Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गृहमंत्रीही दोषी, राजीनामा हवाच!- राज

$
0
0
'आझाद मैदानाजवळ झालेल्या हिंसाचाराबद्दल पोलिस आयुक्तांएवढेच गृहमंत्रीही दोषी आहेत. त्यामुळे त्यांचाही राजीनामा हवाच', अशी टीका करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा गुरुवारी पुनरूच्चार केला.

जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण संस्थांकडून प्रयत्न

$
0
0
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण प्रेमी संस्थांच्या अजेंड्यावर आता ‘इको- फ्रेंडली गणेशोत्सवा’चा विडा उचलला आहे.

पेट्रोल पंपाजवळ अजूनही ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रवासी थांबे

$
0
0
कारवाई करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या इशाऱ्यानंतर वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंप आणि आजूबाजुच्या आवारात ट्रॅव्हल्स सर्रास उभे राहत असल्याचे गुरुवारी आढळून आले आहे.

होर्डिंग धोरण रखडले, सव्वाशे कोटी अडकले

$
0
0
राज्य सरकारने अद्याप हिरवा कंदील न दाखविल्यामुळे महापालिकेचे होर्डिंग धोरण रखडले आहे. त्यामुळे महापालिकेचा सुमारे सव्वाशे कोटी रूपयांचा महसूल अडकला आहे.

पेटंट एक्झामिनर अभावी बारा हजार अर्ज प्रलंबित

$
0
0
पेटंट मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जांच्या संख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असताना, त्या तुलनेत ‘पेटंट एक्झामिनर’च्या जागा भरण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.

डॉ. घैसास खून खटल्याचा आज निकाल

$
0
0
ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय घैसास यांच्या खून खटल्याचा निकाल आज (शुक्रवार) देण्यात येणार आहे. या केसची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश अनंत बदर यांच्या कोर्टात पूर्ण झाली आहे.

आजींच्या प्रसंगावधानामुळे खुनी हल्ल्यातून महिला बचावली

$
0
0
शेतावरील नोकराच्या नातेवाइक तरुणाने आपल्या साथीदाराच्या मदतीने कोथरूड येथे ज्येष्ठ महिलेवर चोरीच्या उद्देशाने गुरुवारी सकाळी खुनी हल्ला केला. मात्र, शेजारच्या बंगल्यातील आजींनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.

कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा हिशोब द्या

$
0
0
पुणेकरांना एकच वेळ पाणी देत असताना सध्या कालव्यातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा हिशेब जाहीर करावा, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे गुरूवारी केली आहे.

वादग्रस्त प्राध्यापक सक्तीच्या रजेवर

$
0
0
पुणे विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागाच्या प्राध्यापकाने विद्यार्थिनींसोबत केलेला गैरवर्तणूक व प्राध्यापकांमधील बेबनाव प्रकरणी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी अखेर गुरुवारी चौकशी समिती स्थापन केली.

दुचाकीस्वारांवर प्रशासनाची वक्रदृष्टी

$
0
0
पुणे महापालिका आणि कॅन्टोन्मेंट परिसरात दुचाकीस्वारांवर प्रशासनाची वक्रदृष्टी पडली असून, ‘पे अँड पार्क’ योजनेचा भुर्दंड आणि गैरसोयीच्या हेल्मेटसक्तीचा मुकाबला आता करावा लागणार आहे.

राज्यात सर्वाधिक बालमृत्यू पुण्यात

$
0
0
आरोग्याच्या सोयी सुविधा असतानाही मार्च महिन्याअखेरपर्यंत महापालिका असलेल्या २३ शहरांमध्ये पुणे आणि बृहन्मुंबईत सर्वाधिक म्हणजे प्रति एक हजार बालकांमागे २७ मृत्यू झाले आहेत.

