Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक वीस टक्के वाढ

$
0
0
राज्यातील महापालिकांच्या क्षेत्रातील वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्यात (रेडी रेकनर) दहा ते वीस टक्के एवढी वाढ मुद्रांक व नोंदणी विभागाने केली आहे. ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिकांत सर्वाधिक २० टक्के, मुंबईत १४.८१ टक्के तर पुणे विभागात सरासरी १४.२० टक्के वाढ झाली आहे.

विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0
चाकणजवळील कडाचीवाडी येथे घरातील छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. आरती उर्फ मोना संजय खांडेभराड (वय १७, रा. कडाची वाडी ता. खेड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

कात्रज परिसरातील पाणी गळतीकडे दुर्लक्ष

$
0
0
भारती विद्यापीठामागील सरहद चौकातील रिक्षा थांब्या शेजारील नळजोडामधून पाणी गळती होत असून, रोज सकाळी मोठ्याप्रमाणात पाणी वाया जात आहे. वर्दळीच्या मार्गावरील पाणी गळती दुरुस्तीला होणारा विलंब पादचाऱ्यांसह वाहतुकीला धोकादायक ठरत आहे.

मिठाई कारखान्यास येरवड्यात विरोध

$
0
0
कळस येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानदाराने मिठाई बनविण्याच्या कारखाना सुरू केल्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध आजारांचा त्रास होऊ लागला आहे. कारखान्याच्या भट्टीतून येणाऱ्या तेलकट धुरामुळे परिसरातील अनेक नागरिकांच्या घरांना काजळी लागली आहे.

औंधमध्ये तळीरामांनी पेटविला बसस्टॉप

$
0
0
औंध येथील नागरस रस्त्यावरील बसस्टॉप तळीरामांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पेटविला. आगीची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विजवली. दरम्यान, आगीमुळे स्टॉपजवळील विद्युत ‘डीपी’चे नुकसान झाले.

सासवड रुग्णालयाच्या अधीक्षकांचे निलंबन?

$
0
0
शनिवारी रात्री पोलिस गाडी अपघातामध्ये मृत झालेल्या ३ पोलिसांचे शवविच्छेदन करण्यासाठी सासवड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. धनराज परदेशी वेळेत हजर झाले नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत कारवाईचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘फारमॅकोलॉजी’ कोर्सनंतर अॅलोपॅथीची प्रॅक्टिस शक्य

$
0
0
राज्य सरकारने कायद्यात बदल करून होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली आहे. येत्या दोन महिन्यात नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे होमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘फारमॅकोलॉजी’ अभ्यासक्रम सुरू होईल.

तिजोरी फोडून पाच लाखांची चोरी

$
0
0
के. के. मार्केट येथील मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील तिजोरी उचकटून चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपयांची रोकड चोरली आहे. कंपनीत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पाहून त्यांनी फुटेज रेकार्ड होणारा डीव्हीआरही चोरल्याने पोलिसांसमोर तपासासाठी अडचण उभी राहिली आहे.

मंगळसूत्र चोरांना पोलिस कोठडी

$
0
0
दागिन्याला पॉलिश करण्याच्या बहाण्याने कर्वे रोड परिसरातील एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धुळीत पडलेल्या १६६ बस मार्गावर

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (प‌ीएमपी) गेली अनेक महिने किरकोळ दुरुस्तीविना बसडेपोत धूळ खात पडलेल्या १६७ बस दुरुस्त करून मार्गावर आणण्यात आल्या आहेत. मागील १६ दिवसात ‘पीएमपी’ने ही कामगिरी केली असून, यामुळे ‘पीएमपी’च्या दररोजच्या उत्पन्नात वाढ होऊ लागला आहे.

तबलावादक मिरजकर यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ तबलावादक उस्ताद हनीफभाई मिरजकर (वय ७६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, नवाज व रिजवान ही दोन मुले असा परिवार आहे. संगीताची मोठी परंपरा असलेल्या घरात हनीफभाईंचा जन्म झाला.

आता प्रचाराची धूम

$
0
0
पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीच्या प्रचाराची राळ येत्या आठवडाभर उडणार असून, सर्वच राजकीय पक्षांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील स्टार प्रचारक नेत्यांच्या सभा आणि रॅलींचे नियोजन केले आहे.

ज्यांना काही जमत नाही ते राडा करतात

$
0
0
‘अभिव्यक्तीसाठी ज्यांना काही सापडले आहे, ते चांगले काही तरी करतात. ज्यांना काहीच जमत नाही, ते केवळ राडा करतात,’ असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी मांडले.

नाट्य संमेलनासाठी बेळगावकरांना साद

$
0
0
बेळगावला होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनावर कोणाही राजकीय व्यक्तीचा वरदहस्त नसल्याने संमेलनासाठी निधी उभारण्यासाठी बेळगाव शाखेने बेळगावकरांनाच साद घातली आहे.

मेसेंजरच्या जमान्यातही ‘ग्रीटिंग’चा प्रभाव कायम

$
0
0
मेसेंजर आणि अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट’ शुभेच्छा संदेशांच्या आजच्या युगात ग्रीटिंग कार्ड विकत घेऊन शुभेच्छा देण्याची पद्धत अजून तशीच कायम आहे. ज्येष्ठांसह तरुणांकडूनही ग्रीटिंग कार्डना मागणी असल्याचे दिसून आले आहे.

सरकारी शाळांना निधीची कमतरता

$
0
0
एकीकडे शिक्षणहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही भूमिका पुढे केली जात असतानाच, सरकारी शाळांना कायद्याच्या तरतुदी पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधीच उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

सोशल नेटवर्किंग ठरते वादाचे कारण

$
0
0
टेक्नॉलॉजीचा अतिवापर कौटुंबिक वादांचे कारण ठररू लागले आहे. व्हॉटस अप, फेसबुक, इंटरनेटच्या अतिवापरामुळे एकमेकांमधील संवाद कमी होऊ लागल्यामुळे त्याचा नात्यांवर परिणाम होऊ लागला आहे.

‘त्या’ शाळांची मान्यता रद्द

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना उघड झालेल्या शहरातील दोन शाळांची मान्यता धोक्यात आली आहे. शिक्षण खात्याने या शाळांना पाठविलेल्या नोटिसांबाबत दोन्ही शाळांकडून कोणताही खुलासा केला जात नसल्याने, खात्याने या दोन्ही शाळांची मान्यता काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

LBT च्या सुनावणीला व्यापाऱ्यांची ‘दांडी’

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्यात टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आता पालिकेच्या सुनावणीलाही ‘दांडी’ मारण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर सुनावणीला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या वेगाने कमी होत असून, त्याचा फटका पालिकेच्या उत्पन्नावरही झाला आहे.

डिसेंबरमध्ये दुप्पट उत्पन्नाचे ‘बांधकाम’

$
0
0
महिन्याला ५० कोटी रुपयांचा टप्पा पार करु न शकणाऱ्या महापालिकेच्या बांधकाम विभागाने डिसेंबर महिन्यात जोरदार घोडदौड करत २२५ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images