Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आज मैफल ‘शब्द-सुरां’ची

$
0
0
‘त्या तिथे पलीकडे’, ‘खेड्यामधले घर कौलारू’, ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’ यांसारख्या गाण्यांच्या गायिका मालती पांडे – बर्वे आणि पं. ओंकारनाथ ठाकूर यांचे शिष्य असलेले पं. पद्माकर बर्वे या दोन्ही कलावंतांच्या सांगीतिक कारकिर्दीचा मागोवा घेणारा ‘शब्द सूर बरवे’ हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.

एक पाऊलः ऑटिझमकरिता

$
0
0
गेल्या काही वर्षात अनेक स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे आणि ऑटिस्टिक मुलांच्या पालक संघांद्वारे केलेल्या अनेक प्रयत्नांमुळे आज जनमानसात ऑटिझमबद्दलची पुरेशी जनजागृती झालेली आहे.

टाइमपास

$
0
0
आपण मोठ्यांनीच मुलांबरोबर ‘टाइमपास’ करायचा ठरवला तर? त्यांच्याबरोबर त्यांचाच एखादा टीव्हीवरचा कार्यक्रम रस घेऊन बघितला, कुठलेही शिस्तीचे, उपदेशाचे डोस न पाजता धमाल गप्पा-गोष्टी केल्या, मुलाबंरोबर खेळायला, पळायला, टेकडी चढायला गेले, तर लक्षात येईल ‘टाइमपास’ चांगला असतो.

इच्छाशक्तीमुळे वाहतूक सुधारणा

$
0
0
सुमारे ५५ लाख लोकसंख्येच्या अहमदाबादमध्ये ‘बीआरटीएस’ सेवेची अंमलबजावणी करणे तसे सोपे नव्हते. परंतु, लोकांच्या सेवेसाठी खंबीरपणे पाऊल उचलले आणि तोटा सहन करूनही प्रकल्प राबविला.

गजर अन् स्वच्छतेचा जागर

$
0
0
श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी दिनानिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या महोत्सवात श्रीराम नामाचा गजर, स्वच्छतेचा जागर आणि पवनेकाठच्या पक्षांच्या छायाचित्रांचे दर्शन घडले.

कचरा वेचकांना किमान वेतन द्या

$
0
0
कचरा वेचकांना किमान वेतन मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या कागद, काच, पत्रा पंचायतीच्या प्रयत्नांना अखेर यश मिळत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर कचरा वेचक कामगारांना किमान वेतन दिले जावे, अशा सूचना महापौर शकुंतला धराडे यांनी आयुक्त राजीव जाधव यांना दिल्या आहेत.

‘सेमी हायस्पीड ट्रेन हवी पुण्यापर्यंत’

$
0
0
अहमदाबाद-मुंबई मार्गावरील सेमी हायस्पीड ट्रेनचा मार्ग पुण्यापर्यंत वाढविण्यात यावा, अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी नुकतीच रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.

अखेर तिला मिळाले घर..

$
0
0
पतीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्यानंतर सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढले..तर तिलाही या रोगाची लागण झाली म्हणून माहेरच्या लोकांनीही पाठ फिरवली. भाड्याच्या घरात राहण्याचा तसेच उपचाराचा खर्च परवडत नसल्यामळे तिने सासरच्या लोकांविरुद्ध दावा दाखल केला.

वसुलीसाठी मारहाण करणाऱ्यांना कोठडी

$
0
0
व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर अवाजवी व्याज लावूनही कर्जाच्या रकमेसाठी शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना कोर्टाने १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

भूमिहीनांना मिळणार ‘शेतकरी दर्जा’

$
0
0
सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन संपादित होऊन भूमिहीन झालेल्या शेतकरी आणि त्यांचा वारसांना ‘शेतकरी दर्जा’ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तहसीलदार स्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजपचा स्वबळाचा नारा

$
0
0
राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर यापुढील निवडणुका महायुतीतर्फे लढविण्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी पुणे कँटोन्मेंट बोर्डातील भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

पक्के लायसन्स, डोक्याला ताप

$
0
0
प्रादेशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे पक्क्या लायसन्सच्या नवीन पद्धतीमध्ये काम करताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत असून, परीक्षेसाठी आलेल्या नागरिकांचाही त्यामुळे जादा वेळ खर्ची पडत आहे.

‘डीबीटीएल’ला ‘आधार’ची सक्ती नको

$
0
0
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेमध्ये (डीबीटीएल) आवश्यक जोडणीसाठी आधार क्रमांकाची सक्ती नाही. त्यामुळे अशा प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकत्याच देण्यात आल्या आहेत.

रंगले ‘बिनकामाचे संवाद’

$
0
0
व्हॉट्स अॅपवरील गप्पा, नाटक करणारी मुले, राजकीय परिस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करत ‘बिनकामाचे संवाद’ हा नाट्यप्रयोग रंगला. हशा, टाळ्यांची दाद घेतानाच काही प्रसंगामध्ये या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांना अंतर्मुखही केले.

चकचकीत सामाजिक प्रश्नांची नांदी

$
0
0
घरच्या गरिबीचा अडथळा पार करून मॉलमधील चकाचक वातावरणात रोज दहा तास काम करणाऱ्या मॉलमधील मुलींच्या मनावर येणारा अनावश्यक ताण भविष्यातील सामाजिक प्रश्नांची नांदी ठरू शकतो, असा निष्कर्ष ‘स्त्री मुक्ती संघटने’ने नुकत्याच केलेल्या सर्व्हेतून काढण्यात आला आहे.

पर्यटकांचा ओढा ‘सोशल टुरिझम’कडे

$
0
0
िख्रसमस सुट्ट्या जवळ आल्याने उत्साही पर्यटकांना दुबई, सिंगापूर-मलेशियाचे वेध लागलेले असतानाच चंद्रपूरमच्या दुर्गम भागातील हेमलकसा, आनंदवनातील सगळ्या टूर्सेदेखील फुल्ल झाल्या आहेत, एवढेच नव्हे गडचिरोलीतील डॉ. अभय आणि राणी बंग यांची ‘सर्च’ संस्था अगदी अहमदनगरमधील हिवरेबाजारला जाण्याचे नियोजनही अनेकांनी केले आहे.

‘निरोगी आयुष्यासाठी विनोदबुद्धी टवटवीत ठेवा’

$
0
0
‘निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व जीवांमध्ये हास्याचे वरदान केवळ माणसाला लाभलेले आहे. हास्य लोपणे अथवा विनोद बुद्धी क्षीण होणे म्हणजे समाजातील सांस्कृतिक वाटचालीची अधोगती आहे.- मिलिंद जोशी

बदल्यांमुळे अधिकारी धास्तावले

$
0
0
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांची रवानगी थेट विदर्भात करण्यात आल्याने पुण्या-मुंबईत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले महसूल अधिकारी धास्तावले आहेत.

संमेलनाध्यक्ष आज ठरणार

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे बुधवारी (१० डिसेंबर) स्पष्ट होणार आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांची मोजणी करून अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल.

पार्टी करा; पण टॅक्सही भरा

$
0
0
ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन पार्टी करण्यापू्र्वी परवाना न घेतल्यास संबंधित पार्टीचे आयोजक आणि हॉटेलचालकांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images