Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हेल्मेट घातले, तर गाडी सुरू

$
0
0
हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीवरून सध्या पुण्यात बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी लावलेला एक नवा शोध उपयुक्त ठरणार आहे. हेल्मेट घातले नाही, तर टू व्हीलर सुरूच होणार नाही, अशी यंत्रणा इंदापूरच्या एस. बी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे.

मंत्री अडकले लिफ्टमध्ये

$
0
0
कोट्यवधी रुपये खर्चून अद्ययावत नाट्यगृहांची उभारणी करणाऱ्या पालिकेला तेथील मूलभूत सुविधांकडे मात्र पुरेसे लक्ष द्यायला वेळ मिळाला नसल्याने त्याचा फटका शनिवारी थेट केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील दोन मंत्र्यांनाही सहन करावा लागला.

‘ऊर्मीच्या जोरावर समस्या सोडवा’

$
0
0
‘आपल्या आणि पाश्चिमात्य देशांच्या समस्या वेगळ्या आहेत. ते त्यांच्या समस्या सोडविण्यात व्यग्र आहेत. आपल्याकडे वाहतूक, आरोग्य अशा क्षेत्रात अनेक समस्या आहेत. राजकीय परिस्थितीचा विचार न करता तुमची बुद्धी, क्षमता आणि ऊर्मीच्या जोरावर तुम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करा,’ असा सल्ला ‘केपीआयटी’चे अध्यक्ष आणि ग्रुप सीईओ रवी पंडित यांनी रविवारी विद्यार्थ्यांना दिला.

शहीद तुकाराम ओंबाळेंना पुरस्कार

$
0
0
ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या ओंकारेश्वर श्रीमंत चिमाजीअप्पा पेशवे पुरस्कारासाठी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम ओंबाळे यांची निवड करण्यात आली आहे.

किमान तापमानात घट

$
0
0
शहर आणि परिसरात शुक्रवारच्या तुलनेत किमान तापमानात एका अंशाची घट झाली. शहरात शनिवारी ९.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा एका अंशाने कमी होते.

जीप अपघातात ३ पोलिसांचा मृत्यू

$
0
0
रात्रीच्या गस्तीवर असलेली पोलीस जीप सासवडजवळच्या पानवडी घाटात कोसळून झालेल्या अपघातात सासवड पोलीस ठाण्याच्या तीन पोलीस हवालदारांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.

लिफ्ट उद्‍घाटनाचा बनाव

$
0
0
रेल्वेच्या पादचारी पुलाच्या लिफ्टचे उद्घाटन हा रेल्वे अधिकाऱ्यांचा बनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस सोडल्यामुळेच पवारांचे पंतप्रधानपद हुकले

$
0
0
शरद पवार यांनी पुलोदच्या प्रयोगानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पुन्हा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. ते काँग्रेसमधून बाहेर पडले नसते, तर देशाचे पंतप्रधान झाले असते, असा सूर ‘समग्र- शरद पवार’ या चर्चेत शनिवारी उमटला.

‘बालकुमार’ला राजाश्रय कधी?

$
0
0
बालकुमारांमध्ये वाङ्मय आणि वाचनाच्या प्रसाराचे कार्य करत असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन राजाश्रयाच्या प्रतीक्षेत आहे.

चित्रपट महामंडळाविरोधात उपोषण करण्याचा इशारा

$
0
0
मराठी चित्रपट महामंडळातील गैरकारभाराविरोधात कोल्हापूर येथे १ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा अखिल भारतीय मराठी चित्रपट नाट्य व्यावसायिक कृती समितीने शनिवारी दिला. सध्याचे अध्यक्ष विजय पाटकर यांची निवड बेकायदेशीर असून, त्यांनी त्वरित या पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी PMP चा तोटा भरून द्यावा

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (बस) पालिका हद्दीबाहेर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीत अनेक ठिकाणी जात असल्याने संचलनातील तूट भरून काढण्यासाठी संबंधित नगरपालिका आणि जिल्हा परिषदांनी आपला वाटा उचलावा, अशी मागणी केली जात आहे.

कॅबचालकाच्या खुन्याला अटक

$
0
0
कॉल सेंटरची गाडी भाड्याने घेत कार चोरीसाठी कॅब चालकाचा खून करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला विमानतळ पोलिसांनी हडपसर येथे अटक केली. यापूर्वी या गुन्ह्यांत चौघांना अटक करण्यात आली आहे.

मालकाला ४५ लाखांचा गंडा

$
0
0
मालकाने बँकेत भरायला दिलेल्या रक्कमेतील ४५ लाख रुपयांचा अपहार करून नोकराने मालकाचा विश्वासघात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक केल्यानंतर नोकर पळून गेला असून त्याच्याशी संपर्क साधला असता परत फोन केल्यास वाइट परिणाम होतील अशी धमकी त्याने मालकाला दिली आहे.

संरक्षण क्षेत्रातही आता ‘मेक इन इंडिया’वर भर

$
0
0
‘संरक्षणक्षेत्रातील भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी दहा वर्षात स्वयंसिद्धता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

वर्षाला पाच हजार गावांत पाणीसाठ्यांची निर्मिती

$
0
0
राज्यातील गावांमधील टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’अंतर्गत दरवर्षी सुमारे पाच हजार गावांमध्ये विकेंद्रीत पाणी साठे तयार केले जाणार असून, त्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

MIT तील रॅगिंगचा प्रकार दडपणाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0
एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये झालेला रॅगिंगचा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉलेज प्रशासन आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी युवा सेनेने शनिवारी केली.

‘इन्श्युरन्स’च्या फसव्या कॉलना भुलू नका

$
0
0
तुमच्याकडे अमूक एका कंपनीची इन्शुरन्स पॉलिसी आहे ना. त्याच्याच संदर्भात फोन करीत आहोत… तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीचे व्याज बुडते आहे. त्यासाठीच तुम्हाला काही रक्कम भरावी लागणार आहे…

शेतकऱ्याला मारहाण करून शेतमाल हिसकावला

$
0
0
प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजारपेठेतील तरकारी विभागात शेतकऱ्याच्या मालाची चोरी करून, त्यास मारहाण केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

होऊन जाऊ द्या जंगी पार्टी!

$
0
0
नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी नाकेबंदी सुरू केली असतानाच पार्टी संयोजकांकडूनही जय्यत तयारी केली जात आहे. पुणेकरांना पार्टीचा आनंद देण्यासाठी पुण्यातील पंचतारांकित, रेस्तरॉ, क्लब, पबमध्ये थीमनुसार डेकोरेशन केले जात आहे.

हिंजवडी बाह्यवळणमार्गापासून लोणावळ्यापर्यंत हॉटेल फुल्ल

$
0
0
नववर्षाच्या पू्र्वसंध्येसाठी हिंजवडी आयटीपार्क ते लोणावळा या पट्ट्यातील हॉटेल बुक झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हिंजवडी, वाकड येथील अनेक हॉटेलांमध्ये विविध शोज्‌चे आयोजन करण्यात आले आहे, तर लोणावळा येथे प्रायव्हेट पार्टीपासून कुटुंबांनी आत्तापासून गर्दी करण्यात सुरवात केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images