Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विद्यार्थीभिमुख धोरणे

0
0
राज्य बोर्डाची ऐतिहासिक परंपरा लक्षात घेता, गेल्या काही काळामधील बोर्डाच्या धोरणांविषयी....

पाइपफुटीचे प्रमाण वाढले

0
0
शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये वाढत असलेल्या थंडीमुळे शहरातील पाण्याची पाइपलाइन फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. ‌गेल्या महिन्यात (डिसेंबर २०१४) विविध भागातील पाइपलाइन फुटण्याच्या ९००पेक्षा अधिक तक्रारी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आल्या असून, यातील ५०० ठिकाणी ‘वॉटर हॅमर’मुळे पाइपलाइन फुटल्याचे समोर आले आहे.

आडतवसुलीवरुन आंदोलन?

0
0
आडत वसुलीच्या मुद्द्यावरून मूठभर व्यापारी सरकारला वेठीला धरणार असतील, तर त्यांच्या विरोधात लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून हिसका दाखवतील, असा प्रतिइशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी बुधवारी दिला आहे.

मेट्रोसाठी ठोस भूमिका हवी

0
0
अनेक चर्चा वाद आणि पूर्वतयारीच्या मार्गावरून पुणे मेट्रोचा प्रकल्प आता केंद्र सरकारच्या मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पुण्यातील वाहतुकीची कोंडी आणि खासगी वाहनांची वाढती संख्या रोखण्यासाठी मेट्रोसारखा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे

प्राध्यापक पगाराविना

0
0
पुणे आणि मुंबई विभागातील मान्यताप्राप्त बी.पीएड कॉलेजांमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या पगारावर संक्रांतीपूर्वीच संक्रात आली आहे. राज्य सरकारकडून पगारासाठीचे बजेट मंजूर केले असतानाही, पुणे आणि मुंबई विभागातील प्राध्यापकांना गेल्या तीन महिन्यांपासून पगाराविनाच दिवस काढावे लागत आहेत.

...तर शिक्षणशुल्क नाही

0
0
विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे अर्ज प्रलंबित राहिल्यास, अशा कॉलेजांना सरकारकडून दिले जाणारे शिक्षण शुल्क देण्यात येऊ नये, अशी सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी पुण्यात विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

पुणे विद्यापीठात USच्या विद्यापीठाचे केंद्र

0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या पेन स्टेट विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची माहिती आता विद्यापीठाच्या आवारातच मिळणे शक्य होणार आहे. दोन्ही विद्यापीठांमध्ये असलेल्या कराराचे पुढचे पाऊल म्हणून विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रात ‘पेन स्टेट’चे एक स्वतंत्र केंद्र सुरू झाले आहे.

देशमुखांवर कारवाई

0
0
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जमिनीचे तत्कालीक प्रशासक बी. जे. देशमुख यांनी अधिकार नसताना कामगार सोसायटीला हस्तांतर केल्याचा ठपका ठेवतानाच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस पणन संचालकांनी सहकार सचिवांना केली आहे.

मॉरिशसची तरुणी बेपत्ता

0
0
पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आलेली मॉरिशस येथील तरुणी गेल्या दोन वर्षांपासून कोंढवा येथून गायब झालेली आहे. या तरुणीने आपल्या बँक अकाउंटमधून २०१३ मध्ये एकदा पैसे काढले होते. त्यानंतर पुन्हा तिचा कुठलाही ठावठिकाणी शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

‘कॅशलेस’साठी ‘इर्डा’कडे

0
0
हॉस्पिटल्सनी कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा बंद केल्याप्रकरणी इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीकडे (इर्डा) दाद मागण्यात आली आहे. ही सुविधा बंद झाल्याने हजारो पेशंट्स उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याने इर्डाने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तरुणाईचा संगीताकडे ओढा

0
0
व्हायोलीन अॅकॅडमीतर्फे येत्या ९ ते ११ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरझंकार’ संगीत महोत्सवात पहिल्याच दिवशी प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांचे गायन होणार आहे. त्यांचे गुरू पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीचे विविध पैलू ते संवाद आणि गायनातून उलगडणार आहेत. यानिमित्त ‘मटा’ने भाटे यांच्याशी संवाद

PMP अधिका-यांचे पगार रोखले

0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) आर्थिक परिस्थितीमुळे एरवी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसत; पण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच याच स्थितीची सामना वरिष्ठ अधिकाऱ्यांना करावा लागला आहे. कॉर्पोरेट ऑफिसप्रमाणे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे.

कचराकोंडीसाठी वन जमिनीचा पर्याय

0
0
‘पुण्यातील कचराकोंडीची समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय पुढाकार घेण्यास तयार आहे. यासाठी पुणे परिसरातील वन जमिनीचा पर्याय आम्ही महापालिकेला दिला असून यामुळे शहराचा किमान २५ त ३० वर्षांचा कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे,’अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

वारजे-शिवणे रस्ता मोकळा होणार?

0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) हद्दीतून जाणाऱ्या वारजे-शिवणे रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला बुधवारी दिले.

एप्रिलपासून लिखित सातबारा बंद

0
0
पुणे जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत येत्या १ एप्रिलपासून हस्तलिखित सातबारा बंद केला जाणार असून, हे उतारे ‘ऑनलाइन’ देण्यात येणार आहेत. जमीन खरेदीदस्ताची नोंदणी झाल्यानंतर अवघ्या काही तासांत फेरफार नोंद करण्याबरोबरच पंधरा दिवसांच्या मुदतीत सातबारा उतारा देण्याची महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वाच्या वाटेवर आहे.

सुपरफास्ट पुणे

0
0
समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या पुण्याची महानगरांच्या सुपरफास्ट महामार्गावर धाव घेण्यासाठीचा ‘रोडमॅप’ उद्योगापासून समाजकारणापर्यंतच्या दिग्गजांच्या साक्षीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आखणार आहेत.

कंटेनर ट्रकवर आदळला

0
0
कोंढवा-हडपसर रोडवर पिसोळीजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या ट्रकवर मालाने भरलेला कंटेनर कोसळून बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.

NDA रोडवर पाणीचोरी

0
0
‘एनडीए’ रोडवरील धनाढ्यांच्या फार्म हाउससाठी पाषाणच्या लष्करी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर अॅण्ड डी) पाइपलाइनमधून बेकायदा पाणी कनेक्शन घेतल्याचे उघडकीस आले आहे. गेली काही वर्षे ही सर्रास ‘पाणीचोरी’ होत असून जलसंपदा विभागाने ही कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावली आहे.

पीएफ हडप

0
0
महापालिकेला ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी पुरविणाऱ्या एका ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

थंडी वाढेल

0
0
ढगाळ वातावरण दूर होऊन आकाश निरभ्र झाल्याने शहरात आता थंडीचा कडाका वाढणार आहे. उत्तरेकडील राज्यातील थंडीची लाट कायम असतानाच विदर्भाच्या काही भागातही थंडीची लाट आहे. त्यामुळे राज्यात थंड वारे वाहत असून हवामान कोरडे असल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images