Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मिळकतकर वसुलीचे आव्हान

$
0
0
शहरातील तब्बल एक लाख ८७ हजार मिळकतधारकांनी ५४३ कोटींचा मिळकतकर थकविला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने आता अशा मिळकतधारकांना नोटिसा बजाविण्याचे काम हाती घेतले आहे.

अखेर बकेट मिळाल्या

$
0
0
ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांना बकेट वाटप करण्यासाठी महानगरपालिकेला अखेर मुहूर्त लाभला आहे. नववर्षात शहरातील तब्बल साडे चार लाख कुटुंबीयांना सहा कोटी रुपये खर्च करून प्रत्येकी दोन बकेटचे वाटप करण्यात येणार आहे.

हत्यारांच्या धाकाने कारचालकाला लुटले

$
0
0
गणेशखिंड रोडवरील गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज ते मूळचंद स्वीटहोम दरम्यान कार चालकाला अडवून हत्यारांच्या धाकाने लुटल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकरा जणांवर मोका

$
0
0
गजा मारणे टोळीतील अकरा जणांवर पुणे पोलिसांनी मोका लावला आहे. अटक आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. यापूर्वी आरोपींना पंधरा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ती पुरेशी असल्याचे स्पष्ट करून कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

७७ लाखांचा तांदूळ, गहू जप्त

$
0
0
स्वस्त धान्य दुकानात (रेशनिंग) विक्री करण्यात येणाऱ्या तांदूळ आणि गव्हाची १६१२ पोती एका व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये सापडली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने कारवाई करत एका व्यापाऱ्यासह चार जणांना अटक केली.

जुळले रक्ताचे नाते

$
0
0
एकाने स्वतःचे ‘स्टेम सेल’ दुसऱ्याला दिले... पण घेणाऱ्या अन् देणाऱ्या या दोघांचीही भेट झाली दीड वर्षांनंतर... त्या वेळी काहीही न बोलताच दोघांच्या डोळ्यांतून अश्रू कोसळले अन् या हृदयीच्या भावना त्या हृदयापर्यंत अलगद पोहोचल्या...

‘आता मी करू तरी काय’

$
0
0
उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीत उत्तरे तपासलीच नसल्याचे दाखवून देणाऱ्या फार्मसीच्या एका विद्यार्थ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या दोन महिन्यांपासून निकालासाठी अडविले आहे. वर्ष वाया जाण्याच्या भीतीने त्या विरोधात विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील क्लार्कपासून टप्प्याटप्प्याने थेट कुलगुरूंकडेही दाद मागून थकल्याने ‘आता मी नेमकं करू तरी काय,’ असा सवाल हा विद्यार्थी करीत आहे.

सव्वाशे उमेदवार अपात्र

$
0
0
निवडणुकीनंतर नियमानुसार महिन्याभरात खर्चाचे हिशेब सादर न केल्याच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील १२८ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या कारवाईमुळे या सर्वांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढता येणार नाही.

आनंद देणारी अखंड संगीतसेवा

$
0
0
मराठी भावसंगीताच्या क्षेत्रात स्थान मिळविणाऱ्या ‘स्वरानंद’ या संस्थेने नुकताच ४४वा वर्धापनदिन साजरा केला. या निमित्ताने संस्थेच्या कार्याचा आढावा घेत आहेत संस्थेचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे.

वीजदरांतही महाराष्ट्र प्रथम

$
0
0
आर्थिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र सध्या तरी शेजारी राज्यांपेक्षा वीजदरांच्या बाबतीत आघाडीवर ठरला आहे. इतकेच नव्हे, तर येत्या फेब्रुवारीपर्यंत आणखी सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या वीज दरवाढीची वीज ग्राहकांवर कोसळण्याची भीती आहे.

एअर एशियाच्या नकाशावर पुणेही!

