाव कोरून इतिहास रचणा-या सुपर सायनाला हिंजवडी इथं एक आलिशान प्लॅट देऊन अविनाश भोसले इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे तिचा सत्कार करण्यात येणार आहे.

परराज्यांतील खव्याला बंदी

$
0
0
गणेशोत्सवादरम्यान मिठाईसाठी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यातून येणारा खवा खरेदी करायला आता मनाई करण्यात आली आहे. मिठाईतील भेसळ रोखण्याबरोबर होणारी विषबाधा टाळण्यासाठी पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही आक्रमक भूमिका घेतली आहे.

जुन्या दराने जादा पाणी द्या

$
0
0
पुण्याला जलसंपदा विभागाने पूर्वीच्या दराप्रमाणे पाण्याचा वाढीव कोटा देण्याचा ठराव स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्यांनी मंगळवारी एकमताने घेतला. पाणीसाठयाबाबत करार करण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आला असला, तरी यापुढे कराराच्या मसुद्याला स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता घेण्याची अट घालण्यात आली आहे.

‘अॅम्फी’ची शताब्दी

$
0
0
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे ब्रिटिश राजसत्तेला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आवाज घुमला नि ऐतिहासिक अॅम्फी थिएटरची शताब्दी बुधवारी खऱ्या अर्थाने साजरी झाली.

शिक्षकांना गुणवत्तेआधारे पुरस्कार

$
0
0
शाळा, शिक्षक आणि शाळेतील गुणवत्तेचे मूल्यमापन करूनच यापुढील काळात जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक आणि शाळा पुरस्कार जाहीर केले जातील, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी सांगितले. शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी लवकरच हेल्पालाइन सुरू केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

मांडवांच्या आव्वाजावर कॉपीराइटचा बडगा

$
0
0
वीज कनेक्शनबरोबरच गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना आरती-भक्तिपर गाणी वाजवितानाही आता खबरदारी घ्यावी लागणार आहे. भक्तिगीतांची सीडी वाजविण्यासाठी परवाना न घेतल्यास मंडळांवर कॉपीराइट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा इंडियाज कॉपीराइट इन्व्हेस्टिगेशन संस्थेतर्फे देण्यात आला आहे.

मोहरीच्या तेलात भेसळ

$
0
0
मोहरीच्या तेलात भेसळ आढळल्याने सांगली जिल्ह्याच्या भिलवडीतील विक्रेत्यास दहा हजार रुपये दंड भरण्याचा आदेश एफडीएच्या अन्न विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिला.

इको-फ्रेंडली गणेशमूर्ती

$
0
0
गणेशोत्सवाच्या तयारीचा फिल कॉलेज कँपसमध्येही जाणवू लागला आहे. मराठवाडा मित्र मंडळाच्या स्कूल ऑफ इंटेरिअर डिझाइनच्या विद्यार्थ्यांचीही इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याची लगबग सुरू आहे. यंदाच्या गणेशोत्सवात आपापल्या घरी या मूर्तींची प्रतिष्ठापना हे विद्यार्थी करणार आहेत.

आणखी एक धक्का...

$
0
0
अनधिकृत बांधकामांना यापुढील काळात सार्वजनिक सेवा-सुविधा न देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी तयार केला आहे. विधी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

'ती' मिरवणूक लक्ष्मी रस्त्यानेच हवी

$
0
0
दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील ताण हलका करण्यासाठी टिळक रस्त्याऐवजी मानाच्या पाचव्या केसरीवाडा ट्रस्टनेही लक्ष्मी रस्त्यानेच मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिसांतर्फे बुधवारी करण्यात आले.

जलवाहिनीचे काम होऊ देणार नाही

$
0
0
मावळ तालुक्यातील पवना थेट जलवाहिनी योजनेचे काम कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा आमदार बाळा भेगडे यांनी दिला आहे. पवना थेट जलवाहिनीच्या कामाला गती देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत मंगळवारी (चार सप्टेंबर) घेण्यात आला.

स्वाइन फ्लूच्या पेशंटची संख्या ५५ वर

$
0
0
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लू ची लागण झालेला एक पेशंट बुधवारी दाखल झाला. तर, सहा संशयित पेशंट शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यामुळे शहरात स्वाइन फ्लू च्या आजाराची लागण झालेल्या पेशंटची संख्या ५५ झाली आहे.

ऑनलाइन प्रक्रियेत त्रुटी नाहीत

$
0
0
‘पुणे विद्यापीठाचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेली ऑनलाइन प्रक्रिया सुरळित सुरू असून, कॉलेजांनी पाठवलेल्या सूचनांवर विचार करून अनुषंगिक बदल करण्यात येत आहेत,’ अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी ‘मटा’ला दिली.

पेशंटची होतेय फसवणूक!

$
0
0
आर्थिक मदत देण्याचे आमिष दाखवून शहरातील अनेक हॉस्पिटलमधील पेशंटच्या नातेवाईकांची अनेक भामटे फसवणूक करीत असल्याचे उघडकीस आले आहे.

खेड येथे सायबर कॅफे चालक गजाआड

$
0
0
पुणे शहरात गणेशोत्सवात घातपात करणारा ई-मेल २५ ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्तालयाच्या मेलवर खेड येथील सायबर कॅफेतून पाठविण्यात आला होता. या सायबर कॅफेमधील कम्पुटरवर बंदी असलेले डी-फ्रीज सॉफ्टवेअर असल्यामुळे तपासास अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, सायबर कॅफे चालकांनी ग्राहकांची कोणतीही माहिती ठेवली नसल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

दोन ठिकाणी सोनसाखळी चोरी

$
0
0
कोथरुड येथील सदाशिव गृहरचना संस्थेसमोरून चाललेल्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. दुचाकीवर आलेल्या आरोपीने या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.

‘रिव्हर व्ह्यू’, ‘माया’वर

$
0
0
करमणूक कर विभागाची परवानगी न घेता चिल्लर पार्टी आयोजित करणाऱ्या मुंढवा येथील हॉटेल रिव्हर व्ह्यू आणि वाघोली येथील माया रेस्टॉरंटच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

स.पो.निरीक्षकाची जामीनावर सुटका

$
0
0
चालकाला पोलिस स्टेशनमध्ये न आणल्यास गाडीच्या मालकाला अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच घेतलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाची बुधवारी कोर्टाने जामिनावर सुटका केली. दर गुरुवारी पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचा आदेशही कोर्टाने दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images