Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भाटघर वनक्षेत्र चौकशीचे आदेश

$
0
0
भाटघर धरण पुनर्वसन प्रकल्पांतर्गतच्या ३६ गावांमधील वनक्षेत्रांची पाहणी व चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल उपविभागीय वन अधिकाऱ्यांमार्फत सादर करण्याच्या सूचना मुख्य वनसंरक्षक जीतसिंग यांनी दिल्या आहेत.

विशेष सभेविरोधात नगराध्यक्षा कोर्टात

$
0
0
भोर नगरपर‌िषदेमध्ये नगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुंदोपसुंदी सुरू असल्यामुळे अखेर प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. त्यामुळे जनहिताच्या प्रश्नांची काही प्रमाणात का होईना तड लागेल, अशी शक्यता ग्रामस्थांना वाटत आहे.

‘सोसायट्यांचा पाणीप्रश्न सोडवण्यावर भर देऊ’

$
0
0
पाषाण-बाणेर लिंक रस्ता परिसरातील सोसायट्यांचे पाणीप्रश्न तसेच अन्य समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आंदोलन करू. तसेच, नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यावर आपण अधिक भर देणार असल्याचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

बारामतीत घातक दारूचा ‘सुकाळ’

$
0
0
उत्पादनशुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे बारामती शहर परिसर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध तसेच बनावट दारूविक्री सुरू आहे. मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या या रसायनयुक्त दारूच्या सेवनामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

पगार साडेअकरा हजार; मिळतात साडेपाच हजारच

$
0
0
महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना दर महिना विशेष भत्त्यासह सर्वसाधारण साडेअकरा हजार रुपये पगार देणे बंधनकारक आहे. असे असतानाही कामगारांच्या हातात प्रत्येक महिन्याला केवळ पाच ते साडेपाच हजार रुपयेच दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

सुपेकर दाम्पत्याची जीवनसाधना

$
0
0
मतिमंद मूल जन्माला आल्यानंतर औषधोपचार केले जातात. तरीही व्यंग दूर झाले नाही तरी त्यावर मात करण्याचा पालक सर्वतोपरी प्रयत्न करतात. परंतु, अशा मुला-मुलींचे संगोपन करणे मानसिकरित्या पालकांना कठीण होऊन बसते.

अतिरिक्त खर्च केंद्राने करावा

$
0
0
भूमिगत मेट्रोसाठीचा खर्च पाहता त्याचे तिकिट दरही सर्व सामान्यांना न परवडणारे असते. त्यामुळे आम्ही काही ठिकाणी भूमिगत व काही ठिकाणी एलिव्हेटेड मेट्रोचा प्रस्ताव ठेवला होता. आता पुण्याची मेट्रो संपूर्ण भूमिगत करायची चर्चा सुरू आहे.

रेशन कार्यालयांत सीसीटीव्ही

$
0
0
शहरातील रेशन कार्यालयांमधील गैरकारभाराला घालण्याबरोबरच एजंटांच्या विळख्यातून ही कार्यालये मुक्त करण्यासाठी ५६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत हे कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

PMPचे तिकीट ऑनलाइन

$
0
0
पीएमपीएमएलमध्ये होणारा तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी ऑनलाइन ई-तिकिट सुविधा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ही सेवा पुरविण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने तयारी दाखविली असून, सादरीकरणानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

‘प्लास्टिकचा राष्ट्रध्वज नकोच’

$
0
0
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात प्लास्टिकचा राष्ट्रीय ध्वज वापरण्यात येऊ नयेत; तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींनी विशेष काळजी घ्यावी, असा आदेश राज्याच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने काढला आहे.

पुणे @ १०.२ अंश

$
0
0
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढल्याने राज्याकडे वाहणारे थंड वारे व राज्यातील कोरडे हवामान यामुळे महाराष्ट्रातही थंडीने बस्तान बसवले आहे. शहरात रविवारी १०.२ अंश सेल्सिअस इतकी यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली.

पुण्याला ‘अच्छे दिन’ येतील का?

$
0
0
शहरातील रस्ते व वाहतूक, मेट्रो, पीएमआरडीएची स्थापना, कचरा समस्या, बेकायदा बांधकामे, बीडीपी अशा महत्त्वाच्या विषयांवर लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली आहेत. ‘अच्छे दिन’ येण्याची स्वप्ने त्यांनी दाखविली आहेत.

रंगला भक्तीसोहळा!

$
0
0
‘मेरे तो गिरीधर गोपाल’, ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’, ‘राम रंगी रंगले’, ‘झणी धाव आता पांडुरंगा’, ‘टाळ बोले चिपळीला’ यांसारखी भक्तिगीतं आणि भजनांनी आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ‘भीमसेनजींचे भक्तिसंगीत’ हा कार्यक्रम रंगला.

लोकसंगीताचा आदर करा

$
0
0
जगप्रसिद्ध गिटारिस्ट व्ही फार्का तुरे नुकताच पुण्यात येऊन गेला. ब्लॅकबेरी आयोजित ‘शार्प नाइट्स’मध्ये त्यानं गिटारवादनानं उपस्थितांना थक्क केलं. या वेळी झालेल्या मनमोकळ्या गप्पा.

नानासाहेबांच्या इतिहासाला उजाळा

$
0
0
नानासाहेब पेशव्यांचे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील योगदान आणि त्या लढ्याच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. निमित्त होतं, हेरिटेज वॉकचं. नानासाहेब पेशव्यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त तुळशीबाग राम मंदिरात या वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं.

शहीद जवान पाटील यांचे कुटुंबीय पुणे भेटीवर

$
0
0
सियाचीन परिसरात देशाचे रक्षण करत असताना बर्फाखाली गाडले गेलेल्या आणि २१ वर्षांनंतर पार्थिव सापडलेल्या हवालदार तुकाराम पाटील यांचे कुटुंबीय दहा डिसेंबर रोजी पुण्यात येणार आहेत.

व्यवसाय बंद का करू नये?

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. त्याअंतर्गत सराफी व्यापाऱ्यांसह काहींना नोटिसही बजावण्यात आल्या असून, आपला व्यवसाय का बंद करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी ‘होऊ दे खर्च’

$
0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या खर्चावर आणि त्यांच्या अपत्यांवर कोणतेही बंधन नसल्याचे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी (८ डिसेंबर) केला.

डॉक्टरांच्या साक्षीसाठी कोर्ट कमिशनर

$
0
0
मोटार अपघाताच्या केसेसमध्ये डॉक्टरांची साक्ष अत्यंत महत्त्वाची असते. मात्र त्यांना व्यस्त कामकाजामुळे कोर्टात हजर होणे शक्य होत नाही. त्यामुळे आता कोर्टच डॉक्टरांकडे जाणार आहे.

सुनेने सासूला कपबशी फेकून मारल्याने गुन्हा

$
0
0
गावावरून मोठ्या हौसेने पुण्यात आपल्या मुलाकडे राहण्यास आलेल्या सासूला रागाच्या भरात सुनेने भांडी आणि कपबशी फेकून मारल्याची घटना सुस रोड येथे घडली. या प्रकरणी सासूने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार सुनेविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images