Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘पिफ’मध्ये ‘नाना’ची सटकली

$
0
0
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ)काही ना काही कारणाने गोंधळ होण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. आपण येण्यापूर्वी चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरू झाल्याने नाराज झालेल्या अभिनेता नाना पाटेकर यांनी संयोजकांवर राग काढला.

‘पीएमपी’त महिलेवर ब्लेडने वार

$
0
0
स्वारगेट ते अप्पर इंदिरानगर या ‘पीएमपी’ प्रवासादरम्यान दोघा मद्यधुंद तरुणांनी एका महिलेवर ब्लेडने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या महिलेवर उपचार न करता ‘पीएमपी’ वाहक आणि चालकाने तिला बसस्टॉपवर उतरून दिले.

वेटिंग लायसन्सला ‘एंट्री’

$
0
0
गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत ​शिकाऊ वाहन परवाना घेतलेल्या आणि अद्यापपर्यंत कायमस्वरुपी वाहन परवाना घेण्यासाठी अपॉइंटमेंट न मिळालेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. परिवहन विभागाने या उमेदवारांना चाचणीसाठी विना अपॉइंटमेंट बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

सायकल वाटपात घोटाळा

$
0
0
महापालिकेच्या शि‌क्षणमंडळाच्या शाळांमधील मुलांना दिल्या जाणाऱ्या सायकल वाटपासाठी पालिकेतील अधिकाऱ्यांनी जादा दराने सायकलींची खरेदी करून यामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एअरपोर्टच्या ‘टेकऑफ’ला गती

$
0
0
पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जागेच्या वादातून रुतलेले चाक, मतैक्याच्या कसोटीवर उतरत बाहेर काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला आहे.

संजय दत्तची ‘जेलवापसी’

$
0
0
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं फर्लो रजा वाढवून देण्यासाठी केलेला विनंती अर्ज अखेर आज येरवडा तुरुंग प्रशासनानं फेटाळून लावला आहे. त्याला तातडीनं शरण येण्याचे आदेश देण्यात आले असून संजूबाबा ‘जेलवापसी’साठी मुंबईहून पुण्याकडे रवाना झाला आहे.

जोहान्सबर्गच्या विश्व साहित्य संमेलनाविषयी प्रश्नचिन्हच

$
0
0
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होऊ घातलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाविषयी यंदाही प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. साहित्य महामंडळाकडून विश्व साहित्य संमेलनाची घोषणा करताना मार्चमध्ये हे संमेलन होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

कँटोन्मेंट उमेदवारांचे आज ठरणार भवितव्य

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत असून, आठ वॉर्डांतील ६८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी होणार असल्याने काँग्रेसकडून सत्ता राखली जाणार की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींप्रमाणे भाजप सत्ताधीश होणार, हे रात्री अकरा वाजेपर्यंत स्पष्ट झालेले असेल.

खडकीत मतदान तयारी पूर्ण

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या आज, रविवारी होणाऱ्या मतदानासाठी आणि त्यानंतर लगेचच होणाऱ्या मतमोजणीसाठीची प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारी दुपारनंतर निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे ताब्यात देण्यात आली.

राज्यात थंडीचा कडाका वाढणार

$
0
0
राज्याचा काही भागात असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव राज्यभर जाणवत आहे. संपूर्ण राज्यात किमान तापमानात मोठी घट झाली असून पुण्यातील पारा ७.४ अंशांपर्यंत खाली आला आहे. पुढील दोन दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढणार असून पुण्यात पारा सहा अंशांपर्यंत घसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

किरकोळ विक्रेत्यांचा ‘खरेदी बंद’चा इशारा

$
0
0
मार्केट यार्डातील भुसार विभागात किरकोळ विक्रेते करीत असलेला व्यवसाय हा बेकायदेशीर आहे. त्या विक्रेत्यांना गूळ तसेच भुसार विभागातील काही व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला असून पाठिंबा देणाऱ्यांविरोधात खरेदी बंदचा इशारा शहर व जिल्ह्यातील किरकोळ दुकानदार व व्यापाऱ्यांनी दिला आहे.

किरकोळ व्यापाराविषयी राजकारण नको

$
0
0
मार्केट यार्डातील भुसार विभागात किरकोळ विक्री करण्याबाबत भुसार विभागातील काही घाऊक विक्रेत्यानी विरोध दर्शविला आहे. त्यासंदर्भात व्यापाऱ्यांनी राजकारण करू नये, अशी भूमिका दि पूना मर्चंट्स चेंबरने घेतली आहे.

दुचाकीच्या धडकेत तरुण ठार

$
0
0
लॉ कॉलेजरोडवर इंडिकेटर लावून उभ्या असलेल्या कारला दुचाकीवरून जात असताना धडकून पडल्यानंतर उभे राहत असताना त्याचवेळी समोरून आलेल्या दुचाकीने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला; तर एक महिला जखमी झाली.

संध्या गायकवाड यांचे जातप्रमाणपत्र रद्दचे आदेश

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या गायकवाड यांनी सादर केलेले जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

संजय दत्त सुटीवरून तुरुंगात परतला

$
0
0
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आरोपी प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त शनिवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास फर्लोची रजा संपल्यानंतर जेलमध्ये परतला. त्याने फर्लोच्या मुदतवाढीचा अर्ज जेल प्रशासनाकडे केला होता; मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला.

बाराशे टन कचऱ्याचे वर्गीकरण

$
0
0
उरळी व फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले असले, तरी सध्या शहरातील कचऱ्याच्या वर्गीकरणावर पालिकेने अधिक भर दिला आहे. दैनंदिन स्वरूपात शहरातील बाराशे टन कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात पालिकेला यश येत असून, रॅम्पवरही वर्गीकरण केलेलाच कचरा स्वीकारला जाईल, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

‘झोपडपट्टी पुनर्वसना’ची कोंडी फुटणार

$
0
0
झोपडपट्टी पुनर्वसनाच्या सुधारित नियमावलीमध्ये चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) कमी केल्याने निर्माण झालेली कोंडी लवकरच फुटणार आहे. या योजनेतील अडथळे दूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या (एसआरए) रखडलेल्या योजना मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

आडतीला लवकरच पर्यायी व्यवस्था

$
0
0
‘राज्य सरकार आडतीला चांगल्या पर्यायाच्या शोधात असून योग्य पर्याय मिळताच त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल,’ अशी माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात दिली.

‘नॉन क्रिमिलेअर’ गोंधळ

$
0
0
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या उत्त्पन्नाच्या अटीतील घोळाविरोधात ओबीसी संघर्ष परिषदेतर्फे रविवारी (११ जानेवारी) बैठक आयोजिण्यात आली आहे.

‘माळीण गावाचे पुनर्वसन करणार’

$
0
0
राज्यात आदर्श गाव ठरेल, अशा पद्धतीने दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी दिले. खडसे यांनी माळीण गावास भेट देऊन पुनर्वसनाच्या कामाची पाहणी केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images