Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पार्किंग ठेकेदाराकडून लूट

$
0
0
पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्किंग ठेकेदार नागरिकांची सर्रास लूट करत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुचाकी पार्किंगसाठी संबंधित ठेकेदार अनाकलनीय पद्धतीने नागरिकांकडून किमान सहा तासांचे वीस रुपये शुल्क आकारत असल्याने, अर्ध्या वा एका तासासाठी आलेल्या नागरिकांनाही निष्कारण भूर्दंड सहन करावा लागत आहे.

ग्राहकांनी संघटित होण्याची गरज

$
0
0
२४ डिसेंबर हा भारताचा ग्राहक दिन आहे. कारण २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारा अत्यंत सक्षम असा ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक न्यायमंच अस्तित्वात आले आणि खऱ्या अर्थाने ग्राहकांच्या हक्काला कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले.

दख्खनच्या पठाराकडे ‘भोरड्यां’ची पाठ

$
0
0
युरोप, अफगाणिस्तान, पाकिस्तान, कझाकीस्तान या राष्ट्रांतून येणाऱ्या भोरड्या पक्षांनी यंदा अवेळी झालेली गारपीट व हवामानातील बदलांमुळे दखखनच्या पठाराकडे पाठ फिरविली आहे.

रिक्षाचालकाचा लाखमोलाचा प्रामाणिकपणा

$
0
0
दौंडच्या एका व्यापाऱ्याची सव्वा दोन लाख रुपये असलेली बॅग ​पुण्यातील रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाली. अथीनियल सुंदरलाल गायकवाड (एमएच १२ एक्स३०५७) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.

सुट्टीच्या दिवशी ‘स्वच्छ अभियान’

$
0
0
सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटनस्थळी, किल्ल्यांवर मनसोक्त भटकंती करायची आणि संध्याकाळी परतीचा मार्ग धरायचा... अशा उद्देशाने येणारे पर्यटक अनेक असतात; पण किल्ल्यांवरील स्वच्छतेसाठी स्वतंत्र मोहीम आखणारे फार थोडेच!

हिंजवडीत रस्ते गेले खड्ड्यांत

$
0
0
हिंजवडी आयटी पार्क रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या खड्ड्यांतून मार्ग काढताना नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अपुरे रस्ते व खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

जलयुक्त शिवार अभियान

$
0
0
पुणे जिल्ह्यासह राज्यात पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी, जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी येत्या पावसाळ्यात पावसाचे वाहून जाणारे पाणी गावातच अडवून विकेंद्रीत पाणी साठे तयार करण्यात येणार आहे.

कोर्टातील रेकॉर्डसाठीही जागा नाही

$
0
0
कोर्टाच्या कामकाजात कागदपत्रांना अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे अनेक दाव्यांची कागदपत्रे वर्गवारी करुन रेकॉर्ड रूममध्ये ठेवली जातात. कोर्टातील वाढत्या केसेसच्या संख्येमुळे रेकार्ड रूमची जागाही अपुरी पडू लागली आहे.

वेश्या व्यवसायप्रकरणी एजंट महिलेला अटक

$
0
0
वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या एका एजंट महिलेला बनावट ग्राहकाच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हांडेवाडी चौकात अटक केली; तर एका पश्चिम बंगाल येथील तरुणीची सुटका करण्यात आली.

रॉकेट लाँचरपासून दुचाकींपर्यंत सारे काही

$
0
0
दुचाकी गाड्यांमधील छोट्या स्पेअर पार्टस् पासून महागड्या एसयूव्ही गाड्यांच्या स्पेअर पार्टस् पर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वाहनांपासून ते अगदी लष्कराच्या रॉकेट लाँचरपर्यंतच्या नानाविध वाहनांची झलक सर्वसामान्यांना एकाच ठिकाणी मिळवून देणाऱ्या ‘ऑटो एक्स्पो १४’चे गुरुवारी पुण्यात उद् घाटन झाले.

