Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बेसन स्वस्त, तूरडाळ महाग

$
0
0
मार्केट यार्डातील भुसार बाजारात गेल्या आठवड्यात बेसनाच्या दरात घट झाली. तर तूरडाळीच्या दरात वाढ झाल्याने ‘वरण’ खायला महाग होण्याची चिन्हे निर्माण झाली. त्यामुळे ग्राहकांच्या महिन्याच्या सुरुवातील खिशावर बोजा येणार आहे.

लसूण, मिरची महाग

$
0
0
मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली असली तरी मागणी वाढल्याने लसूण, हिरवी मिरची, सिमला मिरची, कोबी, तोंडलीचे दर वाढले आहेत. मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे.

‘रेडीरेकनर’च्या वाढीवर टीका

$
0
0
पुणे महानगर क्षेत्रात सदनिकांच्या मूळ किंमती सात-आठ टक्क्यांनी, तर जमिनीच्या किंमती पाच ते पंधरा टक्क्यांनी वाढल्या, परंतु रेडी रेकनरमध्ये सदनिकांच्या किंमती पंधरा ते पंचवीस टक्क्यांनी, तर जमिनीच्या किंमती वीस ते शंभर टक्क्यांनी वाढविण्यात आल्याची टीका क्रेडाई पुणे मेट्रोने केली आहे.

कपात टळली; शुद्धिकरण हवे

$
0
0
शहरातील प्रक्रिया केलेले दोन टीएमसी पाणी शेतीला सोडण्याची तयारी महापालिकेने केली असली, तरी ते बेबी कॅनॉलमध्ये सोडण्यास मार्च-एप्रिल महिना उजाडणार आहे.

भूसंपादनासाठी नवे TDR धोरण

$
0
0
महापालिकेच्या विकास आराखड्यात सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित केलेल्या जमिनी संपादित करण्यासाठी महापालिकेकडून दिला जाणारा टीडीआर नव्या भूसंपादन कायद्यामुळे जमीनमालकांच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या आतबट्ट्याचा ठरणार आहे.

शिक्षक : पगाराचे गणित चुकले!

$
0
0
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारांचे शिक्षण खात्याचेच अंदाजपत्रक चुकल्याने एरवी एप्रिल-मेच्या पगारादरम्यान शिक्षकांना जाणवणारी तंगी डिसेंबरमध्येच जाणवू लागली आहे.

बोरे खरेदीला गर्दी

$
0
0
अवघ्या तीन दिवसांवर संक्रांत येऊन ठेपली असताना कडाक्याच्या थंडीमुळे बोरांची आवक घटली आहे. सक्रांतीमुळे मागणी तिपटीने वाढल्याने भाव कडाडले असून रविवारी मार्केट यार्डात बोरे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली.

वारी : एक आनंदयात्रा

$
0
0
पंढरीच्या वारीने कष्टकरी आणि बुद्धिजीवी वर्गाला जोडले आहे. अशा या परंपरेवर, दृष्यमाध्यमातील कलावंतांनी एकत्र येऊन आपल्या माध्यमातून व्यक्त व्हावे, त्यातून निर्माण झालेल्या कलाकृतींचे प्रदर्शन करून ते काम पुन्हा समाजाकडे घेऊन जावे, यासाठी एक स्तुत्य उपक्रम आयोजिण्यात आला आहे. त्याविषयी..

मुद्रांक, तिकीट विक्री राजगुरुनगरमध्ये चढ्या दराने

$
0
0
राजगुरुनगर शहरातील सर्व मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक मनमानीप्रमाणे मूळ किमतीपेक्षा चढया भावाने मुद्रांकाची व तिकिटांची विक्री करत असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

हजारो लिटर फिल्टर पाणी वाया

$
0
0
हडपसरमध्ये तुकाई दर्शनमध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून फिल्टर केलेले हजारो लिटर पाणी टाकी भरल्याने बऱ्याचदा वाया जात आहे. याबाबत, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

शिक्षणाचे भारतीयीकरण स्वदेशी पद्धतीने व्हावे

$
0
0
‘देशात गेल्या काही महिन्यांमध्ये शिक्षणाच्या भारतीयीकरणाचा मुद्दा चर्चेला आला असून, त्याला तीव्रतेने विरोधही होताना दिसत आहे. आपल्या समाजाची गरज आणि वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा बदल महत्त्वाचा आहे.

मूलभूत गरजा भागविण्यात सरकार अपयशीच

$
0
0
‘अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या मूलभूत गरजांचा मुद्दा सोडविण्यात सरकार अपयशीच ठरत असल्याची बाब सातत्याने स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता देशातील युवकांनीच त्यासाठी पुढाकार घेऊन, इतरांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.

‘प्रभात’ नव्याने सुरू होणार

$
0
0
मराठी चित्रपटांच्या वैभवशाली परंपरेचे साक्षीदार ठरलेले प्रभात चित्रपटगृह नव्याने पुणेकरांच्या भेटीला येणार आहे. प्रभात चित्रपटगृह पाडण्याचा अजिबात विचार नसून, व्यवस्थापनासंदर्भातील काही बदल करून ‘प्रभात’ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

डॉ. प्रकाश यांच्या भूमिकेसाठी नाना राहिला ठाम

$
0
0
‘डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो या सिनेमातल्या बाबा आमटेंच्या भूमिकेसाठी अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव मनात होते; पण त्यांनी डॉ. प्रकाश यांची भूमिका करण्याचे ठामपणे सांगितल्याने बाबांच्या भूमिकेसाठी डॉ. मोहन आगाशे यांची निवड केली,’ अशी माहिती सिनेमाच्या दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी सोमवारी दिली.

‘डीएड-सीईटी’धारकांचे आंदोलन

$
0
0
राज्य सरकारच्या अटीनुसार शिक्षक होण्यास पात्र ठरलेल्या, मात्र अद्यापही नोकरी न मिळालेल्या डीएड-सीईटी पात्रताधारक उमेदवारांनी शिक्षण संचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

PMP कर्मचाऱ्यांसाठी ५० कोटी रुपये बँकेत जमा

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सर्व कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटीचे ५० कोटी रुपये सोमवारी बँक खात्यात जमा करण्यात आले. एप्रिल २००७ ते नोव्हेंबर २०११ दरम्यानच्या एकूण फरकापैकी पहिल्या हप्त्यातील २० टक्के रक्कम सर्व कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आली.

सर्व निवडणुकांमुळे विकासकामांत खोडा

$
0
0
‘लोकसभेपासून ग्रामपंचायतींपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांमुळे विकासकामांत खोडा घातला जातो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आणि वेळही जातो. त्यामुळे निवडणुकीवर संशोधन करून सगळ्या निवडणुका एकाच वेळी घेता येतील का, याचा विचार केला पाहिजे,’ असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केले.

अंदाजपत्रकातच नव्हे; ‘शालार्थ’मध्येही घोळ

$
0
0
शिक्षकांच्या पगाराचे सरकारचेच अंदाजपत्रक एकीकडे चुकले असताना, दुसरीकडे या पगारांच्या नोंदींसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘शालार्थ’ या ऑनलाइन प्रणालीमध्येही अनेक घोळ असल्याची ओरड केली जात आहे.

केबलच्या वादातून तरुणावर हल्ला

$
0
0
धनकवडी येथे केबल व्यावसायातून झालेल्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

फेम्टो लेझर तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा

$
0
0
‘फेम्टो लेझर’ या मोतिबिंदूच्या ऑपरेशनमधील अद्ययावत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त पेशंटना फायदा व्हावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी व्यक्त केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images