Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सायबर कॅफेत तरुणाची आत्महत्या

$
0
0
हडपसरमधील माळवाडी येथील ‘स्पायडर सायबर कॅफे’त एका २५ वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आली. आत्महत्यचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.

दोषी ठेकेदारांची चौकशी सुरूच

$
0
0
ठेकेदारांची चौकशी करणाऱ्या, त्यांना ब्लॅकलिस्ट करणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांवर ‘बदली’चा बडगा उगारूनही संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामांचे चौकशी सत्र पालिकेने सुरूच ठेवले आहे. नितीन वरघडे या ठेकेदाराने केलेल्या दोनशेहून अधिक कामांची आता सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये बारामती मागे

$
0
0
केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’ चा नारा दिला, तर त्या पाठोपाठ राज्यात आलेल्या फडणवीस सरकारने ‘मेक इन महाराष्ट्र’ ची घोषणा केली. नवीन उद्योजकांना गुंतवणूक करण्यासाठी सुलभ परवाने मिळवता येण्यासाठी उच्चस्तरीय समित्या नियुक्त केल्या.

स्मार्ट कार्ड केवळ नावालाच ‘स्मार्ट’

$
0
0
पुण्यात वाहन चालविणाऱ्या तेरा लाख वाहन चालकांकडे असणारे स्मार्ट कार्ड लायसन्स अस्सल वा बनावट आहे, याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) फक्त दोन हँड होल्ड मशिन (कार्ड रीडर) उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रिक्षांची बिले थकली

$
0
0
पालिका शिक्षण मंडळाच्या क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांची सहा महिन्यांची बिले थकल्याप्रकरणी रिक्षाचालकांसह, पालक आणि विद्यार्थ्यांनी शनिवारी पालिकेसमोर आंदोलन केले.

बस खरेदी निधी परत जाण्याची ‌भीती

$
0
0
पुणे महापालिकेच्या लेखा विभागाच्या मनमानी कारभारामुळे पीएमपीएमएलला २६० बस खरेदीसाठी मिळालेला केंद्र सरकारचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. यामध्ये महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी लक्ष घालून पीएमपीची बस खरेदी मार्गी लावावी, अशी मागणी पीएमपीएमएलचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केली.

ड्रायव्हिंग लायसन्स धोरणात फेरबदल होणार

$
0
0
वाहनचालकांना ड्रायव्हिंग लायसन्स देताना अधिक कठोर परीक्षा घेण्याचा विचार सुरू असून, लवकरच या प्रक्रिये‌त फेरबदल करून धोरण निश्चित केले जाईल, असे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी स्पष्ट केले.

वाहतूक नियमांबद्दल नवशिके अनभिज्ञ

$
0
0
वाहन चालविण्याच्या लर्निंग लायसन्ससाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत एकूण उमेदवारांपैकी ३७ टक्के उमेदवारांना वाहतुकीचे नियम आणि नियमांच्या चिन्हांचीच माहिती नसल्याची धक्कादायक माहिती आरटीओकडील गेल्या सात महिन्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे.

उत्तरेतील धुक्याचा विमानसेवेवर परिणाम

$
0
0
दिल्ली तसेच उत्तरेकडील राज्यातील दाट धुक्यामुळे रविवारी पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. रविवारी सकाळी पुण्याहून दिल्लीकडे जाणारी विमाने दीड ते दोन तास विलंबाने रवाना झाली.

संयुक्त महाराष्ट्रासाठी पुन्हा लढा

$
0
0
गेली ५८ वर्षे संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिल्यानंतर आता नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांसह बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा आकाराला येत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या ठरावातील भागच अद्याप महाराष्ट्रात समाविष्ट झालेला नसल्याने त्या भागाला महाराष्ट्रात आणण्यासाठी हा लढा उभारला जात आहे.