करवाढीला मनसेचा विरोध

$
0
0
पालिकेच्या उत्पन्नाला ओहोटी लागल्याने मिळकतकरात सुमारे १८ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मनसेने विरोध केला. अखेर त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी खास सभा घेण्यात येणार आहे.

उलगडणार शिवकालीन इतिहास

$
0
0
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे येत्या २७ आणि २८ डिसेंबरला ‘किल्ले रोहिडा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील गडावर सापडलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, पारंपरिक-सांस्कृतिक कार्यक्रम, शिवारफेरी, आकाशदर्शन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल दुर्गप्रेमींना या महोत्सवादरम्यान अनुभवायला मिळणार आहे.

ऑनलाइन खरेदीमुळे ‘दुकानदारी’ धोक्यात

$
0
0
कम्प्युटर अँड मीडिया डीलर्स असोसिएशनतर्फे (सीएमडीए) नुकतेच ‘आयटी एक्स्पो २०१४’चे आयोजन करण्यात आले होते. त्याविषयी सीएमडीएचेअध्यक्ष अनिरुद्ध मेणवलीकर यांच्याशी प्रसाद पानसे यांनी साधलेला संवाद.

‘एसटी बचाव’साठी कामगार सरसावले

$
0
0
सुरक्षित रस्ता वाहतूक विधेयकाची भविष्यात अंमलबजावणी झाल्यास खासगी व एसटी वाहतूक समान पातळीवर येऊन एसटीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हॉस्पिटलला पुन्हा ‘कॉल’

$
0
0
‘कॅशलेस’चा तिढा अधिकाधिक क्लिष्ट होत असताना चार विमा कंपन्यांनी मात्र छोट्या हॉस्पिटलना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. ‘प्रेफर्ड प्रोव्हायडर नेटवर्क’ (पीपीएन) योजना स्वीकारण्यासाठी हॉस्पिटलवर दबाव आणण्यात येत असून, त्याला हॉस्पिटल जुमानत नसल्याचे चित्र आहे.

चोरीच्या १२ दुचाकी सापडल्या

$
0
0
पल्सर दुचाकीच्या नंबर प्लेटविषयी शंका आल्याने फरासखाना पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले होते. या संशयितांकडे केलेल्या चौकशीत ते वाहनचोर असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना शहरातील विविध भागातून १२ दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे.

मालमत्तांवरही टाच आणण्याचे प्रयत्न

$
0
0
गँगस्टर गजा मारणेच्या आ​र्थिक नाड्या आळवण्यासाठी पोलिसांनी त्याचे आर्थिक स्रोत उकरून काढायला सुरुवात केली आहे. त्याने कमावलेली मालमत्ता कोठून आली, याचाही तपास सुरू करण्यात आला असून प्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभागाचीही मदत घेण्यास सुरुवात झाली आहे.

डीपी रस्त्यावर ‘नो पार्किंग’चा निर्णय

$
0
0
म्हात्रे पूल ते मातोश्री वृद्धाश्रमादरम्यानच्या राजा मंत्री रस्त्याच्या (डीपी रस्ता) दुतर्फा वाहने लावण्यास (पार्किंग); तसेच वाहने थांबविण्यास (हॉल्टिंग) बंदी घालण्याचा तुघलकी निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

जमिनी माफियांच्या विळख्यात

$
0
0
अठराविश्वे दारिद्र्यात असलेल्या आदिवासींना पैशांचा मोह दाखवून त्यांच्या मालकीची शेकडो एकर जमीन भू-माफियांनी लाटली आहे. गेल्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यातील आदिवासींच्या मालकीची तब्बल १,६४७ एकर जमीन हडपली गेल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या तपासणीत आढळले आहे.

मल्टिप्लेक्स थिएटरचे खेळ

$
0
0
कोरेगाव पार्क भागातील ‘कोरेगाव प्लाझा मॉल’मध्ये असेंब्ली हॉल आणि फुडकोर्टची परवानगी असताना तेथे बेकायदा मल्टिप्लेक्स थिएटर सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images