Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘कॅशलेस’ अडकले चर्चेच्या फेऱ्यात

$
0
0
‘अर्थमंत्री अरुण जेटली यांची दिल्लीत गेल्यानंतर भेट घेणार आहे. ‘कॅशलेस’ तिढा सोडविण्यासाठी विशेषाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पुण्यात पाठविण्याची विनंती करणार आहोत,’ असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

मॅक्डोनाल्डमधून मुलाला हाकललं!

$
0
0
पुण्यात चिड आणणारी एक घटना घडलीय. मॅक्डोनाल्डमधल्या एका आऊटलेटमध्ये गरीब असल्याच्या कारणावरून मुलाला धक्के मारून बाहेर काढणयात आलं. हा मुलगा मॅक्डोनाल्डमध्ये सॉफ्टड्रींक घेण्यासाठी गेला होता. हा सगळा प्रकार एका महिलेने आपल्या फेसबूकवर टाकलेल्या पोस्टवरून समोर आलाय.

पोलिस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हे नोंदवणार

$
0
0
पोलिस चौकीस्तरावर तक्रार घेण्यासाठी होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी यापुढे केवळ पोलिस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हे दाखल करून घेतले जाणार आहेत. भोसरी एमआयडीसीतील एका युवतीच्या छेडछाडीच्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे तिला आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये तू-तू-मैं-मैं

$
0
0
पालिकेतील कारभारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्येच नाराजी आणि संशयाचे वातावरण असून, शुक्रवारी सायंकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच नगरसेवकांमध्ये खटके उडाले.

बकोरिया बदलीवरून ‘दादां’नी टोचले कान

$
0
0
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीवरून इतर सर्व पक्ष आंदोलने करत असताना, राष्ट्रवादी थंड का, अशा शब्दांत कान टोचत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरसेवकांना आक्रमक काम करण्याचा सल्ला दिला.

‘रुपी’च्या विलिनीकरणाबाबत विचारपूर्वक पावले टाका

$
0
0
रुपी बँकेच्या थकीत कर्जांच्या वसुलीसाठी एकरकमी परतफेड योजनेला (ओटीएस) रिझर्व्ह बँकेने मान्यता दिल्यास सुमारे तीनशे कोटी रुपयांची वसुली होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ठेवीदारांनी त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे दाद मागावी, अशी मागणी बँक कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

ATS ने केली ६ पिस्तुले जप्त

$
0
0
दहशतवादविरोधी पथकाने सापळा रचून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून सहा पिस्तुल आणि अकरा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी एटीएसने गणेश उर्फ प्रदीप बाळासाहेब गाडे (वय २४ रा. गंगासदन, दुसरा मजला, किरकटवाडी, सिंहगड रोड) याला अटक केली आहे.

मिलिंद संगोराम यांचे निधन

$
0
0
प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट, अर्थतज्ज्ञ आणि लेखक मिलिंद संगोराम (वय ४७) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ-बहिण असा परिवार आहे. संगोराम हे आंतरराष्ट्रीय करप्रणाली आणि प्राप्तिकर या विषयांमध्ये तज्ज्ञ होते.

दौंड-लोणावळा लोकलसाठी प्रयत्न

$
0
0
दौंड-लोणावळा लोकल सुरू करणे, लोहमार्गाचे चौपदरीकरण करणे, चिंचवड किंवा आकुर्डी येथे सबजंक्शन उभारणे यासंदर्भात रेल्वे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी दिली.

गरीब म्हणून प्रवेश रोखला

$
0
0
केवळ गरीब असल्याच्या कारणावरून एका मुलाला जंगली महाराज रोडवरील मॅक्डोनाल्डमधून धक्के मारून बाहेर काढण्यात आले होते. या प्रकरणाच्या निषेधार्थ एका संघटनेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शनिवारी मॅक्डोनाल्डवर चिखलफेक केली.

घोटाळ्यातील जमीन ताब्यात

$
0
0
बनावट दाखल्यांद्वारे पुनर्वसनाची नऊशे एकर जमीन गिळंकृत केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने त्यातील तीनशे एकर जमीन ताब्यात मिळविली आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर राज्य सरकारचे नाव लावण्यात आले आहे.

हेल्मेटसक्ती बेकायदा

$
0
0
महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार महापालिका हद्दीत दुचाकीस्वार व सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्राच्या मोटार वाहन कायद्यानुसार राज्य सरकारने आपले अधिकार वापरून हेल्मेट सक्ती न करण्याच्या सूचना देऊनही पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचेही समोर आहे.

किरकोळ विक्रीविरोधात आज घंटानाद

$
0
0
मार्केट यार्डातील बेकायदेशीर किरकोळ विक्रीविरोधात शहरातील किरकोळ विक्रेत्यांना पुकारलेल्या आंदोलनास दी पूना मर्चंट्स चेंबरच्या पाच माजी अध्यक्षांनीच पाठिंबा दर्शविला आहे. त्याशिवाय हे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी येत्या सोमवारी (दि. १९) घंटानाद; तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

गूळ, डाळी, शेंगदाणा, बेसन झाले स्वस्त

$
0
0
मार्केट यार्डातील भुसार बाजारात गेल्या आठवड्यात गूळ, सर्व प्रकारच्या डाळी, साबुदाणा, शेंगदाणा, बेसन या वस्तूच्या दरात घट झाली आहे. भगरीचे दर वाढले आहेत. संक्रातीचीच्या सणामुळे लागणाऱ्या वस्तूंची मागणी घटल्याने आता गुळाच्या दरात प्रतिक्विंटलमागे १०० ते १२५ रुपयांची घट झाली.

भूमी अधिग्रहण कायद्यास विरोध

$
0
0
भूमी अधिग्रहण कायद्यात केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारने केलेल्या फेरबदलास पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे.

‘वायसीएम’ची सुरक्षा ‘व्हेंटिलेटर’वर

$
0
0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलमध्ये सध्या डॉक्टरांच्या बरोबरीनेच सुरक्षा रक्षकांची कमतरता जाणवत आहे.

पिंपरीत १२ वर्षांच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
लहानपणापासून खेळताना हाताला किंवा गळ्याला बांधून घ्यायची सवय आज बारा वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतली. कम्प्युटर गेम खेळत असताना अचानक सिद्धार्थ चंद्रशेखर खरमाळे याने घरातील खोलीच्या खिडकीला स्कार्फ बांधून गळफास लावून घेतला.

सफाई कामगारांकडून पिस्तूल हस्तगत

$
0
0
औंध जिल्हा हॉस्पिटलच्या कर्मचारी वसाहतीमध्ये (सांगवी) राहणाऱ्या दोन सफाई कामगारांकडून बेकायदेशीरपणे बाळगलेले एक गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सांगावी पोलिसांनी रविवारी (ता. १८) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही कारवाई केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये मतदारांचा निरुत्साह

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली. जिजामाता हॉस्पिटल प्रभाग क्रमांक ४३ मध्ये झालेल्या या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) शांततेत मतदान झाले.

निकालावर ठरणार विरोधी पक्षनेता

$
0
0
पुणे महापालिकेच्या दोन प्रभागातील रिक्त जागांसाठीचे मतदान रविवारी दोन्ही प्रभागात शांततेमध्ये पार पडले. या दोन प्रभागातील पोटनिवडणुकीच्या निकालावर महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याचे भवितव्य ठरणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images