Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बीडीपी झोनिंगचा प्रस्ताव फेटाळला

0
0
महापालिकेच्या हद्दीतील समाविष्ट गावांत ‘बीडीपी’साठी रिझर्व्हेशन न ठेवता त्याचे झोनिंगमध्ये रुपांतर करण्याची संकल्पना याबाबतच्या समितीने फेटाळली आहे. झोनिंगमुळे जमिनीची मालकी मूळ मालकाकडे कायम राहिली असती. याच मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमी आणि संबंधित गावांतील नागरिक यांच्यात संघर्ष होता.

विधान मागे घेण्याची महसूलमंत्र्यांकडे मागणी

0
0
महसूलमंत्र्यांच्या ‘पुणेकर दोनदा आंघोळ करतात’ या विधानाबद्दल आक्षेप व्यक्त करून महसूलमंत्री पुणेकरांच्या बाथरूममध्ये डोकावतात का, असा सवाल भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी उपस्थित केला आहे. महसूलमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घेऊन पुणेकरांची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष प्रा. विकस मठकरी आणि पालिकेतील गटनेते अशोक येनपुरे यांनी केली आहे.

नर्सिंग कॉलेजला लाखोंचा भुर्दंड

0
0
स्वतंत्र हॉस्पिटलची सुविधा नसलेल्या खासगी नर्सिंग कॉलेजमधील शिकाऊ नर्सेसना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये द्याव्या लागणाऱ्या शुल्कात बारा पटींनी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक खाटेसाठी एका विद्यार्ध्यामागे प्रशिक्षणासाठी दोन रुपयांवरून पंचवीस रुपये शुल्क आकारणी करण्यात येत आहे.

‘एक्मो’ मुळे मिळाली नवसंजीवनी

0
0
हृदयविकाराचा तीव्र झटका, त्यातच फुफ्फुसाचेही कार्य बिघडल्याने अत्यावस्थ झालेल्या पेशंटला तब्बल दहा दिवस शरीराबाहेर रक्त शुद्धीकरण करून (एक्मो) नवसंजीवनी देण्याची किमया दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी नुकतीच साधली. अशा प्रकारच्या उपचारामधील ही पुण्यातील पहिलीच यशस्वी केस असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

हत्ती गणपती भागात चक्राकार वाहतूक

0
0
टिळक रोडवरील साहित्य परिषदेच्या चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हत्ती गणपती समोरील वाहतूक एकेरी करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी वाहतूक पोलिस करणार आहेत.

पालिकेच्या शिक्षण मंडळाचे बजेट

0
0
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे २०१३-१४ या वर्षीचे बजेट ३४४ कोटी २४ लाख रुपयांचे झाले आहे. गेल्या वर्षीच्या बजेटच्या तुलनेत ९२ कोटी रुपयांची भर पडली आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या एक लाख तीन हजार १८० विद्यार्थी असून, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सुमारे ३५ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.

पुण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत

0
0
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामाला विलंब लागल्याने मध्यवर्ती भागातील पेठांसह शहरातील बहुतांश परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी (३१ ऑगस्ट) विस्कळीत झाला. शनिवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

१५ ऑक्टोबरनंतर पाण्याचे नियोजन

0
0
पुण्यातील पाणीपुरवठ्याचे पुढील वर्षभराचे नियोजन १५ ऑक्टोबरनंतर केले जाणार असून, शहरातील सार्वजनिक शौचालयांमध्ये पिण्याचे पाणी न वापरता त्यासाठी बोअरवेल्स खोदण्यात येणार आहेत.

८७ लाखांची चोरी पकडली

0
0
श्यामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कोथरूड आणि सिंहगड रोडवरील शाखेच्या लॉकरमधून चोरीस गेलेले ८७ लाख रुपयांचे दागिने गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने जप्त केले आहेत. या प्रकरणी बँकेतील कस्टोडिअन, असिस्टंट मॅनेजर प्रशांत विजय नलावडे (वय ३७, रा. बोरिवली, मुंबई) याला अटक करण्यात आली आहे.

नजर आणेवारीसाठी ऑक्टोबरची वाट

0
0
दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दुष्काळाच्या सवलतींचा लाभ मिळण्यासाठी नजर आणेवारी होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. नजर आणेवारी येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस असला तरी दुष्काळग्रस्तांच्या पदरात प्रत्यक्ष सवलती पडण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडण्याची चिन्हे आहेत.

