Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आणखी एक ‘ड्रेनेज’ बळी

$
0
0
कामगारांना अपुऱ्या सुविधा महापालिकेच्या ड्रेनेज विभागात काम करणाऱ्या २५० पैकी केवळ ५० कर्मचारी सध्या काम करीत आहेत. या कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा सुविधा व साधने मनपाकडून देण्यात आलेली नाहीत.

कैद्यांचे उत्पन्न दोन कोटीे

$
0
0
राज्यातील कारागृहात विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगणाऱ्या बंदी कैद्यांनी शिक्षेच्या कालवधीत कारागृहातील विविध उद्योगात कामे करून मागील पाच वर्षांत सरकारला जवळपास दोन कोटी रुपयाचे उत्पन्न मिळवून दिले आहे.

सुरक्षेची भिस्त ‘अँड्रॉइड अॅप’वर

$
0
0
ऑफिसबरोबरच इतर वेगवेगळ्या कारणांमुळे रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणाऱ्या महिलांसाठी अँड्रॉइड फोन सध्या ‘बॉडीगार्ड’चे काम करीत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेली मोबाइल सेफ्टी अॅप्लिकेशन्स आतापर्यंत चार लाख महिलांनी डाउनलोड केली आहेत.

तीन हजार जणांना किडनीची प्रतीक्षा

$
0
0
भावनिक अडथळ्यांमुळे ‘ब्रेनडेड’ पेशंट जाहीर केले जात नसल्याने राज्यातील तीन हजार पेशंट किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. किडनी प्रत्यारोपणाअभावी डायलिसिसच्या उपचाराची खर्चिक मात्रा स्वीकारत जीवन जगणाऱ्यांची संख्याही दिवसागणित वाढते आहे.

'एपीएल' अन्नसुरक्षेला कात्री?

$
0
0
महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा योजनेचे पुढचे पाऊल म्हणून पूर्वीच्या राज्य सरकारने दारिद्र्यरेषेवरील लाभार्थींना (एपीएल) रेशनकार्डावर धान्य पुरविण्याच्या योजनेला कात्री लावण्याचा नव्या भाजप सरकारचा इरादा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. सदानंद मोरे विजयी

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली. डॉ. सदानंद मोरे यांना एकूण ४९८ मते मिळाली असून पहिल्या फेरीतच त्यांचा विजय निश्चित झाला.

भाषेच्या क्षेत्रात अतिरेक नको

$
0
0
‘मराठी भाषेची सक्ती करायला हवी किंवा इंग्रजीचे स्तोम माजतेय ही टोकाची भूमिका आहे. हे दोन्ही विषय अंगीकारणे आताच्या काळात शक्य होणार नाही. भाषेच्या क्षेत्रात कोणतीच अतिरेकी गोष्ट करून चालणार नाही,’ अशी भूमिका ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी बुधवारी मांडली.

पुणेकरांच्या माथी हेल्मेटसक्ती का?

$
0
0
आशियाई देशात सर्वाधिक दुचाकी पुण्यात आहेत. पुण्याच्या ‘आरटीओ’च्या नोंदीनुसार पुण्यात आजमितीला सुमारे २० लाख दुचाकी वाहने आहेत. त्यात दररोज ३०० ते ४०० वाहनांची भर पडते. यातील ७५ ते ८० टक्के दुचाक्या रोज रस्त्यावर येतात.

नदीला माता समजून पावित्र्य जपावे

$
0
0
कारखान्यांचे प्रदूषित पाणी सोडण्याऐवजी नदीला माता समजून तिचे पावित्र्य राखावे, असे आवाहन मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे व्यक्त केले.

आईच्या प्रसंगावधानाने वाचला बालकाचा जीव

$
0
0
दोन इमारतींमध्ये मोकळ्या जागेत असलेल्या उघड्या गटारमध्ये पडलेल्या तीन वर्षांच्या बालकाचा जीव त्याच्या आईच्या प्रसंगावधानामुळे वाचला. त्याच्या बहिणीने आरडा-ओरड केल्यामुळे आईनेच धावपळ करून त्याला बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. रें

जलद सेवेला तंत्रज्ञानाची जोड

$
0
0
केवळ जलद नव्हे तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अहमदाबाद येथे ‘बीआरटीएस’ सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एअरकंडिशन बस, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम, रॅपिड टिकेटिंग सिस्टिम, स्मार्टकार्ड सुविधा, सीसीटिव्ही, कंट्रोल सिस्टिम आदींचा वापर करून सुरक्षित सेवा देण्याकडे अहमदाबाद पालिकेने लक्ष दिल्याचे दिसून आले.

