Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहरात ३५८ तळीरामांवर कारवाई

$
0
0
नववर्षानिमित्ताने विविध पार्ट्यांमध्ये सेलिब्रेशन करून बाहेर पडलेल्या तळीराम वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी आपला हिसका दाखवला. पोलिसांकडून अवघ्या काही तासांत ३५८ तळीरामांवर कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्याभरात सुमारे ११०० तळीरामांवर कारवाईला सामारे जावा लागले आहे.

ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच तोडगा

$
0
0
‘उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन शहरातील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल,’ असा ठाम विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी व्यक्त केला. तसेच, कचरा समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तातडीने आराखडा सादर केला जावा, अशा सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या.

बांधकाम व्यावसायिक, ग्राहकांना बसणार फटका

$
0
0
प्लॉटवरील संभाव्य टीडीआरचा रेडी रेकनरमध्ये समावेश करून यंदापासून त्यापोटी २५ टक्के जादा दर लागू करण्यात येणार असल्याने बांधकाम व्यावसायिक आणि पर्यायाने ग्राहकांना मोठा दणका बसणार आहे.

अडीच लाख कोटींच्या ‘एनपीए’चे करायचे काय?

$
0
0
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडील थकित आणि बुडित कर्जांची रक्कम तब्बल २.६० लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बँकिंग व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची भाषा करणाऱ्या केंद्र सरकारकडून यासह इतर अनेक समस्यांबाबत कोणती धोरणे आखली जातात, यावर बँकिंग क्षेत्राचे भवितव्य अवलंबून आहे.

‘मटा’च्या व्यासपीठावर मुख्यमंत्री करणार ‘पुणेमंथन’

$
0
0
गतिमान कारभार करून सुशासनाची ग्वाही देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यासपीठावरून पुण्याला सुपरफास्ट बनविण्याच्या दृष्टीने विचारमंथन करणार आहेत.

‘रुपी’च्या मॅनेजरचा बँकेतच ‘थर्टी फस्ट’

$
0
0
आर्थिक डबघाईत असलेल्या रुपी सहकारी बँकेच्या बुधवार पेठ शाखेतील मॅनेजरने बुधवारी भरदिवसा बँकेतच थर्टी फस्ट साजरा केला. बँकेच्या कार्यालयात मद्यसेवन करून या महाशयांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ केली.

कोरेगाव पार्कच सर्वांत महागडे!

$
0
0
पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा हायप्रोफाइल परिसर निवासी सदनिका घेण्याच्या दृष्टीने सर्वात महागडा ठरला आहे. उच्चभ्रू वस्तीच्या डेक्कन परिसरातील प्रभात गल्लीने महागड्या वास्तूंमध्ये दुसरे स्थान यंदाही कायम ठेवले आहे.

शून्य कचरा प्रकल्पाचा ‘कचरा’

$
0
0
बाणेर-बालेवडी येथील शून्य कचरा प्रकल्पाला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी अनेक ठिकाणी कचरा जाळण्याचा प्रकार परिसरात पहायला मिळाला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शून्य कचरा प्रकल्पाचे उद् घाटन करण्यात आले होते.

महिलाही करणार प्लम्बिंग

$
0
0
घरातील नळ बिघडला किंवा एखादा गळणारी पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी अचानक एखादी महिला प्लम्बर तुमच्यासमोर आली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

‘रेडीरेकनर’ : १४ टक्क्यांनी वाढ

$
0
0
पुणे शहर, शहरालगतचा विकसनशील परिसर आणि ग्रामीण भागाच्या रेडीरेकनरच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ एक जानेवारीपासून लागू करण्यात आली असून, त्यामुळे घरांच्या किमतीदेखील वाढणार आहेत.

वीज दरवाढीचा ३२ टक्के दणका?

$
0
0
वीज कंपन्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी अनुदानाला स्थगिती आणि नवा बारा टक्के दरवाढीचा महावितरणचा प्रस्ताव; असा वीज दरवाढीचा एकूण ३२ टक्के दणका राज्यातील वीजग्राहकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोवारीकर यांचा अल्पपरिचय

$
0
0
अवकाश, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रात संशोधन करुन अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर हे देशातील मूलभूत समस्यांची जाण असलेले आणि त्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ होते.

डॉ. गोवारीकर यांचे निधन

$
0
0
अवकाश संशोधन, हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर (८१) यांचे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मूलभूत समस्यांची जाण असणारा संशोधक अशी डॉ. गोवारीकर यांची ख्याती होती.

कँटोन्मेंटमध्ये यंदा पंचरंगी लढत

$
0
0
रस्त्यावर उभे राहायलाही मोकळी जागा नसल्याने दाटीवाटीत असलेल्या वॉर्ड क्रमांक दोनमध्ये उमेदवारांचीही भाऊगर्दी आहे. सर्वच पक्षांमध्ये अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी असलेल्या या वॉर्डात एका-एका मतासाठी उमेदवारांना ​जीवाचे रान करावे लागणार आहे.

पुण्याच्या पर्यटनाला ब्रँडनेम

$
0
0
राज्याची सांस्कृतिक राजधानी, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, सायबर सिटी अशा बिरुदावली मिरवणारे पुणे शहर पर्यटनच्या क्षेत्रात ‘ब्रँड’ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष योजना हाती घेण्यात येत आहे.

तलावांच्या जमिनी बिल्डरच्या घशात

$
0
0
पुरंदर तालुक्यात वळण बंधारे व पाझर तलाव यासाठीची जमीन संपादित केली नसल्याने काही एजंट या जमिनी थोड्या किमतीत खरेदी करून कोरडे तलाव फोडून त्या जागा मोठ्या बिल्डर व उद्योगपतींना कोट्यावधी रुपयांना विकण्याचा उद्योग करीत आहेत.

खेड विमानतळाचे उड्डाण कधी?

$
0
0
अतुल काळे, राजगुरुनगरपुणे शहराला स्वतंत्र विमानतळ असावा म्हणून खेड तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प गेल्या बारा वर्षापेक्षा अधिक काळापासून रेंगाळत चाललेला आहे. केवळ चर्चेच्या फेऱ्यातच अडकलेल्या या प्रकल्पाची सद्यस्थिती 'जैसे थे'च आहे.

४० दिवसांत २२ बांधकाम प्रस्ताव मंजूर

$
0
0
कमी वेळेत बांधकामाची परवानगी मिळावी यासाठी पालिकेने सुरू केलेल्या ‘फास्ट ट्रॅक सिस्टिम’ला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या ४० दिवसांत या सिस्टिमच्या माध्यमातून २२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून काही तांत्रिक कारणाने ४ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत.

'कॅशलेस'च्या वादात पेशंटचे हाल

$
0
0
पेशंटना आता लहान मोठ्या खासगी हॉस्पिटलमधील ‘कॅशलेस’ सेवा बंद झाल्याचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. विमाधारक असूनही ‘पेशंटच्या उपचारासाठी आधी पैसे भरा, नंतर उपचार’ या हॉस्पिटलच्या भूमिकेमुळे पेशंटसह नातेवाईकांवर आर्थिक मदतीसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे.

बिहारच्या व्यक्तीने पेटवून घेतले

$
0
0
कायमच माणसांची वर्दळ आणि वाहनांची गर्दी असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सच्या येथे भरदिवसा एका व्यक्तीने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images