Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पक्षकारांना मिळणार बेअर अॅक्टची प्रत

$
0
0
कायदा आणि कलमांची माहिती जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांना आता कोर्टातच अधिनियमांच्या प्रती (बेअर अॅक्ट) मिळणे लवकरच शक्य होणार आहे. राज्यातील खंडपीठे आणि प्रत्येक जिल्हा कोर्टातील बार असोसिएशनला अधिनियमांची विक्री करण्याची अधिकृत परवानगी नुकतीच देण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकांना कोर्टातच या प्रती उपलब्ध होऊ शकणार आहेत.

VAT ची आकारणी सरसकट १ टक्क्यांनी व्हावी

$
0
0
‘व्हॅट’ आकारणीतील विषमतेमुळे आणि त्यावर आकारण्यात येणा-या दंडामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे सरसकट एक टक्का दराने व्हॅट आकारणी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी आमदार अनिल भोसले यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

हेल्मेट सक्तीला मनसेचा विरोध

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या भागातील हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविला आहे. सक्तीविरोधात स्वाक्षरी मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पुणे कँटोमेंट बोर्ड विभागाचे उपाध्यक्ष अतिश कु-हाडे यांनी कळविले आहे.

‘राष्ट्रवादी’ आबांच्या पाठीशीच!

$
0
0
गुजरात दंगलीला जबाबदार ठरवून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा राजीनामा का घेतला नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी उपस्थित केला. तसेच, मुंबईतील घटनेप्रकरणी गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी धुडकावून लावली. आर. आर. पाटील पक्षाचे बडे नेते असून, पक्ष त्यांच्या पाठिशी मोठी ताकद उभी करेल, अशी ग्वाही शुक्रवारी त्यांनी दिली.

फ्लॅट फोडून आठ लाखांची चोरी

$
0
0
गेल्या दोन दिवसांमध्ये चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून सुमारे पावणे आठ लाखांचा ऐवज चोरला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी आणि मार्केटयार्ड पोलिस स्टेशनमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदनिकांवरील VAT विरोधात हायकोर्टात धाव

$
0
0
इमारत ही स्थिर मालमत्ता असून, यावर व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (व्हॅट) आकारता येऊ शकत नाही. त्यामुळे फ्लॅट खरेदीवर पूर्वलक्ष्यी पद्धतीने व्हॅट आकरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरूद्ध मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेने मुंबई हायकोर्टात रिट याचिका, तर ‘क्रेडाई’नेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

हॉटेलच्या चवीला महागाईचा तडका

$
0
0
हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशनने शुक्रवारी घेतला. ही दरवाढ येत्या एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

पुन्हा नजराणा भरणे हे अन्यायकारक

$
0
0
सिलिंगची ४८५ एकर जमीन शर्तभंग करून खरेदी केल्याच्या तक्रारीप्रकरणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने नजराणा भरावा लागणे अन्यायकारक आहे, असे लवासातर्फे निकालावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट करण्यात आले आहे.

निवृत्तीची वयोमर्यादा ६२ वर्षे

$
0
0
प्राध्यापकांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेनंतर आता राज्यातील अकृषी विद्यापीठे, संलग्नित तसेच खासगी अनुदानित महाविद्यालयात ग्रंथपालांसह उपग्रंथपाल, सहायक ग्रंथपालांच्या निवृत्तीची वयोमर्यादा साठवरून ६२ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयांच्या ग्रंथपालांना दोन वर्षांचा ‘बोनस’ मिळणार आहे.

बिल्डर पितापुत्रांना सोडले

$
0
0
विमा कंपनीकडून कोट्यवधी रुपये हडपण्याच्या उद्देशाने स्वतःच्या गाडीवर गोळीबार झाल्याचा बनाव रचल्याप्रकरणी पकडलेले नगरचे धनाढ्य बिल्डर शरद मुथ्था व त्यांचा मुलगा निर्मल मुथ्था यांच्यासह पाच प्रमुख आरोपींना पोलिसांनी अचानक सोडून दिल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे.

