Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विमानप्रवास, मोबाइलवर लाखो रुपयांची उधळपट्टी

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ हा भ्रष्टाचाराचे कुरण ठरल्याचे संघाच्या संचालकांवर ठेवलेल्या दोषारोप पत्रावरून स्पष्ट झाले आहे. संचालकांनी केलेला विमान प्रवास, वाहन खर्च आणि मोबाइल खरेदी व दुरुस्ती यावर तब्बल २० लाख ७१ हजार रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

पीएमपीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील बंद बस रस्त्यावर आणण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पगार रोखल्यानंतर आता पीएमपीचे मुख्य अभियंता आणि भांडार अधिकारी या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

शैक्षणिक इमारतींना आता जादा बांधकाम

$
0
0
मंजूर प्रादेशिक योजनेतील ‘शेती व ना विकास’ विभागात शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांच्या इमारतीसाठी वाढीव चटईक्षेत्र (एफएसआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, नगरसह पंधरा जिल्ह्यांत हे वाढीव चटईक्षेत्र मिळणार आहे.

पुण्याची मेट्रो आकसाने मागे ठेवली

$
0
0
‘नागपूरचे लोकप्रतिनिधी किती कार्यक्षम आहेत, हे दाखविण्यासाठी फक्त नागपूर मेट्रोचे उद्घाटन केले आणि पुण्याची मेट्रो आकसाने मागे ठेवली आहे,’ असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर केला.

एक लाख उत्पन्नाची अट

$
0
0
पालिकेतर्फे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीवर दरवर्षी वाढणाऱ्या खर्चाला लगाम घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्यासह खुल्या गटातील विद्यार्थ्यांना वाढीव टक्केवारीची अट लागू करण्यास सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी एकमताने मंजुरी दिली.

तीन वर्षांखालील मुलांचे प्रवेश रद्द करणार

$
0
0
नर्सरी प्रवेशासाठी किमान तीन वर्षे वयाची अट येत्या शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेले प्रवेश अडचणीत येणार आहेत. ३१ जुलै २०१५ रोजी ज्यांचे वय तीन वर्षे किंवा त्याहून अधिक असेल अशाच मुलांचे प्रवेश ग्राह्य धरले जातील.

पुणेकर अनुभवणार अनोखा रविवार

$
0
0
येता रविवारी पुणेकरांसाठी खास भेट घेऊन येणार आहे. ही भेट आहे, ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रमाची ! नागरिकांना घराबाहेर पडून सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेत ताज्या शुद्ध हवेत ताजेतवाने होण्याची संधी मिळवून देणारा हा उपक्रम आहे. त्यातच रस्त्यावरील वाहतूकही बंद राहणार असल्याने निर्धास्तपणे मौजमजा करता येणार आहे. म्हणूनच याबाबतची चर्चा आणि उत्सुकता पुणेकरांमध्ये दिसून येत आहे.

‘क्लालिटी टाइम्स’ रविवार सकाळचा

$
0
0
एरवीच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमध्ये आपल्या कुटुंबीयांसाठी वेळच देता येत नसल्याची खंत व्यक्त करणारे हजारो पुणेकर येत्या रविवारी ‘क्वालिटी टाइम’ अनुभवणार आहेत. विविधरंगी आकर्षक वेशभूषा, एरोबिक्सपासून योगासने, बॅडमिंटनपासून फुटबॉल आणि मनसोक्त गप्पा……

आघाडीतही ‘राष्ट्रवादी’ची धोरणे भाजपकेंद्रित

$
0
0
‘आपल्या सरकारच्या काळात गृह खाते आपल्याकडे नव्हते, ही मोठी चूक झाली,’ असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी नमूद केले. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडणे, हे भाजपला मदत करण्यासाठीच होते, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीवर शरसंधान केले.

सायकल खरेदीचा प्रस्ताव पुढे ढकलला

$
0
0
पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना; तसेच नागरवस्ती विभागांतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सायकलींच्या दरावरून स्थायी समितीमध्ये एकमत न झाल्याने हा प्रस्तावच पुढे ढकलण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली.