‘रायसोनी’वर वेगळा गुन्हा दाखल करा’

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, तसेच वैधानिक लेखा परीक्षणात संचालक व काही खातेदार यांनी संगनमताने मनी लौंड्रीग अक्ट आणि आयकर अधिनियमाचा भंग केल्याच्या प्रकरणी संस्थेवर वेगळा गुन्हा दाखल करण्याची मागणी संस्थेच्या ठेवीदारांच्या समन्वय समितीने केली.

पोलिसांच्या क्रेनखाली तरुणीचा मृत्यू

$
0
0
पोलिसांच्या क्रेनखाली सापडून १९ वर्षीय तरुणीचा रविवारी रात्री मृत्यू झाला. कोंढवा बुद्रुक येथील सोमजी फाटा येथे साडेआठ वाजता हा अपघात झाला. देलसिना माशाहारी (वय १९, रा. कोंढवा खुर्द) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

टोमॅटो, फ्लॉवर स्वस्त

$
0
0
मार्केट यार्डात फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक झाली असली, तरी मागणी वाढल्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, कारली, तोंडलीचे दर वाढले आहेत. टोमॅटो, फ्लॉवर स्वस्त झाले आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डात १७० ते १८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे.

आरटीओत एजंट हद्दपारीला विरोध

$
0
0
परिवहन कार्यालयातील एजंटांना हद्दपार करण्याच्या परिवहन आयुक्तांच्या निर्णयाला विविध संस्था, संघटनांनी विरोध केला आहे. सुप्रीम कोर्टाने १९९९ साली दिलेल्या एका निर्णयानुसार एखाद्या व्यक्तीचा प्रतिनिधी असल्याचे अधिकृत पत्र घेऊन परिवहन कार्यालयात आलेल्या व्यक्तीला सरकारी कामकाजात सहभागी होता येईल.

गांधीजींवर विशेष टपाल तिकीट

$
0
0
दक्षिण अफ्रिकेतील कृष्णव​र्णिय नागरिकांच्या अधिकारांसाठी यशस्वी लढ्यानंतर महात्मा गांधीजींच्या मायदेशी आगमनाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने टपाल खात्याने गांधींजीवर खास टपाल तिकीट काढले आहे.

रुपी बँकेवर प्रशासकीय मंडळ?

$
0
0
अडचणीत आलेल्या रुपी बँकेचे विलीनीकरण मार्गी लावण्यासाठी त्यावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ डॉ. मुकुंद अभ्यंकर यांची या मंडळावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते.

हेल्मेटसक्ती करणारच!

$
0
0
केंद्र आणि राज्यातील कायद्यामधील तरतुदी हेल्मेटसक्तीच्या विरोधात असल्याचा दावा केला जात असतानाच राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मात्र हेल्मेटसक्ती करण्याचा ‘निर्धार’ व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे, तर प्रत्येक टू-व्हीलरधारकाकडून त्या संदर्भातील हमीपत्र भरून घेण्याचा विचारदेखील बोलून दाखविला.

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ‘एमसीसीआयए’ प्रयत्नशील

$
0
0
पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे, यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अॅण्ड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) प्रयत्नशील असून, मुख्यमंत्र्यांशी यांच्याशी चर्चा करण्यात येत असल्याचे संस्थेचे माजी अध्यक्ष एस. के. जैन यांनी सांगितले.

गॅस गळतीमुळे स्फोट; तरुण भाजला

$
0
0
येवलेवाडी येथे घरातील गॅस सिलेंडरची गळती झाल्याने झालेल्या स्फोटात घरातील तरुण ९० टक्के भाजला आहे. त्याला उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

परिचारिकांना उत्सवाच्या उद‍्घाटनाचा मान

$
0
0
सातत्याने समाजाची सेवा करणारे; मात्र सन्मानापासून वंचित असणाऱ्या सरकारी निमसरकारी कार्यालयातील कर्मचारी व विविध सस्थांच्या समाजसेवकांच्या हस्ते सुरू होणाऱ्या धनकवडीतील या वर्षीच्या साई उत्सवाचे उद‍‍्घाटन ससून हॉस्पिटलमधील परिचारिकांच्या हस्ते झाले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images