पुण्यात ‘क्रीडा नर्सरी’ चळवळ

0
0
पुणे महापालिकेने अंगणवाडयांच्या धर्तीवर महापालिकेच्या इमारती, शाळा, क्रीडांगणे आणि उद्यानांमध्ये ‘क्रीडा नर्सरी’ सुरू करण्याची योजना आखली असून, क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू मुलांना दरमहा ५०० रुपये आहारभत्ता देण्यात येणार आहे.

पुण्यात जोरदार पावसाची शक्यता

0
0
काही भागांत पावसाची जोरदार हजेरी, तर काही भागांत केवळ हलका शिडकावा, असे पावसाळी वातावरण शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम होते. पुढच्या दोन दिवसांत शहराच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

मुजाहिदीनचे कनेक्शन तपासणार

0
0
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटांचा तपास करताना सर्व शक्यातांवर विचार करण्यात येत असल्याचे दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सांगण्यात येत असले, तरी ‘एटीएस’ची पथके मराठवाड्यासह कर्नाटकमध्येही चकरा मारत आहेत. तसेच, कर्नाटक आणि नांदेड येथून ताब्यात घेतलेल्या तरुणांकडेही याबाबत चौकशी करण्यात येत आहे.

एक महिन्याने पुन्हा...तोच थरार!

0
0
डेक्कन जिमखाना बसस्टँड शेजारी एका स्कूटरवर संशयास्पद बॅग आढळल्याने शुक्रवारी सायंकाळी नागरिकांमध्ये घबराट पसरली. गेल्या महिन्यात येथे फुटलेल्या चौथ्या बॉम्बच्या ठिकाणीच ही संशयास्पद बॅग आढळली. उद्या (शनिवारी) जंगली महाराज रोडवरील साखळी स्फोटांना महिना होत असतानाच हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली.

सीसीटीव्हीची घोषणा हवेतच!

0
0
जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाची गंभीर दखल घेत शहरातील महत्त्वाच्या भागात एका महिन्यांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची प्रशासनाने केलेली घोषणा हवेतच विरली आहे.

नगररचना कारभारावरून नगरसेवकांचा गोंधळ

0
0
महापालिकेच्या नगररचना आणि विकास विभागातील अधिकारी केवळ पैशाच्या तालावर नाचतात, ठराविक बिल्डरांसाठी काम करतात, सर्वसामान्यांना टीडीआर वाटप करताना त्रास देतात, टीडीआर विकणा-यांची साखळी तयार झाली असून भूसंपादन प्रक्रियेत अडथळे आणले जात आहेत, अशा शब्दात सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगररचना विभागाच्या कारभारावर शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी गोंधळ घातला.

‘पीएमपी’च्या कंडक्टर भरतीला मुहूर्त

0
0
तब्बल दोन वर्षांनंतर ‘पीएमपी’मधील कंडक्टर भरतीला मुहूर्त सापडला आहे. महामंडळाने दोन वर्षांपूर्वी कंत्राटी कंडक्टर पदासाठी मागविलेल्या अर्जांवर येत्या आठवड्यापासून मुलाखतींची प्रक्रिया सुरू होत आहे. या पदाच्या सोळाशे जागांसाठी तब्बल ३२ हजार अर्ज आले असून ‘पीएमपी’तर्फे दररोज पाचशे जणांच्या मॅरेथॉन मुलाखती घेण्यात येणार आहेत.

आधुनिक विचारसरणीचा अवलंब करावा

0
0
‘बदलत्या काळात शब्द हेच शस्त्र झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाने आधुनिक राहणीमानाबरोबरच आधुनिक विचारसरणीचाही अवलंब करावा,’ असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी शनिवारी केले.

उत्तम बाल साहित्याची गरज

0
0
‘विज्ञान- तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माहितीच्या जाळ्यामध्ये आजच्या मुलांची झालेली अवस्था ही चक्रव्यूव्हात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. या आजच्या अभिमन्यूंना चक्रव्यूहामधून बाहेर काढण्यासाठी त्यांची सद्सदविवेकबुद्धी जागृत करणारे बालसाहित्य निर्माण व्हायला हवे,’ असे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी शनिवारी व्यक्त केले.

नव्या अभ्यासक्रमाचे CBSE कडून कौतुक

0
0
राज्यामध्ये पहिली ते आठवीसाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम देशपातळीवर उत्कृष्ट ठरत असून, सीबीएसईनेही या अभ्यासक्रमाचे कौतुक केले असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images