मारहाण करणारे चौघे अटकेत

$
0
0
मोबाइल विक्रीच्या व्यवसायात मोठा तोटा झाल्याने ओळखीच्या सावकाराकडून पैसे घेतले; परंतु, या रकमेवर भरमसाठ व्याजदर आकारून दुकानदाराला मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या चार सावकारांना येरवडा पोलिसांनी अटक केली.

स्वीमिंग टँक बनले ‘पांढरा हत्ती’

$
0
0
जलतरण तलाव अर्थात स्विमिंग पूल ही आजच्या राहणीमानाची एक आवश्यक बाब बनत चालली आहे. आज प्रत्येक क्रीडा संकुलामध्ये जलतरण तलाव हा अविभाज्य घटक बनला आहे.

बॅँकेची २९ लाखांची फसवणूक

$
0
0
बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याची भासवून गृहकर्ज म्हणून मिळालेला धनादेश बोगस खात्यावर वटवून पंजाब नॅशनल बँकेची २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी २५ जणांचे अर्ज

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी २५ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामध्ये आरती महाजन आणि करणसिंग मकवानी या विद्यमान नगरसेवकांबरोबरच मंजूर शेख, शैलेंद्र बीडकर आणि संतोष कवडे या विद्यमानांच्या पत्नींचा, तर अंजू मथुरावाला यांचे पती माजी नगरसेवक विनोद मथुरावाला यांचा यात समावेश आहे.

सर्वाधिक मतदानाची नोंद

$
0
0
साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत साध्या पोस्टाने मतपत्रिका पाठवूनही यंदा मतपत्रिका मिळण्याबाबत कोणताही गोंधळ झाला नाही. निर्वाचन अधिकाऱ्यांनी उमेदवारांना सोबत घेऊनच निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवल्याने संमेलनाच्या इतिहासात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली.

सायकलने या, पार्किंग फ्री!

$
0
0
कॉलेजमध्ये पार्किंगसाठी नेमके किती शुल्क घ्यायचे, याची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ठरवून दिली आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांना सायकल पार्किंग विनामूल्य असून, इतर दुचाकी वाहनांसाठी मात्र रोज तीन रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

निर्णयाचा अधिकार नाहीच

$
0
0
भल्यामोठ्या इमारती आणि आकर्षक सजावट असलेल्या चकचकीत मॉलमध्ये तत्पर सेवा देणाऱ्या तरुण-तरुणींना अन्य नोकऱ्यांच्या तुलनेत चांगले पगार दिले जात असले, तरी आर्थिक निर्णयांसाठी त्यांना कुटुंबातील पुरुषांवरच अवलंबून राहावे लागते, असे स्त्री मुक्ती संघटनेने केलेल्या सर्व्हेतून दिसून आले आहे, तसेच चाळिशी उलटल्यावर या मुलींना मॉल्समध्ये कामाला ठेवतील का, की हवाईसुंदरीप्रमाणे त्यांनाही संघर्षात उतरावे लागेल, अशी भीती स्त्री मुक्ती संघटनेच्या सर्व्हेतून व्यक्त झाली आहे.

कॅशलेससाठी अर्थमंत्र्यांकडे धाव

$
0
0
मोठ्या हॉस्पिटलना उपचाराच्या २१ टक्के दरवाढीचा प्रस्ताव देताना छोट्या हॉस्पिटलकडे डोळेझाक करणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधात आता केंद्रीय अर्थमंत्री अरुणजेटली यांच्याकडेच धाव घेण्याचा निर्णय शहरातील छोट्या हॉस्पिटलच्या संघटनेने घेतला आहे.

लिव्हरदान मिळाले; आर्थिक मदतीचे काय?

$
0
0
अवघ्या पंधरा वर्षांच्या युवतीला लिव्हरची गरज असताना महाराष्ट्रात तिला अवयव मिळाले नाहीत. अखेर चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले. लिव्हरदानमुळे तिला जीवदान मिळाले खरे, पण उपचारासाठी आलेल्या २५ लाखांच्या खर्च पेलण्यासाठी आर्थिक मदतीसाठी मात्र एका खासदारासह राज्य सरकारनेच पाठ फिरविली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images