Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कोर्टात साक्षीदारांची पळवापळवी

$
0
0
बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी कोर्टात साक्ष देण्यासाठी उपस्थित असलेल्या हॉर्टिकल्चर मिस्त्रीला महापालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यांनी साक्ष देण्यापूर्वीच भर कोर्टातून गायब केले.

गरीबांच्या हिताची धोरणे

$
0
0
‘केंद्र सरकारची आर्थिक धोरणे केवळ उद्योगांना धार्जिणी नसून गरिबांचे हित पाहणारीही आहेत. त्यासाठीच आम्ही आर्थिक सर्व समावेशकतेला प्राधान्य देत आहोत,’ असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले.

बँकिंग परिषदेवर मोदी इफेक्ट

$
0
0
बँकांच्या व्यवस्थापनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी पुण्यात आयोजित ‘ज्ञानसंगम’ या परिषदेवरील प्रत्येक सत्राच्या अजेंड्यावर असा मोदीइफेक्ट दिसून येत आहे. परिषदेचा विषय अत्यंत किचकट आणि व्यापक असला, तरी ही चर्चा अधिक अनौपचारिक, मनमोकळी व्हावी, यासाठी मोदी यांनीच परिषदेची रूपरेषा ठरवून दिली होती.

कॉर्पोरेट ‘कॅशलेस’ही दहा जानेवारीनंतर बंद

$
0
0
विमा कंपन्यांनी खासगी हॉस्पिटलच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी येत्या दहा जानेवारीपर्यंत न बोलाविल्यास वैयक्तिक ‘कॅशलेस’ सेवेनंतर आता शहरातील सर्वच हॉस्पिटलांमध्ये सुरू असलेली ‘कॉर्पोरेट कॅशलेस’ सेवाही कायमचीच बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात १४ हजार CNG रिक्षा

$
0
0
गेल्या तीन वर्षांत पालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा फायदा घेत शहरातील १४ हजार रिक्षाचालकांनी सीएनजी किट बसवून घेऊन पर्यावरण रक्षणाला हातभार लावला आहे.

१३९ कंपन्यांना नोटीस

$
0
0
पर्यावरण आणि प्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षभरात १३९ केमिकल, डिस्टीलरी आणि साखर कारखान्यांना नोटीस बजावल्या आहेत. याशिवाय एका कंपनीला बंद करण्याची नोटीसही देण्यात आली आहे.

बँकिंग क्षेत्रात बदलाचे वारे

$
0
0
‘आर्थिक विकासाचे उद्दिष्ट वेगाने साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्रात व्यापक बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच्या विविध समित्यांच्या अहवालांचा ‘ज्ञानसंगम’ परिषदेत सविस्तर अभ्यास करून ठोस कृती आराखडा तयार करण्यात येईल,’ अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव डॉ. हसमुख आढिया यांनी शुक्रवारी दिली.

नानाचा परिवर्तनाचा संवाद

$
0
0
लोकांना आपला आधार वाटायला हवा असे कृत्य करा,’ अशा शब्दांमध्ये संवाद साधून सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी तरुणाईची मने जिंकली.

शिवतारे लिफ्टमध्ये अडकले

$
0
0
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे शुक्रवारी सायंकाळी पालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले. महापालिकेच्या वतीने नव्याने नुतनीकरण करण्यात आलेली लिफ्ट अचानक अडकल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

मोदींसाठी रस्ते चकाचक

$
0
0
पुणे शहरातील रस्ते, त्यावरील खोदाई अन् डागडुजी याकडे बहुतेकवेळा दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेने एनआयबीएम आणि परिसरातील रस्ते मात्र एकदम चकाचक ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी या परिसरात येणार असल्याने रस्त्यांचा दर्जा तातडीने सुधारण्यात आला आहे.

विज्ञानधुरीण हरपला

$
0
0
अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या यशाचे एक शिल्पकार, देशाच्या विज्ञान धोरणाला आकार देणारे सल्लागार, मान्सूनच्या अंदाजासाठीच्या मॉडेलचे धुरीण आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वसंतराव गोवारीकर (८१) यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

पिफःतनुजा,शत्रुघ्न सिन्हाचा सन्मान

$
0
0
भारतीय सिनेसृष्टीत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा तसेच ज्येष्ठ कवी-गीतकार ना, धों. महानोर यांना या सोहळ्यात ‘पिफ विशेष गौरव सन्मान २०१५’ने गौरविण्यात येणार आहे.

महास्वच्छता अभियानाला सुरूवात

$
0
0
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी स्वच्छतेचे व्रत हाती घेऊन नागरिकांमध्ये त्याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्ह्यात राबविलेल्या महास्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सराईत वाहनचोराला सणसवाडीत अटक

$
0
0
वाहतुकीचे नियमन करत असताना वाहतूक पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला पकडले. या प्रकरणी फिरोज सलीम गुदडवात (वय ३५, रा. सणसवाडी, ता. शिरूर) याला पकडले. फिरोज हा सराईत वाहनचोर आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

संशयातून पत्नीचा खून; पतीची आत्महत्या

$
0
0
मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वत: आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. कोथरूडमधील किष्किंधानगर येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

पोलिस कर्मचाऱ्यावर लाचप्रकरणी गुन्हा

$
0
0
पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे काम करून देण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशनमधील एका पोलिस कर्मचाऱ्यासह आणखी एकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

‘मनी लॉँडरिंग’ प्रकरणी २१ जणांवर गुन्हा

$
0
0
‘मनी लॉँडरिंग’ केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणावळ्यातील उद्योजक, व्यापारी, पोलिस, राजकारण्यांसह काही नगरसेवकांचा समावेश आहे.

पालिकेची कचरा नियमावली धूळ खात

$
0
0
पालिकेत आणि राज्यात पूर्वी विरोधात असणाऱ्यांनी सत्ता येताच, कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्याचे वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले असले, तरी पालिकेच्या घनकचरा विभागाने त्यासाठी तयार केलेली उपविधी मात्र अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

वर्गीकरणानंतर होईल ८० टक्के कचरा नष्ट

$
0
0
ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत कठोर पावले उचलल्यास ८० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावता येणे शक्य असून, पालिकेने त्यासाठी पुढाकार घेण्याचे बंधन पालकमंत्र्यांनी घालावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे.

काश्मीरच्या महिलांसाठी सरहदचा ‘आश’ प्रकल्प

$
0
0
जम्मू-काश्मीरमधील हिंसाचाराचा सर्वाधिक फटका बसलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी ‘लिज्जत’च्या धर्तीवर ‘आश’ (आशा) या प्रकल्पाची आखणी केली असून,या प्रकल्पांतर्गत पहिले विक्री केंद्र सरहद भवन येथे लवकरच सुरू होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images