Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पिंपरीत २ दिवसांत विनयभंगाच्या ४ घटना

$
0
0
युवतीची छेडछाड आणि त्यानंतर तिने केलेली आत्महत्या यामुळे सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच मंगळवारी आणि बुधवारी या दोन दिवसांत चार महिलांचा विनयभंग झाल्याच्या घटना एकट्या पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

कबुतरांच्या ढाबळी काढून टाका

$
0
0
शहरातील झोपडपट्ट्यांसह वसाहतींमधील महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांवर आणि इतर परिसरात असलेल्या कबुतरांच्या ढाबळी काढून टाकण्याचे आदेश महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी गुरुवारी दिले.

‘सांस्कृतिक धोरण ६ महिन्यांत ठरवू’

$
0
0
‘महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाबरोबर सांस्कृतिक क्षेत्राचाही विकास केला जाईल. त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक धोरण येत्या सहा महिन्यात ठरविण्याचा प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे दिली.

हिंजवडीत सुरक्षेसाठी कंपन्यांचाही पुढाकार

$
0
0
पुण्याला ‘आयटी हब’ अशी ओळख मिळवून देणाऱ्या हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क परिसराच्या सुरक्षेसाठी कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील गस्तीसाठी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने पोलिस खात्याला दोन अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून दिली.

कचऱ्यासाठी मोफत ‘बकेट’

$
0
0
ओला आणि सुका कचरा स्वतंत्ररित्या साठविण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक कुटुंबाला प्लॅस्टिकच्या दोन बकेटचे मोफत वाटप महापालिकेमार्फत केले जाणार आहे.

‘हुतात्मा राजगुरू यांचे स्मारक उभारणार’

$
0
0
‘थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे भव्यदिव्य स्मारक लवकरात लवकर उभे राहावे, यासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली जाईल. तसेच पुणे जिल्हा नियोजन समिती व वेगवेगळ्या माध्यमातून देखील टप्प्याटप्प्याने या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

बारामती आरटीओ कार्यालय एजंटमुक्त

$
0
0
महाराष्ट्रातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी सरकारने राज्यातील आरटीओ कार्यालये एजंटांच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर होणारी गैरसोय टाळण्यासाठी दुसऱ्या दिवशी बारामती कार्यालय सज्ज झाले होते.

बिया वेगळे करणारे यंत्र विकसित

$
0
0
सीताफळातील गर व बिया वेगळे काढणारे यंत्र अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेे. सासवड येथे जय मल्हार फळ व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्थेच्या वतीने फळउत्पादक शेतकरी यांच्यासाठी या यंत्राचे उद‍्घाटन करण्यात आले, असल्याची माहिती राज्य जय मल्हार फळ व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली.

सावित्रीबाई फुलेंचा पुरस्कार देणे गौरवाचे

$
0
0
‘अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचे काम उभे केले तोच वारसा आजही आपल्या आवडीच्या क्षेत्रात ताकदीने पुढे नेत असलेल्या दोन महिलांना अत्रे यांच्या भूमीत सन्मानित करण्याचे भाग्य मला लाभले आहे,’ असे ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.

एकाच गावाचे दप्तर १८ वर्षांत जमा

$
0
0
महापालिकेत समाविष्ट होऊन १८ वर्षे उलटल्यानंतरही २३ गावांपैकी केवळ एक गाव वगळता इतर कोणत्याही गावातील जन्म-मृत्यूच्या नोंदीचे दप्तर महापालिकेकडे जमा झालेले नाही.

भारत अस्मिता पुरस्कार जाहीर

$
0
0
माईर्स एमआयटीतर्फे दिले जाणारे यंदाचे भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार बुधवारी जाहीर झाले.

‘नद्यांच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी प्रकल्प’

$
0
0
‘व्याघ्र प्रकल्प, हत्ती प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नद्यांच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र प्रकल्प सुरू होण्याची गरज आहे. यासाठी मी नद्यांच्या स्रोतांचा अभ्यास आणि संशोधन करणारे दोन प्रशिक्षण वर्ग सुरू करणार आहे,’ अशी माहिती यशदाचे माजी अधिष्ठाता डॉ. भारत भूषण यांनी शुक्रवारी दिली.

५० मिळकतींना २ दिवसांत टाळे

$
0
0
मिळकतकरातून पहिल्या नऊ महिन्यांत अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने उद्दिष्ट गाठण्याकरीता मिळकतकर विभागातर्फे थकित मिळकती सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये शहराच्या विविध भागांतील ५० मिळकतींना टाळे ठोकण्यात आले.

बसचालकांचे आंदोलन मागे

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील खासगी ठेकेदारांच्या बसचालकांचे विविध मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.

बोगस सातबारा; तलाठी निलंबित

$
0
0
जमिनीचे प्रचंड भाव असलेल्या पाषाण भागातील तलाठ्याने मोठ्या प्रमाणावर बोगस सातबारा उतारे दिल्याचे उघडकीस आले असून, हा प्रकार निदर्शनास आल्याने या तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे.

दर्जाहीन रस्त्यांमुळेच अपघातांत वाढ

$
0
0
‘देशातील रस्त्यांवर दरवर्षी पाच लाख अपघात होतात. यामध्ये दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात तर तीन लाख नागरिक अपंग होतात. अपघातांमध्ये ७० टक्के वाहनचालकांची चुकी असल्याचा दावा सरकारकडून केला जातो.

पुणे-शिरूर रस्ता प्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा

$
0
0
पुणे-शिरूर रस्ता प्रश्नी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयात २६ जानेवारीला आंदोलन केले जाणार आहे. अनेकदा निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रमोद मोहोळे यांनी केला आहे.

विक्रीकर निरीक्षकाची पूर्वपरीक्षा एक फेब्रुवारीला

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा येत्या १ फेब्रुवारी रोजी होत असून या परीक्षेला पुणे केंद्रातून ४८ हजार ८६८ विद्यार्थी बसणार आहेत. शहरी व ग्रामीण भागातील १२३ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

साहित्य संमेलनात देवी यांची मुलाखत

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणारे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलन विविध विषयांवरील परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे.

खासगीकरणाची टपाल खात्याला झळ

$
0
0
टपाल खाते घरोघरी पोहोचले असले, तरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि खासगीकरणाची झळ पोहोचल्याने या खात्याला ‘घरघर’ लागली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images