Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोलकरणींबाबत निष्काळजीपणा घातक!

$
0
0
मोलकरीण पाहिजे अशी वर्तमानपत्रात जाहिरात देवून नोकरीस ठेवलेल्या मोलकरणीने वानवडी येथे लाखो रुपयांचे दागिने चोरल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. घरकाम करणाऱ्या मोलकरणींची घरमालकांकडून कुठलीही माहिती ठेवण्यात येत नसल्याने, अशा प्रकारच्या चोऱ्या वाढत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.

दुबार मतदारांची स्वतंत्र यादी

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या मतदार यादीतील दुबार आणि मृत मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार असून, ती यादी मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राध्यक्षांकडे दिली जाणार आहे. या निर्णयामुळे बोगस मतदानाला आळा बसू शकणार आहे.

भाजप उमेदवारीसाठी भाऊगर्दी

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेने यश मिळवून दिल्यानंतर पुणे आणि खडकी कँटोन्मेंट बोर्डांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे तिकीट मिळण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली.

विनयभंगप्रकरणी आरोपीला शिक्षा

$
0
0
एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नाट्य परिषद शाखांना आर्थिक चणचण

$
0
0
राज्य सरकारकडून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला देण्यात आलेल्या साडेतीन कोटींतील एक रुपयाही परिषदेच्या शाखांना मिळालेला नाही. नाट्य परिषदेने हा निधी कायम ठेव म्हणून ठेवला असल्याने परिषदेच्या राज्यभरातील शाखांना आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे.

इमारती खोदाई रॉयल्टी लागणार नाही

$
0
0
इमारतीच्या बांधकामासाठी केलेल्या खोदाईवर रॉयल्टी भरावी लागणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे खोदाईतील दगडमाती जागेवरच जिरविल्यास बांधकाम व्यावसायिकांना रॉयल्टी भरावी लागणार नाही.

स्कॉलरशिप योजनेचे निकष बदलणार?

$
0
0
कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेच्या वतीने दर वर्षी राबविल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप योजनेचे निकष बदलण्याचा विचार केला जात आहे. स्कॉलरशिपचा फायदा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि त्यासाठी करावी लागणारी तरतूद याचा विचार करता यासाठी काही आर्थिक निकष लावण्याचे संकेत महापौर दत्तात्रय धनकवडे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी यांनी दिले.

कॅबचालकांचे व्हेरिफिकेशन होणार

$
0
0
दिल्ली येथील बलात्काराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा कॅब मालकांना त्यांच्या चालकांचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घेण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात हजारो कॅब चालक असून त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्यात येत नसल्याची माहिती उघड झाली आहे.

शिवसेना सत्तेत जैतापूरचे पुढे काय?

$
0
0
पर्यावरणाच्या मुद्द्यावरून राज्यात अनेक प्रकल्प वादग्रस्त ठरले आहेत. अलीकडील काही वर्षात रखडेलेला जैतापूर प्रकल्प याचे उत्तम उदाहरण आहे. आता तर सरकारमध्ये असलेल्या शिवेसनेचा या प्रकल्पा विरोध तर भारतीय जनता पक्षाचा पाठींबा आहे.

कचरा दगडखाणीत जिरवण्याबाबत चर्चा

$
0
0
शहरातील कचऱ्याचा प्रश्न जटिल होत चालला असताना मोशी, पिंपरी सांडस व वाघोलीतील दगडखाणींमध्ये कचरा जिरवण्याचा प्रस्ताव अजूनही चर्चात्मक पातळीवर आहे. मोशीची सरकारी जमीन व पिंपरी सांडसच्या वन खात्याच्या जमिनींचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवण्यात आला असून, त्यासंबंधी जलद गतीने पाठपुरावा करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.

अनुभवा ‘नक्षत्रांचे देणे’

$
0
0
अजि सोनियाचा दिनु, आनंदवनभुवनी... अशी भावगीते; असं एखादं पाखरू वेल्हाळ, आम्ही ठाकर ठाकर, आला आला वारा, गोमू संगतीनं माझ्या तू… अशी उडत्या चालींची गीते; केव्हा तरी पहाटे, जीवलगा राहिले दूर घर माझे, तरुण आहे रात्र अजुनी अशा प्रेमगीतांसह अनेक भक्तिगीतांमुळे गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सांगीतिक प्रवास ऐकण्याची संधी संगीतप्रेमींना मिळणार आहे.

