Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दोन आरोपींची निर्दोष मुक्तता

$
0
0
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय घैसास यांच्या खून प्रकरणातील दोघा आरोपींची सबळ पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्यात अनेक त्रुटी असून हा पुरावा संशयास्पद आहे. सरकार पक्ष या गुन्ह्यामागील कारणही सिद्ध करू शकले नाही, असे निकालात म्हटले आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश अनंत बदर यांनी हा निकाल दिला.

विधी समितीविरूद्ध विधी सल्लागार

$
0
0
विधी समितीच्या सदस्यांनी बैठकीत विधी सल्लागाराला टार्गेट केल्याच्या प्रकरणानंतर महापालिकेत नव्या वादाला तोंड फुटले आहे. महापालिका कामकाज नियमावलीमध्ये विधी समितीच्या बैठकीला विधी सल्लागाराने उपस्थित राहण्याबाबत उल्लेख नसल्याने यापुढे बैठकीला उपस्थित रहायचे की नाही, याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे विधी सल्लागार मंजुषा इधाटे यांनी स्पष्ट केले आहे.

डोळ्यादेखत मरू दिले आपल्या नवजात अर्भकाला

$
0
0
दोन मुली जन्मल्या... त्यापैकी एका दुर्दैवी जिवाचा अंत जन्मतःच झाला. ईश्वरी सत्तेपुढे काय चालणार? जन्मदात्यांवर काय परिस्थिती ओढविली असेल... किमान दुस-या मुलीला तरी वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असतील, असे कुणालाही वाटेल. मात्र, तसे घडले नाही... चक्क जन्मदात्यांनी डॉक्टरांशी संगनमत करून आपल्या दुस-या मुलीलाही अक्षरशः डोळ्य़ादेखत मरू दिले...

राज्य सरकारची डीपीसाठी मुदतवाढ

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीचा प्रारूप विकास आराखडा प्रसिध्द करण्यास राज्य सरकारने पुढील वर्षी एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष चेतन तुपे यांनी गुरूवारी ही माहिती दिली.

भाषा जपण्याची धुरा त्रिमूर्तींवर

$
0
0
ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा दिवस. शुभेच्छांसाठी सतत वाजणा-या मोबाइलमुळे त्यांना दिवसातला पहिला चहा घ्यायला सकाळचे अकरा वाजतात. तत्पूर्वीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे खास त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी आवर्जून आलेले असतात.

ओंकारने घडविला साच्याशिवाय ‘ओंकार’

$
0
0
आपल्या घरात सगळ्यात आकर्षक देखणी मूर्ती आणायची… असा हट्ट घराघरात लहान मुलं करीत असतात. ओंकारनेही काही वर्षांपूर्वी असाच बालहट्ट केला आणि ठरवलं आपण स्वतःच सगळ्यात उत्तम मूर्ती तयार करायची. ओंकारने त्याचे स्वप्न तर पूर्ण केलेच, त्याशिवाय तो इतरांनाही गणेशमूर्ती तयार करून देतो आहे.

प्रभाग : फटका पालिका शाळांना बसणार?

$
0
0
महापालिकेमध्ये राबविण्यात आलेल्या प्रभाग पद्धतीचा फटका महापालिका शाळांच्या कामकाजाला बसण्याची शक्यता आहे. एका प्रभागात दोन नगरसेवक असल्याने शाळा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करायची आणि दैनंदिन खर्चासाठी लागणा-या चेकवर दोन्ही नगरसेवकांच्या सह्या अत्यावश्यक आहेत की नाहीत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सामाजिक संस्था या ऑक्सिजनची बेटं

$
0
0
‘लोकांच्या गरजांची जाणीव ठेवत त्यांच्यामध्ये सद्भावना निर्माण करणे हे खूप मोठे काम आहे. सामाजिक कार्यकर्ते सातत्याने हे काम करत असतात. अनेकांना जगण्याची उर्जा देणा-या सामाजिक संस्था या जणू ऑक्सिजनची बेटेच आहेत,’ असे मत प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पोलंडमधील नाट्यचर्चासत्रात आशियातून डॉ. प्रवीण भोळे

$
0
0
पोलंडमधील अॅडम मॅकिविक्झ विद्यापीठात थोर नाटककार येर्झी ग्रोटोव्हस्की, पीटर ब्रुक आणि युजिनिओ बार्बा यांच्या ‘कलाकाराची कौशल्ये आणि अभिनय पद्धती’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय नाट्यचर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पुण्याचे नाट्यकर्मी डॉ. प्रवीण भोळे यांना निमंत्रित करण्यात आले असून, भारतासह आशियाई देशातून निवड झालेले डॉ. भोळे हे एकमेव नाट्यकर्मी आहेत.

