Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मेव्हण्याचा खून

$
0
0
प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेव्हण्याने आपल्या बहिणाच्या नवऱ्याचाच कोयत्याने २८ वार करत तसेच गोळ्या घालून खून केला. वारजे हायवे उड्डाणपूल चौकातील अक्षय पॅलेससमोर मंगळवारी रात्री हा प्रकार पाहणाऱ्या अनेकांचा थरकाप उडाला. वारजे पोलिसांनी या प्रकरणी मेव्हण्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात ३ तासांत ३ खून

$
0
0
पुणे शहरात सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवारी रात्री साडेदहा अशा तीस तासांत खुनाचे तीन गुन्हे घडले. खून करणारे अल्पवयीन आणि तरुण असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. व्याजाच्या पैशांच्या वादातून, किरकोळ भांडणातून, तर बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून, हे खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कलावंतांनी पुढाकार घ्यावा

$
0
0
'खेड्यांतील 56 लाख कुटुंबांत, तर शहरांतील 1 कोटी कुटुंबांत अजूनही स्वच्छतागृहे नाहीत. पुढील चार वर्षांत ही स्वच्छतागृहे बांधून दिली जातील. त्यासाठी लाभार्थींना चार हजार रुपयांऐवजी यापुढे 12 हजार रुपये दिले जाणार आहेत.

‘शास्त्रीय संगीतात प्रयोग व्हावेत’

$
0
0
व्हायोलीन अॅकॅडमीतर्फे आजपासून, ९ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरझंकार’ संगीत महोत्सवामध्ये पहिल्याच दिवशी देवकी पंडित यांचे गायन होणार आहे.

बेळगाव नाट्य संमेलनात भरणार पुस्तक प्रदर्शन

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे मराठी माणसांचे वास्तव्य नसल्याने साहित्य संमेलनात पुस्तक विक्री होणार नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रकाशकांना आता व्यावसायिक संधी उपलब्ध झाली आहे.

२३ तासांत पार केले १६४२ किमी

$
0
0
सोबत घेतलेली थालीपीठे आणि एनर्जी पेय पिऊन पुणे ते बेंगळुरू असा सलग सोळाशे ४२ किमी प्रवास करण्याचे अमेरिकेतील ‘आयर्न बट’ असोसिएशनचे ‘सॅडल सोर’ हे आव्हान पुण्यातील चार युवकांसह एका युवतीने पेलले आहे.

‘जलयुक्त शिवार’साठी २३५ गावांचे आराखडे

$
0
0
‘नेमेचि येते पाणीटंचाई’ अशी अवस्था झालेल्या जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना ‘जलयुक्त शिवार’ गावांत रूपांतरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

दरोडा टाकणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी

$
0
0
मोबाइल दुकानावर दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना जखमी केल्याप्रकरणी जितू बाबूराव रजपूत (वय ४५, रा. सणसवाडी, पुणे) याला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी १० वर्षे सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

ससाणेनगरमधील जलवाहिनी दुरुस्त

$
0
0
आठ इंच पिण्याची जलवाहिनी फुटल्याने हजोरो लिटर पाणी वाया जाण्याची बातमी मटाने सोमवारी दिली होती. बातमीची दखल घेऊन तातडीने लष्कर पाणी पुरवठा विभागाने ही जलवाहिनी दुरुस्त केली आणि हजारो लिटर पाणी वाया जायचे थांबले.

माळीण दुर्घटनाग्रस्तांना दिलासा

$
0
0
माळीण दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत येत्या १० जानेवारीपूर्वी वितरित करण्याचे आश्वासन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहे. माळीण गावच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या निधीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मिठाई कारखान्याला महापालिकेची नोटीस

$
0
0
कळस रोडवरील लक्ष्मी कॉर्नरच्या मागे असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर वाहनतळाच्या ऐवजी मिठाई बनविण्याच्या कारखाना सुरू केल्या प्रकरणी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून मिठाई मालकाला नोटीस बजाविण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची सासवडमध्ये मनमानी

$
0
0
सासवड एसटी आगारातील काही कर्मचारी मनमानी करून कर्तव्यात कसूर करत असल्याचे दिसत आहे. प्रवाशांना या कर्मचाऱ्यांच्या मनमानीचा बऱ्याच वेळा फटका बसतो आहे. आगार व्यवस्थापनाकडे याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही त्यामध्ये कोणतीही सुधारणा अद्यापही झालेली नाही.

पादचाऱ्यांना चालणे मुश्किलच?

$
0
0
अत्यंत अरुंद रस्ता; त्यातच एका बाजूचे पार्किंग, भरधाव वेगाने येणारी सर्व प्रकारची वाहने, त्यांचे ओव्हरटेकिंग यामुळे थोपटे रोडवरील पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. बहुतांश वेळा बंद असलेले पथदिवे, वाहनांचा प्रचंड वेग आणि वन वेमुळे सतत असलेली वर्दळ यामुळे येथे वारंवार अपघातही होत आहेत.

आरोग्य सेवा कार्यालयाच्या स्थलांतराच्या हालचाली

$
0
0
पुणे स्टेशन येथील मध्यवर्ती इमारतीत असलेल्या आरोग्य सेवा विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचा कारभार दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचा घाट आरोग्य खात्याकडून घातला जात आहे. या स्थलांतरास आरोग्य खात्यातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विरोध केला असून, कार्यालय स्थलांतरित होऊ नये, अशी मागणी केली आहे.

‘आयुष’ची मदत नको

$
0
0
वैद्यकीय उपचार करताना कोणत्याही ‘आयुष’ डॉक्टरांची मदत घेऊ नका तसेच त्यांची हॉस्पिटलमध्ये नेमणूक देखील करू नये, असे फर्मानच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) बैठकीत काढण्यात आले आहे.

प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या पदाचाच ‘कचरा’

$
0
0
राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी त्रासदायक विभागात काम करण्यास तयार नसल्याने आधीच एका पदाची जबाबदारी असलेल्या पालिकेतील अधिकाऱ्यांना घनकचरा विभागाची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.

‘कचरा व्यवस्थापनासाठीच्या आरक्षित जागांचे काय केले?’

$
0
0
शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी विकास आराखड्यात (डीपी) आरक्षित असलेल्या पाच जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने काय प्रयत्न केले, याची माहिती द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्यातील जमिनींची पुनर्मोजणी मार्गी

$
0
0
मोजणीच्या दरावरून रखडलेल्या राज्यातील जमिनीच्या पुनर्मोजणीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला असून, या मोजणीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. पुनर्मोजणीच्या पहिल्या टप्प्यात सहा विभागीय आयुक्तालयांचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यांची मोजणी करण्यात येणार आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

$
0
0
कात्रज येथे उभ्या असलेल्या कारला दोनदा हटकल्याने तीन तरुणांनी पोलिसावर हल्ला करून त्यांना जखमी केले होते; मात्र सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध वेळेत आरोपपत्र दाखल न केल्याने कोर्टाने भारती विद्यापीठ पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

परदेशी पाहुण्यांचे होणार सर्वेक्षण

$
0
0
परदेशी पक्षी पूर्वी खूप येत होते, आता त्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या काही वर्षांत नवीन जातीचा पक्षी दिसलाच नाही... या आणि अशा सरधोपट विधानांना संशोधनाची जोड मिळावी.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images