मेंटल हॉस्पिटलची दुरवस्था

$
0
0
येरवड्यातील १३३ एकर जागेत विस्तारलेल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये अंतर्गत रस्ते, स्वच्छता, पेशंटची सुरक्षा, शौचालये यांसारख्या सोयीसुविधांचे सुमारे सहा कोटी रुपयांचे प्रस्ताव काही महिन्यांपासून सरकार दरबारी धूळ खात पडले आहेत.

उड्डाणपुलाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

$
0
0
इंजिनीअरिंग कॉलेजच्या (सीओईपी) चौकात उभारल्या जाणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे काम करताना कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे, तसेच कॉलेजतर्फे सुचवण्यात आलेल्या विविध उपायांकडे पालिकेने साफ दुर्लक्ष केले असल्याचे उजेडात आले आहे.

प्रवासातील चॉकलेट पडले महागात

$
0
0
पुणे-मुंबई प्रवासादरम्यान बिस्किट आणि चॉकलेट खायला देऊन मुंबई येथील एका व्यक्तीला एसटी बसमध्ये लुटल्याचा प्रकार ३० नोव्हेंबर रोजी घडला. या प्रकाराला बळी पडलेली व्यक्ती त्यानंतर तीन दिवसांनी एका हॉस्पिटलच्या ‘आयसीयू’मध्ये शुद्धीवर आली.

दुचाकीच्या स्वतंत्र ट्रॅकचा फज्जा

$
0
0
गणेशखिंड रस्त्यावर दुचाकी वाहनचालकांच्या सोयीसाठी सोमवारपासून राबवण्यात येणाऱ्या स्वतंत्र ट्रॅकचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. ही योजना जाहीर करणारे आमदार हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला, तर या विभागातील संबंधित वाहतूक पोलिस अधिकारी प्रशिक्षणासाठी मुंबईला गेल्याने ही योजना सुरूच होऊ शकली नाही.

‘तो’ सिनेमा हेमलकसावर नाही

$
0
0
‘बाबांचा फोटो सरकारी कार्यालयात दिसल्यास एक कोटी रुपये देईन’ बाबा गेल्यावर श्रद्धांजलीही वाहण्यात आली नसल्याचे नमूद करून सरकारी कार्यालयात बाबांचा फोटो दिसल्यास एक कोटी रुपये देईन, अशी उपरोधिक टिप्पणीही डॉ. आमटे यांनी केली.

‘लिव्हर’विना दरमहा २९ मृत्यू

$
0
0
अवयवदानाबाबत जनजागृती केली जात असतानाच सर्वसामान्य पेशंटना ती सुविधा मिळवून देण्याचे आव्हान अजूनही कायमच आहे. हे ‘ऑपरेशन’ यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय उपचारांसह प्रशासकीय-कायदेशीर नियमावली आणि आर्थिक आधार मिळवून देणे गरजेचे आहे.

घरगुती वीजदरवाढीचा शॉक

$
0
0
कधी महानिर्मितीमधील तूट, तर कधी पारेषणमधील अडचणींचा सामना सुरू असल्याचा परिणाम थेट वीज वितरणावर होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वीजबिलापोटी जादा रक्कम मोजावी लागत आहे.

सरकारी आदेशाची चालकांकडून बोळवण

$
0
0
कॅब चालक, रिक्षा तसेच मीटर टॅक्सी या वाहन चालकांची माहिती ड्रायव्हर सिटमागे प्रवाशाला दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावी, तसेच या चालकांनी आपल्या छातीवर परिवहन विभागाकडून देण्यात येणारे ओळखपत्र लावावे, या राज्य सरकारच्या आदेशाला अनेक वाहन चालक केराची टोपली दाखवत आहेत.

छोटुकल्या माँटूची गोष्ट

$
0
0
रंगभूमीवरील सर्जनशील लेखक-अभिनेता- दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या संदेश कुलकर्णी याने ‘माँटुकले दिवस’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तीन वर्षांच्या माँटू या मुलाबद्दल त्यांच्या मनात निर्माण झालेल्या कुतुहलातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images