इच्छुकांची जात पडताळणीसाठी धावाधाव

$
0
0
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या तोंडावर जात पडताळणीचे अधिकार जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीकडे आल्याने या समितीला अर्ज तपासण्यासाठी शुक्रवारी मोठी कसरत करावी लागली.

११वी, १२ वी साठी पर्यावरण विषय सक्तीचा

$
0
0
पर्यावरणाविषयी जाणीवीचे ‍वाढते महत्त्व लक्षात घेत, महाराष्ट्र राष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून अकरावी आणि बारावीसाठी पर्यावरण शिक्षण हा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. दोन्ही वर्षांमध्ये प्रत्येकी पन्नास गुणांसाठी हा विषय ठेवण्यात आल्याचे मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे.

‘फ्लावर्स ऑफ कास’ मधून कासचे दर्शन

$
0
0
जैवविविधतेसाठी जगातल्या हॉट-स्पॉटमध्ये नोंद झालेल्या कास पठारावर नक्की आहे तरी काय, तेथील जैविक समृद्धता नेमकी कशी आहे, तेथील रानफुलांसह विविध पैलू उलगडणारे ‘फ्लावर्स ऑफ कास’ हे पुस्तक प्रसिद्ध वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर यांनी लिहिले आहे. येत्या २ सप्टेंबरला पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

महिला अधिका-याला पालिकेत कोसळले रडू

$
0
0
वेगवेगळी कारणे काढून सदस्यांनी टार्गेट केल्यामुळे पुणे महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत एका महिला अधिका-याला गुरूवारी रडू कोसळले. अखेर या अधिका-याने महापौरांकडे तक्रार केल्यानंतर या विषयावर पडदा टाकण्यात आला.

‘लेखक, समीक्षकांचा धर्म वैश्विक’

$
0
0
लेखक आणि समीक्षक कोणत्या धर्माचे, विचारधारेचे प्रतिनिधी नसतात. ते वैश्विक संस्कृतीचे घटक असतात, असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पहिल्याच दिवशी पाच कोटींची वसुली

$
0
0
मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कर आकारणी आणि कर संकलन विभागातर्फे तयार केलेल्या दहा विशेष पथकांनी पहिल्या कारवाईत एका दिवसात पाच कोटी रुपयांची वसुली केली. अडीचशे कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी यापुढे दर बुधवारी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे कर आकारणी आणि करसंकलन प्रमुख हेमंत निकम यांनी स्पष्ट केले.

पश्चिम घाट : नवी समिती कशाला?

$
0
0
पश्चिम घाट जैवविविधता समितीच्या अभ्यासासाठी नवीन समिती नेमण्याऐवजी गाडगीळ अहवालावर ग्रामस्थांबरोबर खुली चर्चा घडवावी आणि त्या भागात विनाशकारी प्रकल्पांना परवानगी देऊ नये, अशी मागणी सोशालिस्ट पार्टीने केली आहे.

शकुंतेश्वराची यात्रा उत्साहात

$
0
0
सातारा जिल्ह्यात कृष्णा काठावर असलेल्या वडुथ या गावातील शकुंतेश्वर मंदिराची पालखी यात्रा श्रावणातील शेवटच्या सोमवारी उत्साहात पार पडली. आजुबाजूच्या गावातील पालख्या आणि भाविकांनी परिसर गजबजून गेला होता.

नारायण शुक्ल यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि जुन्या पिढीतील शिक्षणतज्ज्ञ नारायण गोविंद शुक्ल यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी शिक्षकीपेशाला सुरूवात केली. संवादातून शिक्षण ही संकल्पना शुक्ल यांनी प्रथम राबविली.

‘जोर’मुळे कुस्ती स्पर्धेचा आखाडा

$
0
0
महापालिकेतर्फे घेण्यात येणारी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोणत्या संघटनेमार्फत भरविण्यात यावी, यावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय कुस्तीगीर संघ आणि मामासाहेब मोहोळ अॅकॅडमी या दोन संघटनांनी स्पर्धेचे आयोजकत्व स्वीकारण्यासाठी ''जोर'' लावल्याने याबाबतचा निर्णय पक्षनेत्यांच्या आखाड्यात घेण्याचे महापालिकेच्या क्रीडा समितीने शुक्रवारी ठरविले.

मंदीचे मळभ कॅम्पस प्लेसमेंटवरही

$
0
0
उद्योग क्षेत्रातील मंदीचे मळभ इंजिनीअरिंग कॉलेजांच्या कॅम्पस प्लेसमेंटवरही झाकोळले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कॅम्पसवरील भरती थेट ३० टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे. मंदीच्या या झळा गेल्या वर्षी ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाही बसल्या असून, कंपन्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे ‘जॉइनिंग’ पुढे ढकलले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images