$
0
0
‘लो कॉस्ट एअरलाइन’ ठरत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या एअर एशिया या विमानवाहतूक कंपनीने बुधवारपासून पुण्यातून सेवा सुरू केली. बेंगळुरू आणि जयपूर या मार्गावरील सेवेने एअर एशियाच्या नकाशावर पुणेही विराजमान झाले.

फुलपाखरू उद्यानात तारांगण कसे?

$
0
0
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून अरणेश्वर भागात उभारण्यात आलेल्या ‘फुलपाखरू’ उद्यानात ‘तारांगण’ कसे करता, यासाठी प्रशासनाने नक्की कुणाची मान्यता घेतली असा प्रश्न महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी उपस्थित केला आहे.

पुण्याच्या सुरक्षेबाबत बैठक

$
0
0
पुणे आणि ​पिंपरी-चिंचवड शहरातील बिघडलेल्या कायदासुव्यस्थेचे पडसाद बुधवारी पुन्हा विधिमंडळात उमटले. शहरातील कायदासुव्यस्थेबाबत सर्व आमदारांची लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

पूर्व पुणे पालिकेबाबत सकारात्मक

$
0
0
‘पायाभूत सुविधा पुरविताना पूर्व पुण्यातील उपनगरांवर पडत असलेला ताण दूर करणे गरजेचे आहे. पुणे महापालिकेत त्या ठिकाणची गावे समाविष्ट करून हा प्रश्न सुडणार नाही. पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका स्थापणे हाच पर्याय आहे. त्याबाबत मी सकारात्मक आहे,’ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मांडली.

पुण्यातही ‘हाय अलर्ट’

$
0
0
पाकिस्तानातील पेशावर येथे आर्मी स्कूलवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरक्षेसाठी ‘१५-पॉइंट’ आराखडा तयार केला असून त्याद्वारे कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, प्रत्येक परिमंडळातील महत्त्वाच्या शाळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

५२ प्रकारची औषधे स्वस्त

$
0
0
डायबेटिस, बीपी, कोलेस्टरॉल, पोटदुखी, खरुज, जखमांसह सलाइनसारख्या वारंवार लागणाऱ्या ‘अॅन्टिबायोटिक’ (प्रतिजैविके) औषधांच्या किंमती ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राइस अॅथॉरिटी’(एनपीपीए)ने कमी केल्या आहेत.

खुलं होतंय ‘आइस’चं व्यासपीठ

$
0
0
सिने-इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यासाठी पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या शॉर्टफिल्म विभागात जास्तीत जास्त टॅंलेट तयार व्हावं, यासाठी दरवर्षी ‘आइस डिजिटल शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’चं आयोजन करण्यात येतं. यंदाही हा फेस्ट होणार असून, त्यासाठी विद्यार्थी आणि खुल्या गटासाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. एंट्री पाठवण्याची अंतिम तारिख २२ डिसेंबर आहे.

‘अक्षरोत्सव’ची सांगता

$
0
0
विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या भेटीनं रंगलेल्या ‘अक्षरोत्सवा’ची गुरुवारी सांगता झाली. शेवटच्या सत्रात डॉ. प्रदीप आपटे यांचं ‘खाद्यसंस्कृती’ या विषयावर व्याख्यान झालं. अन्नाचं उगमस्थान, इतिहास जाणून घेणं किती रंजक असू असतं, याची प्रचिती यावेळी विद्यार्थ्यांना आली.

रंगते आहे ‘महा’नाट्य!

$
0
0
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीस दणक्यात सुरुवात झाली आहे. राज्यभरातून निवडल्या गेलेल्या महाविद्यालयीन संघामध्ये रंगतदार चुरस पाहायला मिळते आहे. दोन दिवसांत नऊ एकांकिका सादर झाल्यात.

मतदान, मतमोजणी होणार एकाच दिवशी

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी घेण्याचा निर्णय निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल ११ जानेवारीला रात्री अकरा वाजेपर्यंत जाहीर होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images