Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे मेट्रोला विलंब नाही

$
0
0
शहरातील मेट्रो प्रकल्प लांबविण्याचा कोणताही विचार नसून, पुणेकरांसाठीची मेट्रो स्वस्त आणि दोषमुक्त असावी, यासाठीच एकदा अंतिम चर्चा केली जाणार असल्याचा पुनरूच्चार शहराचे खासदार अनिल शिरोळे यांनी शुक्रवारी केला.

‘चाणक्य’च्या वास्तूचे लोकार्पण दलाई लामांच्या हस्ते

$
0
0
चाणक्य मंडल परिवाराच्या वारजे येथील नूतन वास्तूचे लोकार्पण नोबेल पुरस्कार विजेते तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे, अशी माहिती ‘चाणक्य’चे संस्थापक माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली.

आरोग्याचा थकित निधी देण्याची मागणी

$
0
0
केंद्र सरकारच्या आरोग्य योजना राबविताना, त्याअंतर्गत मिळणारा राज्य सरकारच्या अनुदानचा वाटा गेल्या काही वर्षांपासून थकित राहिला असल्याने ही रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेने राज्य सरकारला केली आहे. शहरातील साथीच्या रोगांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निधी आरोग्य विभागाला त्वरेने द्यावा, असा आग्रह धरण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

$
0
0
मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सोळा टक्के आरक्षण देण्याच्या भाजप-शिवसेना युतीच्या सरकारचे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

अजूनही ४० टक्के जाहिरात फलक अनधिकृत

$
0
0
शहरातील पावणेचारशे अनधिकृत जाहिरात फलकांपैकी अद्यापही ४० टक्क्यांहून अधिक अनधिकृत जाहिरात फलक शहराच्या विद्रुपीकरणात भर घालत असून, त्यातून पालिकेचेही नुकसान होत आहे. या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली जात असल्याचा दावा पालिकेने केला असला, तरी अनधिकृत जाहिरात फलकांची संख्या कित्येक पटींनी अधिक असण्याची शक्यता आहे.

अठराशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

$
0
0
कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातर्फे ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या घाऊक दुकानदारांवर आणि त्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून शनिवारी एका दिवसात ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत अठराशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

चित्रपट महामंडळाविरोधात उपोषणाचा इशारा

$
0
0
मराठी चित्रपट महामंडळातील गैरकारभाराविरोधात कोल्हापूर येथे १ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा अखिल भारतीय मराठी चित्रपट नाट्य व्यावसायिक कृती समितीने शनिवारी दिला. सध्याचे अध्यक्ष विजय पाटकर यांची निवड बेकायदेशीर असून, त्यांनी त्वरित या पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

नऊ जानेवारीपासून स्वरझंकार महोत्सव

$
0
0
व्हायोलिन अकादमीतर्फे आयोजित केला जाणारा स्वरझंकार संगीत महोत्सव यंदा नऊ ते ११ जानेवारीदरम्यान होणार आहे. रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या महोत्सवातून रसिकांना गायन आणि वादनाची अनोखी पर्वणी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापनदिनानिमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमांमधीलच हा एक कार्यक्रम आहे.

‘माझे जंगल लोक सहभागातून’चा जागर

$
0
0
सह्याद्रीच्या पर्वत रागांमधील वेगाने नष्ट होत असलेल्या खासगी जंगलाला वाचविण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने अनोखा उपक्रम घेतला आहे. चिपळूणजवळील जंगल वाचविण्यासाठी संस्थेतर्फे ‘माझे जंगल लोक सहभागातून’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

‘टिंबक्टू’ ने होणार ‘पीफ’चे उद्घाटन

$
0
0
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन ‘टिंबक्टू’ या फ्रान्सच्या सिनेमाने होणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे आयोजित हा महोत्सव ८ ते १५ जानेवारी दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड इथे होत आहे.

गावोगावी फुलवणार औषधी वनस्पतींचे बगीचे

$
0
0
आयुर्वेद ही मानवाच्या कल्याणासाठी ऋषीमुनींनी दिलेली देणगी संपूर्ण जगाला देण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच गावोगावी औषधी वनस्पतींचे बगीचे उभारण्याची नवीन योजना राबविण्याचा विचार करणार असल्याचे ‘आयुष’चे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी सांगितले.

तीन-चार जानेवारीला गुलाबपुष्प प्रदर्शन

$
0
0
‘दी रोझ सोसायटी ऑफ पुणे’ यांच्यातर्फे दर वर्षी आयोजित करण्यात येणारे हिवाळी प्रदर्शन येत्या तीन आणि चार जानेवारीला टिळक स्मारक मंदिर येथे भरवण्यात येणार आहे. रोझ सोसायटीचे हे ९५वे गुलाब प्रदर्शन आहे. प्रदर्शनात यंदा ७५ विभाग असून, नवोदितांचा स्वतंत्र विभाग असेल.

