Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रॉकेल टँकरची ‘जीपीएस’ बंद

$
0
0
रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून जिल्ह्यातील ३४ टँकरवर बसविण्यात आलेली ‘जीपीएस’ यंत्रणा गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.

लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी

$
0
0
बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालक, शिक्षक आणि शिक्षण संस्था यामध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत (पॉस्को) जनजागृती निर्माण करण्यासाठी पोलिस उपायुक्त परिमंडळ चारकडून शालेय पोलिस दक्षता समिती ‘निर्भय विद्यार्थी अभियान’ची स्थापना करण्यात आली.

दागिने पॉलिश करताय, सावधान...

$
0
0
दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करत हातचलाखीने लाखो रुपयांचे दागिने फसवून नेण्यात येत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या दहा दिवसांत अशा प्रकारच्या पाच घटना घडल्या असून त्यात सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने फसवून नेण्यात आले आहेत.

उपनगरांचाही श्वास कोंडला

$
0
0
विकासाच्या मागे धावणाऱ्या पुण्याने गेल्या काही वर्षात प्रगतीबरोबरच अनेक समस्याही ओढावून घेतल्या आहेत. यामध्ये प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या असून हवेचे प्रदूषण रोखणे हे सर्वात मोठे आव्हान शहरासमोर आहे.

वाढते प्रदूषण हे आरोग्य खात्याचे अपयश

$
0
0
पुणे शहरातील वाढत्या वाहनांमधून ओकला जाणारा धूर रोखण्यात अथवा त्याला पर्यायी उपाययोजना करणारी यंत्रणा पुणे शहराच्या महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे नाही. त्यामुळे वाढते वायू प्रदूषण रोखण्यात पालिका अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रदूषणात १० टक्के वाटा कचऱ्याचा

$
0
0
रस्त्याच्या कडेला फूटपाथवर, एखाद्या झाडांच्या खाली किंवा कचरापेटीशेजारी सकाळी पेटविण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे आरोग्यास हानीकारक वायूंचे उत्सर्जन होते आहे. शहरात औद्योगिक ठिकाणी जाळलेल्या या कचऱ्याचा हवेच्या प्रदूषणात १० टक्के वाटा असून रहिवासी क्षेत्रात हे प्रमाण ६ टक्के आहे.

तंत्रज्ञानामुळे टळणार आजार

$
0
0
‘माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जीवशास्त्रात मोठ्या प्रमाणावर माहितीसाठा निर्माण होत आहे. त्याचे सखोल विश्लेषण करून आपल्याला भविष्यात होऊ शकणाऱ्या आजारांचे पूर्वनिदान करणे शक्य आहे. त्यानुसार व्यक्तिनुरूप औषधे देऊन जीवनशैलीत बदल घडवून हे आजार टाळणेही शक्य होऊ शकेल,’ अशी माहिती सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंग’ अर्थात ‘सी-डॅक’चे महासंचालक रजत मूना यांनी सोमवारी दिली.

आता पक्षीही झाले शहरी

$
0
0
ससाणा, घार अगदी करकोचाचे घरटे मोबाइल टॉवरवर दिसले. निसर्गातील सर्वोत्तम आर्किटेक्टची पदवी मिळालेला सुगरण पक्षी विजेच्या तारेवर घर बांधताना दिसला, अथवा बुलबुल, सूर्यपक्ष्यांची घरटी ड्रेनेजच्या पाइपमध्ये पाहायला मिळाली तर धक्का बसण्याचे काहीच कारण नाही.

पक्षिसंवंधर्नाला ‘एकीचे बळ’

$
0
0
राज्याच्या कानाकोपऱ्यातील पक्षी अभ्यासकांना एकत्र आणून त्यांनी राबविलेले उपक्रम आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सुरू झालेल्या पक्षी संमेलनाला आता एकत्रित ‘अॅक्शन’ची जोड देण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रातील पक्ष्यांच्या ५० प्रजाती धोक्यात

$
0
0
महाराष्ट्रातील ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. माळढोक, तणमोर, सारस आणि गिधाडे या पक्षांची संख्या तर आता बोटावर मोजण्याइतपत राहिली आहे. या जातींच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी माहिती पक्षिअभ्यासक राजू कसांबे यांनी सोमवारी पत्रकार परिषेदत दिली.

गळफास घेऊन कामगाराची आत्महत्या

$
0
0
कामगाराने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोशी येथील शिवाजीवाडीत सोमवारी (१९ जानेवारी) उघडकीस आली. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उघड झाला. बळीराम गुरुनाथ चांदगावे (वय ३५, मूळगाव लातूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गोवंश हत्याबंदी लागू करा

$
0
0
‘केंद्र सरकारने देशात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करावा आणि हत्या करणार्यास मृत्युदंडाची शिक्षा द्यावी,’ अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष हुकूमचंद सांवला यांनी येथे केली.

पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एकच सोनोग्राफी मशीन

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये सध्या केवळ एकच सोनोग्राफी मशीन सुरू आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना येथे उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.

किरकोळ विक्रेत्यांची मार्केट यार्डमध्ये ‘गांधीगिरी’

$
0
0
मार्केट यार्डातील किरकोळ विक्री विरोधातील आंदोलनादरम्यान मार्केट यार्डातील घाऊक विक्रेत्यांना गुलाब पुष्प देऊन शहरातील किरकोळ विक्रेत्यांनी सोमवारी गांधीगिरी केली.

बलात्कारप्रकरणी १० वर्षांची शिक्षा

$
0
0
घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन एका बारा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

पुण्यातील वाढते प्रदूषण धोकादायक

$
0
0
विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. याबाबत अधिक प्रबोधन करणे आवश्यक आहे. विकासाच्या संकल्पनेचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. पुण्यातील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, अशी चिंता ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

घोटाळ्यांचे अहवाल दडवून ठेवल्याचा आरोप

$
0
0
परीक्षा गैरव्यवहार, औषधनिर्माण-वाणिज्य शाखेतील गैरव्यवहार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रासंदर्भातील लेखापरीक्षण अहवालातील ताशेरे अशा कोणत्याही मुद्यांवरील समितीच्या अहवालांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सोमवारी अंतिम निर्णय घेतला नाही.

पेशंटच्या सेवेसाठी औषधविक्रेते सरसावले

$
0
0
वैद्यकीय उपचार महागडे ठरत असताना डायबेटिस, हृदयविकार तसेच रक्तदाबाच्या पेशंटची संख्या वाढत आहे. या पेशंटना आजाराबाबत योग्य मार्गदर्शन, उपचार आणि आजाराबाबतची जनजागृती करण्यासाठी पुण्यातील औषध विक्रेते पुढे सरसावले आहे.

सॅलिसबरी पार्कमध्ये आग

$
0
0
सॅलिसबरी पार्क येथील गोल्डन बेकरी शेजारी असलेल्या एका केटरिंग व्यावसायिकाच्या दुकानात पहिल्या मजल्यावर आग लागून चार कर्मचारी जखमी झाले. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

ऑनलाइन फसवणूकप्रकरणी ४४ लाख रुपयांची भरपाई

$
0
0
ऑनलाइन बँकिंगद्वारे पुण्यातील एका कंपनीची ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधिताला ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अगरवाल यांनी दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images