Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नियमांसाठी गांधीगिरी करा

$
0
0
वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी गांधीगिरी हे प्रभावी माध्यम ठरू शकते. याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास थोडा कालवधी जाईल, पण निश्चितच त्याचा फायदा होईल.

‘रेडझोन’चे आश्वासन ठरले निर्णायक

$
0
0
केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी रेडझोनची हद्द कमी करण्याबाबत दिलेले आश्वासन आणि पालमंत्र्यांची देहूरोड येथे झालेल्या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हाता’तून सत्ता काढून घेत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याकडे कूच केली.

भाजपने मारली मुसंडी

$
0
0
भारतीय जनता पक्षाने सातपैकी चार जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले आहे. तर भाजपने तिकीट न दिल्याने बंडखोरी करत थेट आमदारांना आव्हान निर्माण करणाऱ्या बंडखोर उमेदवार रघुवीर शेलार यांनी मताधिक्य मिळवत बाजी मारली.

भाजपची लाट थोपवून काँग्रेसची बाजी

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा बहुमत सिद्ध केले. तर, फक्त मोदी लाटेवर स्वार होऊन विजयी होण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

पहिल्या फेरीपासून काँग्रेस आघाडीवर

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या आठ वॉर्डांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी रविवारी रात्री झाली. मतमोजणी तीन फेऱ्यांमध्ये पार पडली. त्यात पहिल्याच फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार मताधिक्य घेऊन पुढे होते.रविवारी रात्री दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली.

५० उमेदवारांनी गमावली अनामत रक्कम

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या ६८ उमेदवारांपैकी ५० जणांना अनामत रक्कम गमावावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) सर्वच उमेदवारांवर ही नामुष्की ओढवली आहे.

मोदी लाटेची जादू कायम

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने ऐन निवडणुकीत तिकीट वाटपावरून घातलेला गोंधळ, आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेसने प्रचाराच्या काळात आरोपांच्या फैरी झाडत केलेला घातलेला रडीचा डाव आणि झंझावात विसरून निद्रावस्थेत राहिलेली शिवसेना यामुळे पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत मोदी लाटेची पुनरावृत्ती होत भाजप पहिल्यांदाच बोर्डात सत्तेवर आले.

महायुतीचे सरकार १५ महिन्यांत बदलू

$
0
0
तत्कालीन आघाडी सरकारप्रमाणेच व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय राज्य सरकार घेणार असेल, तर मागील सरकारला घरचा रस्ता दाखविण्यासाठी पंधरा वर्षे लागली. या सरकारला पंधरा महिन्यांत बदलून टाकू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला.

मागण्या योग्य; हिंसक आंदोलन नको

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रश्नावर सुरू केलेल्या आंदोलनातील मागण्या योग्य आहेत; मात्र, आंदोलनात हिंसात्मक मार्गाचा अवलंब होऊ नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

दोष सरकारचा की शेतकऱ्यांचा?

$
0
0
‘पूर्वीच्या सरकारप्रमाणेच हे सरकारही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार असेल, तर अशा घटनांचा दोष शेतकऱ्यांना द्यायचा, की सरकारला,’ असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी विचारला आहे.

‘धनदांडग्यांना चुचकारून निसर्गरक्षण करणे मान्य नाही’

$
0
0
‘पर्यावरण रक्षणाबाबत निराशेची छाया असल्याचे सांगितले जाते. पर्यावरणवादीही निराश होतात. मात्र, धनदांडग्यांना चुचकारून निसर्गाचे रक्षण करणे मान्य नाही,’ अशी भूमिका ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी मांडली.

पुणे शहरातील २५ गुन्हेगारांना ‘मोक्का’

$
0
0
पुण्यातील गुन्हेगारी लोखंडी हातांनी चिरडून टाकण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाचे पालन पोलिस दलाकडून करण्यात येत असल्याचे सांगून, पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी शहरातील २५ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई केल्याचे सांगितले.

बेकायदा होर्डिंगबाबतचा टोल फ्री नंबर बंदच

$
0
0
शहरातील बेकायदा होर्डिंग आणि जाहिरात फलकांची माहिती नागरिकांना देता यावी, यासाठी मोठा गाजावाजा करून महापालिकेने सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर केवळ ‘ट्रिंग... ट्रिंग...’ ऐकू येत आहे. पालिकेने सुरू केलेल्या या टोल फ्री क्रमांकाचे हायकोर्टाने विशेष कौतुक करून पुणे महापालिकेचा आदर्श घ्यावा, अशा सूचना दिल्या होत्या.

‘बीआरटी’ची सुरक्षा वाऱ्यावरच

$
0
0
आळंदी व नगररोडवरील जलद बस वाहतूक प्रकल्पांतर्गत (बीआरटी) उभारण्यात आलेल्या बसथांब्यांची तोडफोड आणि दुरवस्था रोखण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यास आयुक्तांनी मंजुरी देऊनही अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

तरुणाईच्या मदतीसाठी ‘हॅलो माय फ्रेंड’

$
0
0
चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या तरुणाईला वाचविण्यासाठी महापालिकेने ‘हॅलो माय फ्रेंड’ ही विशेष हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून ही हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिकेचे उपमहापौर आबा बागूल यांनी केली.

रेडिओ कॅबवर बंदीची रिक्षा पंचायतीची मागणी

$
0
0
रेडिओ कॅब वाहने शहरात रिक्षा व बसप्रमाणे प्रवासी वाहतूक करत आहेत. या कॅबना शहराअंतर्गत प्रवासी वाहतूक करण्यास प्रतिबंध करून सार्वजनिक परिवहन वाहनांना सुरक्षा द्या, अशी मागणी रिक्षा पंचायतीतर्फे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे करण्यात आली.

दुबार, स्थलांतरित मतदारांची ‘साफसफाई’

$
0
0
दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांनी फुगलेल्या मतदार यादीची ‘साफसफाई’ करण्यात येत असून, पुणे जिल्ह्यातील अशी चार लाख ८६ हजार नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.

सावधान… दिवस-रात्र अपघातांचा आहे

$
0
0
‘एक्स्प्रेस वे’वर होणाऱ्या अपघातांमध्ये गंभीर अपघातांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातांपैकी ४० टक्क्याहून अधिक अपघात हे प्राणांतिक आणि गंभीर स्वरूपाचे आहेत.

बेकायदा बांधकाम शोध मोहीम थंडावली

$
0
0
नऱ्हे येधील इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर ग्रामीण भागातील बेकायदा इमारतींची पाहणी करण्याची हाती घेण्यात आलेली मोहीम थंडावली आहे. बांधकामांची पाहणी करणाऱ्या पथकांतील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना ‘ई-चावडी’ कार्यक्रमामधील अभिलेख दुरुस्तीच्या कामात गुंतविल्याने बेकायदा बांधकामांचा शोध थांबला आहे.

कचरा कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

$
0
0
ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण न केलेला कचरा कचराकुंडीत टाकण्यास विरोध करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला सोमवारी नागरिकांनी मारहाण केली. महपालिकेचे सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या प्रभागात हा प्रकार घडला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images