मल्टिप्लेक्सला ८० कोटींचा ‘दणका’

$
0
0
करमाफी असताना शहरातील मल्टिप्लेक्स मालकांनी प्रेक्षकांकडून करमणूक कर व सेवाकरापोटी सुमारे ८० कोटी रुपये बेकायदा आकारल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण चित्र

$
0
0
पेरणी झाली पण पाऊस नाही, पाऊस झाला पण चाऱ्याची उगवण नाही, धरणात थोडेफार पाणी दिसते पण गावात प्यायला पाणी नाही... माणसं तहानलेली आणि गुरे भुकेली ! ... अशी दुष्काळजन्य परिस्थिती आहे पुणे जिल्ह्यातील बारा तालुक्यांची.

नो-पार्किंगः राज यांना १०० रु दंड

$
0
0
फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशालीसमोर नो-पार्किंगमध्ये मसिर्डिज बेंझ कार उभी केल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीच्या चालकाला शंभर रुपयांचा दंड भरावा लागला आहे. पण असा दंड भरण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही त्यांना याच रस्त्यावर गाडी बेकायदा पार्किंग केल्याबद्दल दंड झालेला आहे.

राज यांच्या ‘शाळे’त पदाधिका-यांना ‘छडी’

$
0
0
आठ जागांवरून थेट विरोधी पक्ष म्हणून ‘नवनिर्माणा’ची जबाबदारी मिळाली असूनही पक्ष इतरांप्रमाणेच ‘राजकीय’ मार्गाने चालला आहे... शहरात विरोधी पक्षाचे काही अस्तित्व आहे की नाही...? शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर परस्पर निर्णय कसे घेतले जातात... अशा भाषेत खरडपट्टी काढत अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नगरसेवकांची ‘शाळा’ घेतली.

राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत महाराष्ट्राचा सहभाग

$
0
0
‘इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी होणा-या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत महाराष्ट्र राज्य सन २०१४-१५ पासून सहभागी होईल. आम्ही केंद्र सरकारला तसे कळवणार आहोत,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे दिली.

फ्लॅटधारकांना ‘व्हॅट’चा झटका

$
0
0
फ्लॅट खरेदीनंतर अचानक आलेल्या व्हॅट आकारणीच्या नोटिशीमुळे शहरातील लाखो फ्लॅटधारक चिंताग्रस्त झाले असून, येत्या ३१ ऑगस्टपर्यंतच्या मुदतीत व्हॅटची रक्कम कशी भरायची या विवंचनेने त्यांना ग्रासले आहे. व्हॅटची नेमकी रक्कम किती भरायची, त्यावरचे व्याज आणि दंड याची आकारणी कशी झाली अशा अनेक प्रश्नांनी फ्लॅटधारकांचा गोंधळ उडाला आहे.

मैदानात उतरण्याचा आबांचा इशारा

$
0
0
‘नाक कापून अपशकुन दाखविण्याचा प्रयत्न करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र तुम्हाला धक्का देऊन पुढे जाईल,’ अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी काँग्रेससह आपल्या सर्व विरोधकांवर टीका केली. ‘माझ्या विरोधातील कटकारस्थानांना छुपे बळ देणा-यांना आणि उघडपणे हल्ले चढविणाऱ्यांना खरी ताकद दाखवून देईन,’ असा इशाराही त्यांनी दिला.

आयुक्तांच्या आदेशाने जुगार अड्ड्यांवर छापे

$
0
0
पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी गुरुवारी रात्री जुगार अड्ड्यांवर छापे घालण्याचे आदेश दिल्यानंतर धनकवडी, भारती ​हॉस्पिटलच्या पाठीमागे तसेच रविवार पेठेत विविध ठिकाणी छापे घालण्यात आले आहे. पोलिसांनी १२८ जुगार खेळणा-यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

...अन् केसरीवाड्यात पुन्हा घुमला टिळकांचा आवाज!

$
0
0
''आजचा कार्यक्रम गणपती उत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाण गायनाचार्य बखलेबुवांचं गाणं सुरु झालंच आहे. लोकांनी शांतपणे ते ऐकावं अशी माझी इच्छा आहे. कुणी गडबड केली, तर मी ऐकून घेणार नाही''...गाण्याविषयी आस्था दाखवणारा हा भारदस्त आवाज होता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा!
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images