Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मंगळवारी शाळा बंद?

$
0
0
शिक्षण संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष सुरूच राहिल्याचा आरोप करत संबंधित संघटनांनी येत्या मंगळवारी (१३ जानेवारी) राज्यव्यापी शाळा बंदची हाक दिली आहे.

बोगस तिकिट: PMP ची फसवणूक

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) कारभार सुधारण्यासाठी भर दिला जात असतानाच, बोगस तिकिटांद्वारे प्रवाशांची फसवणूक करण्याचा प्रकार वाहकाकडूनच (कंडक्टर) घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मासेमारी परवानगी देणार ग्रामपंचायती

$
0
0
जिल्ह्यातील आदिवासी भागातील तलावांमध्ये मासेमारी करण्याचे अधिकार यापुढे संबंधित ग्रामपंचायतीमार्फतच दिले जाणार आहेत. या ग्रामपंचायती सबल करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सातवनगरमधील १० झोपड्या जळाल्या

$
0
0
हांडेवाडी रोड सातवनगर येथील लेबर कॅम्पमधील दहा झोपड्यांना आग लागून संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शॅार्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली.

बारामतीत होणार ई-निवडणूक

$
0
0
बारामती तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यंदा ई-निवडणूक पद्धतीने घेण्यात येणार आहेत. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरण्याची शक्यता आहे. बारामती तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात येत आहे.

‘इनरकॉन’ला ६ कोटींचा दंड

$
0
0
खेड तालुक्यातील चाकण वनपरिक्षेत्रातील शिवे, वहागाव, खरपुड, कुडे आदी तेरा गावांच्या हद्दीतील राखीव वनक्षेत्रात पवनऊर्जा प्रकल्प उभारताना अनधिकृत उत्खनन झाले आहे. या प्रकरणी इनरकॉन पवनऊर्जा कंपनीला सुमारे सहा कोटींच्या दंडाची नोटीस बजावल्याची माहिती तहसीलदार प्रशांत आवटे यांनी दिली.

आदिवासींना भूम‌िहीन करण्याचा डाव : ढमाले

$
0
0
‘आदिवासी बांधव गेल्या हजारो वर्षांपासून निसर्गपूजक व वृक्षसंवर्धन करणारा आहे. त्यांच्या संस्कृती-परंपरा पूर्णत: वेगळ्या आहेत. मात्र, प्रस्थापित व्यवस्था आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालून त्यांना भूम‌िहीन करण्याच्या मार्गावर आहे,’ अशी टीका कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केली.

कंत्राटी कामगार पगाराविनाच

$
0
0
येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी करारावर काम करणाऱ्या सफाई कामगारांना दोन महिन्यांपासून पगारच दिलेला नाही. त्यामुळे मेंटल हॉस्पिटलमधील सुमारे ७८ कर्मचाऱ्यांनी पगारासाठी तगादा लावला होता.

सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली

$
0
0
पुणेकरांनी एक खासदार आणि आठ आमदार निवडून दिल्यानंतर याच पुणे शहरात येऊ घातलेली मेट्रो आणि आयआयएम नागपूरला हलवून भाजप सरकारने पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

फुलपाखरू उद्यानाऐवजी तारांगण नको

$
0
0
सहकारनगर भागातील फुलपाखरू उद्यानाची शुक्रवारी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. फुलपाखरू उद्यानाऐवजी तेथे तारांगण करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने घेतला आहे. याला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे.

एफसी रोड असुरक्षितच

$
0
0
दहशतवादाचे कायमस्वरूपी सावट असलेल्या पुण्यातील फर्ग्युसन रोडवर शनिवार-रविवारी ‘शॉपिंग विकेंड’ साजरा होत आहे. फुटपाथवर बेकायदा विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर तरुणाईच्या उड्या पडत आहेत.

फरारी गुन्हेगारांना अटक

$
0
0
खून, गोळीबार, लुटमार, वाहनचोरी आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना वर्षभर गायब असणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. दोघांनी १९ गुन्हे केल्याची कबुली दिली असून, १७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

लोकांकडून मिळणारी मदत हीच ऊर्जा

$
0
0
हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला समाजाच्या विविध थरातील नागरिकांनी केलेली मदत हीच आमची ऊर्जा होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी नुकतेच येथे केले. चिंचवड येथील अभिनव सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय अभिनव पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.

‘देहूरोड कँटोन्मेंट’चा आज निकाल

$
0
0
सात वॉर्डांसाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी (११ जानेवारी) ७२.२२ टक्के मतदान झाले. विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष अशा एकूण ४५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आज सोमवारी (१२ जानेवारी) सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, नऊ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे.

खडकी कँटोन्मेंट मतदान शांततेत

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या आठ वॉर्डासाठी रविवारी (११ जानेवारी) झालेल्या मतदानात ६८.१० टक्के मतदान झाले. मतदानासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला असल्यामुळे मतदान शांततेत पार पडले. खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या आठ वॉर्डासाठी मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.

कडेकोट बंदोबस्तात मतदान

$
0
0
लष्कर आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात झालेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीमध्ये सुमारे ६४.८४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संवेदनशील असणाऱ्या तीन वॉर्डांमध्येच मतदारांनी उत्साह दाखविल्याने मतदानासाठी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत रांगा लागल्या होत्या.

MBA प्रवेशासाठी CET १४ आणि १५ मार्चला

$
0
0
राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील प्रवेशासाठी यंदाही राज्याचीच एमबीए-सीईटी होणार आहे. येत्या १४ आणि १५ मार्चला ही एमबीए-सीईटी होईल, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.

रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराचा खून

$
0
0
गोऱ्हे बुद्रुक येथील पानशेत रोडवर स्कॉर्पिओला ट्रक आडवा लावून गोळीबार करूत एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. स्कॉर्पिओमधील राजेंद्र दत्तात्रय निवंगुणे (वय ४५, रा. आंबी, तालुका हवेली) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

प्रवाशांना दमदाटी करणाऱ्या रेल्वे पोलिसाला अटक

$
0
0
रेल्वेतील प्रवाशांना दमदाटी करून त्याच्यांकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांच्या एका पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुरेश नथू शेलार या पोलिस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

सामाजिक अत्याचारांविरोधात उभारणार प्रतिबंधक चळवळ

$
0
0
समाजातील विविध वर्गांवर होणाऱ्या जातीय, धार्मिक, तसेच लैंगिक अत्याचाराविरोधात लढा देण्यासासाठी प्रादेशिक पक्ष आणि संघटनांच्या वतीने ‘सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ’ उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>