नववर्ष स्वागतासाठी पहाटे पाचपर्यंत चिअर्स!

$
0
0
नवीन वर्षांच्या स्वागताच्या पार्ट्यांचा जल्लोष यंदा पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहे. डीजेचा दणदणाट, बेभान नृत्य आणि मद्याचे भरलेले प्याले याचा अंमळ आनंद लुटण्यासाठी तळीरामांना ही पर्वणीच ठरणार आहे. मुंबई व ठाण्यापाठोपाठ पुण्यात प्रथमच पहाटेपर्यंत नववर्ष स्वागत पार्ट्यांचे सेलिब्रेशन होणार आहे.

‘अमोल’ यशाकडे सरकारची डोळेझाक

$
0
0
‘बहारदार सृष्टीचा नजराणा दृष्टीत साठवणं माझ्या नशिबी नाही. तरीही त्याचं दुःख न करता मी मनःचक्षूंपुढे वेगळ्या वाटेचं उद्दिष्ट ठेवलं. तशी वाट शोधून, त्यावर धडपडत का होईना, पण चालायला शिकलो. एवढंच नव्हे, तर अगदी दृष्ट लागेल एवढं यशही मिळवलं; पण मदत तर दूरच, साधं तोंड भरून कौतुक करण्याच्या बाबतीतही डोळेझाक केली गेली.

अंकिताने संपविला तेरा वर्षांचा वनवास

$
0
0
दोन आठवड्यांपूर्वीच भारताचा अव्वल टेनिसपटू लिअँडर पेसकडून कौतुकाची थाप मिळालेल्या अंकिताने रैनाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. अंकिताने ब्रिटनच्या कॅटी डुन्नेला पराभूत करून आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी तोटा भरून द्यावा

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (बस) पालिका हद्दीबाहेर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीत अनेक ठिकाणी जात असल्याने संचलनातील तूट भरून काढण्यासाठी संबंधित नगरपालिका आणि जिल्हा परिषदांनी आपला वाटा उचलावा, अशी मागणी केली जात आहे.

‘राम के नाम’ला पुन्हा ‘हे राम’

$
0
0
महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. राज्यात हिंदुत्ववादी पक्षांचे सरकार आल्याच्या पार्श्वभूमीवर, अयोध्येत राम मंदिर उभारण्याची विश्व हिंदू परिषदेची मोहीम आणि बाबरी मशिद पाडली गेल्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलीवर भाष्य असलेल्या आनंद पटवर्धन यांच्या ‘राम के नाम’ या लघुपटाचा पुण्यातील ‘लॉ सोसायटी’च्या लॉ कॉलेजमध्ये होणारा शो धमक्यांमुळे रद्द करावा लागल्याचे उघड झाले आहे.

साकारले पहिले प्रोशल नेटवर्क

$
0
0
प्रोफेशनल आणि सोशल नेटवर्किंग साइटवर मित्रमैत्रिणी तसेच प्रोफेशनल ओळखींचे नेटवर्क जुळवताना होणारी सरमिसळ टाळण्यासाठी पुण्यातील उत्साही तरुणांनी ‘रिपीन’ हे पहिले प्रोशल नेटवर्क सुरू केले आहे. यामध्ये एकाच अकाउंटवर प्रोफेशनल सहकारी आणि मित्रमैत्रिणींचा ग्रुप स्वतंत्र ठेवता येणार आहेत.

पोलिसांच्या ‘वसुली’साठी पुणेकर वेठीस

$
0
0
शहरात छुपी हेल्मेट सक्ती लागू करून वाहतूक पोलिसांनी शनिवारी तब्बल चार लाख रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईसाठी कर्वे रस्ता व औंध रस्त्यावर घोळक्याने उभे असलेले पोलिस, दंडासाठी अडविण्यात आलेल्या दुचाकी आणि त्यांच्यामागे खोळंबलेली वाहतूक असे चित्र पाहावयास मिळत होते.

रंगली विद्यार्थी वाहतूक संसद

$
0
0
मेट्रो, पार्किंग, रस्त्यावरील सुरक्षा अशा वाहतुकीशी संबंधित विविध प्रश्नांवरील प्रस्ताव...त्यावर रंगलेले वादविवाद, घोषणाबाजी आणि शेवटी मतदानाने दिलेली मंजुरी....अगदी संसदेच्या कार्यपद्धतीची आठ‍वण करून देणाऱ्या वातावरणात ‘विद्यार्थी वाहतूक संसद’ शनिवारी रंगली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>