Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अपघातांचा अभ्यास चाकणला

$
0
0
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (एआरएआय) चाकण येथे नवे केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रात वाहनांना धडक बसल्यानंतर होणाऱ्या परिणामांची चाचणी अधिक तपशीलवार पद्धतीने करता येणार आहे.

शिक्षण धोरणांवरून शिक्षणसंस्थांचा ‘वर्ग’

$
0
0
‘शिक्षण हे महर्षींचे क्षेत्र आहे, सम्राटांचे नाही. ज्यांना उद्योग करायचे आहेत, त्यांनी उद्योगक्षेत्रात जावे, शिक्षणक्षेत्रात येऊ नये,’ असा स्पष्ट इशारा राज्याचे शालेय आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पुण्यात दिला.

‘रुसा’च्या निधीवरचा रुसवा दूर

$
0
0
राज्यातील विद्यापीठांना ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना’चा (रुसा) निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्या बाबतची रखडलेली कामे आता मार्गी लागत असून, येत्या मार्च महिन्यापर्यंत राज्यातील विद्यापीठांना रुसाचा निधी उपलब्ध होण्याचे संकेत राज्य सरकारच्या पातळीवरून दिले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ‘कचराकोंडी’वर तोडगा

$
0
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर गेले काही दिवस सुरू असलेल्या कचराकोंडीतून पुणेकरांची काही महिन्यांसाठी सुटका झाली. कचराप्रश्नी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिल्यानंतर आणखी नऊ महिने सध्याच्या कचरा डेपोमध्ये कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी संमती दर्शविली.

‘पुणे सुपरफास्ट’साठी दोन पावले पुढे राहू..!

$
0
0
पुण्याच्या विकासाशी संबंधित सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजिलेल्या विशेष संवादसत्रात दिली. ‘पुणे हे महाराष्ट्रासाठीचे भूषण आहे.

मुलांच्या ताब्याबाबतचे समुपदेशन फॅमिली कोर्टातच

$
0
0
एकमेकांमध्ये वाद झाला म्हणून कोर्टाची पायरी चढलेल्या पती पत्नीच्या वादाचा परिणाम मुलांवरही होतो. मुलांच्या ताब्यावरून पालकांमध्ये सतत वाद होत राहतात. यात मुलांची आणि पालकांची ओढाताण होते. मात्र, मुलांच्या ताब्यावरून होणाऱ्या वादांमध्ये आता फॅमिली कोर्टातच समुपदेशन होणार आहे.

बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन राज्य सरकार करणार

$
0
0
डबघाईला आलेल्या ‘बालचित्रवाणी’चे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी आता राज्य सरकारने घेतली आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या निधीवर अवलंबून असलेली ही संस्था पूर्णपणे स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर पुढे नेण्याचा विचार राज्य सरकारने केला आहे.

अॅप रोखणार लाचखोरी

$
0
0
वाहतूक नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई न करता वाहतूक पोलिस दंडाच्या पावतीऐवजी लाच घेऊन नागरिकांना सोडताना दिसतात. विविध सरकारी कामांची पूर्तता होण्यासाठीही सरकारी अधिकारी लाच मागत असल्याच्या अनेक घटना आढळून येतात.

११.५ हजार इमारती ‘बिगर NA’

$
0
0
बिगरशेती परवानगी (एनए) न घेता बांधकाम करणाऱ्या जिल्ह्यातील साडेअकरा हजार इमारतींच्या मालकांकडून ४७ लाख ४३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिली. दंड भरल्यानंतर इमारत नियमित करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे.

परीक्षाकेंद्र घराजवळचे देणार

$
0
0
दहावी- बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षेदरम्यानची धांदल आता थांबण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना घराजवळच्या परीक्षा केंद्रांसोबतच, परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका हातात मिळणार आहेत.

मेट्रो ते PMRDA व्हाया DP...!

$
0
0
सुपरफास्ट पुण्यासाठी मेट्रोपासून पीएमआरडीएच्या स्थापनेपर्यंतचे निर्णय विनाविलंब घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. कोणताही प्रश्न चिघळत ठेवण्याचे राजकारण करण्यापेक्षा निर्णयप्रक्रिया गतिमान व पारदर्शक करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

शहरात जुलैपर्यंत पाणीकपात नाही

$
0
0
‘शहरातील प्रक्रिया केलेले दोन टीएमसी पाणी यंदा शेतीला सोडणे अखेर शक्य होणार असल्याने येत्या जुलैपर्यंत पुण्याच्या पाण्यात कोणतीही कपात करावी लागणार नाही, असा निर्णय कालवा नियोजन समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

संजय दत्तचे ‘मुंबई-पुणे-मुंबई’

$
0
0
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी संजय दत्तची १४ दिवसांची फर्लोची रजा संपल्याने गुरुवारी पुन्हा तुरुंगात परतण्यासाठी त्याने मुंबईहून पुणे गाठले खरे, पण त्याच्या रजा वाढवण्याच्या अर्जाबाबत निर्णय घेण्यात पोलिस आणि तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये समन्वयच न झाल्याने रात्री तो पुन्हा घरी परतला.

‘चित्रपटगीतांमध्ये प्रयोग व्हायला हवेत’

$
0
0
‘मराठी कवितेत झालेले प्रयोग चित्रपटांच्या गीतांमधूनही व्हायला हवेत. गीतांच्या रचनेचा बंध बदलला पाहिजे. गीतकारानेच गीताच्या आकृतीबंधाचा विचार करावा. त्यासाठी गीतकारालाही रियाज करावा लागतो,’ असे मत रानकवी ना. धों. महानोर यांनी शुक्रवारी मांडले.

सध्याच्या चित्रपटांमध्ये पुनःप्रत्ययाचा आनंद नाही

$
0
0
‘आताचे चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आल्यावर त्यातील काही आठवत नाही. त्यामुळे सध्याचे चित्रपट पुनःप्रत्ययाचा आनंद देऊ शकत नाही,’ अशी टीका ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी केली.

चित्रपटांसाठी धोरण हवे

$
0
0
चित्रपट हा अनेकांना रोजगार मिळवून देणारा व्यवसाय आहे. रोजगाराबरोबरच त्यातून मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो.

पं. मोहन कर्वे यांचे निधन

$
0
0
ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. मोहनराव कर्वे यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, सून असा परिवार आहे. प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे आलेगावकर या त्यांच्या कन्या होत.पं. कर्वे यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२५ रोजी झाला.

बार असोसिएशनची निवडणूक ३१ला

$
0
0
पुणे बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक ३१ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे पाटील यांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज विक्री व स्विकृती १४ जानेवारीपर्यंत होणार आहे.

बनावट जामीनप्रकरणी दोघा भावांना अटक

$
0
0
बनावट जामिनाच्या आधारे येरवडा जेलमधून बाहेर आलेल्या दोघा भावांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कोर्टाने १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी पोलिसांनी चेतन तानाजी निम्हण (वय २७), तुषार तानाजी निम्हण (३३, दोघे रा. पाषाण) या दोघांना अटक केली आहे.

‘पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’वर बंधने येण्याची शक्यता

$
0
0
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळचे मुद्दे आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी सदस्यांकडून वापरल्या जाणाऱ्या ‘पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’वर लवकरच बंधने येण्याची शक्यता आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images