Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फसवणूक प्रकरणी तिघे अटकेत

$
0
0
व्यवसायासाठी कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवर मनमानी व्याज आकारून आणि व्यावसायात जबरदस्तीने भागीदार करून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे.

बिबवेवाडी येथे मंगळसूत्र हिसकावले

$
0
0
बिबवेवाडी येथील वसंतबाग सोसायटीच्या आवारात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी हिसकावल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणावर हल्ला; १९ लाख लंपास

$
0
0
मॉल आणि खासगी कंपन्यांमधून जमा केलेली रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या तरुणाला अपघाताचा बहाणा करून रस्त्यामध्ये अडवून, त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून चोरट्यांनी त्याच्याकडील १९ लाखांची रक्कम लंपास केली.

बाबूगिरीमुळे खोळंबली ‘हिरकणी’ होस्टेल योजना

$
0
0
महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी दर्जेदार होस्टेल बांधण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी सुरू केलेली ‘हिरकणी’ योजना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बाबूगिरीमुळे बंद पडली आहे.

प्रलंबित प्रश्नांना वाचा

$
0
0
पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांसह जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांना नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी, अतारांकित आणि औचित्याच्या मुद्द्याद्वारे वाचा फोडण्याचे काम तिन्ही आमदारांनी केले.

बसथांब्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त

$
0
0
मॉडर्न हायस्कूल समोरील बसथांब्याची दुरवस्था झाली असून बाकडे मोडल्याने नागरिकांना बससाठी तासन्तास ताटकळत उभे रहावे लागते. मॉडर्न हायस्कूल समोरील बसथांब्याची दुरावस्था झाली असून बसस्थांब्याचा बहुतांश भाग गंजल्याने हा स्थांबा मोडकळीस आला आहे.

पाषाणमध्ये पाण्यावर लाखो रुपये खर्च

$
0
0
पाषाण लिंक रस्ता परिसरातील २० हून अधिक सोसायट्यांना दररोज ९५ हून अधिक टँकर पाणी विकत घ्यावे लागत आहे; तर उन्हाळ्यात हेच प्रमाण २०० हून अधिक टँकर इतके होत असल्याने पाण्यासाठी लाखो रुपये सोसायट्यांचे खर्च होत असल्याची बाब या परिसराच्या सर्व्हेमध्ये दिसून आले आहे.

१६५ बसच्या खरेदीस संचालक मंडळाची मान्यता

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) आणखी १६५ बस खरेदी करण्यास संचालक मंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली.

मालमत्ता शोधण्याचा आदेश

$
0
0
कुख्यात गँगस्टर गजा मारणे आणि त्याच्या चार साथीदारांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. या गुन्हेगारांची स्थावर व जंगम मालमत्ता शोधण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरव राव यांनी हवेलीच्या तहसीलदारांना दिले आहेत.

कुख्यात गुंड गजा मारणेवर मोका

$
0
0
अमोल बधे खूनप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला गुंड गजा मारणेला मोका लावण्यात आला आहे. गजा मारणे आणि रूपेश मारणे या दोघांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपींना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

धार्मिक भावना दुखावल्याने ‘पीके’ विरोधात तक्रार

$
0
0
आमिर खानचा नुकताच प्रसिद्ध झालेल्या पीके चित्रपटाविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या चित्रपटातील काही दृष्ये आणि चित्रीत करण्यात आलेल्या गाण्यांवर बंदी घालावी अशा प्रकारचा अर्ज चिंचवड पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे.

प्रदेशाध्यक्षांना हटवण्याची मागणी

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महिला कार्यकर्त्यांची गळचेपी करून पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांना पदमुक्त करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षातीलच महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.

पालिकेच्या निष्क्रियतेमुळे कचरा प्रश्न चिघळला

$
0
0
शहराचा कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी महापालिकेचीच असून पालिकेच्या निष्क्रियतेमुळे हा प्रश्न चिघळला आहे. त्यामुळे पालिकेनेच हा प्रश्न सोडविला पाहिजे, असे घूमजाव जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे.

‘नोटा’चा पर्याय ‘रिजेक्ट’

$
0
0
देशातील कँटोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) असलेला ‘नोटा’ हा पर्याय काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकीत मतदारांना नकाराधिकार वापरता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आधार कार्डची नोंदणी वाढविणार

$
0
0
देशातील नागरिकांना स्वतंत्र ओळख देणाऱ्या ‘आधार’ नोंदणी मोहिमेला गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी मशिन्सबरोबरच आधार सेंटरची संख्या वाढविण्यात येणार आहे.

उमेदवारांना केंद्राची नोकरी नको!

$
0
0
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (एसएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या वर्गात महाराष्ट्र अजून पिछाडीवरच आहे. उत्तर प्रदेशमधील सहा हजार १८३ विद्यार्थ्यांनी या नोकरभरती परीक्षेद्वारे अर्थार्जनाची संधी साधली असून, २६९१ विद्यार्थ्यांसह महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे.

सिलिंडर घ्या बाजारभावाने

$
0
0
गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेला १ जानेवारीपासून सुरूवात होत असल्याने ग्राहकांना आता बाजारभावाप्रमाणे सिलिंडरचे पैसे मोजावे लागणार आहेत.

भाषिक मोडतोड टाळणार

$
0
0
सध्याच्या काळात मराठी भाषेचे होणारे स्वैर लेखन आणि भाषिक मोडतोड टाळण्यासाठी भाषेच्या जुन्या आराखड्याचा पुनर्विचार करून नवा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

कॅशलेसचा तिढा कायमच

$
0
0
शहरातील लहान मोठ्या हॉस्पिटलमधून वैयक्तिक विमाधारकांची कॅशलेस सुविधा बंद करण्याचा निर्णय अजूनच चिघळला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी हॉस्पिटल असोसिशनच्या पथकाने शुक्रवारी ‘जिप्सा’च्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी चर्चेस टाळाटाळ केली.

शर्तभंगामुळे जमीन सरकारजमा

$
0
0
शैक्षणिक संस्था व मुलींच्या वसतीगृहासाठी भारत दलित सेवक संघ आणि डिस्ट्रिक्ट जज्ज सोसायटीसाठी सुमारे पन्नास वर्षापूर्वी वाटप करण्यात आलेली कर्वेनगरमधील साडेदहा एकर जमीन शर्तभंग झाल्यामुळे सरकारजमा करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images