घरबांधणी परवानगी आठवड्यात

$
0
0
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम लागू केलेली टाइप प्लॅनची योजना बुधवारी राज्यभरात लागू करण्यात आली. आपल्या मालकीच्या दोन गुंठ्यांच्या प्लॉटवर सरकारने निश्चित करून दिलेल्या टाइप प्लॅनपैकी एखादा आराखडा निवडला, तर फक्त अर्जाद्वारेच आठ दिवसांतच घर बांधण्याची परवानगी मिळणार आहे. त्यासाठी आर्किटेक्टची गरज लागणार नाही.

मुंबईतील सराफाची रास्तापेठेत लॉजमध्ये हत्या

$
0
0
रास्ता पेठेतील सुंदन लॉजमध्ये मुंबईतील एका व्यावसायिकाचा धारधार हत्यारांनी वार करत खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. या प्रकरणी दोघे आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

प्राथनास्थळावरील कारवाईचे पडसाद

$
0
0
सहकारनगर भागातील प्रार्थनास्थळावर महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना, भाजपच्या सभासदांनी सभागृहात गोंधळ घातला. सभा सुरू होऊन दीड तास झाल्यानंतर सभासदांना कारवाईची आठवण झाली आणि त्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

समकालीन जाणिवांचे संगीत नाटक हवे

$
0
0
‘मराठी संगीत नाटकांची परंपरा उज्ज्वल आहे. मात्र, आताच्या काळातही मानापमान, सौभद्रच्या पलीकडे संगीत नाटक जात नाही. त्यामुळे संगीत नाटकांची अवस्था बिकट आहे. मात्र, संगीत नाटकांची परंपरा जतन करतानाच समकालीन जाणिवांचे प्रतिबिंब उमटणाऱ्या संगीत नाटकांची गरज आहे,’ अशी भूमिका नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री फैय्याज यांनी मांडली.

खासगीकरणाची टपाल खात्याला झळ

$
0
0
टपाल खाते घरोघरी पोहोचले असले, तरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि खासगीकरणाची झळ पोहोचल्याने या खात्याला ‘घरघर’ लागली आहे. सेवाभावी वृत्तीने लोकांना टपाल सेवा देणाऱ्या या खात्याला गेल्या वर्षभरात तब्बल पाच हजार ४२५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला असल्याने ‘आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी स्थिती झाली आहे.

नदीपात्रातील रस्ता झालाच पाहिजे

$
0
0
सिंहगडरोडवरील वाढती वाहतुकीची समस्या पाहता नागरिकांच्या हितासाठी विठ्ठलवाडी ते वारजे हा नदीपात्रातील रस्ता महत्त्वाचा आहे. हा रस्ता झालाच पाहिजे, अशी मागणी गुरुवारी मुख्य सभेत करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाने संपूर्ण अभ्यास करून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

‘महसूल विभागाची तत्परतेने कारवाई’

$
0
0
भ्रष्ट कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत महसूल विभाग चालढकल करीत असल्याचे लाचलुचपत खात्याने निरीक्षण योग्य नसल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी त्या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

स्वागताध्यक्षपदी डॉ. साठे

$
0
0
बेळगाव येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होणार हा प्रश्न गुरुवारी मिटला. बेळगावचे ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अशोक साठे यांची निवड करण्यात आली. त्याबाबतचे पत्र नाट्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर व बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी डॉ. साठे यांना दिले.

पुण्यातही खबरदारीच्या सूचना

$
0
0
प्रजासत्ताक दिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भारत भेट या पार्श्वभूमीवर पुणे शहरात खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात विशेषतः मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवल्यामुळे पुणे शहरातील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

बेवारस नोंद केल्याने मृताचे नातेवाइक संतप्त़़

$
0
0
टेम्पोच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची बेवारस मृतदेह म्हणून नोंद करून शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्याच मोबाईल फोनवरून त्याच्या मृत्यूची माहिती नातेवाइकांना देण्याचा प्रकार येथे घडला. यामुळे संबंधित तरुणाच्या संतप्त नातेवाइकांनी गुरुवारी (ता. २२) सकाळी वायसीएम हॉस्पिटलच्या शवविच्छेदन गृहाबाहेर गर्दी केली होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images