Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वाघांची निर्यात शक्य नाही़

$
0
0
‘भारतातील राज्यांमध्येही वाघांची देवाणघेवाण झाली नाही. त्यामुळे वाघांची संख्या वाढल्यानंतर त्यांची निर्यात करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होणार नाही,’ असे स्पष्ट मत वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रेय यांनी मांडले.

एजंट हद्दपारीची भूमिका योग्यच

$
0
0
‘प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) एजंटला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे,’ अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे शुक्रवारी कौतुक केले.

बंद केलेले रस्ते लवकरच खुले

$
0
0
पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्डांच्या हद्दीतील लष्कराकडून बंद करण्यात आलेले रस्ते खुले करण्याबाबतच्या आदेशाचे पत्र संरक्षण मंत्रालयाकडून प्रिन्सिपल डायरेक्टर ऑफ डिफेन्स इस्टेट (पीडीडीई) विभागाला पाठविण्यात आले आहे.

‘भाऊसाहेब’ आता नावापुरतेच!

$
0
0
जमीन खरेदी केल्यानंतर तत्काळ फेरफार उतारा आणि अवघ्या पंधरा दिवसांत मालकी हक्काचा सातबारा उतारा मिळाला तर... स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात येत आहे. भोर तालुक्यात तर येत्या स्वातंत्र्य दिनापासूनच ही योजना सुरू होत आहे.

मेट्रोसाठी आघाडीने काय केले?

$
0
0
‘पुणे मेट्रोबाबत केंद्र सरकार आकसाने वागत असेल, तर माजी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला चार वर्षांत मंजुरी का मिळविली नाही,’ असा प्रतिप्रश्न करत भारतीय जनता पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांचे शुक्रवारी खंडन केले.

अश्लील शेरेबाजी, कलाकारांचा संताप

$
0
0
पुण्यातील बार काऊन्सीलने टिळक स्मारक मंदिरात आयोजित केलेल्या ‘मिस्टर अॅण्ड मिसेस' या नाटकादरम्यान अश्लील शेरेबाजी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सुसंस्कृत म्हणवल्या जाणा-या पुण्यातील या शेरेबाजीने नाटकाचे कलाकार मधुरा वेलणकर आणि चिन्मय मांडलेकर संतापले आहेत.

वंदना चव्हाण यांना हटवा

$
0
0
विधानसभा आणि कँटोन्मेन्टच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांना शहराध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी थेट पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतच बुधवारी करण्यात आली.

हजार कोटींचा स्वाहाकार

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पुण्यातील मुख्यालयाच्या इमारतीसह गुलटेकडी व कोल्हापूरमधील भूखंडाचे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर विकसन करण्याच्या करारात १०५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कचराकोंडी सोडविण्यास २७० जणांवर गुन्हे

$
0
0
प्रभागात तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट प्रभागातच लावता यावी, यासाठी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर भर दिला जात आहे. सोसायट्यांमधील कचरा सोसायटीच्या आवारातच जिरविला जावा, यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील ६८ बंद गांडूळखत प्रकल्प सुरू करण्याचे आव्हान वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयासमोर आहे.

‘विद्यार्थी सहायक’चे हीरक महोत्सव कार्यक्रम

$
0
0
उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या विद्यार्थी साहायक समितीचे यंदा हीरक महोत्सवी वर्ष आहे. समितीच्या हीरक महोत्सवाचे उद्घाटन येत्या सोमवारी (दि. २६ जानेवारी) सायंकाळी ४.३० वाजता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवनच्या आवारात होणार आहे.

रंगणार सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सव

$
0
0
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारा सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सव यंदा २३ ते २६ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. सेनापती बापट रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात सायंकाळी ६.३० वाजता महोत्सवातील कार्यक्रम होणार आहेत.

काँग्रेसमधील गटबाजी उफाळली

$
0
0
सक्षम नेतृत्त्वाविना अधोगतीकडे वाटचाल करीत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. महापालिकेतील गटनेतेपदी कैलास कदम यांची निवड झाल्यानंतर प्रभारी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या विरोधात १३ पैकी नऊ नगरसेवकांनी ‘असहकार’ पुकारला आहे.

‘खिदमतगारांच्या मकाना’चा अमृत महोत्सव

$
0
0
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रदेश आणि देशभरातील काँग्रेसच्या वाटचालीचा महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या काँग्रेस भवनास येत्या सोमवारी (२६ जानेवारी) ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अठरा वर्षांत एकाच गावाचे दप्तर जमा

$
0
0
महापालिकेत समाविष्ट होऊन १८ वर्षे उलटल्यानंतरही २३ गावांपैकी केवळ एक गाव वगळता इतर कोणत्याही गावातील जन्म-मृत्यूच्या नोंदीचे दप्तर महापालिकेकडे जमा झालेले नाही. त्यामुळे पालिका हद्दीत समाविष्ट होऊन अनेक वर्षे उलटल्यानंतरही या २२ गावांतील नागरिकांना जन्म- मृत्यूच्या दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागत आहे.

नारायणगावात बिबट्याची कातडी जप्त

$
0
0
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) नारायणगाव परिसरात ​दोघांना अटक करत त्यांच्या ताब्यातून सव्वा लाख रुपये किमतीची बिबट्याची कातडी जप्त केली आहे. या कातडीची विक्री करण्यात येणार होती. दोघेही आरोपी औरंगाबाद येथील असून त्यांनी ही कातडी कोठून आणली, याचा तपास सुरू आहे.

सांगवीत उद्यापासून ‘कलाश्री महोत्सव’

$
0
0
सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळातर्फे २४ ते २६ जानेवारीच्या कालावधीत ‘कलाश्री संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये पं. सुरेश तळवलकर यांना ‘कलाश्री पुरस्कार’ तर, विश्वनाथ दाशरथे यांना ‘युवा गायक पुरस्कार’ देण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक सुधाकर चव्हाण यांनी दिली.

उपाध्यक्षपदासाठी भाजपही प्रयत्नात

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत भाजपक्षाचा एकच उमेदवार निवडून आला, तरी काँग्रेसमध्ये असलेल्या अंतर्गत वादाचा फायदा घेत, अपक्षांच्या मदतीने उपाध्यक्षपद खिशात घालण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.

देहूत ग्रामजागर साहित्य संमेलन

$
0
0
श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पिंपरी-चिंचवड विभागाच्या येत्या शनिवारी आणि रविवारी (२४ आणि २५ जानेवारी) देहू येथे ग्रामजागर साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये काव्यसंमेलन, व्याख्यान, परिसंवाद, अभिरुप कोर्ट कार्यक्रमांचा समावेश आहे.

शास्तीची नाही सक्ती

$
0
0
‘एलबीटी’ रद्दचे आश्वासन, शास्तीची धास्ती आणि विकासकामांवरील वाढीव खर्च यामुळे प्रशासकीय आर्थिक डोलारा सांभाळणे पिंपरी-चिंचवड महापालिकेला अशक्य झाले असताना प्रशासनाने मिळकतकर वसुलीसाठी नवी युक्ती शोधली आहे.

स्मृती जागल्या ‘कला’कृतींच्या

$
0
0
नव्याने भेटलेले जुने मित्र-मैत्रिणी... एकमेकांच्या ख्याली-खुशालीने झालेला आनंद... रंगलेल्या गप्पांमधून ताज्या झालेल्या आठवणी... गतकाळाच्या आनंदाचा मिळालेला पुनःप्रत्यय...निमित्त होते नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने आयोजित ज्येष्ठ कलावंत मेळाव्याचे!
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images