Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिसांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप थांबवा

$
0
0
‘पोलिसांच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढत असून, तो थांबण्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.

करमणूक विभागाकडूनही कारवाईचा बडगा

$
0
0
विनापरवाना कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मुंढवा येथील ‘रिव्हर ह्यु’ हॉटेलच्या आयोजकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या करमणूक कर विभागाच्या वतीने हा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे करमणूक कर अधिकारी गीतांजली शिर्के यांनी सांगितले.

‘व्हॅट’वरील सुनावणी पुढे ढकलली

$
0
0
फ्लॅटवर आकारण्यात येत असलेल्या मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) सुनावणीसाठी सरकारकडून कोणीही उपस्थित न राहिल्याने मुंबई हायकोर्टाने त्याची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे. देवधर खंडपीठाने हा निर्णय गुरुवारी दिला.

करआकारणी रखडली

$
0
0
केंद्र व राज्य सरकारच्या शहरातील कार्यालयांची गेल्या सात वर्षांमध्ये करआकारणीच न झाल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे आढळून आले आहे.

बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी मोतीसिंग मोहता

$
0
0
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी अॅड. मोतीसिंग मोहता आणि उपाध्यक्षपदी अॅड. करण भोसले यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

दोन लाखांची फसवणूक

$
0
0
लॉटरी लागल्याच्या अमिषाने दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, फरासखाना पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुंजवणीचे पाणी न मिळाल्यास आंदोलन

$
0
0
‘दुष्काळी पुरंदरच्या वाट्याचे गुंजवणीचे दोन टीएमसी पाणी मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. १५ सप्टेंबरपासून या योजनांची पूर्तता झाली नाही, तर उपोषण आणि आंदोलन करू,’ असा इशारा पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिला आहे.

चाकाखाली सापड़ून महिला ठार

$
0
0
स्वारगेट (जेधे) चौकात सिग्नलला थांबलेल्या ‘एसटी’बसमधून उतरलेली ६० वर्षीय महिला त्याच ‘एसटी’खाली सापडून ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक सुधारणा कागदावर

$
0
0
वाहतूक पोलिसांनी स्वारगेट चौकातील (जेधे चौक) वाहतूक सुधारणेसंदर्भात तयार केलेला आराखडा कागदावरच राहिला आहे. स्वारगेट चौकातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर चौकातील ‘बीआरटी’ लेन काढण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आज ‘ब्लू मून’चा योग

$
0
0
खगोलप्रेमींसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरणारा ‘ब्लू मून’ योग अर्थात एकाच महिन्यातल्या दुस-या पौर्णिमेचा योग पुणेकरांना शुक्रवारी (आज) संध्याकाळनंतर अनुभवायला मिळणार आहे.

तालमींमध्ये मसाज-सोना सेंटर

$
0
0
पुण्याच्या तालमींमध्ये लवकरच दिसेल मसाज सेंटर आणि सोना स्टिम बाथ घेणारे मल्ल! आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. तालमींच्या लाल मातीत कसरती आणि जोर-बैठकांनी घाम गाळणाऱ्या मल्लांसाठी आता तालमीतच मसाजची सोय होणार आहे. पुणे महापालिकेने तयार केलेल्या क्रीडा धोरणात ही अभिनव कल्पना सुचविण्यात आली आहे.

राज ठाकरे पुणे पालिकेत

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढील आठवड्यात पुणे महापालिकेस भेट देणार असून, शहराच्या विकास आराखड्याबाबत पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

...तर पुण्याची पाणीकपात रद्द

$
0
0
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत अद्याप पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत धरणे पूर्ण भरली नाहीत, तर पुण्याची पाणीकपात कायम ठेवण्यात येणार असल्याचा पवित्रा पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांनी घेतला आहे.

कार-बस अपघात,३ मुंबईकर ठार

$
0
0
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार आणि एका खासगी लक्झरी बसच्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मुकुंद जोगळेकर ( वय- ५२), निखील महेश रिसबूड ( वय-३०, ), महेश रिसबूड ( वय-५२, तिघेही रा. मुंबई ) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

बीडीपी हे रिझर्व्हेशनच

$
0
0
पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील टेकड्यांवर जैवविविधता उद्यानाचे (बायोडायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) रिझर्व्हेशन कायम ठेवण्याची शिफारस याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या समितीने केली आहे. पालिकेने एक मिशन म्हणून या टेकड्या आहे त्या स्वरूपांत जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही समितीने सुचविले आहे.

स्लॅब कोसळून दोन मजूर ठार

$
0
0
फुरसुंगी येथे गंगानगर भागातील रायगड कॉलनीत बांधकाम सुरू असलेल्या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात दोन मजूर ठार झाले आहेत तर, तीन मजुरांनी प्रसंगावधान राखत बाजूला सरल्याने ते बचावले आहेत. फायर ब्रिगेडच्या जवानांनी त्यांची अखेर सुटका केली.

दुर्मिळ मूकपटांच्या डीव्हीडी

$
0
0
‘आवाज आणि गाण्यांच्या धांगडधिंग्यात जगभरात ठेवा असलेले मूकपट मागे पडले होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने (एनएफएआय) घेतलेल्या पुढाकारामुळे मूकपट पुन्हा एकदा प्रकाशात येत आहेत.

कुकडीतील पाण्यासाठी मंत्र्यांचा दबाव

$
0
0
कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाण्यावरून पुणे आणि नगर जिल्ह्यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली असून, या प्रकल्पातील पाणी नगरला शेतीसाठी सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मंत्र्यांकडून मोठा दबाव येत आहे. मात्र, हा दबाव झुगारून नगरला फक्त पिण्यासाठी पाणी देण्याचा पवित्रा शासनाने घेतला आहे.

नगरसेवकाच्या मुलासह तीन जणांना अटक

$
0
0
दौंड येथील युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या मुलासह ‌तीन जणांना गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली. या तिघांवर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टपाल खात्याच्या युनियनचा आंदोलनचा इशारा

$
0
0
टपाल खात्याच्या पुणे विभागात असलेली कर्मचाऱ्यांची कमतरता, उद्दिष्टपूर्तीसाठी कर्मचाऱ्यांवर टाकण्यात येणारा दबाव आणि त्यासाठी सुट्टीच्या दिवशीही करावे लागणारे काम या विरोधात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियनने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images