विजापूरजवळील अपघातात आठ ठार

$
0
0
अधिक मासानिमित्त कुडलसंगम आणि आलमट्टी धरण पाहून सोलापूरकडे परतत असताना तवेरा गाडीला मालट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सोलापुरातील आठजण जागीच ठार झाले. तर, अन्य गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर विजापूर ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

'जयप्रभा'चा व्यवहार रद्द करण्याचा प्रयत्न

$
0
0
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याबरोबर झालेला जयप्रभा स्टुडिओच्या जागा खरेदीचा व्यवहार रद्द करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन या जागेचे खरेदीदार पोपटलाल गुंदेशा यांच्यावतीने त्यांचे बंधू विलास यांनी गुरुवारी दिले. सर्वपक्षीय अंदोलकांच्या झालेल्या बैठकीवेळी गुंदेशा यांनाही नि‌मंत्रित करण्यात आले होते. मात्र पोपटलाल परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांनी बंधू विलास यांना पाठविले होते.

फिरोदिया पुरस्कार

$
0
0
डॉ. टी. व्ही. रामाकृष्णन आणि डॉ. के. विजयराघवन या दोन वैज्ञानिकांना यंदाचा ‘एच. के. फिरोदिया पुरस्कार’ जाहीर झाला आहे. विज्ञानासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. एक ऑक्टोबरला या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे उद्योगपती अरुण फिरोदिया आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी जाहीर केले.

जमिनीच्या सर्वेक्षणासाठी आणखी ११०० सर्व्हेअर

$
0
0
जमिनीचे सर्वेक्षण करुन मोजणी करण्यासाठी राज्यात सुमारे अकराशे नवीन सर्व्हेअरच्या (भू-करमापक) जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांमध्ये हे सर्व्हेअर सरकारी सेवेत रुजू होतील.

…..तरच विद्यापीठाचा दर्जा उंचावेल

$
0
0
‘पुणे विद्यापीठ जागतिक पातळीवर पहिल्या १०० विद्यापीठांत यावे, असे वाटत असेल, तर शिक्षकांनी शिकवण्याच्या आणि संशोधनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केला पाहिजे,’ असा सूर व्यवस्थापन आणि विद्या परिषदेच्या सदस्यांच्या कार्यशाळेत गुरुवारी आळवला गेला.

पर्यावरण अहवाल की कौतुकाची थाप

$
0
0
वृक्षगणनेचे गौडबंगाल, भटक्या कुत्र्यांची गुरगुरती समस्या, उद्यान विभागातील गैरकारभाराची पानगळ आणि पालिकेकडूनच रस्तोरस्ती झालेली अतिक्रमणे...... स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप देत तयार करण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालाच्या सद्यःस्थितीची अशी लक्तरे सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने गुरुवारी वेशीवर टांगण्यात आली.

आव्वाज कुणाचा... एसपी, गरवारे, कमिन्सचा

$
0
0
कमिन्स आणि आबासाहेब गरवारे कॉलेज, एसपी, सीओईपी यांच्यासह नऊ कॉलेजांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्राथमिक फेरीचा निकाल हाती आल्यानंतर आनंदून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या जोरदार चिअरिंगमुळे भरत नाट्यमंदिर दणाणून गेले होते. आता ८ आणि ९ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम फेरीनंतर यंदाच्या करंडकावर हक्क कुणाचा, ते स्पष्ट होईल.

ई-गणेशोत्सव स्पर्धा

$
0
0
आदर्श मित्र मंडळ आणि सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत वेबसाइट आणि ई- गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या उपक्रमांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.

जात पडताळणी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

$
0
0
राखीव प्रभागातून ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांचे जात पडताळणीचे अर्ज स्वीकारण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली‌आहे. १० सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना जात पडताळणीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

बसथांब्यांच्या शेल्टरांना अखेर मुहूर्त

$
0
0
पावसाळा संपत आला असताना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसथांब्यांवर शेल्टर उभारण्यासाठी पुणे कँटोमेंट बोर्डाचे डोळे उघडले आहेत. महिनाभरात या कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. शेल्टरसाठी बोर्डाने तयार केलेले डिझाइन प्रयोजक कंपन्यांना पसंत नसल्यानेच हा प्रश्न रेंगाळला असून, एका कंपनीने तयारी दर्शविल्याने हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images